जळगाव : प्रतिनिधी शहरातील महात्मा फुले मार्केटमधील एका कपड्याच्या दुकानाला अचानक आग लागल्याची घटना मंगळवारी दुपारी १२:३० वाजता घडली. एका दुकानातील आग विझविण्यासाठी अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांना तब्बल दोन तास लागले. फुले मार्केटमधील अतिक्रमणाचा फटका मनपाच्या अग्निशमन विभागाच्या पथकातील कर्मचाऱ्यांनाही मोठ्या प्रमाणात बसला. जर या आगीचे स्वरूप जर मोठे राहिले असते तर मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. फुले मार्केटमध्ये करण श्रावणकुमार तलरेजा यांचे पूजा कलेक्शन नावाने कपड्यांचे दुकान आहे. मंगळवारी दुपारी १२:३० वाजेच्या सुमारास दुकानातील दुसऱ्या मजल्यावर अचानक आग लागली. आगीविषयी मनपा अग्निशमन विभागाला याबाबतची माहिती देण्यात आली. लागलीच अग्निशमन विभागाचा बंब घटनास्थळी पोहोचला. मात्र,…
Author: editor desk
जळगाव : प्रतिनिधी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाला मार्केटमध्ये लोहारा येथून येत असलेल्या रिक्षाला कुसुंबाजवळ खाजगी बसने दिलेल्या धडकेत रिक्षातील महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सकाळी ७वाजता घडली. यात दोन जण जखमी झाले आहेत. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, रत्नाबाई गणेश हिवाये (४०, रा. लोहारा, पाचोरा) असे मयत महिलेचे नाव आहे. रत्नाबाई या लोहारा येथे भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करत होत्या. जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमधील लिलावातून भाजीपाला खरेदी करून, त्या लोहारा येथे घेऊन जायच्या. मंगळवारी त्या गावातील रिक्षातून जळगाव बाजार समितीकडे येत होत्या. कुसुंबा गावाच्या पुढे एका ट्रॅव्हल्सने रिक्षाला दिलेल्या…
मेष राशी श्रीगणेश म्हणतात की, कुटुंब आणि व्यावसायिक कार्यात संतुलन राखल्याने आनंदी वातावरण निर्माण होईल. सध्या आर्थिक लाभाची चांगली शक्यता आहे. विद्यार्थ्यांनीही अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे. नकारात्मक कार्य करणाऱ्या लोकांपासून दूर राहावे; अन्यथा तुमचा स्वाभिमान धोक्यात येऊ शकतो. कोणत्याही कामात जोखीम घेणे टाळा. कामाच्या ठिकाणी सुरू असलेले वाद दूर होतील. आरोग्याची काळजी घ्या. वृषभ राशी श्रीगणेश सांगतात की, आज तुमचे लक्ष एखादे विशेष कार्य पूर्ण करण्यावर असेल. धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यात थोडा वेळ व्यतित केल्याने तुम्हाला मानसिक शांती लाभेल. राजकीय कार्यांपासून दूर राहा. अन्यथा तुमची बदनामी होऊ शकते. विद्यार्थी आणि तरुणांनी अभ्यासासह आपल्या करिअरवर लक्ष केंद्रीत करावे. मुलांसोबत आणि कुटुंबासोबत…
कोल्हापूर : वृत्तसंस्था राज्यात नुकताच ‘छावा’ चित्रपट सुरु असून या चित्रपटाला मोठा प्रतिसाद लाभत असतांना आता इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना जीवे मारण्याची धमकी आली आहे. भूमिका मांडताना ब्राम्हणद्वेष पसरवल्याचा आरोप करत प्रशांत कोरटकर नावाच्या व्यक्तीने फोनवरून धमकी दिल्याची माहिती इंद्रजित सावंत यांनी फेसबुक पोस्टमधून दिली आहे. सावंत यांनी फेसबुकवर संपूर्ण कॉल रेकॉर्डिंग पोस्ट केले आहे. याबाबत माध्यमांशी बोलताना इंद्रजित सावंत यांनी सांगितले की, साधारण १२ वाजता धमकीचा फोन आला होता. ती व्यक्ती शिव्या घालून जातीवाचक बोलत होती. छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख केला. हा महाराष्ट्र पेशव्यांचा होत आहे का? अशी खंत वाटते. राज्याच्या गृहमंत्रालयाकडून संबंधितावर कारवाई करावी. त्याने…
पुणे : वृत्तसंस्था राज्यातील शीतगृहातील मिरचीचा शिल्लक असलेला मुबलक साठा अन् नव्या हंगामातील सुरू झालेली आवक, यामुळे बाजारात मागणीच्या तुलनेत लाल मिरची मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाली आहे. परिणामी, दरात मोठी घसरण झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत भावात किलोमागे तब्बल 20 ते 250 रुपयांनी घट झाली असून, किलोचे भाव 40 ते 400 रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीतील भुसार बाजारात दररोज तीस ते पन्नास किलोंच्या दीड ते दोन हजार पोत्यांची आवक होत आहे. आंध्र प्रदेश, तेलंगण तसेच कर्नाटक भागातून मिरची बाजारात दाखल होत आहे. लाल मिरचीचा हंगाम हा दरवर्षी 15 जानेवारीनंतर सुरू होतो. तसेच, एप्रिल अखेरपर्यंत संपुष्टात येतो. गतवर्षी मिरचीचे…
छत्रपती संभाजी नगर : वृत्तसंस्था गेल्या काही दिवसापासून राज्यात ‘छावा’ चित्रपट मोठ्या चर्चेत आला असताना आता लक्ष्मण उतेकर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून या चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर प्रकाश टाकण्यात आला आहे. औरंगजेबने कसे संभाजी महाराजांना कैद केले, तसेच संभाजी महाराजांना किती क्रूरपणे त्रास दिला. असे असले तरी देखील छत्रपती संभाजी महाराजांनी निर्भयपणे सगळे सहन करत धर्माची व स्वराज्याची विजयी पताका फडकवत ठेवली. असे सगळे असले तरी यात शिर्के घराण्याची बदनामी करण्यात आल्याचा आरोप शिर्के घराण्याने केला आहे. यात आता संभाजी ब्रिगेडनेही शिर्के घरण्याला पाठिंबा दर्शवला आहे. शिर्के घराण्यातील सर्व कुटुंबीय पानशेत धरण परिसरातील शिरकोली गावात कुलदैवत शिरकाई…
जळगाव : प्रतिनिधी शेतात एकटी असल्याचा फायदा घेत एका तरूणाने १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला. ही घटना रविवार दि. २३ फेब्रुवारी रोजी दुपारी १ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात संशयित आनंदा उर्फ भैया वाणी रा. दापोरा याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित आरोपीला अटक करण्यात आली आहे. तालुक्यातील एका गावातील एका शेतात १५ वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. रविवार दि. २३ फेब्रुवारी रोजी दुपारी १ वाजता पिडीत मुलगी ही घरी एकटी असतांना संशयित आरोपी आनंदा वाणी याने अल्पवयीन मुलीचा हात पकडून तोंड दाबून तिचा विनयभंग केला आहे. हा प्रकार पिडीत मुलीने…
भडगाव : प्रतिनिधी तालुक्यातील कजगाव-वाडे मार्गावरील मनमाड कंपनी भागातील पुरातन मनकामेश्वर महादेव मंदिरात दि. २२ रोजी मध्यरात्री चोरट्याने चोरी करत मंदिरातील तांबे-पितळीच्या ८० हजार रुपये किमतीच्या वस्तू लांबवल्या आहेत. हा चोरटा सीसीटीव्हीत कैद झाला आहे. सविस्तर वृत्त असे कि, कजगाव-वाडे मार्गावरील संजय चिला पाटील यांच्या शेतातील पुरातन मनकामेश्वर महादेव मंदिरात दि. २२ रोजी रात्री चोरट्याने तांबे, पितळ यांच्या विविध वस्तू लांबवल्या आहेत. याचं मंदिरात या अगोदरदेखील तीन ते चार वेळेस चोऱ्या झाल्या आहेत. मात्र, एकाही चोरीचा तपास लावण्यात पोलिसांना यश आलेले नाही. काही दिवसांवर आलेल्या महाशिवरात्री पर्वाच्या तीन दिवस अगोदर महादेव मंदिरात चोरी केल्याने शिवभक्तांतून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील भाऊंच्या उद्यानाजवळ एका तरुणाला विनाकारण मारहाण करून त्याच्या खिशातील दीड ते दोन हजार रुपयांची रोकड जबरदस्तीने हिसकावून नेल्याची घटना रविवारी दुपारी १:३० वाजता घडली. याप्रकरणी रात्री १०:०० वाजता रामानंदनगर पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, सुभाष रामराव घुगे (वय ३४, रा. अकोला, ह. मु, आयोध्यानगर, जळगाव) हा तरुण कामाच्या निमित्ताने जळगावात राहतो. रविवारी दुपारी सुभाष हा भाऊंच्या उद्यानाजवळ आला असता, एका अज्ञात व्यक्तीने त्याच्याशी वाद घालत शिवीगाळ करीत मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच त्याच्या खिशातील रोकड हिसकावून पसार झाला. घटनेनंतर सुभाष घुगे यांनी तातडीने रामानंदनगर पोलिस ठाण्यात तक्रार…
जळगाव : प्रतिनिधी जुना खेडी रोड परिसरात महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून चोरी करणाऱ्या संशयित आरोपीला जळगाव पोलिसांनी आसोदा गावातून रविवारी दुपारी २ वाजता अटक केली आहे. गणेश राजेंद्र माळी (वय २९, रा. आसोदा) असे आरोपीचे नाव आहे. सविस्तर वृत्त असे कि, त्याने तीन गुन्ह्यांची कबुली दिली असून, त्याच्याकडून २३ ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र जप्त करण्यात आले आहे. पुढील कारवाईसाठी त्याला शनि पेठ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. सोनसाखळी चोरीच्या वेगवेगळ्या घटनांचा सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक पुराव्याच्या आधारावर तपास सुरू होता. शनिपेठ पोलिसांनी संशयित गणेश राजेंद्र माळी याला…

