Author: editor desk

यावल : प्रतिनिधी तालुक्यातील चिंचोली येथे शेत विहिरीत बकऱ्यांसाठी पाणी भरण्याकरिता गेलेल्या २० वर्षीय तरुणीचा पाय घसरला आणि ती पाण्यात बुडाली. ही घटना मंगळवारी सायंकाळी घडली. मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील चिंचोली येथील प्रज्ञा सुरेश साळुंखे ही तरुणी मंगळवारी बकऱ्यांना पाणी पाजण्याकरिता ती गोठ्यालगत असलेल्या भागवत रामचंद्र पाटील यांच्या शेतात विहिरीवर गेली. दरम्यान, तिचा पाय घसरला असावा आणि ती विहिरीत बुडाली असावी. ती मंगळवारी रात्री उशिरापर्यंत घरी परतली नाही म्हणून कुटुंबाकडून तिचा रात्री शोध घेण्यात आला. विहिरीजवळ बादली मिळून आल्यामुळे त्यांनी रात्री विहिरीत डोकावून पाहिले. मात्र, काहीही आढळले नाही. बुधवारी सकाळपासून विहिरीत शोध घ्यायला सुरुवात करण्यात आली. पोलिस पाटील राकेश साठे, सरपंच…

Read More

मेष राशी श्रीगणेश म्‍हणतात की, आजचा दिवस संमिश्र स्‍वरुपाचा आहे. दुपारनंतर परिस्थिती अनुकूल असेल. तुमच्‍या कौशल्यांचे नातेवाईकांकडून कौतुक होईल. विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळाल्‍याने दिलासा मिळेल. कोणताही निर्णय घाईघाईने भावनेच्‍या आहारी जावून घेऊ नका. यामुळे परिस्थिती आणखी बिकट होऊ शकते. व्यवसायातील कामे थोडी मंदावतील. पती-पत्नीमध्ये सुसंवाद राखला जाईल. आरोग्‍याची काळजी घ्‍या. वृषभ राशी श्रीगणेश सांगतात की, मागील काही दिवसांपासून सुरु असणार्‍या ध्‍येयप्राप्‍तीमध्‍ये आज यश मिळेल. समविचारी लोकांबरोबरील संवादामुळे आत्‍मविश्‍वास वाढेल. नोकरदार महिला त्यांच्या जबाबदाऱ्या योग्यरित्या पार पाडू शकतील. आर्थिक परिस्थितीत काही चढ-उतार जाणवतील. प्रवास टाळणे हितकारक ठरेल. कामाच्या ठिकाणी तुम्ही केलेले बदल खूप फायदेशीर ठरू शकतात. घराच्या व्यवस्थेबाबत पती-पत्नीमध्ये तणाव असू…

Read More

जळगाव : प्रतिनिधी जिल्ह्यातील अनेक ठिकाणी पोलीस प्रशासनातर्फे अनेक कारवाई होत असतांना आता कासोदा पोलीस स्टेशन हद्दीत व परीसरात गांजा विक्री होत असलेबाबत गुप्त बातमीदारामार्फत माहीती मिळाल्याने पोस्टे हद्दीत वेशांतर करुन मागील ५ दिवसांपासुन सपोनि, निलेश राजपुत व त्यांच्या पथकाने गांजा पकडण्यासाठी सापळा रचला होता. सविस्तर वृत्त असे कि, गेल्या चार दिवसापासून अपयश मिळाले होते. परंतु दि.२५ फेब्रुवारी २०२५ रोजी पेट्रोलिंग दरम्यान वनकोठे गावाजवळ सपोनि, निलेश राजपुत पोउनि. दत्तु खुळे, पोहेकों.नंदलाल परदेशी, पोकों समाधान तोंडे, पोकॉलहु हटकर यांना एरंडोल कडुन कासोदा कडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर वनकोठे गावाजवळ एक संशयित इसम त्याचे मोटार सायकलवर प्लास्टीकचे गोणीत गांजा घेवुन जात असल्याची माहीती…

Read More

जळगाव : प्रतिनिधी शहरातील सिंधी कॉलनी परिसरातील बाबा नगरातील रहिवाशी हर्षद नागपाल यांची बुलेट चोरून नेल्याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना पोलीस अधीक्षकांनी दिल्याने एमआयडीसी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या तांत्रिक विश्लेषणाच्या आधारवरून दोन जणांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून चोरीच्या दोन बुलेट हस्तगत करण्यात आल्या आहे.त्यांच्याकडून आणखी चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. सविस्तर वृत्त असे कि, जिल्ह्यांमध्ये मोटरसायकली चोरीच्या घटना वाढत असल्यामुळे पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी ,अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते , उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावित यांनी गुन्हेशोध पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना केल्या…

Read More

पुणे : वृत्तसंस्था राज्यातील अनेक शहरात गुन्हेगारी घटना उघडकीस येत असतांना नुकतेच आता पुण्यातुन एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. शिवशाही बसमध्ये 26 वर्षीय तरुणीवर बलात्कार करण्यात आल्याची संतापजनक घटना घडली आहे. पुण्यातील स्वारगेट परिसरात ही घटना घडली आहे. पहाटे अंधाराचा फायदा घेत नराधमाने तरुणीवर बलात्कार केला अन् पळ काढला. पोलिसांकडून आरोपीचा शोध घेण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही धक्कादायक घटना पहाटे साडेपाच वाजताच्या सुमारास घडली आहे. या प्रकारानंतर पुण्यात एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळातच पोलिसांची पथके आरोपीच्या मागावर असून त्याचा शोध घातला जात आहे. तरुणी पुण्यातून फलटणच्या दिशेने निघाली होती. स्वारगेट एसटी स्टँडच्या परिसरात आल्यानंतर ती एका…

Read More

नाशिक : वृत्तसंस्था राज्यातील अनेक शहरात आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावरच राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला नाशिकमध्ये गळती सुरु झाली आहे. पक्षाचे नेते माजी नगरसेवक नाना महाले यांनी शरद पवार यांची साथ सोडली असून अजित पवारांचे घड्याळ हाती घातले आहे. त्यामुळे शरद पवार गटाला नाशिकमध्ये मोठा धक्का बसला आहे. विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मिळालेलं अपयश लक्षात घेता आगामी पालिका निवडणुकांच्या दृ्ष्टीने महाले यांनी पुन्हा स्वगृही परतण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. मात्र, महाले यांनी पक्षाचे प्रमुख उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास असल्याने आपण हा प्रवेश केल्याचे म्हटले आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी स्वत: ‘एक्स’वर पोस्ट करुन महाले यांच्या राष्ट्रवादी…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात ठाकरे गट व महायुतीमधील नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु असतांना आता भाजपचे मंत्री नितेश राणे यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. भाजपचे मंत्री नितेश राणे म्हणाले कि, उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानी जाणाऱ्या साड्या, परफ्यूम, एसी, पेट्रोलही उमेदवारांकडून दिले जाते. ज्यांना शिवसेनेचा इतिहास माहिती आहे. अशा सर्वांना हे सत्य माहिती असल्याचा आरोप भाजपचे मंत्री राणे यांनी केला आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी नीलम गोऱ्हे यांची पाठराखण करायला हवी, असेही राणे यांनी म्हटले आहे. नीलम गोऱ्हे जे बोलल्या ते सत्य होते. शिवसेनेचा इतिहास ज्यांना – ज्यांना माहिती आहे. त्यात नारायण राणे असतील किंवा एकनाथ…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील स्व.बाळासाहेब ठाकरेंच्या दोन शिवसेनेत चांगलेच राजकारण तापले असतांना नुकतेच दिल्ली येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या एका चर्चा सत्रात शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी ठाकरे गटावर तसेच उद्धव ठाकरे यांच्याविषयी वादग्रस्त विधान केले होते. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत दोन मर्सिडीज दिल्या की एक पद मिळते, असे विधान त्यांनी केले होते. त्यांच्या या विधानावर ठाकरे गटातील नेत्यांनी नीलम गोऱ्हे यांच्यावर टीकेची झोड उठवली. यावर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नीलम गोऱ्हे यांची पाठराखण केली आहे. अंधेरी येथील जाहीर सभेत बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, नीलम गोऱ्हे हे दिल्लीच्या व्यासपीठांवरुन एक वाक्य बोलल्या आता ते व्यासपीठ बरोबर होते…

Read More

जळगाव : प्रतिनिधी व्यावसायिक सुनील झंवर यांच्या वडिलांचे नुकतेच निधन झाले. आजोबांच्या अस्थी हरिद्वार येथे विसर्जित करून घरी परतत असलेल्या सूरज झंवर यांच्या वाहनाला समोरून विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव वाहनाने धडक दिली. अपघातात सूरज झंवर यांच्यासह तिघे जखमी झाले असून चालकाची प्रकृती चिंताजनक आहे. इंदौरजवळील मानपूर येथे सोमवारी रात्री १ वाजता हा अपघात झाला. सविस्तर वृत्त असे कि, उद्योजक सुनील झंवर यांचे वडील देवकीनंदन झंवर यांचे नुकतेच निधन झाले. आजोबांच्या अस्थी विसर्जन करण्यासाठी नातू सूरज झंवर हा मित्र पलाश तोतला आणि आलोक शिवानी यांच्यासह हरिद्वार येथे गेला होता. विधी आटोपून ते दिल्ली रेल्वे स्थानकावर पोहचले असता राजधानी एक्सप्रेस निघून गेले.…

Read More

पाचोरा : प्रतिनिधी तालुक्यातील लोहारा येथे एकाच रात्रीत चोरट्यांनी सात ठिकाणी चोरी करीत पोलिसांसमोर आव्हान उभे केले आहे. लाखो रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला असून यामध्ये पाच दुकाने तर दोन घरांचा समावेश आहे. चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले आहेत. सविस्तर वृत्त असे कि, बसस्थानक आवारात असलेले पवन मेडिकल, सारिका मोबाइल अॅड हार्डवेअर, चौधरी इलेक्ट्रॉनिक्स, ज्योती कृषी केंद्र, नवजीवन किराणा या दुकानांच्या शटरचे कुलूप गॅस कटरच्या सहाय्याने तोडून गल्ल्यातील रोख रक्कम व दुकानातील किमती वस्तू चोरून चोरट्यांनी पोबारा केला. यासोबतच राजेंद्र शेळके यांचे घरही चोरट्यांनी फोडले. कुटुंबीय बाहेरगावी असल्याने तेथे चोरट्यांनी घरातील कपाट उचकटून साहित्य अस्ताव्यस्त केले. मात्र, घरात त्यांच्या हाती काही…

Read More