Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » नशिराबाद उड्डाणपुलावर दुचाकीचा अपघात : एकाचा मृत्यू तर दुसरा गंभीर !
    क्राईम

    नशिराबाद उड्डाणपुलावर दुचाकीचा अपघात : एकाचा मृत्यू तर दुसरा गंभीर !

    editor deskBy editor deskMarch 31, 2025No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    नशिराबाद उड्डाणपुलावर दुचाकीच्या भीषण अपघातात  निंभोरा बुद्रुक तालुका रावेर येथिल जुळ्या भावांपैकी एकाचा जागीच मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी ३१ मार्च रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली आहे. चैतन्य सुपडू फेगडे (वय २६ रा. निंभोरा ता. रावेर) असे मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, रावेर तालुक्यातील निंभोरा बुद्रुक  गावात राहणारा चैतन्य सुपडू फेगडे हा तरुण भाऊ चेतन, आई-वडील यांच्यासोबत वास्तव्याला होता. घरकुल योजने संदर्भातची फाईल च्या कामानिमित्ताने चैतन्य हा जुळवा भाऊ चेतन आणि वडील यांच्यासोबत सोमवारी ३१ मार्च रोजी जळगावला निघाले. दरम्यान चैतन्यचे वडील रिक्षाने पुढे निघाले तर चेतन आणि चैतन्य हे दोघे भाऊ दुचाकी (क्रमांक एमएच १९ इइ १७०२) भुसावळकडून जळगावकडे येण्यासाठी निघाले. त्यावेळी जळगावपासून जवळ असलेल्या नशिराबाद गावातील उड्डाणपुलावर दुचाकीवरील ताबा सुटल्याने त्यांची दुचाकी डिव्हायडर जोरदार धडकली या अपघातात चैतन्य याचा जागीच मृत्यू झाला तर त्याचा भाऊ चेतन फेगडे हा गंभीर जखमी झाला आहे. अपघात घडल्यानंतर नशिराबाद पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करून जखमी झालेल्या चेतनला तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. या संदर्भात पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद घेण्याचे काम सुरू होते. मयत चैतन्य हा एक वर्षापूर्वी रेल्वे विभागात नोकरीला लागलेला होता.तो पुणे (खडकी)रेल्वे स्टेशनला ट्रॅकमन या पदावर कार्यरत होता.

     

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    जामनेर : १६ वर्षीय मुलीचा विनयभंग : एका विरोधात गुन्हा दाखल !

    April 21, 2026

    चोपड्यात थरारक खून प्रकरणाचा २४ तासांत छडा : संशयित आरोपी अटकेत !

    April 21, 2026

    लातूर हादरला : आईसह दोन निष्पाप जीवांचा दुर्दैवी अंत !

    April 21, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.