Author: editor desk

जळगाव : प्रतिनिधी बंद असलेल्या गोदामाच्या शटरचे कुलूप तोडून चोरट्यांनी आठ लाख ३५ हजार १०२ रुपये किमतीचा पापड मसाला चोरून नेला. ही घटना २४ ते २६ मार्चदरम्यान औद्योगिक वसाहत परिसरातील एम सेक्टरमध्ये घडली.  याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरी करण्यापूर्वी चोरट्यांनी बाहेर डीपी बंद करीत वीजपुरवठा खंडित केला व त्यानंतर चोरी केल्याचे समोर आले आहे. मिलाल्लेया माहितीनुसार, अतुल विश्वनाथ मुळे (५९, रा. मोहाडी रोड) यांचा मसाल्याचा व्यवसाय असून जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्याचे ते स्टॉकीस्ट आहेत. औद्योगिक वसाहत परिसरातील एम सेक्टरमध्ये त्यांचे श्री प्रभू डिस्ट्रीब्युटर्स नावाचे गोदाम आहे. त्यात ते पापड मसाल्यासह इतरही मसाले ठेवतात.…

Read More

मेष राशी अनुभव आणि ज्ञानाच्या बळावर तुम्ही पुढे जात रहाल. दूरदर्शी दृष्टीकोन चांगला राहील. लोकांच्या बोलण्यातून दिशाभूल होऊ देऊ नका. यशाने उत्साही व्हाल. आर्थिक बाजू चांगली राहील. मित्र तुम्हाला साथ देतील. प्रवास करताना काळजी घ्या. अन्यथा समस्या उद्भवू शकतात. नवीन व्यवसाय सुरू करण्याची योजना यशस्वी होईल. विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे. वृषभ राशी सामाजिक कार्यात सुख-सुविधा वाढतील. कार्यक्षेत्रात अनावश्यक दबाव वाढू शकतो. समन्वयाचे वर्तन ठेवा. इतरांची दिशाभूल करू नका. आपल्या कामासाठी समर्पित रहा. व्यवसायात नवीन करारांमुळे व्यवसायाची स्थिती सुधारेल. मिथुन राशी आज तुम्ही एखाद्या प्रिय मित्रासोबत मनोरंजनाचा आनंद घ्याल. प्रेमप्रकरणात अडथळ्यांना सामोरे जावे लागेल. जास्त जोखीम घेणे टाळा. घरगुती समस्यांमुळे…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था महायुती सरकारचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरील टीकात्मक गाण्यामुळे अडचणीत सापडलेल्या कुणाल कामराने अटकेपासून संरक्षण मिळवण्यासाठी मद्रास हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर आज किंवा उद्या सुनावणी होण्याची शक्यता आहे. दरम्यान, भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी या प्रकरणी कुणाल कामरावर टीकेची झोड उठवत त्याच्या ‘आयुष्याची कॉमेडी’ करण्याचा इशारा दिला आहे. स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराच्या एका व्यंगात्मक गाण्याचा व्हिडिओ सोशल मीडियात चांगलाच व्हायरल झाला आहे. या गाण्याद्वारे त्याने शिवसेनेतील बंडखोरीवर भाष्य करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता त्यांचा उल्लेख गद्दार असा केला होता. त्याच्या या विधानामुळे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी कामराच्या हॅबिटेट स्टुडिओची तोडफोड केली होती. तसेच…

Read More

धरणगाव : प्रतिनिधी तालुक्यातील हनुमंतखेडा या गावात चारित्र्याच्या संशयावरून तरूणाने आपल्या पत्नी व मुलावर कुऱ्हाडीने हल्ला करत तिला ठार केल्याची धक्कादायक घटना धरणगाव तालुक्यात घडली असून यात त्या व्यक्तीचा मुलगा देखील गंभीर जखमी झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, धरणगाव तालुक्यातील हनुमंतखेडा येथे भयंकर घटना घडली. येथील रहिवासी सोमनाथ उर्फ सोन्या अशोक सोनवणे हा आपली पत्नी शीतल उर्फ आरती हिच्यावर नेहमी चारित्र्याबाबत संशय घेऊन मारहाण करत असे. काल पहाटे पावणे तीन वाजेच्या सुमारास त्याने आपली पत्नी शीतल उर्फ आरती हिच्यावर कुऱ्हाडीने वार केले. यात तिचा मृत्यू झाला. याप्रसंगी त्याने आपला दहा वर्षाचा मुलगा सिध्दू सोमनाथ सोनवणे याच्यावरही वार केले असून तो देखील…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात मनसे व ठाकरे गटात आरोप प्रत्यारोप सुरु असतांना आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा येत्या 30 तारखेला रविवारी गुढी पाडवा मेळावा आहे. दरवर्षी दादरच्या शिवाजी पार्क मैदानात या दिवशी मनसेची भव्य सभा होते. यंदा सुद्धा गुढी पाडवा मेळाव्याला राज ठाकरेंच भाषण होणार आहे. राज ठाकरे भाषणात काय बोलतात? विरोधकांचा कसा समाचार घेतात? याची उत्सुक्ता आहे. राज्यात औरंगजेबाची कबर, कुणाल कामरा, दिशा सालियान हे विषय गाजत आहेत. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये यावरुन आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे या विषयावर काय बोलतात? त्यांची भूमिका काय असणार? मनसेची भविष्याची दिशा काय असेल? ते राज ठाकरे यांच्या भाषणातून स्पष्ट होईल. याच…

Read More

राज्यात रविवारी (दि. ३०) नवीन शके १९४७ या संवत्सराचे नाव विश्वावसु संवत्सर असे आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्या नवीन वर्षाची सुरुवात होते. या दिवशी सकाळी घरोघरी गुढया उभ्या करून, तोरणे लावून नवीन वर्षाचे स्वागत केले जाते. आपली कालगणना हजारो वर्षे जुनी आहे. ती ग्रहांवर आधारित कालगणना पंचांगाच्या माध्यमातून आपल्याला कळते म्हणून संवत्सरारंभाच्या दिवशी गुढीबरोबर पंचांगावरील गणपतीचे पूजन करावयास सांगितले आहे. हा उत्सव घरोघरी करावयाचा असल्यामुळे आपण स्वतंत्रपणे राहत असल्यास आपल्या घरी ही पूजा करून गुढी उभी करण्यास काहीच हरकत नाही. त्याकरिता असे कोणतेच बंधनही नाही. त्यामुळे गुढीपूजन, पंचांगपूजन अवश्य करावे, अशी माहिती पंचांगकर्ते ओंकार मोहन दाते यांनी दिली. अशी उभी करा…

Read More

महायुती व महाविकास आघाडीतील नेत्यामध्ये आरोप प्रत्यारोप सुरु असतांना आता शिंदेंचे खा.नरेश म्हस्के यांनी थेट उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल चढविला आहे. खा.म्हस्के म्हणाले कि, उद्धव ठाकरे यांनी औरंगजेब प्रमाणे आपल्या भावांना आणि अखेरच्या काळात आपल्या वडिलांना देखील त्रास दिला. त्यामुळे ते आधुनिक काळातील औरंगजेब असल्याची बोचरी टीका त्यांनी केली आहे. शिवसेना खासदार नरेश म्हस्के म्हणाले की, “ते नवीन युगाचे ‘आधुनिक औरंगजेब’ आहेत. उद्धव ठाकरेंनी त्यांच्या भावांना औरंगजेब सारखेच त्रास दिला. राज ठाकरेंनी स्वतः म्हटले होते की उद्धव ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरेंना त्यांच्या शेवटच्या काळात त्रास दिला… ते त्यांच्या वडिलांच्या विचारसरणीचे पालन करत नव्हते. म्हणूनच उद्धव ठाकरे हे ‘आधुनिक औरंगजेब’ आहेत. त्यांनी…

Read More

जळगाव : प्रतिनिधी जिल्ह्यातील भुसावळ रेल्वे स्थानकावर मोठी कारवाई करण्यात आली असून यामध्ये रेल्वे पोलिसांनी एका संशयिताकडून तब्बल एक कोटी रुपयांच्या नकली नोटा जप्त केल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मलकापूरहून भुसावळला आलेले दोन संशयित रेल्वे स्थानकावर उतरल्यावर रेल्वे पोलिसांना त्यांच्यावर संशय आला. तपासणी दरम्यान, त्यांच्या बॅगमध्ये पाचशे रुपयांच्या बंडलमध्ये ‘चिल्ड्रन बँक’ लिहिलेल्या नकली नोटा आढळून आल्या आहेत. तपासणी सुरू असताना एक संशयित फरार झाला असून, दुसऱ्या संशयिताला रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी रेल्वे सुरक्षा बल (RPF) आणि लोहमार्ग पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे. रेल्वे पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नोटा बंडलमध्ये केवळ वरची नोट खरी दिसत होती, तर बाकी सर्व…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारवर ठाकरे गट हल्लाबोल करण्यासाठी एक हि संधी सोडत नसताना आता पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांनी महायुती सरकारवर चांगलाच हल्लाबोल केला आहे. कुणाल कामराने सरकारवर योग्य गाणं केलं आहे. देशातील मोदींची सत्ता ही “सौगत ए मोदी नाही, सौगत ए सत्ता” आहे. त्यामुळे सध्याच्या सरकारची स्थिती ही ‘खिशात नाही आणा आणि मला बाजीराव म्हणा’, अशी असल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी सत्ताधारी सरकारवर केली आहे. ते आज (दि.7) मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. पुढे बोलताना ठाकरे म्हणाले, शिवरायांचा अपमान करणारा सोलापूरकर अजून मस्तीत फिरतोय, बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील शाळा संचालक आपटेवर अद्याप कारवाई नाही? मात्र कॉमेडियन…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना आपणच फोन केला होता. तर मोबाईलमधील संपूर्ण डाटा आपण स्वतःहून डिलीट केला असल्याची कबुली प्रशांत कोरटकर याने पोलिसांना दिल्याची माहिती समोर आली आहे. असे वृत्त एका मराठी वृत्त वाहिनीने दिले आहे. दरम्यान प्रशांत कोरटकरने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर आपण मंचरियाल येथून चेन्नईला जाणार होतो असेही पोलिसांना सांगितले आहे. कोरटकरला न्यायालयाकडून 28 मार्चपर्यंत पोलीस कोठडी मिळाल्यानंतर बुधवारी त्याचे फॉरेन्सिक टीम कडून तपासणी करण्यात आले. तत्पूर्वी रात्रभर केलेल्या चौकशीत कोरटकरने कोल्हापूर पोलिसांना ही माहिती दिल्याचे वृत्त आहे. तब्बल महिनाभरापासून प्रशांत कोरटकर हा पोलिसांना गुंगारा देत होता. यानंतर कोल्हापूर पोलिसांकडून प्रशांत कोरटकर याची चौकशी केली जात…

Read More