Author: editor desk

सोलापूर : वृत्तसंस्था राज्यातील अनेक शहरातून खुनाच्या घटना समोर येत असतांना आता एक खळबळजनक घटना मोहोळ तालुक्यातील रामहिंगणी येथून समोर आली आहे. पत्नीस नांदवण्यास पाठवण्याच्या वादातून जावयाने धारदार शस्त्राने हल्ला करुन सास-याचा खून केल्याची घटना घडली. वडिलांचा वाचवण्याचा प्रयत्न करणा-या मेहुण्यासह सासूवरही हल्ला केल्याने दोघे गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना रविवार, २७ एप्रिल रोजी मध्यरात्री १२ वाजण्याच्या सुमारास घडली. दरम्यान आरोपी मंगेश देविदास सलगर (वय ३५, रा. लक्ष्मीनगर, कोळेगाव) याने पोलिस हेल्पलाईन ११२ वर कॉल करुन मदत मागितल्याचा प्रकारही समोर आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अभिषेक बापूराव मासाळ (२४) यांनी मोहोळ पोलिसांत फिर्याद दिली आहे. आरोपी मंगेश सलगर (३५,…

Read More

जळगाव : प्रतिनिधी निंभोराहून येथून जळगावकडे येणाऱ्या बसला महामार्गावरुन समोरुन येणाऱ्या ट्रकने कट मारला. त्यामुळे बस चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे बस थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात उतरली. बसमध्ये साधारण ४० ते ५० प्रवासी होते, मात्र सुदैवाने बसमधील कोणाला काहीही दुखापत झाली नाही. ही घटना दि. २८ रोजी दुपारच्या सुमारास आहुजा नगर ते द्वारकागनर स्टॉपदरम्यान घडली. मिळालेल्या माहितीनुसार, धरणगाव तालुक्यातील निंभोरा येथून (एमएच २०, बीई २४२१) क्रमांकाची बस प्रवासी घेवून जळगावकडे येत होती. महामार्गावरुन येत असतांना आहुजा नगर ते द्वारकानगर स्टॉपच्या दरम्यान, समोरुन ओव्हरटेक ट्रक येत होता. त्या ट्रकने बसला कट मारल्यामुळे बसवरील चालकाचे नियंत्रण सुटले आणि बस थेट रस्त्याच्या कडेला उतरली.…

Read More

जळगाव : प्रतिनिधी पारोळा तालुक्यातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. नात्याला काळिमा लागल्याची घटना घडल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. सख्या मेव्हण्याने शालकाच्या नावे असलेली विमा पॉलिसी व दिलेल्या स्कुटीचा अपघातात विम्याचा लाभ मिळवण्यासाठी फागणे येथील शालकास पारोळा हद्दीत ठार मारून त्याचा अपघात झाल्याची माहिती पोलिसांना देऊन बनवाबनवी केली होती. याप्रकरणी मेव्हण्यासह त्याच्या एका साथीदारास पोलिसांनी सखोल माहितीच्या आधारे २७ रोजी ताब्यात घेतल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी पारोळा येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. याबाबत उपनिरीक्षक अमरसिंह वसावे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून प्रारंभी १७ रोजी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास मयत समाधान शिवाजी पाटील (वय २६) याचा पारोळा हद्दीत अपघात झाल्याची नोंद धुळे…

Read More

जळगाव : प्रतिनिधी पारोळानजीक एप्रिल २००९ मध्ये झालेल्या सावित्री फटाका कारखान्यातील स्फोटात २४ जणांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी पारोळा येथील दोन माजी नगराध्यक्षांसह तीन जणांना दहा वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली. सहा जणांना निर्दोष सोडण्यात आले आहे. विशेष म्हणजे या खटल्यात ३८ साक्षीदार फितूर झाले आहेत. अमळनेर येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश छाया पाटील यांनी सोमवार दि.२८ रोजी हा निकाल दिला. माजी नगराध्यक्ष गोविंद एकनाथ शिरोळे, त्यांचा भाऊ चंद्रकात एकनाथ शिरोळे, चंद्रकांत यांच्या पत्नी व माजी नगराध्यक्षा मनीषा शिरोळे या तीन जणांचा शिक्षा झालेल्यांमध्ये समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पारोळा-अमळनेर रस्त्यावरील सावित्री फायर वर्क्स फॅक्टरीत १० एप्रिल २००९ रोजी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास…

Read More

मेष राशी श्री गणेश म्हणतात की, सकारात्मक राहण्यासाठी काही धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यात वेळ घालवा. तुम्ही घरातील देखभाल आणि साफसफाईच्या कामांमध्ये देखील व्यस्त राहू शकता. विशिष्ट ध्येय साध्य करण्यासाठी केलेल्या कठोर परिश्रमाचे चांगले परिणाम मिळतील. हा वेळ आत्मचिंतन घालवा. यामुळे तुमच्या मनात निर्माण होणाऱ्या अनेक प्रश्नांची उत्तरे मिळतील. कोणत्याही अशुभ सूचना मिळाल्याने मनामध्ये अशांतता आणि ताण येऊ शकतो. व्यावसायिक कामे सामान्य राहतील. वृषभ राशी श्री गणेश म्हणतात की, कोणत्याही सकारात्मक कार्याबद्दल एखाद्या व्यक्तीसोबत विचारांची देवाणघेवाण होते. यामुळे तुमचे मनोबल आणि आत्मविश्वास वाढेल. आज तुम्हाला मानसिक शांती मिळेल. भविष्यात उत्पन्नाचे साधन देखील मिळू शकते. कुटुंबातील कोणत्याही सदस्याच्या आरोग्याबद्दल थोडी चिंता असेल.…

Read More

धरणगाव : प्रतिनिधी ज्येष्ठांचे विरंगुळा केंद्र म्हणजे आपुलकी, माया, जिव्हाळा असलेली जागा आहे. जेष्ठाच संघर्षमय आणि प्रेममय आयुष्य आमच्यासाठी प्रेरणादायी आहे. तुमच्या अनुभवाचं, आशीर्वादाचं मोल अनमोल आहे. तुमच्या प्रत्येक सुरकतीत संघर्षाची, जिद्दीची, प्रेमाची कथा दडलेली आहे. आज तुम्हाला आयुष्याच्या संध्याकाळी आनंदाने फुलण्यासाठी एक सुंदर विरंगुळा मिळावा, यासाठी आम्ही हे विरंगुळा केंद्र उभारले आहे. ज्येष्ठांचा आशीर्वाद आणि बचत गटांची जिद्द, धरणगावच्या विकासाचा आधारस्तंभ असून महिलांच्या बचत गटांसाठी व्यापारी संकुल करीता 2 कोटींचा निधी मंजूर केला असून बचत गटाच्या माध्यमातून महिलांना लखपती दीदी होण्याचे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. धरणगाव नगरपरिषदेच्या वतीने उभारण्यात आलेल्या विरंगुळा केंद्राचे लोकार्पण करून विरंगुळा केंद्राची चाबी…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था जम्मू-काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव कायम आहे. आता भारत सरकारने पाकिस्तानविरुद्ध नवीन कारवाई केली आहे. केंद्र सरकारने कारवाई करत अनेक पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी घातली आहे. या निर्णयामुळे, भारतीय युट्यूब वापरकर्त्यांसाठी शोएब अख्तर, आरजू काझमी आणि सय्यद मुझम्मिल शाह यांसारख्या पाकिस्तानी चॅनेलचा प्रवेश मर्यादित करण्यात आला आहे. भारत सरकारने केलेल्या कारवाईनंतर, यूट्यूबवर पाकिस्तानी चॅनेल शोधताना, “राष्ट्रीय सुरक्षा किंवा सार्वजनिक सुव्यवस्थेशी संबंधित सरकारी आदेशांमुळे ही सामग्री सध्या या देशात उपलब्ध नाही” असा मजकूर असलेला एक पेज दिसतो. सरकारी काढून टाकण्याच्या विनंत्यांबद्दल अधिक माहितीसाठी, कृपया गुगल पारदर्शकता अहवाल (transparencyreport.google.com) ला भेट द्या.” यासोबतच काही पाकिस्तानी…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था देशातील भाविकांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. येत्या ३० एप्रिलपासून सुरू होणाऱ्या चार धाम यात्रेची तयारी जोरात सुरू आहे. केदारनाथ धामचे दरवाजे उघडण्याची प्रक्रिया आज औपचारिकपणे सुरू झाली. चाल उत्सव विग्रह डोलीमध्ये विराजमान असलेली भगवान केदारनाथची पंचमुखी भोग मूर्ती उखीमठ येथील ओंकारेश्वर मंदिरातून धामाकडे रवाना झाली आहे. डोली यात्रा श्रद्धा आणि भक्तीच्या वातावरणात सुरू झाली, ज्यामध्ये मोठ्या संख्येने भाविक सहभागी झाले होते. परंपरेनुसार, कपदोद्घटनाची प्रक्रिया केदारनाथचे रक्षक मानले जाणारे भगवान भैरवनाथ यांच्या विशेष प्रार्थना आणि पूजेने सुरू झाली. संध्याकाळी ७ वाजता ओंकारेश्वर मंदिराच्या गर्भगृहात भगवान केदारनाथ आणि भगवान ओंकारेश्वर यांची पूजा आणि आरती करण्यात आली. रविवारी…

Read More

रावेर : प्रतिनिधी तालुक्यातील बोर घाटात झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील वडील आणि मुलाचा जागीच मृत्यू झाला. थार जीप आणि मोटरसायकल यांच्यात झालेल्या जोरदार धडकेत मोटरसायकलस्वार पिंटू बोडोले (वय 30) आणि त्यांचा तीन वर्षांचा मुलगा ऋतिक बोडोले यांचा दुर्दैवी अंत झाला. या दुर्घटनेने संपूर्ण रावेर तालुक्यात शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पिंटू बोडोले हे पत्नी मालुबाई (वय 28) आणि दोन मुले -ऋतिक (वय३) व आठ महिन्यांचा टेंगुराम – यांच्यासह भुसावळहून पाल येथे नातेवाईकांना भेटण्यासाठी निघाले होते. रविवार (दि.27) रोजी रात्रीच्या सुमारास बोर घाटात, खेरगावकडून भुसावळकडे भरधाव वेगाने येणाऱ्या थार जीपने त्यांच्या मोटरसायकलला जोरदार धडक दिली. अपघात इतका भीषण होता की…

Read More

भंडारा  : वृत्तसंस्था राज्यातील अनेक महामार्गावर अपघाताच्या घटना घडत असतांना आता मुंबई-कोलकाता राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघाताची घटना घडली आहे. यात बोलोरो आणि ट्रकमध्ये झालेल्या भीषण अपघातात चौघांचा घटनास्थळीचं मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भंडारा महामार्गावरील बेला येथील साईप्रसाद हॉटेल समोर रविवारी रात्री ही घटना रविवार रात्री 10 वाजून 30 ते 11 च्या सुमारास घडली. अपघातानंतर महामारगावर वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमीला रूग्णालयात दाखल केले, तर मृतदेहाला पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आले आहे. रायपूरकडून आलेलं बोलेरो वाहन हे नागपूरकडं जात होते. यात 5 जण प्रवास करीत होते. बेला गावाजवळ असलेल्या हॉटेल साई प्रसादमध्ये…

Read More