Author: editor desk

मुंबई : वृत्तसंस्था देशभरातील अनेक नेते, अभिनेते व उद्योजकांना नेहमीच धमकीचे फोन येत असतात मात्र आता मंत्रालयामधील मुख्यमंत्री कार्यालयावर हल्ला करण्यात येईल असा धमकी देणारा मेसेज मुंबई वातूक पोलिसांना मिळाला आहे. व्हॉट्सॲपवर हा मेसेज मुंबई वाहतूक पोलिसांना पाठवण्यात आला होता. याप्रकरणी वरळी पोलिसानी गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली. मिळालेल्या माहितीनुसार एका पाकिस्तानी नंबरवरून ट्रॅफिक पोलिसांना व्हॉट्सॲपवर हा धमकीचा मेसेज आला होता. बुधवारी दुपारच्या सुमारास हा मेसेज आला होता, त्यानंतर पोलिस यंत्रणा या अलर्ट मोडवर आहेत. त्यांनी तपास सुरू केला आहे. मेसेज करणाऱ्या व्यक्तीने मालिक शहाबाज हुमायून राजा देव असे नाव सांगितले, अशी माहिती समोर आली. दरम्यान, दोन आठवड्यांपूर्वीच…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील पुणे शहरातील स्वारगेट प्रकरणावरून राज्याचे राजकारण तापले असतांना आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वारगेट बलात्कार प्रकरणात पीडितेने ‘प्रतिकार’ न केल्याच्या मुद्यावर बोट ठेवणाऱ्या गृह राज्यमंत्री योगेश कदम यांना संवेदनशीलतेने बोलण्याचा सल्ला दिला आहे. अशा प्रकरणांत बोलताना संवेदनशीलता बाळगली पाहिजे. कारण, बोलताना चूक झाली तर त्याचा थेट समाजमनावर परिणाम होतो. त्यामुळे मंत्री असो की लोकप्रतिनिधी सर्वांनी संवेदनशीलतेने बोलावे असा माझा सल्ला आहे, असे ते म्हणालेत. गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी गुरुवारी स्वारगेट बलात्कार प्रकरण ‘फोर्सफुली’ घडले नसल्याचा दावा केला होता. स्वारगेट एसटी स्टँडवर घडलेली घटना स्ट्रगल किंवा फोर्सफुली घडलेली कृती नाही. ही घटना घडली तेव्हा शिवशाही बसच्या…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील अनेक शहरात महिला व तरुणींवर होणाऱ्या अत्याचारांच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. प्रेम प्रकरणातून हल्ले, बलात्कार, लैंगिक अत्याचार असे अनेक गुन्हे घडताना दिसत आहेत. अशीच एक घटना मुंबई येथील विरारमध्ये घडली आहे. प्रियकराने प्रेयसीवर धारदार शस्त्राने अनेक वार करत तिला गंभीर जखमी केले आहे. विशेष म्हणजे या दोघांचे लग्न देखील ठरले आहे. सविस्तर वृत्त असे कि, अक्षय जनार्दन पाटील असे या आरोपीचे नाव असून तो विररार पूर्वच्या गास कोपरी या गावात राहतो. त्याच गावात राहणाऱ्या 23 वर्षीय भाविका भालचंद्र गावड हिच्यासोबत मागील 11 वर्षांपासून प्रेमसंबंध होते. अक्षय आणि भाविका यांचे डिसेंबरमध्ये लग्न देखील ठरले आहे.…

Read More

पुणे : वृत्तसंस्था स्वारगेट येथील तरुणीवर अत्याचार करणारा दत्तात्रय गाडे गेल्या दोन दिवसापासून शिरूर तालुक्यातील गुनाट गावातील उसात लपून बसला होता. पोलिसांनी गुनाट गावात जवळपास 50 तास ऑपरेशन राबवले. मात्र तो सापडला नव्हता. अखेर भूक लागल्याने रात्री बाराच्या सुमारास तो गावातील एका नातेवाईकांच्या घरी गेला. तिथे त्याने मला प्रचंड भूक लागली असून काहीतरी खायला द्या, अशी मागणी केली. त्यानंतर नातेवाइकांनी त्याला खायला आणि पाण्याची बाटली दिली. त्याचवेळी दत्तात्रय गाडेने आपल्याला पश्चात्ताप झाला आहे, असे नातेवाईकांना सांगितले. तसेच जे काही केले ते चुकीचे आहे. मला पोलिसांना सरेंडर व्हायचंय, असे देखील तो म्हणाला. त्यानंतर पाण्याची बाटली घेऊन तो निघून गेला. त्याचवेळी नातेवाइकांनी…

Read More

जळगाव : प्रतिनिधी शहरातील गेंदालाल मिल भागातील एक हायस्कूलमधील एका शिक्षिकेचा विनयभंग केल्याच धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी बुधवारी रात्री उशिरा शाळेचे मुख्याध्यापक आसीफ पठाण व चेअरमन मुश्ताक अहमद इक्बाल या दोघांवर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, गेंदालाल मिल भागात असलेल्या हायस्कूलमधील एका शिक्षिकेचा २८ जानेवारी व ८ फेब्रुवारी रोजी मुख्याध्यापक आसीफ पठाण व चेअरमन मुश्ताक अहमद इक्बाल यांनी शाळेतील आवारात व शौचालय परिसरात विनयभंग केल्याची तक्रार शिक्षिकेने केली आहे.  यासह शिक्षिका शाळेत शिकवत असताना, त्यांचा डावा हात पकडून दमदाटीदेखील केली. यासह शिवीगाळदेखील केली. दरम्यान, याप्रकरणी बुधवारी शिक्षिकेने शहर पोलिस ठाण्यात जाऊन…

Read More

जळगाव : प्रतिनिधी एसटी वर्कशॉपजवळ राहणाऱ्या एका सोनार कारागिराचे बंद घर फोडून घरातून २ लाख रुपये किमतीचे सोने व चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना मंगळवारी पहाटे साडेतीन वाजता उघडकीस आली. या प्रकरणी बुधवारी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, सुरेश हिरामण सोलंकी (वय ४१, रा एसटी वर्कशॉप) यांचे घर बंद असताना २५ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी मुख्य दरवाजाचे लोखंडी गेटचे कुलूप तोडून लोखंडी कपाटातून सोन्याचे व चांदीचे दागिने आणि ४० हजार रुपयांची रोकड असा एकूण २ लाख रूपये किमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला आहे. या प्रकरणी सुरेश…

Read More

जळगाव : प्रतिनिधी एका कुत्र्याने बकरीचा चावा घेतला म्हणून, बकरीच्या मालकाने कुत्र्याला चक्क मोटारसायकलला बांधून फरफटत ओढल्याचा संतापजनक प्रकार गुरुवारी सकाळी १०:१५ वाजता डीमार्ट समोर घडला. एका युवकाच्या सतर्कतेमुळे कुत्र्याचा जीव वाचला असला तरी कुत्र्याला ओढत नेल्याने कुत्रा गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी मोटारसायलस्वारावर एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भाग्येश आनंदराव मगर हा युवक शिरसोली रस्त्याने जात असतानाच सलीम अन्सारी (रा.तांबापुरा) हा व्यक्ती एका जीवंत कुत्र्याला (एम.एच.१९, डी.डी. ७८६५) मोटारसायकलला बांधून फरफटत नेत असल्याचे दिसून आले. भाग्येशने सलीम अन्सारीची मोटारसायकल थांबवून, त्याला मोटारसायकलला बांधलेल्या कुत्र्याला सोडण्यास सांगितले. याप्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात दोन अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल…

Read More

एरंडोल : प्रतिनिधी मुलाकडून होणाऱ्या छळाला कंटाळून माजी सैनिक असलेल्या बापाने त्याचा गळा आवळून खून करत स्वतःही आत्महत्या केली. अंगावर काटा आणणारी ही घटना एरंडोल येथे गुरुवारी उघडकीस आली. बापाच्या खिशात आढळलेल्या सुसाईड नोटवर त्यांनी मुलाचा खून करून तो पुरल्याची माहिती दिली. मुलगा सोशल मीडियावर रिल्स बनवायचा. विठ्ठल पाटील ५०) आणि हितेश पाटील (२२) अशी या मृत बाप-बेट्यांची नावे आहेत. माजी सैनिक विठ्ठल पाटील हे भवरखेडा (ता. एरंडोल) येथील मूळ रहिवासी असून ते आपल्या परिवारासह एरंडोल येथील वृंदावन नगरात वास्तव्यास होते. त्यांचा मुलगा हितेश विठ्ठल पाटील हा रिल्स बनवायचा. मात्र, तो वडिलांपासून वेगळा राहत होता. तो वडिलांचा छळ करून मारहाण…

Read More

मेष राशी आजच्या दिवसाची सुरुवात चांगल्या बातम्यांनी होईल. व्यवसायाशी संबंधित लोकांना फायदा आणि प्रगतीची संधी मिळेल. तुमची कार्यक्षमता वाढवा. सामाजिक उपक्रमांबाबत जागरूक राहा. महत्त्वाच्या कामात गोपनीयता ठेवा. वृषभ राशी आज आर्थिक बाबतीत अधिक सावधगिरी बाळगावी लागेल. अनावश्यक कामावर पैसे खर्च होण्याची शक्यता जास्त आहे. याबाबत सावधगिरी बाळगा. कुटुंबातील भौतिक सुखसोयी आणि साधनांवर जास्त पैसा खर्च होईल. मिथुन राशी तुम्हाला नको असलेल्या प्रवासाला जावे लागेल. प्रिय व्यक्तीपासून दूर गेल्याने मन अस्वस्थ राहील. व्यवसायात अज्ञात लोकांवर जास्त विश्वास ठेवू नका. अन्यथा फसवणूक होऊ शकते. नोकरीत असे कोणतेही काम करू नका. ज्यामुळे तुमचा अपमान होईल. कर्क राशी आज तुम्हाला प्रिय व्यक्तीकडून चांगली बातमी…

Read More

कोल्हापूर : वृत्तसंस्था राज्यातील पुणे येथील स्वारगेट बस स्थानकावर उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये एका 26 वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्याची घटना ताजी असतानाच कोल्हापूर येथे देखील असाच धक्कादायक प्रकार घडला आहे. बंदुकीचा धाक दाखवत तरुणीवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. सविस्तर वृत्त असे कि, कोल्हापूर येथील लक्षतीर्थ वसाहत येथे बंदुकीचा धाक दाखवत एका तरुणीवर बलात्कार करण्यात आला आहे. इतकेच नव्हे तर या नराधम आरोपीने शरीरसंबंधांचे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत वारंवार बलात्कार केल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. विश्वजित सचिन जाधव असे या नराधमाचे नाव असून त्याच्या विरोधात शाहपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.…

Read More