जळगाव : प्रतिनिधी शहरातील सिंधी कॉलनी परिसरातून चोरीला गेलेली दुचाकी आणि शहरातील इतर ठिकाणांहून चोरीला गेलेल्या दुचाकींच्या घटना उघडकीस आणण्यात एमआयडीसी पोलीसांना यश आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन सराईत गुन्हेगारांना शनीपेठ परिसरातून बुधवारी ४ मार्च रोजी दुपारी २ वाजता अटक करण्यात आले. त्यांच्याकडून १ लाख ४० हजार रुपये किमतीच्या चोरी केलेल्या दोन दुचाकी जप्त केल्या आहेत. सविस्तर वृत्त असे कि, शहरातील केमिस्ट भवन परिसरातील रहिवासी यश मनोहरलाल अहुजा (वय २४) यांनी ३१ मार्च रोजी सिंधी कॉलनी सेवामंडळ परिसरातून त्यांची सीबी झेड मोटारसायकल (एम.एच. १९ बीए १७३७) चोरीला गेल्याप्रकरणी गेल्याची तक्रार दाखल केली होती. एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप…
Author: editor desk
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुतीच्या महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज एक महत्वपूर्ण घोषणा केली आहे. येत्या महाराष्ट्र दिनापासून म्हणजे 1 मेपासून ऑनलाईन मुद्रांक नोंदणी व ‘एक राज्य एक नोंदणी’ उपक्रम राबवण्याची घोषणा त्यांनी आज केली आहे. या उपक्रमामुळे पुण्यात बसून नागपुरातील घराची किंवा मुंबईत बसून पुण्यातील घराची नोंदणी नोंदणी करता येईल. ही सर्व प्रक्रिया फेसलेस असेल, असे ते म्हणाले. या प्रक्रियेमुळे घर खरेदीच्या प्रक्रियेतील दलालीला चाप बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सद्यस्थितीत घराच्या नोंदणीसाठी आपल्याला उपनिबंधक कार्यालयात किवा तहसील कार्यालयात खेटे मारावे लागतात. अनेकदा या प्रकरणी नागरिकांचा मोठा वेळ व पैसे वाया जातात. या पार्श्वभूमीवर चंद्रशेखर बावनकुळे यांनी…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यात ५ ऑक्टोबर रोजी एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीच्या जाहीरनाम्यातील 10 प्रमुख आश्वासने जाहीर केली. एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूर येथील जाहीर सभेत सांगितले होते की, व्हिजन महाराष्ट्र 2029 च्या जाहीरनाम्यात दिलेली आश्वासने सरकार स्थापनेनंतर 100 दिवसांच्या आत पूर्ण केली जातील. शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचे निवडणुकीतील आश्वासन पूर्ण न करण्याचा आरोप महाराष्ट्र काँग्रेसने महायुती सरकारवर केला आहे. भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस युती ‘गजनी सिंड्रोम’ने ग्रस्त असल्याचे बुधवारी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे. शेतकऱ्यांचे कर्जमाफीचे निवडणूक आश्वासन ते विसरले आहेत. ते म्हणाले की, अर्थसंकल्पीय अधिवेशनातही कर्जमाफी आणि महिलांना पैसे देण्याबाबत कोणताही ठोस निर्णय घेण्यात आला नाही. जनतेचे लक्ष…
चाळीसगाव : प्रतिनिधी नवसाचा कार्यक्रम आटोपून पातोंडा येथे परतणाऱ्यांची पीकअप व्हॅन गाडी कन्नड घाटाच्या पायथ्याशी उलटली. या भीषण अपघातात व्हॅनमधील चार जण जागीच ठार झाले तर जवळपास २५ जण गंभीर जखमी झाले. ही घटना बुधवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास कन्नड घाटाच्या पायथ्याची घडली. मिलाल्लेया माहितीनुसार, चाळीसगाव तालुक्यातील पातोंडा येथील नाना दामू माळी यांच्या नातीचा नवसाचा कार्यक्रम श्रीरामपूर भागात होता. त्यासाठी नातेवाईक व गावातील जवळपास ३० जण पीकअप व्हॅनने (एम. एच. १९ बीएम ३९४७) ने गेले होते. नवसाचा कार्यक्रम आटोपल्यानंतर पातोंडा गावाकडे सर्व जण परत येण्यासाठी निघाले. कन्नड घाट उतरत असताना शेवटच्या वळणावर चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने पीक अप व्हॅन अचानक…
अमळनेर : प्रतिनिधी तालुक्यातील एका गावात महिलेचा विनयभंग झाल्याने दोन गटात हाणामारी झाल्याची घटना २९ रोजी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडली. परस्परांविरुद्ध मारवड पोलिस स्टेशनला गुन्हे दाखल करण्यात आला आहे. याबाबत ३० वर्षीय महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, २९ रोजी सायंकाळी ७:३० वाजता ही महिला घरी असताना नरेश महारू पाटील हा घरात घुसला आणि महिलेचा विनयभंग केला. महिलेचा आवाज ऐकून तिची मुले व पती घरात आल्याने नरेश व महिलेच्या पतीची झटापट झाली. त्यावेळी नरेश पळून जात असताना पाय घसरून पडल्याने डोक्याला दुखापत झाली. या प्रकाराने महिला घाबरून गेल्याने उशिराने मारवड पोलिसांत फिर्याद देण्यात आली असून पुढील तपास हेकॉ दिनेश पाटील हे करीत…
जळगाव : प्रतिनिधी काहीही कारण नसताना सद्दाम शहा हुसेन शहा (४२, रा. तांबापुरा) या भंगार विक्रेत्यासह त्याच्या मुलावर दोघांनी धारदार शस्त्राने वार करीत गंभीर जखमी केले. ही घटना ३१ मार्च रोजी रात्री तांबापूरा परिसरात घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भंगार विक्रेते सद्दाम शहा हुसेन शहा यांच्या घरासमोर येऊन दोन जणांनी चाकू सारख्या धारदार शस्त्राने त्यांच्यावर वार केले. शहा यांचा मुलगा साहील हा तेथे आला असता, त्याच्यावर देखील एकाने कोयत्याने वार करून गंभीर जखमी केले. याप्रकरणी सद्दाम शहा यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास…
जळगाव : प्रतिनिधी रेल्वेमध्ये मुलीला नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत व बनावट आदेश पाठवून सेवानिवृत्त गोकूळ युवराज पाटील (६०, रा. पिंप्राळा) यांची १३ लाख रुपयांमध्ये फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी संजय नथ्थू कोळी (रा.जैनाबाद, जळगाव), राम नारायण नेवाडकर (रा. सिडको, नाशिक) व सतीश गोकूळ पाटील (रा. जुनोने, ता. अमळनेर) या तिघांविरुद्ध रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातून निवृत्त झालेले गोकूळ पाटील यांची मुलगी दीपाली हिचे अभियांत्रिकीचे शिक्षण झाले असून, तिच्या नोकरीसाठी पाटील हे प्रयत्न करीत होते. मार्च २०२३ मध्ये त्यांचे भाऊ मधुकर पाटील यांनी त्यांचे मित्र संजय कोळी…
अमळनेर : प्रतिनिधी एका खळ्याला अचानक आग लागून त्यात एका घरातील चार ते पाच सिलिंडरचा स्फोट होऊन सात ते आठ घरे जळून खाक झाल्याची थरारक घटना तालुक्यातील सात्री येथे बुधवारी रात्री घडली. त्यातच परिसरातील वादळामुळे आग अधिकच पसरत गेली. अचानक झालेल्या या प्रकारामुळे संपूर्ण गाव हादरून गेले. मिळालेल्या माहितीनुसार, अमळनेर तालुक्यातील सात्री येथे बुधवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास एका खळ्याला अचानक आग लागली. या खळ्याच्या शेजारी असलेल्या एका घरात चार ते पाच गॅस सिलिंडर होते. आगीने या घरालाही आपल्या कवेत घेतले. त्यामुळे एकापाठोपाठ एक करून सिलिंडरचा स्फोट झाला. स्फोटानंतर गावात भीषण आग लागल्याने अमळनेर येथून अग्निशमन दलाची दोन वाहने पोहोचली.…
मेष राशी श्रीगणेश म्हणतात की, तुम्ही तुमच्या व्यावहारिक कौशल्य आणि समजुतीने कोणतेही अपूर्ण काम पूर्ण करू शकाल. तुमच्या कार्याची लोकांमध्ये प्रशंसा होईल. जवळच्या मित्राला मदत कराल. मुलांच्या कोणत्याही समस्येवर तोडगा काढण्यासाठी तुमचे योगदान आवश्यक आहे. भागीदारीशी संबंधित व्यवसायात एकमेकांशी जुळवून घेणे आवश्यक आहे. वृषभ राशी श्रीगणेश सांगतात की, आज जवळच्या मित्राला आर्थिक मदत कराल. कुटुंबातील सदस्यांसह खरेदीत वेळ जाईल. तरुणांनी चुकीच्या कामांपासून लांब राहून करिअरला प्राधान्य द्यावे. व्यवसायात कोणत्याही नवीन योजना आखताना काळजीपूर्वक विचार करावा. घराची सुव्यवस्था राखण्यासाठी पती-पत्नीत सुसंवाद आवश्यक. आरोग्य चांगले राहील. मिथुन राशी श्रीगणेश म्हणतात की, आज तुमचे लक्ष एखाद्या विशिष्ट विषयावर केंद्रित असेल. धार्मिक आणि आध्यात्मिक…
मुंबई : वृत्तसंस्था विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानतर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही योजना गेमचेंजर ठरली आहे. सरकारने यापूर्वीही अनेक योजना राबवल्या आहेत, पण या योजनेची लोकप्रियता घराघरात पोहोचली आहे. त्यानंतर आता राज्यातील नवजात बालिकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी श्रीसिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाने ‘श्री सिद्धिविनायक भाग्यलक्ष्मी योजना’ राबविण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील सरकारी रुग्णालयांमध्ये जागतिक महिला दिनी (८ मार्च) जन्मलेल्या नवजात बालिकांच्या नावाने १० हजार रुपयांचे ठेव (फिक्स्ड डिपॉझिट) करण्यात येणार आहे. श्री सिद्धिविनायक न्यासाच्या विश्वस्त समितीच्या बैठकीत अध्यक्ष सदानंद सरवणकर यांच्या अध्यक्षतेखाली ‘भाग्यलक्ष्मी योजना’ मंजूर करण्यात आली आहे. ही रक्कम मुदतपूर्ती झाल्यानंतर १८ वर्षांनंतर मुलीच्या शिक्षणासाठीच वापरणे बंधनकारक असेल.…

