कोल्हापूर : वृत्तसंस्था राज्यातील पुणे येथील स्वारगेट बस स्थानकावर उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये एका 26 वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्याची घटना ताजी असतानाच कोल्हापूर येथे देखील असाच धक्कादायक प्रकार घडला आहे. बंदुकीचा धाक दाखवत तरुणीवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. सविस्तर वृत्त असे कि, कोल्हापूर येथील लक्षतीर्थ वसाहत येथे बंदुकीचा धाक दाखवत एका तरुणीवर बलात्कार करण्यात आला आहे. इतकेच नव्हे तर या नराधम आरोपीने शरीरसंबंधांचे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत वारंवार बलात्कार केल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. विश्वजित सचिन जाधव असे या नराधमाचे नाव असून त्याच्या विरोधात शाहपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.…
Author: editor desk
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील राजकीय धुमाकूळ सुरु असताना अचानक राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर जयंत पाटील हे भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. मात्र जयंत पाटील यांनी पक्ष प्रवेशाची चर्चा फेटाळून लावली आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतल्यानंतर जयंत पाटील भाजपच्या वाटेवर असल्याचे बोलले जात आहे. यावर या भेटीचा कोणताही राजकीय अर्थ काढू नका, असे जयंत पाटील यांनी म्हटले. सांगली जिल्ह्यातील महसूल संदर्भात काही प्रश्न होते, त्या संदर्भात निवेदन देण्यासाठी मी बावनकुळे यांची भेट घेतली, अशी माहिती जयंत पाटील यांनी दिली आहे. तसेच…
पुणे : वृत्तसंस्था पुणे शहरातील स्वारगेट येथे काल पहाटे झालेल्या बलात्काराच्या प्रकारानंतर पुण्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. कालपासून स्वारगेटवर मंत्री किंवा इतर महत्त्वाच्या पदावरील व्यक्तींच्या भेटी सुरू आहेत. त्यामुळे स्वारगेट बस स्थानकाला कालपासून मिनी छावणीचे स्वरूप आले आहे. यातच आता काही वेळापूर्वीच हाय व्होल्टेज ड्रामा रंगला. गृहराज्यमंत्री योगेश कदम स्वारगेट आगारात दाखल झाले असता भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी योगेश कदम यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आणि त्या गाडीवर धावून गेल्या. देसाई यांच्या कृतीने तिथे एकच गोंधळ उडाला. यानंतर तिथे उपस्थित पोलिसांनी तृप्ती देसाई यांना ताब्यात घेतले आणि पोलीस व्हॅनमधून घेऊन गेले. या सगळ्या प्रकरानंतर गृहराज्यमंत्री योगेश कदम आणि पुणे…
पुणे : वृत्तसंस्था राज्यातील पुणे येथील स्वारगेट बस स्थानकात तरुणीवर अत्याचाराची घटना ताजी असतांना आता कल्याणी नगर परिसरात असलेल्या एका वीस वर्षीय कॅब ड्रायव्हरने महिला सॉफ्टवेअर इंजिनिअर समोर गैरवर्तन केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनंतर महिलेने कॅब मधून उडी मारली तसेच थेट पोलिस ठाणे गाठत तक्रार दाखल केली. वास्तविक 21 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी साडेसात वाजताच ही घटना घडली आहे. मात्र, ती आता समोर आली आहे. सविस्तर वृत्त असे कि, पुण्यातील कल्याणी नगर परिसरात ही घटना घडली आहे. या परिसरात एका कंपनीतील महिला सॉफ्टवेअर इंजिनिअरने प्रवास करण्यासासाठी कॅब बुक केली होती. त्यानंतर संगमवाडी रोडवर तिला घेण्यासाठी एक कॅब आली. या…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील जुने जळगाव परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरनगर भागात बुधवारी सकाळी ९ वाजता एका मालवाहू वाहनाचे नियंत्रण सुटल्याने या वाहनाने पानटपरीला जोरदार धडक दिली. या अपघातात पानटपरीजवळ उभे असलेले ग्राहक आणि टपरी चालक महिला गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जुने जळगाव परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरनगर भागात काँक्रीटीकरणाचे काम सुरू आहे. या काँक्रीटीकरणाच्या कामावर वापरण्यात येणाऱ्या मालवाहू टेम्पोने (एमएच १९-एस ६७७७) बुधवारी सकाळी ९ वाजता रस्त्यावरील पानटपरीला जोरदार धडक दिली. यामध्ये वाहनाचेही मोठे नुकसान झाले आहे. वाहनाने पानटपरीवर उभे असलेले संजय बबन सोनवणे (वय ४५, रा. डॉ. बाबासाहेब आंबेडकरनगर)…
बोदवड : प्रतिनिधी शहरातील श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक केंद्रात मंगळवारी रात्री चोरट्यांनी दानपेटी फोडून त्यातील रक्कम चोरून नेली. तसेच शेलवड गावाबाहेरील महादेवाच्या मंदिराची घंटा व त्रिशूलही चोरट्यांनी लंपास केला. मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री शहरातील कोटेचानगरमध्ये असलेल्या श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक केंद्राच्या गेटचे कुलूप बाजूला असलेल्या चावीने उघडले व मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करत आतमध्ये ठेवलेली दानपेटी चोरट्यांनी फोडली. दानपेटील रोख रक्कम काढून घेत बाजूला राख भरण्यासाठी ठेवलेल्या पिशवीत भरून गेटचे कुलूप पुन्हा लावून चोरटे पसार झाले. बुधवारी सकाळी नेहमीप्रमाणे सेवेकरी मंदिरात आले असता त्यांना दानपेटी फुटलेली, तर बाजूला जमिनीवर राख टाकलेली दिसून आली. दानपेटी ही दत्तजयंतीपासून उघडलेली नसल्याने जवळपास पन्नास हजारपर्यंत…
यावल : प्रतिनिधी तालुक्यातील राजोरा फाटा येथे मंगळवारी सकाळी यावलकडून भुसावळकडे जाणाऱ्या दुचाकीचा आणि भुसावळकडून यावलकडे येणाऱ्या रुग्णवाहिकेचा अपघात झाला. यामध्ये दुचाकीवरील दाम्पत्य जखमी झाले. रुग्णवाहिका चालकाने जखमींना तातडीने भुसावळ येथील रुग्णालयात दाखल केले. दोघांचीही प्रकृती स्थिर आहे. मिळालेली माहितीनुसार, राजोरा फाट्याजवळ दुचाकी क्रमांक (एमएच १९, ६६२९) वरून विजय भास्कर अटवाल (५८) व त्यांची पत्नी अलकाबाई विजय अटवाल (५३, रा. शिरसाड, ता. यावल) हे भुसावळ येथे लग्नाला जात होते. या दरम्यान, भुसावळकडून येणारी रुग्णवाहिका आणि दुचाकीचा अपघात झाला. यात दुचाकीवरील दाम्पत्य जखमी झाले. रुग्णवाहिका चालकाने तातडीने जखमी अवस्थेतील दाम्पत्याला त्याच रुग्णवाहिकेतून भुसावळ शहरातील खासगी रुग्णालयात दाखल केले. दोघांवर उपचार करण्यात…
यावल : प्रतिनिधी तालुक्यातील चिंचोली येथे शेत विहिरीत बकऱ्यांसाठी पाणी भरण्याकरिता गेलेल्या २० वर्षीय तरुणीचा पाय घसरला आणि ती पाण्यात बुडाली. ही घटना मंगळवारी सायंकाळी घडली. मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील चिंचोली येथील प्रज्ञा सुरेश साळुंखे ही तरुणी मंगळवारी बकऱ्यांना पाणी पाजण्याकरिता ती गोठ्यालगत असलेल्या भागवत रामचंद्र पाटील यांच्या शेतात विहिरीवर गेली. दरम्यान, तिचा पाय घसरला असावा आणि ती विहिरीत बुडाली असावी. ती मंगळवारी रात्री उशिरापर्यंत घरी परतली नाही म्हणून कुटुंबाकडून तिचा रात्री शोध घेण्यात आला. विहिरीजवळ बादली मिळून आल्यामुळे त्यांनी रात्री विहिरीत डोकावून पाहिले. मात्र, काहीही आढळले नाही. बुधवारी सकाळपासून विहिरीत शोध घ्यायला सुरुवात करण्यात आली. पोलिस पाटील राकेश साठे, सरपंच…
मेष राशी श्रीगणेश म्हणतात की, आजचा दिवस संमिश्र स्वरुपाचा आहे. दुपारनंतर परिस्थिती अनुकूल असेल. तुमच्या कौशल्यांचे नातेवाईकांकडून कौतुक होईल. विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळाल्याने दिलासा मिळेल. कोणताही निर्णय घाईघाईने भावनेच्या आहारी जावून घेऊ नका. यामुळे परिस्थिती आणखी बिकट होऊ शकते. व्यवसायातील कामे थोडी मंदावतील. पती-पत्नीमध्ये सुसंवाद राखला जाईल. आरोग्याची काळजी घ्या. वृषभ राशी श्रीगणेश सांगतात की, मागील काही दिवसांपासून सुरु असणार्या ध्येयप्राप्तीमध्ये आज यश मिळेल. समविचारी लोकांबरोबरील संवादामुळे आत्मविश्वास वाढेल. नोकरदार महिला त्यांच्या जबाबदाऱ्या योग्यरित्या पार पाडू शकतील. आर्थिक परिस्थितीत काही चढ-उतार जाणवतील. प्रवास टाळणे हितकारक ठरेल. कामाच्या ठिकाणी तुम्ही केलेले बदल खूप फायदेशीर ठरू शकतात. घराच्या व्यवस्थेबाबत पती-पत्नीमध्ये तणाव असू…
जळगाव : प्रतिनिधी जिल्ह्यातील अनेक ठिकाणी पोलीस प्रशासनातर्फे अनेक कारवाई होत असतांना आता कासोदा पोलीस स्टेशन हद्दीत व परीसरात गांजा विक्री होत असलेबाबत गुप्त बातमीदारामार्फत माहीती मिळाल्याने पोस्टे हद्दीत वेशांतर करुन मागील ५ दिवसांपासुन सपोनि, निलेश राजपुत व त्यांच्या पथकाने गांजा पकडण्यासाठी सापळा रचला होता. सविस्तर वृत्त असे कि, गेल्या चार दिवसापासून अपयश मिळाले होते. परंतु दि.२५ फेब्रुवारी २०२५ रोजी पेट्रोलिंग दरम्यान वनकोठे गावाजवळ सपोनि, निलेश राजपुत पोउनि. दत्तु खुळे, पोहेकों.नंदलाल परदेशी, पोकों समाधान तोंडे, पोकॉलहु हटकर यांना एरंडोल कडुन कासोदा कडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर वनकोठे गावाजवळ एक संशयित इसम त्याचे मोटार सायकलवर प्लास्टीकचे गोणीत गांजा घेवुन जात असल्याची माहीती…

