Author: editor desk

पुणे : वृत्तसंस्था गेल्या काही महिन्यापासून राज्यातील महाविकास आघाडीतील अनेक नेते महायुतीमध्ये जात असतांना आता शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. त्यातच आता शरद पवार पक्षाचे आमदार उत्तम जानकर यांनी देखील अजित पवार यांच्यासोबत पुण्यात एकाच गाडीतून प्रवास केला. या दोघांमध्ये दहा मिनिटे चर्चा झाली. यावेळी जाणकार यांच्यासोबत उमेश पाटील देखील उपस्थित होते. त्यामुळे आता या घडामोडीची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. उत्तम जानकर आणि अजित पवार यांच्यात कोणत्या विषयावर चर्चा झाली? याबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र यावर प्रतिक्रिया देताना उमेश पाटील यांनी माळशिरस तालुक्यातील उजनी धरणातून पंधरा दिवस आधी पाणी सोडण्याची जानकर यांनी मागणी…

Read More

जळगाव :  प्रतिनिधी भाजपच्या नेत्या आणि केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची काही टवाळखोरांनी यात्रेदरम्यान छेड केल्याचा प्रकार घडला असून याप्रकरणी भाजपच्या महिला पदाधिकारी यांनी टवाळखोरांच्या अटकेसाठी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात भाजप पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिकांनी ठिय्या मांडला आहे. या नुकत्याच समोर आलेल्या घटनेमुळे जळगाव जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांनी याबद्दल महिला आणि मुली घेऊन पोलीस स्टेशनमध्ये आक्रमक पावित्रा घेतला आहे. एका केंद्रीय मंत्र्याच्या मुलीची छेड काढल्याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस स्टेशनमध्ये नागरिकांसह कार्यकर्त्यांचा मोठा जमाव पाहायला मिळत आहे. यामुळे महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. आमच्यासारख्या परिवाराच्या मुली जर सुरक्षित नसेल तर बाकीच्यांचं काय, असा सवाल केंद्रीय मंत्री…

Read More

बीड :  वृत्तसंस्था राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे मोठ्या अडचणीत आले असून मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर 2024 रोजी निर्घृण हत्या करण्यात आली. याप्रकरणात सीआयडीने दोषारोपपत्र दाखल केले. त्यात वाल्मिक कराड हाच या हत्येचा मास्टरमाईंड असल्याचा दावा करण्यात आला आहे. दरम्यान करुणा मुंडे यांच्या फेसबुक पोस्टने राजकीय खळबळ उडाली आहे. 3 मार्च रोजी धनंजय मुंडे राजीनामा देतील असा दावा त्यांनी या पोस्टमध्ये केल्याने राज्याच्या राजकीय गोटात स्फोट झाला आहे. तर हे प्रकरणात न्याय मिळण्यासाठी राष्ट्रवादीचे खासदार बजरंग सोनवणे यांनी सुद्धा मोठा हातभार लावला. त्यांनी याप्रकरणात मोठे विधान केले आहे. आपण करूणा मुंडे यांची…

Read More

जळगाव : प्रतिनिधी आठवडे बाजारात भाजीपाला घ्यायला गेलेल्या विमल मंगा शिरसाठ (वय ६१) यांच्या घरातून चोरट्यांनी २५ हजार रुपये व अन्य साहित्य चोरून नेल्याची घटना पिंप्राळ्यातील गणपती नगरात घडली. ही रक्कम विमलबाई यांनी डोळ्यांची शस्त्रक्रिया करण्यासाठी सांभाळून ठेवली होती. मिळालेल्या माहितीनुसार, विमल शिरसाठ यांचे पती आरोग्य विभागात नोकरीला होते. २०१९ मध्ये त्यांचे निधन झाल्याने त्या गणपती नगरात एकट्याच राहतात. पेन्शनवर त्या उदरनिर्वाह करतात. बुधवारी पिंप्राळ्याचा बाजार असल्याने सायंकाळी साडेसहा वाजता त्या बाजारात गेल्या होत्या. तेथून रात्री साडेआठ वाजता घरी आल्या असता, घराच्या पुढच्या दरवाजाला लावलेले कुलूप तुटलेले होते तर घरातील कपाटही तुटलेले दिसले. त्या कपाटातील पर्समध्ये डोळ्यांच्या शस्त्रक्रियेसाठी २५ हजार…

Read More

जळगाव : प्रतिनिधी एमआयडीसीतील चटई कंपनीत काम करणाऱ्या अनिकेत विजय मौर्य (वय १८, रा. उत्तर प्रदेश, हल्ली मुक्काम सुप्रीम कॉलनी, जळगाव) या परप्रांतीय तरुणाने सुप्रीम कॉलनी येथील राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी सकाळी साडेआठ वाजता उघडकीस आली. आत्महत्येचे कारण मात्र स्पष्ट झालेले नाही. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. नातेवाइकांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिकेत मौर्य हा वडील विजय मौर्य यांच्यासोबत सुप्रीम कॉलनी येथे भाड्याच्या खोलीत वास्तव्याला होता. एमआयडीसीतील एका चटई कंपनीमध्ये काम करून ते आपला उदरनिर्वाह करीत होते. अनिकेतची आई व बहिणी मूळ गावाला आहेत. इकडे बापलेक दोघेच राहत होते. दोघांची कंपनीत रात्रपाळी ड्यूटी…

Read More

वरणगाव : प्रतिनिधी येथील मुक्ताईनगर रस्त्यावरील गंगाबेन पटेल रुग्णालयास लागून असलेले तायबा टायर्स या दुकानाला शनिवारी दुपारी अचानक आग लागली. आगीने रौद्ररूप धारण केल्याने शेजारील दुकानेही आगीच्या भक्ष्यस्थानी सापडल्यामुळे लाखोंचे नुकसान झाले. मुस्लीम भाई अन्सारी यांच्या टायर दुकानाला आग लागली. यात दुकानातील नवीन व जुने टायर, तसेच दुकानासमोरील या दोन दुचाकी जळून खाक झाल्या. तसेच बाजूला असलेले निजाम शेख यांचे चायनीजचे दुकान, इस्माइल शहा यांचे रेडिएटर शॉप,  गॅरेज, मजहर ऑटो गॅरेज व इलेक्ट्रिक गॅस वेल्डिंग या दुकानांनाही आग लागली. यात दुकानातील साहित्य जळून खाक झाले आहे. तसेच लोककल्याण हॉस्पिटलच्या आवारातील जुने मेडिकल साहित्य यात जळून खाक झाले आहे. वरणगाव फॅक्टरी…

Read More

जामनेर : प्रतिनिधी पहूर येथील येथील शेतकरी गजानन तुळशीराम पाटील यांना दोन जणांनी मुलीला रेल्वेत नोकरी लावून देतो, असे आमिष दाखवून दहा लाखांचा गंडा घातला. याप्रकरणी पहूर पोलिसांनी दोन जणांवर गुन्हा दाखल करून एकाला अटक केली आली आहे, तर दुसरा फरार आहे. सविस्तर वृत्त असे कि, जितेंद्र भागवत थाटे (३५, रा. विवेकानंद नगर, जळगाव) आणि तुषार दीपक गावंडे (३०, रा. गिरिजा कॉलनी जामनेर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. यापैकी तुषार हा अटकेत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पहूर येथील शेतकरी गजानन तुळशीराम पाटील हे परिवारासह वास्तव्यास आहेत. त्यांची मुलगी रेल्वेच्या नोकरीसाठी स्पर्धा परीक्षेची तयारी करीत होती. पाटील यांच्या पत्नीच्या कार्यालयात…

Read More

मेष राशी दीर्घकाळ चाललेल्या समस्या आज संपतील. जमीन, इमारत, वाहन संबंधित कामातील अडथळे कमी होतील. तुम्ही पराक्रमाने काहीतरी नवीन करून दाखवण्यास उत्सुक असाल. पण सुरुवातीला तुम्हाला थोडा जास्त संघर्ष करावा लागेल. हळूहळू परिस्थिती सुधारेल. चांगल्या मित्रांचे सहकार्य वाढेल वृषभ राशी आज तुम्ही आर्थिक बाबतीत भांडवल गुंतवू शकता. भौतिक सुखसोयींवर अधिक खर्च होऊ शकतो. नवीन जमीन, इमारती, वाहने, घरे खरेदी-विक्रीसाठी परिस्थिती विशेष चांगली नाही. याबाबत नीट विचार करून निर्णय घ्या. मिथुन राशी समाजात मान-सन्मान मिळेल. तुम्हाला तुमच्या आईकडून खूप प्रेम मिळेल. मित्र आणि प्रियजनांच्या माध्यमातून घरगुती प्रश्न सुटतील. प्रियजनांच्या मतामुळे तुमचे व्यक्तिमत्व बदलेल. निसर्गाच्या सानिध्यात राहण्याची संधी मिळेल. कर्क राशी…

Read More

 नाशिक : वृत्तसंस्था राज्यातील नाशिक शहरातून एक मोठी बातमी समोर आली आहे. नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघाच्या आमदार देवयानी फरांदे यांनी गंगापूररोडवरील एका कॅफेवर छापा टाकत कारवाई केली आहे. त्यावेळी कॅफेमध्ये सुरु असलेले प्रकार पाहून त्यांना धक्का बसला. या ठिकाणी तरूण-तरूणींना १०० ते २०० रूपयात रूम दिले जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या कॅफेत तरुण तरूणांसाठी पडदे लावून खास सोय केली जात असल्याची तक्रार आल्यानंतर  आज  दि. 1 दुपारी आमदार देवयानी फरांदे यांनी विद्या विकास सर्कल जवळील हॉटेल मोगली कॅफे येथे पोलिसांना घेऊन धडक दिली. पोलिसांनी कॅफेमध्ये अनेक मुला मुलींना अश्लील चाळे करताना ताब्यात घेतले. यावेळी आमदार देवयानी फरांदे चांगल्याच…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील बीड येथील सरपंच देशमुख खून प्रकरणात मोठी अपडेट समोर आल्यानंतर सर्वच विरोधक आता मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागत असतांना नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या प्रकरणी धनंजय मुंडेंवर टीकेची झोड उठवत त्यांची व नैतिकतेची केव्हा भेटच झाली नसल्याचा दावा केला. सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली. या व्यक्तीला (वाल्मीक कराड) एवढे अमानुष वागण्याचा अधिकारच कुणी दिला? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. संतोष देशमुख हत्या आणि खंडणी प्रकरणात सीआयडीने 1500 हून अधिक पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. त्यात वाल्मीक कराड हाच देशमुख यांच्या हत्येचा मुख्य सूत्रधार असल्याचा…

Read More