Author: editor desk

चाळीसगाव : प्रतिनिधी जिल्ह्यातील अनेक ठिकाणी अपघाताच्या घटना घडत असतांना आज दि.४ मार्च रोजी पहाटेच्या सुमारास चाळीसगाव तालुक्यातील वाघळी गावाजवळ ट्रक आणि आयशरची समोरासमोर झालेल्या भीषण आयशर चालकाचा जागीच मृत्यू झाला तर इतर तीन जण गंभीर जखमी झाले आहे. यावेळी जेसीबीच्या माध्यमातून जखमींना अपघातग्रस्त वाहनातून काढण्यात आले. याप्रसंगी रस्त्यावरील दोन्ही बाजूची वाहतूक खोळंबली होती. समाधान मेघराज पाटील गाव सार्वे ह.मु.तांबोळा खुर्द असे मयत चालकाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चाळीसगाव तालुक्यातील वाघळी गावाजवळ ट्रक क्रमांक (एमएच १९ झेड ४७५८) आणि आयशर क्रमांक (एमएच १९ सीवाय ०७०४) यांच्यात समोरासमोर भीषण अपघात झाल्याची घटना मंगळवारी ४ मार्च रोजी सकाळच्या सुमारास घडली आहे. या…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील बीड येथील संतोष देशमुख हत्येप्रकरणी वादात सापडलेले राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी अखेर आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दिला. सोमवारी मध्यरात्री झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी मुंडे यांना राजीनामा देण्याचे आदेश दिले होते. मुंडे यांचे पीए, ओएसडी यांनी ‘सागर’ बंगल्यावर मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा सोपवला आहे. थोड्याच वेळात फडणवीस विधानभवनात राजीनाम्याची घोषणा करतील. विविध भ्रष्टाचार प्रकरणात आरोप झालेले धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सोमवारी भेट घेतली होती. या भेटीत त्यांनी आपल्यावरील आरोपांबाबत स्पष्टीकरण दिले. धनंजय मुंडे हे अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राजीनामा देतील असा दावा त्यांच्या पत्नी करुणा मुंडे यांनी केला…

Read More

धरणगाव : प्रतिनिधी तालुक्यातील पिंपळकोठा ते पिंप्री महामार्गावर जळगाव येणाऱ्या डंपरने ओव्हरटेक करताना दोन दुचाकींना दिलेल्या धडकेत दोन्ही दुचाकीवरील चौघे जण जखमी झाले आहेत. तर या अपघातानंतर डंपर चालक डंपर काही अंतरावर सोडून पसार झाला आहे. धरणगाव तालुक्यातील पिंपळकोठा ते पिंप्री महामार्गावर जळगावकडून येणाऱ्या डंपरने ट्रकला ओव्हरटेक करताना फॅशन प्लस या दुचाकी (एमएच १९, बीए- ५२१६) ला धडक दिली. यात पिंप्री खुर्द येथील दुचाकीवरील भीमराव रमेश पाटील व त्यांचा मुलगा कुणाल भीमराव पाटील हे जखमी झाले आहेत. ते पिंपळकोठा गावात पाण्याचे जार भरण्यासाठी जात होते. याच वेळी त्यांच्या दुचाकीला डंपरने मागाहून धडक दिली. त्यानंतर ही दुचाकी समोरून येणाऱ्या प्लॅटिना या…

Read More

मुंबई ; वृत्तसंस्था राज्यातील बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांना राजीनामा देण्यास सांगितले आहे. देवगिरी बंगल्यावर सोमवारी रात्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, सुनील तटकरे आणि धनंजय मुंडे यांची बैठक पार पडली होती. या बैठकीनंतर देवेंद्र फडणवीस यांना धनंजय मुंडे यांना राजीनामा देण्यास सांगितले आहे. त्यानुसार आज धनंजय मुंडे आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा सादर करतील, अशी शक्यता आहे. संतोष देशमुख हत्याप्रकरणाचा सूत्रधार वाल्मीक कराड हा धनंजय मुंडे यांना निकटचा सहकारी आहे. या प्रकरणात त्यांचे नाव आल्यापासून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची…

Read More

चाळीसगाव : प्रतिनिधी मालेगाव रोडवरील वृंदावननगरमध्ये बंद घराचे कडीकुलूप तोडून घरातील कपाटात ठेवलेल्या १ लाख रुपयांच्या रोकडसह सोन्याचे दागिने असा जवळपास अडीच लाखांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेल्याचे सोमवारी सकाळी उघडकीस आले. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनला अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, वृंदावन नगरमध्ये राहणारे तुषार ईश्वर पाटील हे दि. १ मार्च रोजी घराला कुलूप लावून व बाहेरील गेट बंद करून कुटुंबासह गावी शिरसगाव येथे गेले होते. ३ मार्च रोजी सकाळी १० वाजता ते कुटुंबासह चाळीसगाव येथील घरी आले तेव्हा घराच्या मुख्य दरवाजाला असलेला कडीकोयंडा तुटलेला दिसला. तर दरवाजा आतून बंद केलेला होता. त्यांनी घराच्या…

Read More

जळगाव : प्रतिनिधी शहरातील चंदू अण्णानगर परिसरातील गिरणाई कॉलनी भागातील एका बांधकामाच्या ठिकाणी दुसऱ्या मजल्यावर पाणी मारत असताना तोल जाऊन एका सुरक्षा रक्षकाचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी रात्री ९ वाजता घडली. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद आहे. मनोहर ढेमा बारेला (वय ३०, रा.उंबऱ्या, ता. भगवानपूर, जि. खरगोन, मध्य प्रदेश) असे मृत झालेल्या सुरक्षारक्षकाचे नाव आहे. सविस्तर वृत्त असे कि, मनोहर बारेला हे गेल्या दीड वर्षापासून शहरातील नरेंद्र साळुंखे यांच्या बांधकामाच्या ठिकाणी सुरक्षारक्षक म्हणून काम करत होते. परिसरातील एका ठिकाणी झोपडीत मनोहर बारेलासह पत्नी व मुले असा परिवार होता. रविवारी रात्री नियमितप्रमाणे बांधकामाच्या ठिकाणी जाऊन पाणी मारत असताना…

Read More

भुसावळ : प्रतिनिधी शहरालगतच्या कंडारी परिसरातील केंद्रीय विद्यालयाच्या मागील बाजूस बंद पडलेल्या खोल्यांमध्ये बिबट्याने एका गाढवाची शिकार केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आणि पंचनामा करून पुढील कारवाई केली. रविवारी सायंकाळी केंद्रीय विद्यालयाजवळ बिबट्या दिसल्याने कंडारी आणि सुभाष नगर परिसरात भीतीचे वातावरण पसरले. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी गाढवाच्या शिकारीचे तपशील तपासले. बिबट्याच्या पायाचे ठसे आढळले नसले तरी शिकारीची पद्धत बिबट्यासारखीच असल्याने हा हल्ला बिबट्यानेच केला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला. नागरिकांच्या सुरक्षेसाठी कंडारी शिवारातील बिबट्याला लवकरात लवकर पकडून नागरिकांना भयमुक्त करावे, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे. रेल्वे क्वार्टर, ऑर्डनन्स फॅक्टरी…

Read More

मुक्ताईनगर : प्रतिनिधी लोकप्रतिनिधी तथा भाजपच्या नेत्याच्या कन्येसह तिच्या मैत्रिणीची संत मुक्ताबाई यात्रोत्सवात छेड काढल्याप्रकरणात आणखी दोन जणांना पोलिसांनी रविवारी मध्यरात्रीनंतर अटक केली, आता या प्रकरणात अटकेतील आरोपींची संख्या चार झाली आहे. किरण माळी (२१) व एक अल्पवयीन अशा दोघांना रविवारी रात्री तर अनिकेत भोई (२६), अनुज पाटील (१९) या दोघा संशयितांना रविवारी मध्यरात्रीनंतर अटक करण्यात आली. अल्पवयीन वगळता तीन आरोपींना सोमवारी भुसावळ येथील विशेष सत्र न्यायालयाने दि. ५ मार्चपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तीन आरोपी अद्यापही फरार आहेत. अल्पवयीन आरोपीला जळगावातील बाल न्याय मंडळापुढे हजर करण्यात आले. भुसावळ विशेष सत्र न्यायालयात पोलिस निरीक्षक नागेश मोहिते यांनी तिन्ही…

Read More

मेष श्रीगणेश म्हणतात की, आज महत्त्वाचे काम पूर्ण करतील. विश्वासू व्यक्तीचा सल्ला आणि पाठिंबा तुमचा आत्मविश्वास वाढवेल. इतरांच्या सल्ल्याचा गांभीर्याने विचार करा. अचानक काही खर्च येऊ शकतात. कोणत्याही प्रकारच्या अनुचित कामात रस घेऊ नका. घरातील वातावरण आनंदी राहील. वृषभ गेल्या काही दिवसांपासून अडथळे येत असलेली कामे आज अगदी सहजपणे पूर्ण कराल. जवळच्या नातेवाईकांसोबत मनोरंजनाचे कार्यक्रम होतील. धार्मिक कार्यातही तुमचा सहभाग असेल. कोणतेही काम करण्यापूर्वी चांगल्या आणि वाईट पातळीचा विचार करणे आवश्यक आहे. मुलांच्या समस्या शांतपणे सोडवा, असा सल्‍ला श्रीगणेश देतात. मिथुन श्रीगणेश सांगतात की, आज ग्रहस्‍थिती तुमच्‍यासाठी अनुकूल आहे. धार्मिक कार्यातील सहभागाने तुमची मानसिकतेमध्‍ये सकारात्मकता अनुभवा. तुमच्या संतुलित…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था राज्याच्या राजकारणातून एक महत्वाची बातमी समोर आली आहे. विधानसभा निवडणूक निकालानंतर आता रिक्त पाच विधान परिषदेच्या जागांवर निवडणूक जाहीर करण्यात आलेली आहे. परिषदेतील ५ आमदार विधानसभेवर निवडून गेल्याने त्या जागा आता रिक्त झाल्या आहेत. शिवसेना शिंदे गट एक, अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचा एक तर भाजपच्या तीन रिक्त जागांवर निवडणूक होणार आहे. १० मार्च ते १७ मार्च अर्ज भरण्याची प्रक्रिया असेल. आमश्या पाडवी, राजेश विटेकर, प्रवीण दटके, गोपीचंद पडळकर आणि रमेश कनाड या सदस्यांच्या रिक्त जागांसाठी निवडणूक होणार आहे. दरम्यान, या रिक्त जागांवर कुणाची नेमणूक होणार याकडे आता राज्याचं लक्षू लागून राहिलं आहे. आमदार आमश्या पाडवी…

Read More