पारोळा : प्रतिनिधी पारोळा पोलीस स्टेशन येथे दाखल गुन्ह्यातील शेतकऱ्याच्या शेतातील मोटार चोरी प्रकरणी दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वरिष्ठ अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधिक्षक कविता नेरकर, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते (अमळनेर उपविभाग) यांनी चोरीच्या गुन्ह्यांवर विशेष लक्ष घालण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने, प्रभारी अधिकारी सुनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पारोळा पोस्टे डी.बी. पथकाने गुन्ह्याचा तपास सुरू केला. तपासादरम्यान, पोउपनि अमरसिंग डी. वसाव, पोना संदिप सातपुते, पोकों अभिजित पाटील, पोकों विजय पाटील यांनी गोपनीय माहितीच्या आधारे संशयित आरोपी योगेश उर्फ सुर्या रमेश पाटील (रा.…
Author: editor desk
जळगाव : प्रतिनिधी अमळनेर पोलिसांनी तालुक्यातील टाकरखेडा येथे जुगार अड्ड्यावर छापा टाकून १ लाख २६ हजार ९६० रुपये रोख आणि ५ मोटारसायकली एक रिक्षासह ३ लाख४६ हजार ९६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. धरणगाव व अमळनेर तालुक्यातील ९ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, तालुक्यातील टाकरखेडा येथे मोठा पत्त्यांचा जुगार सुरू असल्याची माहिती प्रभारी अधिकारी केदार बारबोले यांना मिळाल्यानंतर त्यांनी ५ रोजी सायंकाळी पोलीस उपनिरीक्षक नामदेव बोरकर , एएसआय राजेंद्र कोठावदे , हेडकॉन्स्टेबल मिलिंद सोनार, विनोद संदानशीव, निलेश मोरे ,उज्वलकुमार म्हस्के , गणेश पाटील,अमोल पाटील, सचिन पाटील, राहुल पाटील,उदय बोरसे याना टाकरखेडा…
नागपूर : वृत्तसंस्था महायुती सरकारचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर मध्ये गेल्या काही दिवसापासून गुन्हेगारी घटना घडत असतांना आता तर चोरट्यांनी धूमाकूळ घातला आहे. गुन्ह्यांच्या वाढत्या घटनामुळे नागरीक मात्र चांगलेच त्रस्त झाले आहेत. नागपूरमध्ये तीन चोरट्यांनी चक्क एटीएम मशीनचीच चोरी करून ते उचकटून घेऊन गेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. नागपूर जिल्ह्यातील उपरखेडा पोलीस स्टेशन अंतर्गत भानेगाव येथील घटना आहे. चोरीची ही अफलातून घटना सीसीटीव्ही मध्येदेखील चित्रीत झाली आहे. मात्र यामुळे मोठी दहशत माजली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय महामार्गाच्या बाजूला एटीएम सेंटर मधून चक्क एटीएम मशीन चोरून नेल्याची घटना बुधवारी भानेगाव येथे उघडकीस आली. ही घटना रात्री पावणे दोन वाजता घडली…
गडचिरोली : वृत्तसंस्था गेल्या काही महिन्यापासून राज्यातील अल्पवयीन मुलीसह विवाहितेवर अत्याचारासह विनयभंगाच्या घटना घडत असतांना आता गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील लाहेरी पोलिस ठाण्यांतर्गत एका गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिकणाऱ्या आदिवासी विद्यार्थिनीशी मुख्याध्यापकानेच अश्लिल चाळे केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी रवींद्र उष्टूजी गव्हारे (वय ४६, रा. भामरागड) या मुख्याध्यापकास अटक केली आहे. यामुळे शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. संबंधित गाव आदिवासीबहुल असून, तेथे जिल्हा परिषदेची इयत्ता पाचवीपर्यंतची शाळा आहे. शाळेत पूर्वी रवींद्र गव्हारे आणि अन्य एक शिक्षक कार्यरत होते. परंतु दुसऱ्या शिक्षकास अन्य ठिकाणी प्रतिनियुक्तीवर पाठविण्यात आले आहे. त्यामुळे सद्य:स्थितीत मुख्याध्यापक रवींद्र गव्हारे हा तेथे एकटाच…
मुंबई : वृत्तसंस्था पुणे शहरातील स्वारगेट बसस्थानकावर महिलेवर झालेल्या बलात्काराची घटना ताजी असतानाच आता मुंबईच्या जोगेश्वरी परिसरात माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडल्याचे समोर आली आहे. पोलिसांनी 5 जणांना बेड्या ठोकल्या असून अधिक तपास सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 24 फेब्रुवारीला शाळा सुटल्यापासून ती बेपत्ता होती. 26 फेब्रुवारीला मुलीच्या काकांनी मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार पोलिसात केली. त्यानंतर 27 तारखेच्या सकाळी ही पीडिता दादर रेल्वे स्थानकाजवळ आढळली. रेल्वे पोलिसांनी तिला ताब्यात घेतले. पीडित मुलगी तिच्या काकांसोबत राहते. 24 फेब्रुवारी रोजी शाळा सुटल्यानंतर ती बेपत्ता झाली होती. 24 फेब्रुवारीच्या दिवशी ती बेपत्ता झाली होती. अटक करण्यात आलेले आरोपी हे एसी मेकॅनिक आहेत. शाळा सुटल्यानंतर…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील बीड येथील खून प्रकरण चांगलेच तापले असतांना आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आता एका नव्या मुद्या काढला असल्याने मोठी खळबळ उडाली आहे. सतीश भोसले याचे सुरेश धसांसोबतचे त्याचे अनेक फोटो, अनेक व्हिडिओ समोर आलेले आहेत. या कार्यकर्त्यावर काय कारवाई करणार याबाबत सुरेश धसांनी यावर स्टेटमेंट द्यावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केली आहे. सतीश भोसले सुद्धा उद्या वाल्मीक कराड होणार आहे, हे आतापासून तुम्ही समजून घ्या, असेही दमानिया म्हणाल्या. तसेच देवेंद्र फडणवीस जोपर्यंत स्टेटमेंट देत नाहीत, तोपर्यंत मी अधिवेशनादरम्यान विधिमंडळासमोर उद्यापासून ठिय्या मांडणार असल्याचा इशाराही दमानिया यांनी दिला आहे. बीडच्या बावी गावात तरुणाला…
जामनेर : प्रतिनिधी तालुक्यातील देऊळगाव गुजरी येथे मंगळवार दि. ४ मार्च रोजी आठवडे बाजाराच्या दिवशी एकाच समाजातील दोन गटात उधारीच्या पैशांवरून वाद निर्माण झाला. याच वादातून दोन्ही गटात तुफान हाणामारी झाली यात अनेक जण जखमी झाले. याप्रकरणी दोघं गटातील एकूण २७ जणांविरुद्ध फत्तेपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, यासीन चाँद पिंजारी यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली, यामध्ये त्यांचा भाऊ रशीद पिंजारी याचेकडे जाकीर कालू कुरेशी, साकीर कालू कुरेशी यांची मटनाचे चारश रुपये उधारी होती. यातून वाद निर्माण झाला कालांतराने जाकीर व साकीर यांनी गैरकायदेशिर मंडळी जमा करून हातात फायटर सुरी, लोखंडी रॉडने हल्ला करून रशीद…
रावेर ; प्रतिनिधी येथील सलमा बी अब्दुल रहीम (वय ३४) या विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना दि. ४ रोजी घडली. याप्रकरणी रावेर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. आत्महत्येचे कारण मात्र समजू शकले नाही. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील मन्यार वाडा भागातील रहिवासी सलमा बी अब्दुल रहीम (वय ३४) या विवाहित महिलेने काल दुपारी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत शेख इम्रान शेख शकील राहणार बंगाली कॉलनी खंडवा मध्यप्रदेश यांनी रावेर पोलीस ठाण्यात दिलेल्या माहितीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश जाधव करीत आहेत.
जळगाव : प्रतिनिधी शहरातील अनेक ठिकाणी अपघाताच्या घटना घडत असतांना नुकतेच शिवकॉलनी लगत असलेल्या महामार्गावर रात्री ११.१५ वाजेदरम्यान भरधाव कंटेनरने दुचाकीला दिलेल्या धडकेत ५० वर्षीय प्रौढाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. यामुळे रात्री महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. दरम्यान, या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी शिवकॉलनी परिसरात रास्तारोको करुन शहराबाहेरील महामार्गाचे काम तत्काळ पूर्ण करावे, अशी मागणी केली. मिळालेल्या माहितीनुसार, आशाबाबा नगरातील रहिवासी विजय नामदेव भोई (वय ४५, रा.) यांचा मृत्यू झाला. शिवकॉलनीत असलेली आपली टपरी व सोडा वॉटरचे दुकान बंद करुन विजय भोई हे घराकडे जात असताना धुळ्याकडून भुसावळकडे जाणाऱ्या भरधाव कंटेनरने त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली. या अपघातात विजय भोई…
छत्रपती संभाजी नगर : वृत्तसंस्था पुणे येथील स्वारगेट बलात्कार प्रकरणामुळे राज्यातील गुन्हेगारी उफाळून येत असतांना आता छत्रपती संभाजीनगरमध्येही एका विवाहितेवर बलात्काराचा प्रयत्न झाल्याची संतापजनक घटना उजेडात आली आहे. या घटनेत आरोपीने पीडितेवर चाकूचे 15 हून अधिक वार करत तिचा चेहरा विद्रुप करण्याचा प्रयत्न केला. तिच्यावर येथील एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी आरोपी नराधमाच्या मुसक्या आवळल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, अभिषेक तात्यावर नवपुते (19, रा. घारदोन) असे आरोपीचे नाव आहे. चिखलठाणा पोलिसांनी त्याला मंगळवारी अटक केली. आरोपी गत अनेक दिवसांपासून पीडितेचा पाठलाग करत होता. पण पीडितेने त्याच्याकडे दुर्लक्ष केले. विवाहिता 2 मार्च रोजी रविवारी सायंकाळी आपल्या शेतात काम करत होती. त्यावेळी…

