मुंबई : वृत्तसंस्था राज्यात अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी धनंजय मुंडे यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला तर दुसऱ्या दिवशी औरंगजेबाचे उदात्तीकरण करणारे वक्तव्य करणारे समाजवादी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार अबू आझमी यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या तारखेपर्यंत त्यांचे निलंबित करण्याचा प्रस्ताव आज विधानसभेत एकमताने मंजूर करण्यात आला. विधानसभेत मंत्री चंद्रकांत पाटील यांनी अबू आझमी यांच्या निलंबनाचा प्रस्ताव मांडला. अबू आझमी यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना औरंगजेब उत्तम प्रशासक होता, असे त्याची भलामण करणारे आणि छत्रपती संभाजी महाराजांबाबत वादग्रस्त वक्तव्य केले. ही त्यांची वक्तव्ये आक्षेपार्ह आहेत. त्यांची वक्तव्ये निषेधार्ह आहेत. यामुळे सभागृहाचा अवमान झाला. अबू आझमींनी विधानसभेची प्रतिमा मलीन…
Author: editor desk
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारमधील आणखी एक मंत्री अडचणीत सापडण्याची चिन्हे आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय असणारे कॅबिनेट मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर एका महिलेला स्वतःचे विवस्त्र फोटो पाठवल्याचा आरोप झाला आहे. या महिलेने या प्रकरणी योग्य ती कारवाई झाली नाही, तर 17 मार्चपासून विधान भवनासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात एकच हल्लकल्लोळ माजला आहे. पीडित महिलेने यासंबंधी राज्यपालांसह मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री व विरोधी पक्षांच्या नेत्यांना पत्र पाठवून मंत्री जयकुमार गोरे यांची हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे. आपल्या पत्रात पीडितेने हे संपूर्ण प्रकरण विषद केले आहे. त्यानुसार, सातारा जिह्यातील माण-खटाव मतदारसंघाचे जयकुमार गोरे हे आमदार…
मुंबई : वृत्तसंस्था विधानसभा निवडणूक झाल्यानंतर राज्यात महायुती सरकारने सत्ता स्थापन केल्यानंतर अनेक धाडसी निर्णय महायुती सरकारने घेतला आहे तर सध्या सुरु असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात महायुती सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. आता प्रतिज्ञापत्रासाठी लागणारे 500 रुपयांचे मुद्रांक शुल्क माफ करण्यात आले आहे. या निर्णयामुळे राज्यातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. कारण प्रतिज्ञापत्रासाठी लागणारे मुद्रांक शुल्क माफ केल्याने विद्यार्थ्यांचा आर्थिक ताण आता हलका होणार आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या निर्णयाची घोषणा केली. लाडकी बहीण योजनेमध्ये मोठ्या प्रमाणावर निधी खर्च होत असल्याने महसूल वाढीसाठी मुद्रांक शुल्काच्या दरात 100 रुपयांवरुन 500 रुपये वाढ केलेली आहेत. याचा सर्वाधिक फटका विद्यार्थ्यांना बसत होता.…
पाचोरा : प्रतिनिधी शहरात ४२ वर्षीय विवाहितेने आपल्या राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना २ मार्च रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास घडली आहे. घटनेप्रकरणी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पाचोरा शहरातील आशिर्वाद ड्रिमसिटी मधील रहिवासी वैशाली अनिल पाटील (वय – ४२ वर्ष) या विवाहितेने राहत्या घरात गळफास लावून आपली जीवन यात्रा संपविल्याची खळबळजनक घटना २ मार्च रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास घडली. वैशाली पाटील व पती अनिल पाटील यांचे किरकोळ कारणावरून नेहमी वाद होत असत. पती अनिल पाटील याचे कडुन वैशाली हिस शिविगाळ व मारहाण होत असे. नेहमीच्या वादाला कंटाळून अखेर वैशाली पाटील…
रावेर : प्रतिनिधी तालुक्यातील सातपुडा पर्वत भागातील अहिरवाडी व पाडळे खुर्द वनविभागाच्या कंपार्टमेंट मध्ये सुमारे वीस हजार रुपये किमतीचा १६५ किलो डिंक जप्त केला याप्रकरणी डींक चोरी करणारे दोन मोटरसायकल सह मुद्देमाल सोडून पसार झाले. सविस्तर वृत्त असे कि, सातपुडा पर्वतातील अहिरवाडी येथील सेक्टर क्रमांक पाच मध्ये वनविभागाचे कर्मचारी गस्त घालत असताना मोटर सायकलवरून लिंक नेतांना अज्ञात इसम आढळून आले. मोटरसायकल स्वरांचा पाठलाग केला असता ते पळून गेले. या कारवाईत दहा हजार ८७० रुपये किमतीचा ९८ किलो सलई डिंक तसेच एम एच १९ ए जी १७२३ ही पंधरा हजार रुपये किमतीची मोटरसायकल तसेच सेक्टर क्रमांक आठ मध्ये ४७ किलो सल्डिंग…
जळगाव : प्रतिनिधी आठवडे बाजारात भाजीपाला घेण्यासाठी गेलेल्या वृद्ध महिलेच्या घरात चोरी करणाऱ्या वैभव उर्फ गोल्या दत्तात्रय पाटील (वय २४, रा. गणपतीनगर) याच्या रामानंद नगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या. त्याच्याकडून दहा हजारांची रोकड आणि ९ हजार रुपयांचे तांबे पितळाचे भांडे हस्तगत करण्यात आले आहे. सविस्तर वृत्त असे कि, शहरातील पिंप्राळा परिसरातील गणपती नगरात राहणाऱ्या विमल शिरसाठ या आठवडे बाजारात भाजीपाला घेण्यासाठी गेल्या होत्या. त्याचवेळी त्याच्या घराचे कुलूप तोडून चोरट्याने त्यांच्या घरात प्रवेश केला. यावेळी त्यांच्या घरातून २५ हजारांची रोकड आणि तांबे पितळाचे भांडे चोरून नेले होते. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात् गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास करत असतांना…
मुक्ताईनगर : प्रतिनिधी भाजपच्या नेत्याच्या कन्येसह तिच्या मैत्रिणींची संत मुक्ताबाई यात्रेत छेड काढल्या प्रकरणात सातपैकी तीन आरोपी अद्याप फरार आहेत. या आरोपींच्या शोधार्थ तीन पथके स्थापन केली आहेत. फरार आरोपींमध्ये माजी नगरसेवक पीयूष मोरे, चेतन भोई आणि सचिन पालवे यांचा समावेश आहे. तर अटकेतील आरोपी अनिकेत भोई, किरण माळी आणि अनुज पाटील यांची पोलिस कोठडी ५ रोजी संपणार आहे. एक अल्पवीन आरोपी बालसुधार गृहात रवाना करण्यात आला आहे. २८ फेब्रुवारी रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास कोथळी येथे संत मुक्ताबाई यात्रोत्सवात उच्चपदस्थ लोकप्रतिनिधी तथा भाजप नेत्याच्या कन्येची व तिच्या मैत्रिणीची छेड काढण्यात आली होती. याप्रकरणी पीडितांच्या तक्रारीवरून २ मार्च रोजी येथील…
मेष राशी श्रीगणेश म्हणतात की, आज संपत्तीशी संबंधित प्रलंबित कामे मार्गी लागतील. धार्मिक कार्यक्रमाच्या आयोजनामुळे घरात सकारात्मक ऊर्जा प्रबळ राहील. तुमच्या प्रत्येक योजना गुप्त ठेवा. अन्यथा कोणीतरी त्यांचा फायदा घेईल. आर्थिक व्यवहार करताना विचारपूर्वक निर्णय घ्या. कोणत्याही बेकायदेशीर कामात रस घेऊ नका. वृषभ राशी श्रीगणेश सांगतात की, आज नातेसंबंध मजबूत करण्यासाठी तुम्हाला अहंकाराचा त्याग करावा लागेल. तरुणांच्या करिअरच्या चिंता दूर होतील. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. प्रवास टाळणे हितकारक ठरेल. व्यवसायात यश मिळेल. मार्केटिंगशी संबंधित कामांना प्राधान्य द्या. मिथुन राशी आज मित्र आणि नातेवाईकांबरोबर झालेली भेट लाभदायक ठरेल. अनेक समस्या सहजपणे सोडवल्या जातील.मात्र तुमचा संशयी स्वभावामुळे नवे प्रश्न निर्माण होणार…
अकोला : वृत्तसंस्था बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो व व्हिडिओ समोर आल्यानंतर संपूर्ण राज्य हादरले असून या आरोपींनी अत्यंत क्रूर व अमानुषपणे संतोष देशमुख यांची हत्या केली होती. संतोष देशमुख यांना मारहाण करताना व्हिडिओ देखील या नराधमांनी बनवले होते. या संपूर्ण घटनेवर संपूर्ण राज्यातून संतापाची लाट निर्माण झाली आहे. यावर प्रहार संघटनेचे नेते व माजी आमदार बच्चू कडू यांनी संतप्त प्रतिक्रिया देत थेट औरंगजेबाशी तुलना केली आहे. बच्चू कडू म्हणाले, मला असे वाटते की एकंदरीत एवढी निर्घृण हत्या झाली आणि एवढे सगळे होऊन राजकारणी लोकांनी त्यावर राजकारण केले आहे. खरे तर हा दोन जातीतला वाद नसून…
बीड : वृत्तसंस्था राज्यातील बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येचे फोटो व्हायरल झाल्यानंतर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या पार्श्वभूमीवर आज बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आलेली आहे. बीडच्या केज येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकात टायर जाळून निषेध व्यक्त करण्यात आला. बीड जिल्ह्यात रात्रीपासूनच संताप व्यक्त केला जात आहे. तसेच आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली जात आहे. दरम्यान, बीड जिल्हा बंदला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. बीड शहरात व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त पद्धतीने दुकाने बंद ठेवून सहभाग नोंदवला. तर सामाजिक संघटनांनी रस्त्यावरती उतरून बंदसाठी आवाहन केले. तसेच परळी तालुक्यातील मोठी बाजारपेठ असलेल्या सिरसाळा येथेही कडकडीत बंद पाळण्यात आला.…

