बीड : वृत्तसंस्था राज्यातील बीड जिल्ह्यातील सरपंच खुनातील आरोपी अटकेत असतांना आता नव्या वादाला तोंड फुटले आहे. वाल्मीक कराडनंतर आता बीडच्या शिरूर येथील कुख्यात गुंड सतीश भोसलेचे मारहाणीचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. सतीश भोसले हा भाजप आमदार सुरेश धस यांचा खंदा कार्यकर्ता आहे. त्यामुळे त्याच्या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमुळे धस यांची कोंडी होत आहे. दरम्यान, एका ऑडिओ क्लिपमध्ये धस हे भोसलेला माझा तुला 99 नव्हे तर 100 टक्के आशीर्वाद असल्याचे म्हणताना ऐकू येत आहेत. या क्लिपमुळे धस यांच्या अडचणींत वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. बीडमधील राजकीय गुन्हेगारीमुळे अवघा महाराष्ट्र हादरला आहे. सरपंच संतोष देशमुख हत्याकांडामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय…
Author: editor desk
जळगाव : प्रतिनिधी यावल तालुक्यातील किनगाव येथे बिबट्याच्या हल्ल्यात एका ७ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी घडली. ही घटना मौजे साकळी (ता. यावल) येथील शिवारात घडली. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी घडलेल्या दुर्देवी घटनेबाबत दुःख व्यक्त केले आहे. तसेच वन्यप्राण्याच्या हल्यात मृत्यू झाल्यास राज्य शासनाकडून तात्काळ 10 लाखाची मदत दिली जाते. त्या संदर्भातील कार्यवाही तातडीने करण्याचे निर्देश दिले आहेत. किनगाव येथील शेतकरी केतन सुरेश चौधरी यांच्या मालकीच्या गट क्रमांक ४७२ मध्ये काम करणाऱ्या पेमा बुटसिंग बारेला यांचा मुलगा केश्या पेमा बारेला (वय ७) याच्यावर बिबट्याने दुपारी २ ते २:१५ च्या सुमारास हल्ला केला. या हल्ल्यात केश्या गंभीर जखमी…
धरणगाव : प्रतिनिधी वाळूची अवैध वाहतूक करणाऱ्या डंपरने धडक दिल्याने सायकलस्वाराचा जागेवरच मृत्यू झाला. जळगाव रोडवर असलेल्या महावीर जिनिंगच्या समोरच हा भीषण अपघात झाला. बांभोरी ते धरणगाव दरम्यान या चालकाने बेदरकारपणे डंपर चालवून अनेक वाहनांना कट मारले. हे सर्व भयभीत वाहनचालकांना पुढे आल्यावर हा अपघात दिसला. मिळालेल्या माहितीनुसार, धरणगाव येथील रहिवासी दत्तात्रय शंकर पाटील (वय-65) हे जिनिंग मध्ये रात्रपाळी वाचमन म्हणून काम करतात. आज गुरूवारी रात्री 7.30 वाजता ते धरणगाव कडून जिनिंग मध्ये कामासाठी सायकल वरून जात होते. याच वेळी जळगाव कडून वाळूने भरलेला डंपर (MH04/FJ8083) भरधाव वेगाने आला आणि सायकलस्वारला धडक दिली. अपघात एवढा भिषण होता की सायकल आणि…
मुंबई : वृत्तसंस्था देशभर ‘छावा’ चित्रपटाला मोठा प्रतिसाद मिळत असून आता राज्याच्य राजकारणात देखील ‘छावा’ चित्रपटाचा उल्लेख होत असतांना दिसून येत आहे. संभाजी महाराजांचा विचार, वारसा कोणी चालवला असेल तर ‘छावा’ बघा आणि मलापण बघा. धर्म बदलावा म्हणून त्यांचा छळ झाला आणि माझा पक्षा बदलावा म्हणून छळ झाला, असे वक्तव्य ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी केले आहे. अनिल परब यांनी स्वत:ची तुलना छत्रपती संभाजी महाराज यांच्याशी केल्याने त्यांच्यावर टीका केली आहे. परबांच्या वक्तव्यावर आज विधानसभेत वातावरण तापण्याची शक्यता आहे. तर भाजपनेही त्यांच्या या विधानानंतर आक्रमक भूमिका घेतली असून ते याविरोधात आंदोलन करणार असल्याची माहिती समोर आली आहे. राज्यपालांच्या अभिभाषणावरील…
पारोळा : प्रतिनिधी तालुक्यातील तामसवाडी येथे ३० वर्षीय तरुणाचा विषारी औषध सेवन केल्याने मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली. दीपक प्रकाश मोरे असे मयत तरुणाचे नाव आहे. सविस्तर वृत्त असे कि, तामसवाडी येथील बोरी नदीच्या किनारी ६ रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास दीपक प्रकाश मोरे (वय ३०) या तरुणाने विषारी औषध सेवन केले होते. त्यानंतर तो रस्त्याच्या कडेला पडलेला होता. रस्त्याने जाणाऱ्या हा तरुण अत्यावस्थ दिसल्यानंतर त्यांना पारोळा येथील कुटीर रुग्णालयात दाखल केले होते. तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. याबाबत रमेश दिलबर मोरे यांच्या माहितीवरून पारोळा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास पारोळा पोलीस करीत आहेत.
अमळनेर : प्रतिनिधी गलवाडे-अमळनेर रस्त्यावर एका मद्यधुंद दुचाकीस्वाराने स्कूटीला जोरदार धडक दिली. यात स्कूटीचालक गंभीर जखमी झाला. ही घटना बुधवारी घडली. मिळालेल्या माहितीनुसार, पाडसे रेल्वे स्टेशन मास्टर मच्छिंद्र रतिलाल पाटील (वय ३८) बुधवारी स्कूटीवरून गलवाडेकडून अमळनेरकडे जात असताना समोरून येणाऱ्या दुचाकी (एम.एच. १९ बी.व्ही. ४८५०) वरील चालक विनोद दगडू पाटील (रा. सबगव्हाण) याने मद्याच्या धुंदीत जोरदार धडक दिली. यात मच्छिंद्र पाटील यांच्या डाव्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यात स्कूटीचेही नुकसान झाले आहे. मच्छिंद्र पाटील यांच्या फिर्यादीवरून मारवड पोलिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. तपास हे. कॉ. शरीफखान पठाण करीत आहेत. मद्यधुंदीत वाहने चालविल्याने…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील आकाशवाणी चौकात भुसावळकडून खोटेनगरकडे जाणाऱ्या दाम्पत्याच्या दुचाकीला ट्रकचा कट लागला. त्यामुळे दुचाकीवरील महिलेचा तोल जावून ट्रकच्या मागील चाकाखाली आल्याने महिला गंभीर जखमी झाल्याची घटना गुरुवारी सायंकाळी ५.३० वाजता घडली. या प्रकरणी ट्रक चालकावर जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चंपालाल पाटील व रागिणी चंपालाल पाटील हे दांम्पत्य भुसावळहून जळगाव शहरातील खोटेनगर भागातील एका रुग्णालयात उपचारासाठी येत होते. त्यात आकाशवाणी चौकात सायंकाळी ५.३० वाजता सिग्नल सुटल्यानंतर मजूर फेडरेशनच्या बाजूला चंपालाल पाटील यांच्या दुचाकीला ट्रकचा कट लागला. महामार्गावरील अपघातांची मालिका सुरुच असून, जानेवारी महिन्यात ७जणांचा बळी गेला होता. तर फेब्रुवारी महिन्यातही ४ जणांचा बळी…
मेष राशी आज तुमचा वेळ आनंददायी जाईल. ज्या कामाची तुम्ही अपेक्षाही केली नसेल ती पूर्ण होईल. व्यवसायात तुम्ही तुमच्या बुद्धीने पैसे कमवाल. नोकरीत तुमच्या प्रामाणिक कार्यशैलीची चर्चा होईल. लोकांचा तुमच्यावरील विश्वास वाढेल. तुम्हाला उद्योग क्षेत्रातील अनुभवी लोकांकडून मार्गदर्शन आणि कंपनी मिळेल. वृषभ राशी आज प्रेमसंबंधात इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे. प्रेमविवाहासाठी इच्छुक असलेल्या लोकांना या संदर्भात त्यांच्या पालकांची संमती हवी असेल तर त्यांनी आजच त्यांच्याशी बोलावे. त्यांना यश मिळेल. घरगुती जीवनात पती-पत्नीमधील प्रेम आणि समर्पण वाढेल. मिथुन राशी आज घरगुती बाबींबद्दल चिंता वाढेल. कोणी काही सांगितलं म्हणून त्यात अडकू नका. मुलांसोबत जास्त वेळ आनंदात जाईल. एखाद्या मित्राची किंवा प्रिय व्यक्तीची…
बीड : वृत्तसंस्था राज्यातील बीड येथील सरपंच देशमुख हत्या प्रकरणामुळे धनंजय मुंडे यांना मंत्रीपदाचा राजीनामा दोन दिवसापूर्वीच दिला असतांना आता बीडच्या शिरुर येथील एका व्यक्तीला बॅटने अमानुष मारहाण केल्याप्रकरणी पोलिसांनी भाजप आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता असलेल्या सतीश भोसलेवर गुन्हा दाखल केला आहे. यामुळे त्याला केव्हाही अटक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सविस्तर वृत्त असे कि, सतीश भोसले याचा एका व्यक्तीला मारहाण करतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी हा व्हिडिओ पोस्ट करत या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजप आमदार सुरेश धस यांच्याकडे स्पष्टीकरण मागितले होते. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी भाजपचा कार्यकर्ता असणाऱ्या…
मुंबई : वृत्तसंस्था इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना धमकी देणाऱ्या आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक विधान करणाऱ्या प्रशांत कोरटकर याच्यावर करवाई करण्याची मागणी विधान परिषदेत विरोधकांनी केली. यावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोरटकर चिल्लर माणूस आहे, असे म्हटले आहे. यावर टीका करताना फडणवीस यांनी भैय्याजी जोशी देखील चिल्लर माणूस असल्याचे जाहीर करावे, नाहीतर त्यांच्यावर राजद्रोहचा गुन्हा दाखल करावा, असे आव्हान माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (दि. ६) दिले. ते पत्रकारांशी बोलत होते. ते पुढे म्हणाले की, या लोकांनी हिंदू- मुस्लिम असा वाद काढला नाही, तर आता मराठी- मराठी असा वाद काढलेला आहे. भैय्याजी जोशी घाटकोपरमध्ये येऊन काल…

