मेष राशी श्रीगणेश म्हणतात की, आज सकारात्मक विचारसरणीमुळे काही काळापासून सुरू असलेल्या समस्या सोडवता येतील. तुम्ही तुमच्या कामांवर नवीन उर्जेने लक्ष केंद्रित करू शकाल. शेजारी किंवा बाहेरील व्यक्तीशी काही प्रकारचा वाद होऊ शकतो याची जाणीव ठेवा. तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करा. भावांसोबत सुरू असलेला कोणताही वाद शांततेने सोडवण्याचा प्रयत्न करा. व्यवसायाच्या दृष्टिकोनातून हा काळ फारसा फायदेशीर नाही, परंतु तुम्ही कामांमध्ये काही सुधारणा घडवून आणाल. वृषभ राशी श्रीगणेश सांगतात की, सर्जनशील आणि धार्मिक कार्यात तुमचा रस वाढेल. आव्हान स्वीकारल्याने तुमच्या प्रगतीचा मार्ग मोकळा होऊ शकतो. सामाजिक कार्यातही तुमचा आदर राखला जाईल. अचानक मोठ्या खर्चामुळे आर्थिक स्थिती बिघडू शकते. परिस्थिती संयमाने हाताळा.…
Author: editor desk
भंडारा : वृत्तसंस्था राज्यातील तरुण तरुणीना नेहमीच पाणीपुरी खाणे खूप आवडत असते मात्र याच तरुण तरुणीसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील सुकळी (दे) येथे ९ मार्च रोजी आयोजित एका समारंभात अन्न व पाणीपुरी विकणाऱ्या कडून पाणीपुरी खाल्ल्याने जवळपास ३० जणांना विषबाधा झाल्याचा धक्कादायक प्रकार १० मार्च रोजी सकाळी समोर आला. यात २२ जणांना उपचारार्थ बेटाळा व देव्हाडी प्राथमिक आरोग्य केंद्रात तर उर्वरित आठ जणांना आंधळगाव येथील खाजगी रुग्णालयात उपचार घेऊन सुट्टी देण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, सुकळी (दे) येथे ९ मार्च रोजी एका समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमस्थळी अन्न वितरण करण्यात आले. काहींनी कार्यक्रमाजवळ असलेल्या…
मुंबई : वृत्तसंस्था गेल्या काही महिन्यापासून राज्यात मराठी बोलणे महत्वाचे केले असतांना आता मुंबईतील एअरटेलच्या एका कार्यालयातील हिंदी भाषिक महिला कर्मचाऱ्याने मराठीच्या मुद्यावरून मराठी तरुणाशी हुज्जत घातल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत सदर कर्मचारी मराठी का आली पाहिजे? मराठी येत नसेल तर महाराष्ट्रात राहू शकत नाही असे कुठे लिहिले आहे का? असे विविध प्रश्न विचारत मला मराठी येत नाही व मी बोलणारही नाही अशी उद्दाम भाषा वापरताना दिसून येत आहे. ठाकरे गटाने या प्रकरणी एअरटेलला निर्वाणीचा इशारा दिला आहे. गत काही महिन्यांपासून परप्रांतीयाच्या मुजोरीच्या अनेक घटना घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर एअरटेलच्या कार्यालयातील ही घटना समोर आली आहे. सदर…
जळगाव : प्रतिनिधी धुलिवंदन सणाच्या पार्श्वभूमीवर जळगाव शहरातील कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रशासनाने कठोर पावले उचलली आहेत. रामानंद नगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील १४ व्यक्तींना १२ मार्चपासून १५ मार्चच्या सकाळी ८ वाजेपर्यंत शहरातून हद्दपार करण्यात आले आहे. प्रांताधिकारी विनयकुमार गोसावी यांनी हा आदेश जारी केला आहे. रामानंद नगर पोलिस ठाण्याने या १४ व्यक्तींविरोधात अहवाल तयार करून हद्दपारीचा प्रस्ताव प्रांताधिकारी गोसावी यांच्याकडे पाठवला होता. धुलिवंदनाच्या सणादरम्यान संभाव्य अनुचित प्रकार टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. हद्दपारीच्या कालावधीत हे व्यक्ती शहरात आढळल्यास त्यांच्याविरुद्ध अटकेसह गुन्हा दाखल केला जाईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे. हद्दपार व्यक्तींची यादी: राकेश मिलिंद जाधव (मढी चौक, पिंप्राळा) किरण अशोक…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारमधील मंत्री नीतेश राणे यांच्या कार्यकर्त्यांनी एका मुस्लीम कुटुंबाला मारहाण केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. ही घटना वर्षभरापूर्वीची आहे. पण आज हे पीडित कुटुंब न्यायाच्या मागणीसाठी विधानभवनावर आले होते. तिथे त्यांनी आपल्याला जय श्रीराम म्हणण्याची धमकी देत मारहाण करण्यात आल्याचा दावा केला. त्यांनी मंत्री नीतेश राणे यांच्या राजीनाम्याचीही मागणी केली आहे. अशरफ शेख असे पीडित कुटुंबातील कर्त्या पुरुषाचे नाव आहे. ते आज आपल्या पत्नी व मुलीसह विधान भवनाबाहेर आले होते. तिथे पत्रकारांशी संवाद साधताना त्यांच्या पत्नी म्हणाल्या की, आम्ही कणकवली येथे एका कार्यक्रमासाठी गेलो होतो. तेथून परत येताना पनवेल येथे मारहाणीची घटना घडली. तिथे…
बीड : वृत्तसंस्था बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी गेल्या काही दिवसापासून मोठ्या प्रमाणात चर्चेत आली असतांना आता पोलिसांनी एक मोठी कारवाई केली आहे. सतीश भोसले याला प्रयागराजमधून अटक करण्यात आली आहे. बीड आणि युपी पोलिसांनी संयुक्त कारवाई करत त्याला बेड्या ठोकल्या आहेत. सतीश भोसले हा गेली काही दिवस पोलिसांकडून त्याचा शोध सुरू होता. गेल्या 7 दिवसांमध्ये त्यांच्यावर 3 गुन्हे दाखल झाले. पण एका मराठी वृत्तवाहिलीला मुलाखत देणारा भोसले पोलिसांना सापडत नव्हता. आज त्याला प्रयागराजमधून पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान भारतीय जनता पक्षाचा पदाधिकारी यांनी आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता म्हणून ओळख असलेल्या सतीश भोसले याच्यावर अनेक आरोप होत आहेत. मात्र, तो पोलिसांना…
जळगाव : प्रतिनिधी मुलाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी रावेरहून जळगावला आलेल्या एका ३९ वर्षीय व्यक्तीचा परत रावेरला जात असताना, जळगाव रेल्वेस्थानकात तोल जाऊन रेल्वेखाली येऊन दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना सोमवारी रात्री ९ वाजता घडली. या प्रकरणी जळगाव रेल्वे पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सविस्तर वृत्त असे कि, रावेर शहरात अनिल जाधव हे पत्नी आणि मुलगा यांच्यासोबत वास्तव्याला होते. मजुरीचे काम करून आपला उदरनिर्वाह करत होते. त्यांच्या पत्नी जळगाव शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगरातील माहेरी आल्या होत्या. दोन दिवसांपूर्वी अनिल जाधव यांच्या मुलाचा वाढदिवस असल्याने ते जळगाव येथे आले होते. मुलाचा वाढदिवस साजरा केल्यानंतर सोमवारी रात्री ९ वाजता जळगाव…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील आकाशवाणी चौकात दि. ६ मार्च रोजी, ट्रकखाली येऊन जखमी झालेल्या रागिणी चंपालाल पाटील (वय ४५, रा. भुसावळ) यांचा मंगळवारी सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांच्यावर गेल्या पाच दिवसांपासून पुणे येथे उपचार सुरू होते. दि. ६ मार्च रोजी, सायंकाळी ५ : ३० वाजता भुसावळकडून जळगावातील खोटे नगर परिसरातील रुग्णालयात उपचार घेण्यासाठी पतीसोबत जात असताना पाटील यांच्या दुचाकीला आकाशवाणी चौकात ट्रकने धडक दिली. रागिणी पाटील खाली पडल्या, त्यांच्या हाता-पायावरून ट्रक गेल्याने त्या गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांच्यावर पुणे येथे खाजगी रुग्णालयात सुरू होते. मंगळवारी त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पती चंपालाल पाटील, मुलगा देवेंद्र पाटील व मुलगी असा परिवार…
फैजपूर : प्रतिनिधी येथील तहानगरमध्ये राहणाऱ्या महसूल विभागातील सेवानिवृत्त अधिकाऱ्याच्या घरी अज्ञात चोरट्यांनी हातसफाई करत लाखाचा ऐवज लंपास केल्याची घटना सोमवारी (दि. १०) मध्यरात्री घडली. अज्ञात चोरट्यांनी ९३ हजार रुपयाचे सोन्याचे दागिने व ८ हजार रुपये रोख असा एक लाख एक हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. सविस्तर वृत्त असे कि, सातारा जिल्ह्यातील कराड येथे महसूल विभागात नोकरी करीत असताना सेवानिवृत्त झालेले बबन सुभान तडवी हे कराड येथेच सध्या वास्तव्याला आहे व त्यांनी फैजपूर येथेही तहानगर भागात नवीन घर बांधलेले आहे. मुलाच्या लग्नानिमित्त ते एक महिन्यासाठी येथे आले होते. लग्नकार्य आटोपून ते परत कराड येथे गेले असता त्यांनी घराची जबाबदारी त्यांचे…
यावल : प्रतिनिधी पिंप्री येथे प्रेमविवाह केला, त्या रागातून १८ वर्षीय तरुणीवर तिच्या मामाने प्राणघातक हल्ला केला. ही घटना दि. ८ मार्च रोजी सकाळी आठ वाजता घडली होती. तर याप्रकरणी चार दिवसांनंतर अखेर यावल पोलिस ठाण्यात तरुणीच्या फिर्यादीवरून मामाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, वैष्णवी विनोद तायडे (१८, रा. उल्हासनगर) हिने प्रेमविवाह केला या रागातून तिचे मामा उमाकांत चिंधू कोळी (रा. पाडळसे, ता. यावल) याने दि. ८ मार्च रोजी सकाळी ८ वाजेला पिंप्री येथे जाऊन वैष्णवी तायडेवर हल्ला केला होता. त्यात वैष्णवीला वाचवण्याकरिता तिची नणंद वैशाली स्वप्नील सपकाळे ही समोर आली होती. तिलादेखील दोन्ही हातावर आणि…

