जळगाव : प्रतिनिधी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मीनल करनवाल यांनी मंगळवार दिनांक 15 एप्रिल रोजी भुसावल तालुक्यातील विविध गावांना भेट देत घरकुलाचे बांधकाम, तसेच ग्रामपंचायत इमारतींची पाहणी करून जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांना भेट देत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या शालेय पोषण आहाराची चव चाखली.यावेळी त्यांच्यासमवेत भुसावळ गटविकास अधिकारी सचिन पानझडे उपस्थित होते. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती करनवाल यांनी मंगळवार दिनांक 15 एप्रिल रोजी सकाळ सत्रात भुसावळ तालुक्यातील किन्ही व साकरी या गावांना अचानक भेट देऊन तेथील ग्रामपंचायत कार्यालयाची पाहणी केली. त्यासोबतच दोन्ही ठिकाणच्या प्राथमिक शाळा तसेच गावात सुरू…
Author: editor desk
कल्याण : वृत्तसंस्था राज्यातील अनेक छोट्या मोठ्या शहरात अल्पवयीन मुलीसह विवाहितेवर अत्याचाराच्या घटना घडत असतांना आता कल्याणमध्ये एक संतापजनक प्रकार उजेडात आला आहे. एका 40 वर्षीय बदमाशाने आधी पित्याविना पोरक्या झालेल्या मुलीशी अतिप्रसंगाचा प्रयत्न केला. मात्र प्रसंगावधान राखून मुलीने बदमाशाच्या तडाख्यातून कशीबशी सुटका करवून घेतली नाही तोच आईवर देखिल या बदमाशाने अतिप्रसंगाचा प्रयत्न केला. तीन महिन्यांपूर्वी घडलेला हा सारा प्रकार महात्मा फुले चौक पोलिसांनी केलेल्या तपासादरम्यान उघडकीस आला आहे. याप्रकरणी पिडीत महिलेने तक्रार केली होती. पोलिसांनी चौकशी करून याप्रकरणी संबंधित इसमाच्या विरोधात बाल लैंगिक अत्याचार कायद्यासह भारतीय न्याय संहितेप्रमाणे गुरूवारी गुन्हा नोंदवून चौकशी सुरू केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जानेवारी महिन्यात…
बुलढाणा : वृत्तसंस्था खामगाव-नांदुरा रस्त्यावर ट्रक आणि खाजगी बसच्या धडकेत तीन जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात सुमारे 20 जण जखमी झाले आहेत. गंभीर जखमी झालेल्या तिघांना अकोला येथे उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बुलढाणा येथे एक भीषण रस्ते अपघात झाला आहे. मंगळवारी सकाळी मध्य प्रदेश परिवहन महामंडळाची बस आणि ट्रकमध्ये ही भीषण टक्कर झाली. या अपघातात 3 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 20 हून अधिक जण गंभीर जखमी आहेत. सर्व जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, जिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या संबंधी मिळालेल्या अधिक माहितीनुसार बुलढाणा येथील खामगाव-नांदुरा…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या आधी महायुती सरकारच्या वतीने जाहीर करण्यात आलेली लाडकी बहीण योजनेवर पुन्हा एकदा टाच झाली आहे. या योजनेच्या माध्यमातून ज्या महिलांना आर्थिक मदत केली जाते, त्याच महिलांची नावे नमो शेतकरी सन्मान योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये देखील आहेत. अशा आठ लाख महिलांना आता दीड हजार रुपये ऐवजी पाचशे रुपये महिना मिळणार आहे. या योजनेतील अटीनुसार दोन योजनेचा लाभ घेता येत नाही. त्यामुळे आता या महिलांचे पैसे कमी होणार असल्याची माहिती समोर आली आहे. नमो शेतकरी सन्मान योजनेचा लाभ घेणाऱ्या आठ लाख महिलांना आता लाडकी बहीण योजनेचा हप्ता कमी मिळणार आहे. या महिलांना दीड हजार रुपये ऐवजी पाचशे रुपये…
सातारा : वृत्तसंस्था छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी निवडण्यात आलेली अरबी समुद्रातील जागा नैसर्गिकदृष्ट्या अयोग्य आहे. मुंबईत राजभवनाची 48 एकर जागा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा गव्हर्नर मोठा आहे का? त्यामुळे राजभवनाच्या जागेपैकी 40 एकर जागा शिवस्मारकासाठी उपलब्ध करावी. छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाला साजेसे शिवस्मारक शासनाने उभे केले पाहिजे, अशी मागणी खासदार उदयनराजे भोसले यांनी सोमवारी केली. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त अभिवादन केल्यानंतर उदयनराजेनी शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेऊन, राज्य शासनाला खडा सवाल केला. यावेळी रिपाइं (ए) चे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य संदीप शिंदे, ज्येष्ठ नेते अण्णा वायदंडे, आप्पा तुपे आदी उपस्थित होते. उदयनराजे म्हणाले, काँग्रेसने अनेक वर्षे…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारमधील काही मंत्र्यांवर गंभीर आरोप झाल्याच्या घटना नेहमीच चर्चेत असतांना आता मंत्री गिरीश महाजन यांचे एका महिला अधिकाऱ्यासोबत संबंध असल्याचा आरोप करणारे पत्रकार अनिल थत्ते आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांनी अब्रुनुकसानीची नोटीस पाठविली आहे. या नोटिसीमुळे पुन्हा एकदा महाजन-खडसे संघर्ष पेटणार आहे. मंत्री गिरीश महाजन यांचे एका महिला अधिकाऱ्यासोबत संबंध असल्याचा आरोप पत्रकार अनिल थत्ते यांनी आपल्या एका कार्यक्रमात केला होता. त्यांच्या या आरोपाचा धागा पकडत एकनाथ खडसे यांनीही मंत्री गिरीश महाजन यांच्यावर जोरदार टीका करताना आपणास त्या महिला अधिकाऱ्याचे नाव माहीत असून, आपण ते…
जळगाव : प्रतिनिधी जिल्ह्यातील यावल तालुक्यातील न्हावी येथील मित्रांसोबत पंढरपूर येथे विठ्ठलाच्या दर्शनासाठी गेलेला तरुण अंघोळीसाठी चंद्रभागा नदीत उतरले. यावेळी त्याला पाण्याचा अंदाज न आल्यामुळे दर्पण निलेश कोलते (वय १८, रा. न्हावी, ता. यावल) या तरुणाचा बुडून दुर्देवी मृत्यू झत्तला. ही घटना रविवारी सकाळच्या सुमारास घडली. आठ तासानंतर तरुणाचा मृतदेह मिळून आला. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, यावल तालुक्यातील न्हावी येथील दर्पण कोलते हा त्याचा मित्र मनोज रघुनाथ कापडे हे दोघे मित्र पंढरपूरला विठ्ठल दर्शनासाठी गेले होते. रविवारी सकाळी ते दोघे स्नानासाठी चंद्रभागा नदीवर गेले होते. त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने ते दोघे बुडू लागले. हा प्रकार…
जळगाव : प्रतिनिधी शेत जमिनीला वारस लावण्यावरून वाद होऊन चाकू हल्ल्यातील जखमी तौफिक कय्यूम पिंजारी (वय ३२, रा. सदाशिव नगर, मेहरुण) यांचा उपचार सुरू असताना सोमवारी (दि. १४) मृत्यू झाला. तौफिक यांच्यावर ११ एप्रिल रोजी वार करण्यात आल्यानंतर त्यांच्या दोन्ही मेहुण्यांविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. मिळालेल्या माहितीनुसार, तौफिक पिंजारी व त्यांचे मेहुणे अस्लम समशोद्दीन पिंजारी व शफिक गफूर पिंजारी यांच्यामध्ये शेत जमिनीला वारस लावण्यावरून वाद झाले होते. ११ एप्रिल रोजी तौफिक यांच्या घरी जाऊन त्यांना दोन्ही मेहुण्यांनी मारहाण केली. अस्लम याने तरुणाच्या कमरेजवळ चाकूने वार केला होता. त्यात गंभीर दुखापत झाल्याने त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले…
जळगाव : प्रतिनिधी भरधाव डंपरने दुचाकीला धडक दिल्यामुळे दुचाकीस्वार महिला जखमी झाली. हा अपघात सोमवारी (१४ एप्रिल) दुपारी १२ वाजेच्या सुमारास अजिंठा चौफुलीवर झाला. अपघातानंतर महिलेला तिच्या मुलाने खासगी रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, धडक देणाऱ्या डंपरचा अर्धा क्रमांक पुसलेला होता, तरी तो शहरातून ये-जा करीत होता. अजिंठा चौफुलीवर वाहनाच्या शोरूमनजीक वळणाजवळ इच्छादेवीकडे जाणाऱ्या रस्त्यावर कविता सोनवणे (रा. कुसुंबा, ता. जळगाव) दुचाकीने (क्र. एमएच १९ सीटी ५२३६) मुलासह जात असताना एका डंपरने जोरदार धडक दिली. यात महिलेला दुखापत होण्यासह दुचाकीचेही नुकसान झाले.
जळगाव : प्रतिनिधी भागीदारीमध्ये घेतलेल्या कार्यालयाचे कागदपत्र हवे असल्यास स्टॅम्पवर लिहून द्या, असे सांगितल्याने दीपाली बाळू सुरवाडे (३३, रा. मन्यारखेडा शिवार) यांना तीन महिलांसह एकूण सहा जणांनी मारहाण केली. तर एका महिलेने बोटाला चावा घेत दुखापत केली. ही घटना १३ एप्रिल रोजी दीपाली यांच्या घरी घडली. याप्रकरणी नशिराबाद पोलिस ठाण्यात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जळगावात भागीदारीत घेतलेल्या कार्यालयावरून वाद आहे. त्यात पांडुरंग ठाकरे, दगड्डू गवळे, रवींद्र दगडू गवळे, मनीषा दिनेश गवळे, शांताबाई दगडू गवळे, पूजा रवींद्र गवळे हे (सर्व रा. मेहरुण) १३ एप्रिल रोजी दीपाली सुरवाडे यांच्या घरी गेले. तेथे त्यांना कार्यालयाची कागदपत्रे मागितली. सुरवाडे…

