Author: editor desk

मेष राशी आज केलेल्या कामात विनाकारण विलंब होईल. तुमची बुद्धी आणि विवेक वापरा. कामाच्या शोधात इकडून तिकडे भटकावे लागेल. कामाच्या ठिकाणी बॉससोबत विनाकारण वाद होऊ शकतात. तुम्हाला तुमच्या रागावर आणि अहंकारावर नियंत्रण ठेवावे लागेल. तुम्हाला नको असलेल्या प्रवासाला जावे लागेल. वृषभ राशी आज विरोधक आणि शत्रू तुमचा घात करू शकतात. त्यामुळे शारीरिक इजा होण्याची शक्यता आहे. आज तुम्हाला खूप सतर्क आणि सावध राहावे लागेल. कामाच्या ठिकाणी जास्त धावपळ केल्यामुळे तुम्हाला शारीरिक आणि मानसिक थकवा जाणवेल. मिथुन राशी आज उधार दिलेले पैसे न मागता परत मिळतील. व्यवसायात प्रियजनांच्या पूर्ण सहकार्यामुळे आर्थिक लाभ होईल. बिझनेस ट्रिप फायदेशीर ठरण्याची शक्यता आहे. कर्क राशी…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी तुरुंगात असणाऱ्या वाल्मीक कराडने आवादा कंपनीकडून एकदा नव्हे तर 6 वेळा खंडणी मागितल्याची गंभीर बाब उजेडात आली आहे. स्वतः आवादा कंपनीच्या अधिकाऱ्याने हा दावा केल्याचे तपास यंत्रणेने सादर केलेल्या आरोपपत्रात नमूद करण्यात आले आहे. यामुळे वाल्मीक कराडचा पाय आणखी खोलात गेला आहे. आवादा कंपनीचे प्रकल्प अधिकारी सुनील शिंदे यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात नमूद करण्यात आले आहे की, वाल्मीक कराड व त्याच्या गुंडांचे सप्टेंबर ते नोव्हेंबर 2024 या कालावधीत कंपनीच्या अधिकाऱ्यांना सतत फोन येत होते. पैसे द्या, नाहीतर प्रकल्पाचे काम बंद करा, अशा धमक्या ते देत होते. वाल्मीक कराडकडून 28…

Read More

 मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील भोंग्यांमुळे परिसरातील लोकांना होणाऱ्या त्रासाचा मुद्दा भाजप आमदार देवयानी फरांदे यांनी विधानसभेत उपस्थित केला. ज्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता राज्यात कुठल्याही प्रार्थना स्थळावर भोंगे लावण्याची परवानगी पोलिसांकडून घ्यावी लागेल. जर नियमांचे उल्लंघन झाल्यास संबंधितांना कारवाई करण्यात येईल. नियमांची अंमलबजावणी होतेय की नाही याची जबाबदारी पोलीस निरीक्षकावर निश्चित केली जाईल. जर पोलीस निरीक्षकाने याकडे दुर्लक्ष केले तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असा आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. विधानसभेत देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘कुठल्याही प्रार्थना स्थळावर जे भोंगे आहेत त्याची परवानगी घेतली पाहिजे, हे भोंगे रात्री १० ते सकाळी ६…

Read More

मुंबई /जळगांव : प्रतिनिधी विधानभवन येथे छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिनानिमित्त राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तसेच जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या पवित्र स्मृतीस आदरांजली वाहिली. यावेळी बोलताना मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, “छत्रपती संभाजी महाराज हे संपूर्ण देशासाठी प्रेरणास्थान आहेत. अन्यायाविरोधातील त्यांचे संघर्षशील जीवन आणि हिंदवी स्वराज्यासाठी दिलेले सर्वोच्च बलिदान आजही आपल्याला राष्ट्रहितासाठी एकजूट होण्याची प्रेरणा देते. संभाजी महाराजांनी कधीही अन्यायासमोर शरणागती पत्करली नाही. त्यांचा अभिमानास्पद इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे हे आपले कर्तव्य आहे. त्यांच्या त्यागातून प्रेरणा घेऊन आपण महाराष्ट्राच्या आणि देशाच्या प्रगतीसाठी कटिबद्ध राहूया

Read More

जळगाव : प्रतिनिधी जिल्ह्यातील अनेक ठिकाणी अपघाताच्या घटना घडत असतांना आता जळगाव तालुक्यातील नशिराबाद गावाजवळील जळगाव खुर्द पुलाजवळ भीषण अपघात घडला असून रात्री रस्त्याच्या कडेला झोपलेल्या तीन परप्रांतीय मजुरांना अज्ञात वाहनाने चिरडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. हा हृदयद्रावक प्रकार मंगळवारी (११ मार्च) सकाळी उघडकीस आला.अपघाताची माहिती मिळताच नशिराबाद पोलीस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठविण्यात आले आहे. कसा झाला अपघात? जळगाव खुर्द गावाजवळ रेल्वे उड्डाणपुलाच्या बाजूला रस्त्याचे काम सुरू आहे. येथे काम करणारे परप्रांतीय मजूर रात्री लोखंडी पट्टीवर झोपले होते. अंधारामुळे वाहनचालकाला ते दिसले नसल्याने, अज्ञात वाहनाने तिघांना जागेवरच चिरडले.मंगळवारी सकाळी…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात सत्ताधारी व विरोधकामध्ये आरोप प्रत्यारोप सुरु असतांना आता मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित मेळाव्यात महाकुंभातील पवित्र स्नानाची खिल्ली उडवली होती. अरे हाड, कोण पिणार ते गंगेचे पाणी, असे विधान राज ठाकरे यांनी केले होते. त्यांच्या या विधानावर प्रतिक्रिया देताना शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी बगला घासत राज ठाकरे यांची नक्कल केली. तसेच त्यांच्या त्या विधानाचे कौतूक करत त्यांच्या डेअरींगला सलामही ठोकला. राज ठाकरे यांनी महाकुंभातील स्नानावर भाष्य केल्यानंतर त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. राज ठाकरे यांनी हिंदुंच्या भावना दुखावल्या, असे समाजातील लोकांचे म्हणणे आहे. त्यांच्या या विधानावर विविध राजकीय, अराजकीय नेत्यांच्या…

Read More

जळगाव : प्रतिनिधी राज्याच्या अर्थसंकल्पात शेती, शेतकरी आणि महिलांसाठी भरीव तरतुदी करून त्यांना बळ देणारे महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. तसेच मराठी भाषेच्या जतनासाठी आणि गौरवासाठी विशेष निधीची तरतूद करण्यात आली असून, यामुळे मराठी अस्मिता अधिक बळकट होणार असल्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी नमूद केले. मराठी भाषेचा सन्मान – ‘प्रेरणा गीत’ पुरस्काराची घोषणा  मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतर तिच्या सन्मानासाठी राज्य शासनाने दरवर्षी एका प्रेरणादायी गीताला ‘छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्र प्रेरणा गीत पुरस्कार’ जाहीर केला आहे. या निर्णयाचे स्वागत करताना पालकमंत्री पाटील म्हणाले, “मराठी अस्मितेचा अभिमान वाढविणारा हा निर्णय सर्व मराठी भाषिकांसाठी गौरवाचा…

Read More

पाचोरा : प्रतिनिधी तालुक्यातील बांबरुड महादेवाचे येथे एका २५ वर्षीय तरुणाने गळफास लावून आपली जीवन यात्रा संपविल्याची घटना घडली आहे. या घटनेप्रकरणी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पाचोरा तालुक्यातील बांबरुड महादेवाचे येथील रहिवासी शशिकांत विठ्ठल पाटील (वय २५) या तरुणाने आपल्या राहत्या घरात गळफास लावून आपली जीवन यात्रा संपविल्याची घटना घडली आहे. हा प्रकार घरच्या मंडळींच्या लक्षात येताच शशिकांत पाटील यास तात्काळ पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी शशिकांत पाटील यांना मृत घोषित केले. मयत शशिकांत पाटील याच्या पश्चात्य वृद्ध आई, वडिल, एक भाऊ, दोन बहिणी असा परिवार आहे. शशिकांत पाटील…

Read More

जळगाव : प्रतिनिधी शाहूनगर भागातील शाहू कॉम्प्लेक्समधील एका पानटपरीवर आलेल्या एका ग्राहकाने फाटकी नोट दिल्याच्या संशयावरून ग्राहकाला दोन जणांनी बेदम मारहाण केल्याची घटना रविवारी दुपारी १२:३० वाजता घडली. याप्रकरणी ग्राहकाच्या तक्रारीवरून दोन जणांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महेंद्र गजानन पाटील (वय २२, रा. गरताड, ता. चोपडा, ह. मु. जळगाव) हा युवक रविवारी दुपारी शाहू कॉम्प्लेक्समधील एका पानटपरीवर गेला. त्याठिकाणी एक वस्तू घेतली. मात्र, संबधित ग्राहकाने फाटकी नोट दिल्याच्या संशयावरून अरमान ऊर्फ शहदाब हारुण भिस्ती व हारुण फारुक भिस्ती या दोघांनी संबंधिताला शिवीगाळ केली

Read More

मेष राशी आज राजकारणात वर्चस्व प्रस्थापित होईल. जुन्या मित्राची भेट होईल. कोणतेही महत्त्वाचे काम पूर्ण सतर्कतेने आणि सावधगिरीने करा. काम बिघडू शकते. व्यवसायात मित्र उपयोगी पडतील. व्यावसायिक प्रवास यशस्वी होईल. वृषभ राशी आज मालमत्ता विक्रीशी संबंधित कामात सावधगिरी बाळगा. या संदर्भात घाईगडबडीत कोणताही मोठा निर्णय घेऊ नका. संपत्ती जमा करा. अनावश्यक पैसा खर्च होण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थितीत थोडी सुधारणा होईल. मिथुन राशी आज मुलांच्या चांगल्या कर्माने मन प्रसन्न राहील. प्रेमसंबंधात गोडवा राहील. कुटुंबात शुभ कार्ये पूर्ण होतील. अध्यात्मिक विचारांनी भरून राहाल. तुमच्या पालकांना बऱ्याच काळानंतर भेटल्यामुळे तुम्ही भावूक होऊ शकता. कर्क राशी वैवाहिक जीवनात घरगुती बाबींवरून पती-पत्नीमध्ये वाद होऊ…

Read More