Author: editor desk

मुंबई : वृत्तसंस्था गेल्या काही महिन्यापासून बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात बाहेर येत असतांना आता खोक्या उर्फ सतीश भोसले याचे घर आज पाडण्यात आले. वन विभाग आणि शिरूर कासार पोलिसांनी संयुक्त कारवाई केली. खोक्याने वन खात्याच्या जमिनीवर अतिक्रमण करत घर बांधले होते, त्यामुळे ही कारवाई करण्यात आल्याची माहिती आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारले असता, खोक्या असो, बोक्या असो, ठोक्या असो. कुणालाही सोडले जाणार नाही. सगळ्यांना ठोकणार, अशी एका वाक्यात त्यांनी प्रतिक्रिया दिली. आज दिल्ली येथे वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट समिटसाठी बेठक पार पडली. या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. दौऱ्यावर आहेत. भारताच्या मीडिया आणि मनोरंजन क्षेत्राला चालना…

Read More

जळगाव : प्रतिनिधी जिल्ह्यातील बोदवड येथे आज पहाटेच्या सुमारास गव्हाणे भरलेला तामिळनाडूचा ट्रक मुक्ताईनगर कडून बोदवड कडे येत असताना बंद असलेला रेल्वे गेट तोडून थेट एक्सप्रेसला धडकला. सुदैवाने जिवीतहानी झाली नाही मात्र, 5 तासापासून रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे. तर तीन रेल्वे गाड्यांचा मार्ग बदलण्यात आला असून दोन पॅसेंजर रद्द करण्यात आले आहेत. घटनास्थळी रेल्वे पोलीस व बोदवड पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित आहे. तसेच रेल्वेचे आपत्कालीन विभाग घटनास्थळी उपस्थित झाले आहेत. याबाबत मिळालेली माहिती अशी की, ट्रक क्रमांक टी एन 52- एफ -7472 आज दि. 14 रोजी सकाळी 4.45 वाजेच्या सुमारास मुक्ताईनगर कडून बोदवड कडे गहू घेऊन…

Read More

दादर : वृत्तसंस्था राज्यात आज होळीचा सण असल्याने सगळीकडे धामधूम सुरु आहे. यादरम्यान मुंबईमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये एका शिवनेरी बस चालकाने तिघांना चिरडले. या भीषण अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला आहे तर बाकी दोघे गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. ही अपघाताची घटना प्रभादेवी ब्रिजवर मध्यरात्री 2.30 वाजता घडली. प्रणय बोडके (29), करण शिंदे (29) आणि दुर्वेश गोरडे हे तिघेजण स्कुटरवरून परेलवरून दादरला होळीसाठी फुले आणण्यास चालले होते. यादरम्यान शिवनेरी बस चालक ब्रिजवरून समोरच्या दिशेने भरधाव वेगाने आला. यानंतर त्याने समोरून येणाऱ्या स्कुटरला जोरदार धडक दिली. या अपघातात स्कुटरवरील तिघेही गंभीर…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था बदलत्या जीवनशैलीमुळे अनेक पुरुष व महिलांना मोठ्या प्रमाणात डिप्रेशनचा त्रास होत असतो मात्र वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन नुसार, डिप्रेशन हे एक सामान्य मानसिक विकार आहे. हा विकार कोणालाही होऊ शकतो, आणि त्यामध्ये उदास होणे, यासारखी लक्षणे दिसू शकतात. चला, जाणून घेऊया डिप्रेशनची लक्षणे काय असतात. आजकालच्या अस्वस्थ जीवनशैली आणि चुकीच्या आहारामुळे शारीरिक आणि मानसिक आजारांचा धोका वाढला आहे. चिंता आणि डिप्रेशनच्या अनेक कारणांचा शोध घेता येतो. पुरुषांच्या तुलनेत महिलांना अधिक प्रमाणात मानसिक तणाव आणि डिप्रेशनचा सामना करावा लागतो. चला, जाणून घेऊया डिप्रेशनच्या लक्षणांबद्दल. महिलांना डिप्रेशन अधिक होण्याचे कारणे WHO नुसार, डिप्रेशन कोणालाही होऊ शकतो, पण पुरुषांच्या तुलनेत महिलांना…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारमधील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी छत्रपती संभाजीनगर लगतच्या खुलताबाद येथील मोगल बादशहा औरंगजेब यांची कबर नष्ट करण्याची मागणी केली आहे. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण अर्थात एएसआने संरक्षित केलेल्या देशातील 3,691 स्मारक व कबरींपैकी 25 टक्के कबरी व स्मारके ही देशाच्या संस्कृतीविरोधात काम करणाऱ्या मोगल व ब्रिटीश अधिकाऱ्यांच्या असल्याचे ते म्हणालेत. खासदार नरेश म्हस्के लोकसभेत बोलताना खुलताबाद येथील मोगल बादशहा औरंगजेब यांची कबर नष्ट करण्याची मागणी केली. सभागृहाच्या शून्य प्रहरात त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला. शिवसेना खासदार नरेश म्हस्के सभागृहात म्हणाले की, “औरंगजेबासारख्या क्रूर व्यक्तीची कबर संरक्षित करण्याची काहीच गरज नाही.…

Read More

सोलापूर : वृत्तसंस्था तालुक्यातील वांगी येथे दोन आणि पाच वर्षांच्या मुलासह अाईने विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना बुधवारी दुपारी १२ च्या सुमारास गावातील शेतात घडला. त्यापैकी सहा तास शोधानंतर दोघांचे मृतदेह सापडले. एका मुलाचा शोध सुरू आहे. दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात आणले. चित्रा कविराज ऊर्फ दत्तात्रय हाके (२८) आणि स्वराज कविराज हाके (२) यांचा मृतदेह सापडला. पृथ्वीराज कविराज हाके (५) याचा शोध सुरू आहे. एक मुलगा गतिमंद व दुसऱ्यास ऐकू कमी येत असल्याच्या तणावातून चित्रा यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचा अंदाज आहे. चित्रा या पतीसह शेती करतात. त्यांना दोन मुले व एक मुलगी. मोठा मुलगा पृथ्वीराज हा गतिमंद…

Read More

बुलढाणा :  वृत्तसंस्था राज्यातील बुलढाणा जिह्यातील पिंपळगाव‎सैलानी येथे गुरुवारी १३ मार्च रोजी हजारो नारळाच्या होळींची प्रथा असलेल्या हाेळीचा उत्सव‎साजरा केला जाणार आहे. या होळीत नारळाला‎बाहुले, गोटे, बिबे, लिंबू, खिळे ठोकून ते मनोरुग्णाच्या‎अंगावरुन आेवाळून होळीत टाकले जातात. अंगावरील‎कपडेही या होळीत टाकण्याची पंरपरा अाजवर चालत‎अाली अाहे. मागील वर्षी एका अज्ञाताने ही होळी‎पेटवली होती.‎ मागील चार दिवसांपासून या यात्रेसाठी भाविकांची‎वर्दळ वाढली अाहे. या भाविकांच्या उपस्थितीत‎ गुरुवारी दुपारी तीन वाजता मुजावर यांच्या हस्ते पूजा‎विधी करुन होळी पेटवली जाणार आहे. या ठिकाणी‎यात्रेकरुंचे मात्र हाल होत असतात. पिण्याच्या पाण्याची‎व्यवस्था नसते, प्रसाधन गृह नसल्याने उघडयावरच‎घाण करत भाविक निघून जातात. तर १९ मार्च रोजीच्या‎संदलसाठीही भाविक थांबतात. काही भाविक…

Read More

चोपडा : प्रतिनिधी वीज वितरण कंपनीचे सहाय्यक अभियंता अमित दिलीप सुलक्षणे (३५) यांना दि. १२ रोजी साडेचार हजार रुपये लाच घेताना लाचलुचपत खात्याच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले. तक्रारदार यांच्या घरी नवीन वीजमिटर बसवून देण्याकरीता अधिकारी अमित सुलक्षणे यांनी साडेपाच हजार रूपये लाचेची मागणी केली. याबाबत केलेल्या तक्रारीची पडताळणी केली असता तक्रारदारांच्या घराचे विज मिटर बसवून देण्यासाठी प्रथम ५५०० व तडजोडअंती ४५०० रुपयाची मागणी केल्याचे दिसून आले. ही लाच स्विकारताना बुधवारी त्यांना रंगेहात पकडण्यात आले. त्यांच्याविरुध्द चोपडा शहर पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read More

अमळनेर : प्रतिनिधी शेतातील मका का तोडला याचा जाब विचारल्याचा राग आल्याने तिघांनी एकाला जबर मारहाण करून त्याच्या पत्नीलाही मारहाण व मुलीचा विनयभंग केल्याची घटना ९ रोजी सायंकाळी ६:३० वाजेच्या सुमारास तालुक्यातील एका गावात घडली. मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील एका गावातील एक शेतकरी ८ रोजी सायंकाळी आपल्या शेतात काम करीत असताना गोपीचंद नारायण पाटील, सचिन गोपीचंद पाटील, चंद्रकांत गोपीचंद पाटील हे तिघे आले व त्यांनी शेतातील मका पिकाची मोडतोड करून नुकसान केले. ९ रोजी सायंकाळी पुन्हा तिघांनी तोच प्रकार केल्याने शेतमालक त्यांना बोलायला गेले असता त्यांनी शिवीगाळ मारहाण केली. चंद्रकांत पाटील याने वर उचलून फेकून दिले. त्यामुळे शेतमालकाच्या छातीवर पोटावर मुका…

Read More

जळगाव : प्रतिनिधी चाळीसगाव शहरात १७ फेब्रुवारी रोजी झालेल्या विवाहसमारंभातून १२ लाखांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेल्याचा प्रकार घडला होता. या प्रकरणी सीसीटीव्हीच्या सहाय्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपास करून, चोरटे मध्य प्रदेशातील असल्याची माहिती मिळाली होती. या प्रकरणी नऊ दिवस मध्य प्रदेशात थांबून चाळीसगावच्या चोरीसह जिल्ह्यातील इतर तीन चोऱ्यांमधील तब्बल १६ लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. या कारवाईत चोरटे पोलिसांच्या हाती लागले नसले तरी मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे, अशी माहिती बुधवारी झालेल्या पत्रकार परिषदेत जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी दिली. चाळीसगाव येथील विवाहस्थळावरून तांत्रिक पुरावे मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गुलखेडी, ता. नरसिंहगढ, जि.राजगढ, मध्य…

Read More