Author: editor desk

यावल : प्रतिनिधी अकलूद या गावात एका ६५ वर्षीय इसमाने दोन जणांकडून उसनवार पैसे घेतले होते. याचे व्याज मागितले जात होते. या त्रासाला कंटाळून वृद्धाने तापी नदीत उडी घेऊन आत्महत्या केली. याबाबत फैजपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघांना अटक करण्यात आली आहे. सविस्तर वृत्त असे कि, प्रभाकर कडू पाटील (६५) या वृद्धाला विनोद श्रीराम इंगळे व गणेश भागवत काळे (रा. अकलूद, ता. यावल) या दोघांनी उसनवार पैसे दिले होते. विनोद श्रीराम इंगळे व गणेश भागवत काळे हे दिलेल्या पैशाचे व्याज प्रभाकर पाटील यांच्याकडून घेत होते आणि सातत्याने त्यांच्याकडे व्याजाचे पैसे मागण्यासाठी त्यांनी तगादा लावला होता. या त्रासाला…

Read More

मेष राशी श्रीगणेश म्‍हणतात की, आज तुम्‍ही कठोर परिश्रमाच्‍या जोरावर महत्त्वाची कामे पूर्ण कराल. कोणतीही चांगली बातमी मिळाल्यावर कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. धार्मिक कार्यातही तुमचा सहभाग असेल. इतरांच्या सल्ल्याचा गांभीर्याने विचार करा. मुलांच्या समस्या सोडवण्यात तुम्‍ही पुढाकार घ्‍याल. व्यवसायात कोणतेही नवीन काम सुरू करण्यासाठी हा काळ अनुकूल आहे. वृषभ राशी भूतकाळातील काही चुकांमधून शिकून तुम्ही तुमच्या कामाच्या पद्धतीत बदल कराल. ग्रहांची स्थिती तुमच्या बाजूने असू शकते. जवळच्या नातेवाईकांशी सुरू असलेला वाद सोडवता येतील. तरुणांना करिअरशी संबंधित परीक्षेत यश मिळण्याची शक्यता आहे. कोणताही निर्णय सुज्ञपणे घ्या. घाईघाईत घेतलेले निर्णय चुकीचे ठरू शकतात. चुकीच्या कृतींमध्ये तुमचा वेळ वाया घालवू नका, असा सल्‍ला…

Read More

बीड : वृत्तसंस्था बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख प्रकरण ताजे असताना आता आष्टी तालुक्यात एका तरुणाची हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. पिंपरी घुमरी येथे विकास बनसोडे नावाच्या तरुणाचा मालकाने खून केल्याचा आरोप विकासाचे नातेवाईक करत आहे. आरोपी बाबासाहेब क्षिरसागर यांच्याकडे विकास कामाला होता. गेल्या दोन दिवसांपूर्वी त्याला बांधून मारहाण केली जात होती. त्याच्या घराच्यांना फोन करुन ‘तुमच्या मुलाला घेऊन जा नाहीतर आम्ही मारून टाकू’, अशी धमकी दिली होती. धमकी मिळताच घराच्यांनी तात्काळ कडा आरोग्य केंद्र रुग्णालय गाठले. परंतु तो पर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. या घटनेची दखल घेत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी ट्विट करीत संताप व्यक्त केला आहे. मूळचा…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात विधान परिषदेसाठी भाजपचे उमेदवार जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये छत्रपती संभाजीनगरच्या संजय केनेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर संदीप जोशी आणि दादाराव केचे यांनाही संधी देण्यात आली आहे. दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा उद्या शेवटचा दिवस आहे. 5 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी भाजपने 3 जणांचे नाव जाहीर केले आहे. आता 2 जागांसाठी कुणाला संधी मिळणार याकडे सर्वाचं लक्ष लागले आहे. मागील 33 वर्षांपासून निष्ठेने काम केल्याने पक्षाने मोठी संधी दिली, असे संजय केनेकर यांनी म्हटले आहे. 20 मार्च ही अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. त्यानंतर 27 मार्च रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत निवडणूक…

Read More

पुणे : वृत्तसंस्था राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा 375 वा बीज सोहळ्यानिमित्ताने देहू नागरीमध्ये दाखल झाले आहेत. संत तुकाराम महाराजांचा 375 वा तुकारामबीज सोहळा आज देहू नगरीत पार पडणार आहे. दरम्यान देहूतील इंद्रायणी नदीचा काठ भाविकांनी फुलून गेला आहे. तर, देहूतील शेत-शिवारात राहुट्या उभारून भाविक कीर्तन, प्रवचन ऐकण्यात तल्लीन झाले आहेत. टाळ-मृदंग आणि विठुनामाने भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. भाविकांच्या सोयीसाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. पदपथ, रस्त्यांवर व्यवसायास बंदी घालण्याचे आदेश पोलिसांनी दिले आहेत. तुकाराम बीज काय आहे? संत तुकाराम महाराजांचा जन्म देहू गावात वसंत पंचमीला माघ शुद्ध पंचमीला झाला. तर त्यांचे वैकुंठ-गमन फाल्गुन वद्य द्वितीयेला…

Read More

यावल  : प्रतिनिधी तालुक्यातील एका गावातून खळबळजनक बातमी समोर आली आहे. जीवेठार मारण्यासह चाकूचा धाक दाखवून पाच महिन्यांपासून सासऱ्याने सुनेवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरी सासऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, यावल तालुक्यातील एका गावात ३२ वर्षीय विवाहिता वास्तव्यास आहे. तिच्या सासऱ्यांकडूनतीला चाकूचा धाक दाखवून तिच्यावर दि. १ ऑगस्ट २०२४ ते दि. ३१ जानेवारी रोजी या पाच महिन्याच्या काळात वारंवार अत्याचार केला जात होता. दरम्यान, विवाहिता माहेरी गेली असता तिने घडलेला प्रकार आपल्या कुटुंबियांना सांगितला. त्यानुसार त्यांनी तात्काळ पोलीसात तक्रार दिली असून त्यानुसार अत्याचार करणाऱ्या सासऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा यावल पोलीस ठाण्यात…

Read More

चोपडा : प्रतिनिधी गुजरआळी भागातील रहिवासी आणि मणिपूरमध्ये सीमा सुरक्षा दलात (बीएसएफ) कार्यरत असलेले जवान चेतन चौधरी (३४) यांचा शनिवारी अपघाती मृत्यू झाला. मणिपूरच्या सेनापती जिल्ह्यात झालेल्या एका अपघातात ते गंभीररीत्या जखमी झाले होते. १५ मार्च रोजी सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मणिपूर राज्यातील अतिसंवेदनशील भागात ३७बीएन बीएसएफची तुकडी कार्यरत होती. याच तुकडीत जवान चेतन चौधरी कार्यरत होते. ११ मार्च रोजी सेवेवरून परत येत असताना इम्फाळ राष्ट्रीय महामार्गावरील सेनापती जिल्ह्यातील चांगौबुंगजवळ सैन्याचा ट्रक दरीत कोसळल्याने तीन जवान ठार झाले होते. याच अपघातात जवान चेतन चौधरी यांच्यासह काही जवान गंभीर जखमी झाले. जखमी जवानांवर इम्फाळमधील रुग्णालयात उपचार सुरू होते.  गेल्या चार…

Read More

चोपडा : प्रतिनिधी सुरतहून बऱ्हाणपूरकडे जाणाऱ्या बसने पुढे चालणाऱ्या कंटेनरला मागून धडक दिल्याने नऊ जण जखमी झाले. यात लहान मुले, वृद्ध, महिला यांचा समावेश आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. अडावद-यावल मार्गावर लोणी शिवारातील मोहन नाल्याजवळ शनिवारी दुपारी ४ वाजता ही घटना घडली. मध्यप्रदेश परिवहन मंडळाची मान्यता असलेली (एमपी- ६८, पी-२७०) या प्रवासी वाहतूक करणाऱ्या सुरत-ब-हाणपूर बसने अडावदनजीक लोणी शिवारातील मोहन नाल्याच्या पुलाजवळ दुचाकीस्वाराला वाचविताना पुढे चालणाऱ्या कंटेनरला मागून धडक दिली. यावेळी लोणी पोलिस पाटील नरेंद्र पाटील यांनी रुग्णवाहिका बोलवून ग्रामस्थांच्या मदतीने जखमींना रुग्णवाहिकेत बसविले. जखमींवर धानोरा प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी, आरोग्य सेविका भारती सोनवणे, भिकूबाई…

Read More

जळगाव : प्रतिनिधी एजंटच्या मध्यस्थीने एक लाख ६० हजार रुपये देऊन मुलाचे लग्न केले, मात्र लग्नाच्या तिसऱ्या दिवशी वधू दागिन्यांसह रात्रीतून पसार झाली. यामध्ये वराकडील मंडळींची दोन लाख ४४ हजार रुपयांमध्ये फसवणूक करण्यात आली. हा प्रकार १४ ते २३ फेब्रुवारी दरम्यान घडला. याप्रकरणी १३ मार्च रोजी एमआयडीसी पोलिस ठाण्यात वधूसह एजंट व इतर दोघे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रामेश्वर कॉलनी परिसरात २७ वर्षीय रिक्षाचालक तरुण आई, वडील, आजीसह राहतो. त्याच्या आईने बऱ्हाणपूर येथील आशाबाई (पूर्ण नाव समजू शकले नाही) नावाच्या एजंट महिलेशी संपर्क साधला. तिने पूजा गंगाराम गावडे (रा. पिपरी महेपाल, समरडक, ता.जि. यवतमाळ) ही लग्नाची मुलगी असून…

Read More

मेष राशी व्यवसाय आणि उपजीविकेच्या क्षेत्रात जास्त मेहनत केल्याने सुधारणा होईल. गुप्त शत्रूंच्या कारस्थानांपासून सावध राहा. विरोधक तुमच्या कमकुवतपणाचा फायदा घेऊ शकतात. शैक्षणिक, आर्थिक आणि शेतीविषयक काम करणाऱ्या लोकांना फायदेशीर संधी मिळतील. नोकरी करणाऱ्यांना लाभदायक संधी मिळतील. वृषभ राशी तुमची आर्थिक स्थिती थोडी नरम असेल. आज विविध कामांमुळे तुम्ही तुमच्या व्यवसायात योग्य लक्ष देऊ शकणार नाही. त्यामुळे व्यवसायातील उत्पन्न खूपच कमी होईल. प्रेमप्रकरणात खूप पैसा खर्च होईल. पैशाच्या कमतरतेमुळे कुटुंबात अंतर्गत वाद होऊ शकतात. मिथुन राशी कोणाच्या तरी बोलण्यात अडकून व्यवसायात कोणताही चुकीचा निर्णय घेऊ नका. त्यामुळे पुढील व्यवसायाचे मोठे नुकसान होऊ शकते. महत्त्वाची कामे तुम्हाला स्वतः करावी लागतील.…

Read More