Author: editor desk

भुसावळ : प्रतिनिधी शहरातील एका भागातल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न करण्यात आला. याप्रकरणी एकास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शहरातील एका भागात सहा वर्षाची बालिका खेळत असताना नूर मोहंमद (४०) याने सार्वजनिक शौचालयात नेऊन तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. या बालिकेने तेथून कसा तरी पळ काढून आपल्या आईला याबाबत माहिती दिली. या महिलेने बाजारपेठ पोलिस स्थानकात फिर्याद दिली. यावरून संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला अमळनेर येथून ताब्यात घेण्यात आले आहे

Read More

मेष राशी आज तुम्हाला काही अप्रिय बातमी मिळू शकते. परदेश प्रवासाचे संकेत आहेत. वाईट कृत्यांचे विचार मनात येऊ शकतात, सावध रहा. तुमचा आत्मविश्वास वाढेल. सुरक्षेत गुंतलेल्या लोकांना त्यांच्या धैर्य आणि शौर्याच्या जोरावर लक्षणीय यश मिळेल. तुमच्या कामातील चांगल्या कामगिरीबद्दल तुमच्या वरिष्ठांकडून तुमचे कौतुक होईल. वृषभ राशी आज व्यवसायात नुकसान होण्याची चिन्हे आहेत. तुम्ही दिवाळखोरीत जाऊ शकता. कर्ज घेण्याचे प्रयत्नही यशस्वी होतील. वाचवलेले भांडवल निरुपयोगी कामांवर अधिक खर्च केले जाईल. औषध व्यवसायात गुंतलेल्या लोकांना अचानक मोठे यश मिळू शकते. कोणत्याही मौल्यवान वस्तू अनोळखी व्यक्तीला देणे टाळा. मिथुन राशी आज तुमच्या पालकांच्या आजाराची बातमी ऐकून तुम्हाला त्रास होईल. सामाजिक कार्यात चुकीची कामे…

Read More

पुणे : वृत्तसंस्था राज्याच्या राजकारणात आता मराठी- हिंदी भाषेंचा मुद्दा चांगलाच तापलं असतांना आता राज ठाकरेंचा अजित पवारांची चांगलाच समाचार घेतला आहे. राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेकडून ‘राज्य शालेय अभ्यासक्रम आराखडा 2024’ तयार करण्यात आला आहे. या आराखड्यानुसार आता तिसरी भाषा म्हणून हिंदी भाषा सक्तीची करण्यात आली आहे. त्यानंतर आता राज्यभरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. याविरोधात मनसे चांगलीच आक्रमक झाली असून, मनसे प्रमुख राज ठाकरेंनीही ट्विट करत ही सक्ती महाराष्ट्र नवनिर्माण सेना खपवून घेणार नाही, असा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माणसे अध्यक्ष राज ठाकरे यांना अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे. सध्या समोरच्या राजकीय…

Read More

 यावल  : प्रतिनिधी तालुक्यातील डांभुर्णी शिवारात दोन वर्षांच्या चिमुरडीला बिबट्याने उचलून नेऊन ठार केल्यानंतर अखेर वनविभागाच्या तातडीच्या कारवाईत बिबट्याला जेरबंद करण्यात यश आले. दि. १७ एप्रिल २०२५ रोजी रात्री १२.३० ते १.०० वाजेच्या सुमारास प्रभाकर चौधरी यांच्या मा.ग.क्र. ७४१ मधील शेतात झोपलेल्या रत्ना सतीश ठेलारी (वय २ वर्षे) हिला बिबट्याने झडप घालून केळीच्या बागेत ओढत नेऊन ठार केले होते. ही मागील महिन्यातील दुसरी घटना असल्यामुळे परिसरात शेतकरी व मजुरांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. उपवनसंरक्षक श्री. जमीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक वनसंरक्षक (प्रादेशिक व कॅम्पा) श्री. समाधान पाटील यांच्या नेतृत्वात, वनपरिक्षेत्र अधिकारी यावल पश्चिम श्री. सुनील भिलावे, यावल पूर्वचे श्री. स्वप्निल…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. गतवर्षी सारखाच यंदाही दहावी व बारावीचा निकाल मे महिन्यातच लागण्याची शक्यता आहे. बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी स्वतः तसे संकेत दिलेत. त्यांच्या माहितीनुसार, या दोन्ही वर्गांचे निकाल 15 मेपर्यंत लागण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे नुकतीच दहावी व बारावीची परीक्षा घेतली होती. आता या परीक्षांच्या निकालाची सर्वांना उत्सुकता लागली आहे. ही उत्सुकता लवकरच संपण्याची शक्यता आहे. कारण, यासंबंधी बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र बोर्डाचा दहावी व बारावीचा निकाल 15 मेपर्यंत जाहीर होण्याची शक्यता…

Read More

बीड : वृत्तसंस्था गेल्या काही महिन्यापासून बीड जिल्हा गुन्हेगारीने चर्चेत येत असतांना आता आणखी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. बीड मधील अंबाजोगाई सत्र न्यायालयात वकील करणाऱ्या महिलेला सरपंच आणि त्याच्या कार्यकर्त्यांकडून जबर मारहाण करण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे. या महिलेने गावातील ध्वनी प्रदूषणामुळे आपल्याला मायग्रेनचा त्रास होत असल्याने या विरोधात तक्रार केली होती. याचा राग मनात धरूनच ही मारहाण करण्यात आली असल्याचा आरोप करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राज्यात बीड जिल्हा सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर आता बीडमध्ये आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामध्ये एका सरपंच आणि त्याच्या कार्यकर्त्यांनी महिला…

Read More

चाळीसगाव  : प्रतिनिधी शिवीगाळ करण्याच्या कारणातून कोयत्याने तरुणाच्या डोक्यावर वार करून गंभीर जखमी करत धमकी दिली. हा प्रकार चाळीसगाव तालुक्यातील खरजई येथे १५ रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास घडला. या प्रकरणी शहर पोलिस स्टेशनला पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जयेश दत्तात्रय शिंदे, योगेश एरंडे, दीपक एरंडे, महेश छोटू एरंडे, छोटू राजाराम एरंडे (सर्व रा. खरजई) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. अजय उत्तम काळे (रा. खरजई) या तरुणाने दिलेल्या फिर्यादीनुसार त्याच्या पाहुण्यास शिवीगाळ केल्याबाबत विचारणा केली असता संशयित जयेश शिंदे याने हातातील लोखंडी कोयत्याने ठार मारण्याच्या उद्देशाने अजय याच्या डोक्यावर मारून दुखापत केली. तर इतरांनी अजय याचे…

Read More

जळगाव : प्रतिनिधी बहिणीसोबत प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून गोविंद वामन आंबेकर (वय ३१, रा. सीताराम माळी चाळ, मिल परिसर धुळे) याला तीन ते चार जणांनी लोखंडी पाइपने मारहाण केली. यात त्याचे दोन्ही पाय फ्रैक्चर झाले. ही घटना शहरातील रामेश्वर कॉलनीत घडली. याप्रकरणी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. सविस्तर वृत्त असे कि, धुळे येथील गोविंद आंबेकर हा तरुण मिस्तरी काम करतो. १६ एप्रिल रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास त्याला चार जणांनी अडविले. त्यातील एका जणाच्या बहिणीसोबत प्रेम संबंध असल्याच्या संशयावरून या सर्वांनी त्याला शिवीगाळ करीत लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली. यात दोन्ही पाय फ्रैक्चर केले. तरुणीचा भाऊ, मामा अशांसह चार जणांविरुद्ध…

Read More

जळगाव : प्रतिनिधी मेडिकलवर औषध घेण्यासाठी जात असलेल्या मुलीला मारल्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या महेंद्र दिलीप सोनवणे (वय ३५, रा. ममुराबाद, ता. जळगाव) यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांना जमावाने बेदम मारहाण झाल्याची घटना दि. १६ एप्रिल रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास ममुराबाद गावात घडली. याप्रकरणी अकरा जणांविरुद्ध दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, ममुराबाद येथे महेंद्र सोनवणे यांची पुतणी दि. १६ रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास मेडिकलवर जात होती. रस्त्यात किसन भानुदास सोनवणे याने त्या मुलीला शिवीगाळ करून चापटा बुक्क्याने मारहाण केली. मारहाणीचा जाब विचारण्यासाठी महेंद्र सोनवणेसह त्यांचे नातेवाईक किसन सोनवणे यांच्या घरी गेले. यावेळी ११ जणांनी सोनवणे यांच्यासह…

Read More

जळगाव : प्रतिनिधी पेट्रोल आणि गुटखा विक्री करणाऱ्या दुकानदाराकडून हप्ता स्वीकारल्याचा व्हिडीओ थेट पोलिस अधीक्षकांना पाठविण्यात आला असून त्याची दखल घेत स्थानिक गुन्हे शाखेचे गजानन देशमुख व संघपाल तायडे या दोन कर्मचा-यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. देशमुख यांची पाचोरा तर तायडे यांची फत्तेपूर (जामनेर) पोलिस ठाण्यात बदली करण्यात आली आहे. तर ड्रग्स प्रकरणात फरार असलेल्या आरोपीशी २५२ वेळा संपर्कात असल्याच्या कारणावरुन स्थानिक गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक दत्ता पोटे यांना पोलिस मुख्यालयात जमा करण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलतांना दिली. उपनिरीक्षक दत्ता पोटे यांचा ड्रग्स प्रकरणात आरोपीशी संवाद झालेला आहे. त्याच्या रेकॉडींग तपासण्यात आल्या आहेत.…

Read More