मुंबई : वृत्तसंस्था महायुती सरकारमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृहविभाग आहे, त्यामुळे सर्वच विरोधक राज्यातील गुन्हेगारी फोफावत असतांना गृहमंत्री पदाचा राजीनामा मागत आहे. आता कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर हल्लाबोल चढविला आहे. हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, महाराष्ट्रात कायद्याचा कुणाला धाक राहिलेला नाही. सरकारी आशीर्वादाने वाळू, जमीन, पवनचक्की, मटका, दारू, कोळसा माफिया तयार झाले आहेत. पोलिस आणि गृह विभाग काय करत आहे, फडणवीस यांनी आता तरी गृह खात्याचा मोह सोडून राज्याला पूर्ण वेळ गृह मंत्री द्यावा. हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, सत्ताधारी पक्षाचे आमदारच बीडचा बिहार, तालिबान झाल्याचे सांगत आहेत. बीडमध्ये आका, खोक्या सत्ताधाऱ्यांच्या आशीर्वादानेच उदयास आले…
Author: editor desk
जळगाव : प्रतिनिधी पायावरून दुचाकीचे चाक नेल्याचा जाब विचारल्याच्या कारणावरून राहुल राजू सोनवणे याला बेदम मारहाण करण्यात येऊन कोयत्याने पाठीवर आणि खांद्यावर वार केले. ही घटना ३० मार्च रोजी महाबळ परिसरातील साई विहार अपार्टमेंटजवळ घडली. याप्रकरणी सविता सोनवणे यांनी रामानंद नगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून रोहीत परदेशी (१८), नितीन संतोष सोनवणे (२२) व गणेश बुधा सोनवणे (२२, सर्व रा. समता नगर) यांना अटक केली. त्यांच्याकडून कोयता जप्त करण्यात आला आहे.
जळगाव : प्रतिनिधी कर्ज फेडण्यासाठी घेतलेले हातउसनवारीचे पैसे देण्याच्या तणावात असलेल्या लीलाधर जयराम पाटील (५०, रा.भोकर, ता. जळगाव) या शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना तालुक्यातील भोकर येथे सोमवारी (३१ मार्च) दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. मिळालेल्या माहितीनुसार, लीलाधर पाटील यांच्यावर ४० ते ५० हजार रुपयांचे कर्ज होते. त्यांनी इतरांकडून हातउसनवारीने पैसे घेऊन कर्ज फेडले. मात्र, इतरांची रक्कम कशी द्यावी, या चिंतेत ते होते. सोमवारी (३१ मार्च) घरातील सर्व जण शेतात गेलेले असताना घरी एकटेच असलेल्या लीलाधर पाटील यांनी गळफास घेतला. हा प्रकार कुटुंबीयांच्या लक्षात येताच, त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मयत…
भुसावळ : प्रतिनिधी युवकावर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची घटना गौसीया नगर येथे घडली. याप्रकरणी दोन आरोपींना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शेख रिजवान शेख रहीम (३४, व्यवसाय मजुरी, रा. बडी खानका मागे, मुस्लिम कॉलनी) हे आपल्या पत्नी व तीन मुलींसह शहरात राहतात. ३१ मार्च रोजी सकाळी ८ वाजता ते घरातून बाहेर गेले होते. सकाळी ९.३० वाजता ते सहकाऱ्यांसह (शेख रेहमान, मोहम्मद नासीर, फैड़झल खान आणि शेख बिस्मिल्ला) गौसीयानगर येथे गेले. सकाळी १०.१५ वाजण्याच्या सुमारास अचानक रिजवान यांच्या पाठीवर अज्ञाताने धारदार शस्त्राने वार केला. हल्लेखोर दानीश ऊर्फ माया अकील शेख याच्या…
जळगाव : प्रतिनिधी तालुक्यातील धानवड परिसरामध्ये विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस होऊन वीज कोसळून अंकुश विलास राठोड (१५, रा. धानवड, ता. जळगाव) या मुलाचा जागीच मृत्यू झाला तर त्याचे आजोबा शिवाजी जगराम राठोड (६५) हे भाजले जाऊन गंभीर जखमी झाले आहे. त्यांच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरू आहे. सविस्तर वृत्त असे कि, अंकुश राठोड हा मुलगा आजोबा शिवाजी राठोड यांच्यासह नेहमीप्रमाणे शेतात पिकांची राखण करण्यासाठी गेला होता. सोमवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास अचानक विजांसह अवकाळी पाऊस सुरू झाला. त्यावेळी धानवड ते भवानी खोरा रस्त्यावर असलेल्या शेतात तीज कोसळून अंकुश राठोड या मुलाचा मृत्यू झाला तर आजोबा शिवाजी राठोड हे…
मेष राशी आज अशी एखादी घटना घडू शकते ज्यामुळे तुमच्या कामावर परिणाम होईल. सामाजिक कार्याकडे कल वाढेल. कोणाचीही दिशाभूल करू नका. तुमच्या बुद्धीने आणि विवेकाने काम करा. राग टाळा. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. नोकरी करणाऱ्या लोकांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी जास्त लक्ष द्यावे लागेल. वृषभ राशी आज व्यवसायात चांगले उत्पन्न मिळण्याचे संकेत आहेत. त्यामुळे संचित भांडवली संपत्ती वाढेल. आर्थिक बाबतीत पूर्वी केलेले प्रयत्न यशस्वी होतील. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. मिथुन राशी आज प्रेमसंबंधातील तणाव संपुष्टात येईल. परस्पर मतभेद वाढू देऊ नका. एकमेकांचा प्रॉब्लेम समजून घेण्याचा प्रयत्न करा. वैवाहिक जीवनात पती-पत्नीमध्ये समन्वयाचा अभाव असू शकतो. एकमेकांवरील विश्वास वाढवण्याचा प्रयत्न करा. कर्क राशी…
जळगाव : प्रतिनिधी नशिराबाद उड्डाणपुलावर दुचाकीच्या भीषण अपघातात निंभोरा बुद्रुक तालुका रावेर येथिल जुळ्या भावांपैकी एकाचा जागीच मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी ३१ मार्च रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली आहे. चैतन्य सुपडू फेगडे (वय २६ रा. निंभोरा ता. रावेर) असे मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रावेर तालुक्यातील निंभोरा बुद्रुक गावात राहणारा चैतन्य सुपडू फेगडे हा तरुण भाऊ चेतन, आई-वडील यांच्यासोबत वास्तव्याला होता. घरकुल योजने संदर्भातची फाईल च्या कामानिमित्ताने चैतन्य हा जुळवा भाऊ चेतन आणि वडील यांच्यासोबत सोमवारी ३१ मार्च रोजी जळगावला निघाले. दरम्यान चैतन्यचे वडील रिक्षाने पुढे निघाले तर चेतन आणि चैतन्य हे…
जळगाव : प्रतिनिधी पुणे येथे अभियांत्रीकीच्या शेवटच्या वर्षात शिकणारा विद्यार्थी सुट्टी असल्याने घरी आला होता. घरी असतांना रविवारी त्याने छताला दोरीच्या सहाय्याने गळफास घेत आपली जीवनयात्रा संपविली. ही धक्कादायक घटना रविवारी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास शहरातील यशवंत नगरात घडली. लक्षीत राजेंद्र वाघुळदे (वय २२, रा. यशवंत नगर) असे मयत विद्यार्थ्याचे नाव आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील यशवंत नगरात राहणारा लक्षीत वाघुळदे हा तरुण आई वडीलांसह वास्तव्यास होता. त्याचे वडील शहरातील सेंट जोसेफ शाळेत शिक्षक असून आई गृहीणी आहे. लक्षीत हा पुण्यात अभियांत्रीकीचे शेवटच्या वर्षात शिक्षण घेत होता. सद्या सुट्टी असल्यामुळे काही…
मुंबई : वृत्तसंस्था गेल्या पाच महिन्यापासून सतत चर्चेत असलेले मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात अटकेत असणाऱ्या वाल्मीक कराड व सुदर्शन घुले यांना बीड तुरुंगात मारहाण झाल्याची गंभीर घटना घडली आहे. भाजप आमदार सुरेश धस यांनी हा सर्व घटनाक्रम उलगडून सांगत आपसातील टोळी युद्धामुळे ही घटना घडल्याचा दावा केला आहे. वाल्मीक कराड व सुदर्शन घुलेला फक्त मारहाण झाली आहे. विशेषतः वाल्मीकला केवळ 2 कानशिलात लगावण्यात आल्यात. त्यामुळे त्याला रुग्णालयात वगैरे दाखल करण्याची काहीही गरज नाही, असे ते म्हणालेत. सुरेश धस एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले की, वाल्मीक कराड व सुदर्शन घुलेला तुरुंगात मारहाण झाली आहे. मला या प्रकरणाची माहिती आहे.…
मुंबई : वृत्तसंस्था शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नागपूर दौऱ्यावर निशाणा साधत ते आपला राजीनामा देण्यासाठी संघ मुख्यालयात गेल्याचा दावा केला आहे. त्यांच्या या विधानमुळे राजकारणात एकच खळबळ माजली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वरील टीका केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उत्तराधिकारी निवडण्याची वेळ अद्याप आली नसल्याचे विरोधकांना ठणकावून सांगितले आहे. आमच्यासह संपूर्ण देश 2029 चे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांच्याकडे पाहतो. त्यामुळे त्यांच्या उत्तराधिकाऱ्यावर आत्तातच चर्चा करणे योग्य ठरणार नाही. वडील जिवंत असताना मुलांनी असा विचार करावा ही भारतीय नव्हे तर मुघलांची संस्कृती…

