पारोळा : प्रतिनिधी तालुक्यातील भोंडण येथे १८ वर्षीय तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी पहाटेच्या सुमारास उघडकीस आली. पायल संतोष शिंदे (वय १८, रा. पाथर्डी फाटा, नाशिक) असे मृत तरुणीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक येथील मराठा कॉलेजमध्ये पायल ही बारावीचे शिक्षण घेत होती. ती बारावीच्या परीक्षेनंतर सुट्टी असल्याने भोंडण येथे सतीश सुखदेव सोनवणे या मामांच्या घरी आली होती. दरम्यान, २७ रोजी रात्री सर्वजण एकत्र जेवण करून झोपल्यानंतर तरुणीने मध्यरात्रीच्या सुमारास घरातील लोखंडी छताला दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. पहाटे चार वाजेच्या सुमारास लघुशंकला उठलेल्या मामाने ही घटना पाहिली. त्यानंतर त्यांनी पायल शिंदे या तरुणीला खाली उतरून पारोळा…
Author: editor desk
चाळीसगाव : प्रतिनिधी कुटुंब घराबाहेर आणि गच्चीवर झोपल्याचा फायदा घेऊन चोरट्यांनी घरात घुसून रोकडसह सोन्याचे दागिणे असा सुमारे ७४ हजारांचा ऐवज लंपास केल्याची घटना तालुक्यातील तळेगाव येथे घडली. मिळालेल्या माहितीनुसार, तळेगाव येथील उद्धव अर्जुन शिंगाडे हे २७ रोजी रात्री ८ वाजता जेवण करून कुटुंबासह गच्चीवर झोपण्यास गेले तर त्यांचे आई व वडिल घराबाहेर अंगणात झोपलेले होते. शिंगाडे हे रात्री २ वाजता घरात चार्जिंगसाठी लावलेला मोबाईल घेण्यास गच्चीवरून घरात आले असता त्यांना घरातील साहित्य अस्तव्यस्त पडलेले दिसले. कपाटाच्या लॉकरमधील स्टीलच्या डब्यात ठेवलेले ३४ हजारांची १० ग्रॅमची मणी असलेली सोन्याची पोत व रोख ४० हजार रूपये असा सुमारे ७४ हजारांचा ऐवज चोरी…
वरणगाव : प्रतिनिधी येथील पोलीस ठाण्याच्या हद्दीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याच्या प्रकरणी अनिल बारकू निकम रा भुसावळ या संशयिताला पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण पसरले आहे. पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, पीडित मुलगी ही अल्पवयीन असून आरोपीने तिच्यावर दोन तीन महिन्या पूर्वी घरात एकटी असतांना अत्याचार केल्याची तक्रार तिच्या कुटुंबीयांनी वरणगाव पोलीस ठाण्यात नोंदवली आहे. या तक्रारीवरून पोलीसांनी तत्काळ तपास सुरू केला. दरम्यान पोलिसांनी संशयित अनिल बारकू निकम रा. भुसावळ शोधून त्याला अटक केली. तपास तपास सपोनि जनार्दन खंडेराव करीत आहेत. या घटनेने समाजात खळबळ उडाली असून आरोपीस कठोर शिक्षा देण्याची मागणी नागरिकांमधून केली जात आहे.
जळगाव : प्रतिनिधी भरधाव अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्यामुळे महेंद्र एकनाथ बोंडे (३८, रा. गणेश कॉलनी, भुसावळ) हे खाली पडून डोक्यावरून चाक गेल्याने जागीच ठार झाले. हा अपघात शनिवारी (२९ मार्च) सकाळी आठ वाजेच्या सुमारास कंपनीत कामावर येत असताना झाला व कामावर पोहोचण्यापूर्वीच बोंडे यांचा मृत्यू झाला. अपघात एवढा भीषण होता की बोंडे यांच्या डोक्याचा चेंदामेंदा झाला. मिळालेल्या माहितीनुसार, महेंद्र बोंडे हे जळगाव औद्योगिक वसाहतीमधील गणेश अल्युमिनियम कंपनीमध्ये कामाला होते. दररोज ते भुसावळ येथून दुचाकीने अपडाऊन करत होते. शनिवारी (२९ मार्च) सकाळी ते दुचाकीने (क्र. एमएच १९, बीडी ०६०२) कामावर येत असताना खेडी फाट्याजवळील अरुंद पुलावर अज्ञात वाहनाने दुचाकीला जोरदार…
मेष राशी श्रीगणेश म्हणतात की, आर्थिक बाबींशी संबंधित महत्त्वाचे निर्णय सकारात्मक परिणाम देऊ शकतात. कुटुंबातील वडीलधाऱ्यांचे मार्गदर्शन तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. तुमची ऊर्जा सकारात्मक पद्धतीने वापरा. चुकीच्या गोष्टी आणि बाबींमध्ये तुमचा वेळ वाया घालवू नका. सध्याच्या वातावरणामुळे नकारात्मकतेला तुमच्यावर प्रभाव पडू देऊ नका. तुमच्या योजना गुप्त ठेवा. कुटुंबातील आनंद कायम राहील. आरोग्य चांगले राहील; परंतु सध्याच्या परिस्थितीबाबत सावधगिरी बाळगा. वृषभ राशी आज तुमचे अपूर्ण स्वप्न पूर्ण होण्याची शक्यता आहे. दुपारी ग्रहांची परिस्थिती अनुकूल राहील. सकारात्मकता आणि संतुलित विचारसरणीद्वारे काम नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण केले जाईल. जवळची व्यक्ती तुमच्या समस्येचे कारण बनू शकते. भावनिकतेऐवजी व्यावहारिक राहण्याचा हा काळ आहे,असा सल्ला श्रीगणेश देतात. घराच्या…
जळगाव : प्रतिनिधी पाळधी ते तरसोद बायपास चे काम सुरू आहे ऍग्रो इन्फ्रा या ठेकेदाराकडून अवैध गौण खनिजचे उत्खनन झाल्याचे उघड झाले आहे शासनाला किरकोळ रक्कम भरून महसूलच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून करोडो रुपयाचे अवैध गौन खनिज उत्खनन झालेले आहे. अशी तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे झाले आहे परंतु महसूल मोठ्या प्रमाणात या भ्रष्टाचारात सहभागी असल्याने कारवाई होणे अपेक्षित दिसत नाही. महामार्ग तरसोद ते पाळधी बाय पासचे काम सुरू आहे. शासनाच्या सुचनानुसार सदरचे काम प्रगतीपथावर असून लवकरच महामार्ग वाहतुकीसाठी सुरू होईल यात शंकाच नाही. परंतु सदरचे काम करणारी ठेकेदार कंपनी अॅग्रो इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर प्रा.लि.या कामासाठी लागणारा मुरूम गौणखनिज चोरी करत असून त्या ठिकाणी शासनाचे…
अमळनेर : प्रतिनिधी जळोद रस्त्यावर पोलिसांनी छापा टाकून ५६ किलो ९७० ग्रॅम वजनाचा गांजा पकडला. या कारवाईत दोन आरोपींना अटक करण्यात आली असून, वाहनासह एकूण ११ लाख ३९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याबाबत अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एका पांढऱ्या बोलेरो पिकअप (एमएच १८ एजे ०२२३) मधून गांजा विक्रीसाठी येणार असल्याचे समजले. पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली, डीवायएसपी विनायक कोते यांची परवानगी घेऊन आणि तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांच्या उपस्थितीत छापा टाकण्यात आला. २८ मार्च रोजी रात्री १०:५० वाजता पोलिसांनी जळोद रस्त्यावर उड्डाण पुलाजवळ गाडी अडवली. गाडीच्या झडतीत १८ पॅकेटमध्ये भरलेला ओलसर…
नागपूर : वृत्तसंस्था देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या गुढीपाड्व्यानिमित्त नागपूर दौऱ्यावर येत असतांना आता कॉंग्रेसच्या नेत्याने टीकास्त्र सोडले आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार म्हणाले कि, लोकसभा निवडणुकीतील भाजपच्या विजयामागे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नव्हे तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा करिष्मा होता. ही गोष्ट पटल्यामुळेच मोदी उद्या नागपूरच्या दौऱ्यावर येत आहेत या दौऱ्यात ते संघाच्या रेशीमबाग येथील डॉक्टर हेडगेवार स्मृती भवन परिसरासह ऐतिहासिक दीक्षाभूमीला भेट देणार आहेत. यावेळी त्यांच्यासोबत सरसंघचालक मोहन भागवतही हजर राहणार आहेत. विशेष म्हणजे देशाच्या पंतप्रधानपदावर विराजमान असताना संघाच्या मुख्यालयात जाणारे मोदी पहिलेच पंतप्रधान ठरणार आहेत. या पार्श्वभूमीवर विजय वडेट्टीवार यांनी त्यांच्या दौऱ्यावर निशाणा साधला आहे. नरेंद्र मोदी पंतप्रधान…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था म्यानमार आणि थायलंड देशात झालेल्या भूकंपामुळे मोठ्या प्रमाणात विध्वंस झाला आहे. एकट्या म्यानमारमध्ये भूकंपात ६९४ हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. शेकडो लोक बेपत्ता आहेत. या भूकंपात आतापर्यंत १५०० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. मदत आणि बचाव कार्य वेगाने सुरू आहे. दुसरीकडे, थायलंडमध्ये भूकंपामुळे सुमारे १० जणांचा मृत्यू झाला आहे. या अचानक आलेल्या आपत्तीनंतर म्यानमारमध्ये आणीबाणी लागू करण्यात आली आहे. या भयानक भूकंपाने म्यानमारसह शेजारील देशही हादरले आहेत. आज सकाळी अफगाणीस्तानमध्येही भूकंपाचे धक्के बसले. भारत, चीन आणि नेपाळसह सहा देशांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. शुक्रवारी म्यानमार आणि थायलंड हे दोन्ही देश ७.७ रिश्टर स्केलच्या भूकंपाने…
जामनेर : प्रतिनिधी शहरातील वाकी रोडवरील पोस्ट ऑफिससमोर लावलेल्या जवळपास १० दुचाकींना तेथून भरधाव जाणाऱ्या ट्रॅक्टने जबर धडक दिल्याने सर्व दुचाकींचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, या अपघातात सुर्दैवाने कुणालाही इजा झाली नसून ही घटना शुक्रवारी दुपारी घडली. मिळालेल्या माहितीनुसार, जामनेर शहरातून वाकी रोडकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रॅक्टर चालकाने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या जवळपास १० दुचाकींना जबर धडक दिल्याने दुकाकींचे नुकसान झाले असून यात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. ही घटना २८ रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास पोस्ट ऑफीस कार्यालयासमोर घडली आहे. या घटनेमुळे परिसरात गोंधळ उडाला होता. परंतु, पोलिसांनी वेळेवर येऊन परिस्थिती लक्षात घेत खोळबंलेली वाहतूक सुरळीत केली. दरम्यान,…

