मुंबई : वृत्तसंस्था राज्यात नुकताच गुढीपाडवा सण मोठ्या उत्साहात झाला असतांना आज ३१ मार्च रोजी सकाळी ७.२० वाजता २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमची किंमत ८९,३३० रुपये आहे. तर २२ कॅरेट सोन्याच्या त्याच संख्येच्या ग्रॅमची किंमत ८१,८८६ रुपये आहे. गेल्या २४ तासांपासून सोन्याच्या किमतीत सातत्याने वाढ होत आहे. एमसीएक्स इंडेक्सवर १० ग्रॅम सोन्याची किंमत ८८,८५० रुपये आहे, जी कालपेक्षा ४४ रुपये जास्त आहे. आयबीए वेबसाइटनुसार,आज सकाळी ७.२० वाजता चांदीची किंमत १,००,७७० रुपये प्रति किलो आहे. गेल्या २४ तासांत चांदीच्या किमतीत ९९९ रुपयांची वाढ झाली आहे. चांदीच्या ९०० नाण्यांबद्दल बोललो तर ३१ मार्च रोजी त्यांची किंमत ९०,६९३ रुपये प्रति किलो आहे. त्याच…
Author: editor desk
नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशात नव्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस अर्थात एक एप्रिलपासून देशात महत्त्वाचे बदल होणार आहेत. एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीपासून ते बँक खाते, क्रेडिट कार्ड आदींच्या नियमावलीतील बदलास प्रारंभ होणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पीय भाषणात जाहीर केलेल्या नवीन कर दरांची अंमलबजावणी एक एप्रिलपासूनच होणार आहे. प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला तेल आणि वायू वितरण कंपन्या एलपीजी सिलिंडरच्या किमतींत बदल होतात. गेल्या काही महिन्यांमध्ये व्यावसायिक (19 किलो) एलपीजी सिलिंडरच्या किमतींमध्ये चढ-उतार दिसून आले आहेत; तर घरगुती (14 किलो) गॅस सिलिंडरच्या किमती स्थिर आहेत. नव्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस ग्राहकांना गॅसच्या दरांमध्ये काही प्रमाणात सवलतीची अपेक्षा आहे. एप्रिल 2025 पासून…
मुंबई : वृत्तसंस्था भारतीय हवामान विभागाने सोमवारी देशाच्या अनेक भागात वेगवेगळ्या हवामान परिस्थितीचा अंदाज वर्तवला आहे. पश्चिम बंगाल आणि गुजरातच्या मोठ्या भागात उष्णतेच्या लाटेची शक्यता आहे. महाराष्ट्र, गोवा आणि केरळसह ६ राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. यामध्ये ईशान्येकडील काही राज्यांचाही समावेश आहे. येथे, राजस्थान, उत्तर प्रदेश, दिल्ली, पंजाब आणि हरियाणाच्या काही भागात हलके ढग असतील. ताशी २०-३० किमी वेगाने वारे वाहू शकतात. यामुळे सकाळी आणि संध्याकाळी तापमानात घट नोंदवता येते. राजस्थानमध्ये २ एप्रिल रोजी ७ जिल्ह्यांसाठी आणि ३ एप्रिल रोजी ११ जिल्ह्यांसाठी पिवळा इशारा जारी करण्यात आला आहे. त्याच वेळी, ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या अनेक भागात उष्ण वारे वाहू लागले.…
मेष राशी आजचा दिवस अनुकूल आहे. तुमच्या मेहनतीला फळ मिळेल. आत्मविश्वासाने कामे पूर्ण कराल. नकारात्मक गोष्टी नातेसंबंध बिघडू शकतात, याची जाणीव ठेवा. आळसामुळे काम टाळण्याकडे कल असेल. कुटुंबातील सदस्यांसोबत मनोरंजन आणि खरेदीमध्ये वेळ व्यतित करा. वृषभ राशी श्रीगणेश म्हणतात की, आज एखाद्या निर्णयाबाबत व्दिधा मनस्थिती दूर होईल. मुलांकडून कोणतीही चांगली बातमी मिळाल्याने घरात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. पैसे मिळवण्याच्या दिशेने बनवलेल्या योजना यशस्वी होतील. तुमच्यातील नकारात्मक दोषांना दूर करून तुम्ही सर्वोत्तम परिणाम मिळवू शकता. व्यक्तिगत कामासोबतच कुटुंबातील सर्व सदस्यांची काळजी घेणे ही तुमची जबाबदारी आहे, याची जाणीव ठेवा. मिथुन राशी श्रीगणेश सांगतात की, आज तुम्ही तुमचे काम चांगल्या प्रकारे करू…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था उत्तर प्रदेशातील कैसरगंजचे भाजपचे माजी खासदार ब्रजभूषण सिंह यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राज ठाकरे यांच्याबाबत मोठे विधान केले आहे. त्यांनी “जोपर्यंत राज ठाकरे उत्तर भारतीयांची माफी मागत नाहीत तोपर्यंत आम्ही त्यांना रामलल्लाचे दर्शन घेऊ देणार नाही,” असा थेट इशाराच त्यांनी दिला आहे. ब्रिज भूषण यांनी एका सार्वजनिक व्यासपीठावरून हा इशारा दिला आहे. याविषयी बोलताना,”राज ठाकरे उत्तर भारतीयांना कचरा समजत होते आणि त्यांना मारहाण करत होते. त्याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. उन्नावच्या भाजप खासदार साक्षी महाराज यांच्या होळी मिलन समारंभात माजी खासदार ब्रजभूषण शरण सिंह उपस्थित होते. ज्याठिकाणी त्यांनी लोकांना संबोधित…
नागपूर : वृत्तसंस्था देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रविवारी नागपूर येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय केशव कुंज येथे पोहोचले. त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक केशव बळीराम हेडगेवार आणि दुसरे सरसंघचालक माधव सदाशिव गोळवलकर (गुरुजी) यांच्या स्मृती मंदिराला भेट देऊन श्रद्धांजली वाहिली. यानंतर ते दीक्षाभूमीला गेले आणि संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहिली. दीक्षाभूमी हे आरएसएस कार्यालयाच्या अगदी जवळ आहे. गेल्या वर्षी पंतप्रधान मोदींनी येथे येऊन ध्यानधारणा केली होती. पंतप्रधानांनी माधव नेत्रालय प्रीमियम सेंटरच्या नवीन विस्तारित इमारतीची पायाभरणी केली. यावेळी त्यांनी सांगितले की, आमचे सरकार जनऔषधी केंद्राच्या माध्यमातून गरिबांना स्वस्त दरात औषधे पुरवत आहे. डायलिसिस सेंटर्स खुली आहेत, जिथे…
जळगाव : प्रतिनिधी शिंदे गटाचे आमदार गुलाबराव पाटील यांची आज जळगावमध्ये जोरदार फटकेबाजी पाहायला मिळाली. सध्या लाडक्या बहिणी सरपंच आहेत, नवऱ्यांना माझी विनंती आहे की गावच्या कारभारात डोकावू नका, महिलांना थोडे काम करू द्या, तुम्ही थैली घेऊन त्यांच्या मागे राहा, तुमचे काम तेच आहे. बायको तुमची आयुष्यभर सेवा करते, मग ती सरपंच झाली तर तिच्या मागे उभा रहा ना काय फरक पडतो, पतीचे काम हे फक्त प्रॉम्टिंग कराचे आहे, असे गुलाबराव पाटील म्हणाले. सरपंच किती काम करतो, हे पोस्टरवर नव्हे जमीनीवर दिसला पाहिजे, असेही गुलाबराव पाटील म्हणाले. काही लोक बॅनर लावतात कार्य सम्राट, भावी आमदार वगैरे -वगैरे पण त्याच्या गावातील…
नागपूर : वृत्तसंस्था पंतप्रधान नरेंद्र मोदी आज, रविवारी (३० मार्च) हिंदू नववर्ष गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर दौऱ्यावर आले आहेत. पंतप्रधान मोदी नागपुरात दाखल झाले आहेत. विशेष विमानाने त्यांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ नागपूर येथे आगमन झाले. पाच तासांच्या या भेटीत पंतप्रधान मोदी रेशीमबाग येथील डॉ. हेडगेवार स्मृतिमंदिर, दीक्षाभूमी येथे भेट, माधव नेत्रालय प्रीमियम सेंटरच्या विस्तार प्रकल्पाची पायाभरणी व सोलार डिफेन्स, एअरोस्पेस लिमिटेड येथे संरक्षण क्षेत्रातील प्रकल्पाच्या उद्घाटन कार्यक्रमाला उपस्थित राहतील. यानंतर पंतप्रधानांच्या हस्ते हिंगणा मार्गावरील माधव नेत्रालय प्रीमियम सेंटरच्या विस्तार प्रकल्पाची पायाभरणी केली जाणार आहे. यानंतर पंतप्रधानांच्या हस्ते सोलार डिफेन्स आणि एअरोस्पेस लिमिटेड येथे संरक्षण क्षेत्रातील अत्याधुनिक प्रकल्पांचे…
पारोळा : प्रतिनिधी तालुक्यातील भोंडण येथे १८ वर्षीय तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी पहाटेच्या सुमारास उघडकीस आली. पायल संतोष शिंदे (वय १८, रा. पाथर्डी फाटा, नाशिक) असे मृत तरुणीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक येथील मराठा कॉलेजमध्ये पायल ही बारावीचे शिक्षण घेत होती. ती बारावीच्या परीक्षेनंतर सुट्टी असल्याने भोंडण येथे सतीश सुखदेव सोनवणे या मामांच्या घरी आली होती. दरम्यान, २७ रोजी रात्री सर्वजण एकत्र जेवण करून झोपल्यानंतर तरुणीने मध्यरात्रीच्या सुमारास घरातील लोखंडी छताला दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. पहाटे चार वाजेच्या सुमारास लघुशंकला उठलेल्या मामाने ही घटना पाहिली. त्यानंतर त्यांनी पायल शिंदे या तरुणीला खाली उतरून पारोळा…
चाळीसगाव : प्रतिनिधी कुटुंब घराबाहेर आणि गच्चीवर झोपल्याचा फायदा घेऊन चोरट्यांनी घरात घुसून रोकडसह सोन्याचे दागिणे असा सुमारे ७४ हजारांचा ऐवज लंपास केल्याची घटना तालुक्यातील तळेगाव येथे घडली. मिळालेल्या माहितीनुसार, तळेगाव येथील उद्धव अर्जुन शिंगाडे हे २७ रोजी रात्री ८ वाजता जेवण करून कुटुंबासह गच्चीवर झोपण्यास गेले तर त्यांचे आई व वडिल घराबाहेर अंगणात झोपलेले होते. शिंगाडे हे रात्री २ वाजता घरात चार्जिंगसाठी लावलेला मोबाईल घेण्यास गच्चीवरून घरात आले असता त्यांना घरातील साहित्य अस्तव्यस्त पडलेले दिसले. कपाटाच्या लॉकरमधील स्टीलच्या डब्यात ठेवलेले ३४ हजारांची १० ग्रॅमची मणी असलेली सोन्याची पोत व रोख ४० हजार रूपये असा सुमारे ७४ हजारांचा ऐवज चोरी…

