Author: editor desk

छत्रपती संभाजी नगर : वृत्तसंस्था महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढी पाडवा निमित्त आयोजित मेळाव्यात औरंगजेबाच्या कबरीवर भाष्य केले होते. यावेळी बोलताना औरंगजेबाच्या कबरीजवळ केलेली सजावट काढून टाका. तिथे फक्त कबर दिसली पाहिजे. तिथे एक मोठा बोर्ड लावा. आम्हा मराठ्यांना संपवायला आलेला औरंगजेब आम्ही इथे गाडला गेला. हा आमचा इतिहास. आम्ही कोणाला गाडले हे जगाला कळू द्या, असे राज ठाकरे म्हटले होते. तसेच तिकडे लहान मुलांच्या सहली गेल्या पाहिजेत असेही राज ठाकरे यावेळी म्हणाले होते. त्यानुसार आज छत्रपती संभाजीनगर पदाधिकाऱ्यांनी शहरात बॅनर लावले आहेत. राज ठाकरे यांच्या निर्देशानुसार छत्रपती संभाजीनगरचे मनसे जिल्हाध्यक्ष सुमीत खांबेकर यांनी शहराच्या मध्यवर्ती भागात…

Read More

पुणे : वृत्तसंस्था राज्यात अनैतिक संबंधांतून अनेक ठिकाणी गुन्हेगारी घटना घडत असतांना आता एप्रिल महिन्याच्या सुरुवातील वडगाव मावळ येथून एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. अनैतिक संबंधांच्या संशयातून एका २२ वर्षीय तरुणावर कोयत्याने वार करत त्याची हत्या करण्यात आली आहे. मंगळवार दि. १ एप्रिल रोजी रात्री पावणे आठ वाजण्याच्या सुमारास शनि मंदिराजवळ आंबेवाडी, कान्हे (ता. मावळ) येथे ही घटना घडली. घटनेने परिसरात एकच खळबळ माजली असून या २२ तरुणाच्या हत्येने संपूर्ण मावळ तालुका हादरून गेला आहे. वैभव उमेश सातकर (वय २२, रा. आंबेवाडी, कान्हे) असे हत्या  झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी अंकुश जयवंत सातकर (वय ४२, रा. आंबेवाडी, कान्हे) असे…

Read More

चाळीसगाव : प्रतिनिधी चाळीसगाव-धुळे महामार्गावरील भोरस शिवारात मंगळवारी दोन वेगवेगळ्या घटनेत दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. त्यात वडगाव लांबेचे माजी सरपंच प्रकाश निळकंठ पाटील (४५) व दुसऱ्या घटनेत देवांश दिनेश महाजन (४, चाळीसगाव) या दोघांचा समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार, १ रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास प्रकाश पाटील हे आपल्या दुचाकीने चाळीसगावकडून वडगाव लांबेकडे जात असताना भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. वैद्यकीय अधिकारी यांच्या खबरीवरून पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दुसऱ्या घटनेत १ रोजी सायंकाळी ७वाजता धुळे येथून चाळीसगावकडे डॉ. उत्तमराव महाजन हे वाहनाने येत असताना भोरस शिवारात क्रॉसिंग जवळ…

Read More

जळगाव : प्रतिनिधी दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन योगेश बळीराम पाटील (५१, रा. चैतन्य नगर, जळगाव) हे ठार झाले. तसेच दुसऱ्या दुचाकीवरील मुस्तफा लतिफ खान (६५), बी. डी. फर्नाडिस (६१, दोघे रा. भुसावळ) हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरू  आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, बोदवड न्यायालयामध्ये वरिष्ठ लिपिक असलेले योगेश पाटील हे दररोज जळगाव ते बोदवड ये-जा करतात. मंगळवारी (१ एप्रिल) रात्री ते दुचाकीने बोदवड येथून जळगावला येत असताना नशिराबाद ते तरसोद फाट्यादरम्यान हॉटेल सावन समोर समोरून येणाऱ्या दुचाकीने धडक दिली. यामध्ये पाटील हे रस्त्याच्या बाजूला फेकले गेले, तर समोरील दुचाकीवरील मुस्तफा खान व बी.…

Read More

पाचोरा : प्रतिनिधी तालुक्यातील वरखेडी बुद्रुक येथील अल्पभूधारक शेतकरी सतीश त्र्यंबक पाटील यांच्या मालकीचे गट नंबर १०२ मधील तीन एकर क्षेत्रात हरभरा लावलेला होता. परिपक्व झाल्यानंतर शेतात कापून ठेवलेल्या हरभऱ्याच्या गंजीला सोमवारी रात्री आठ ते साडेआठ वाजेच्या सुमारास अचानकपणे आग लागून संपूर्ण हरभऱ्याचे पीक जळून खाक झाले. शेतकऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, हरभऱ्याच्या गंजीवरून वीज वाहिन्या गेल्या असून सायंकाळी वादळ आल्याने या वीज वाहिन्यांचे घर्षण होऊन हरभऱ्याच्या गंजीवर ठिणगी पडली असावी व गंजीने पेट घेतला असावा. वरखेडी-पाचोरा रस्त्यावर असलेल्या पेट्रोलपंपाच्या मागील बाजूस पाटील यांची गटनंबर १०२ मध्ये शेतजमीन असून या शेतात त्यांनी उन्हाळी हरभऱ्याचे पीक घेतले होते. हे ३१ मार्च रोजी हरभरा…

Read More

मेष राशी तुमचे चांगले बोललेले शब्द कोणीही ऐकून घेत नाही, वाया जातात. आज मोठ्याने ओरडण्याऐवजी स्वतःला शांत ठेवा आणि इतरांच्या म्हणण्याकडे लक्ष द्या. जोडीदारांमधील खरी समज त्यांच्यातील नातेसंबंध मजबूत करण्यास मदत करते. वृषभ राशी आजच्या दिवसाची सुरुवात काही स्फोटक बातम्यांनी होईल. पण चांगली बातमीही मिळू शकते. काही व्यावसायिक कामासाठी तुम्हाला बाहेरगावी जावे लागेल. तुम्ही तुमच्या धोरणानुसारच खर्च करा, कोणाचे बोलणे ऐकू नका. व्यवसायात तुमच्याशी स्पर्धा करणारे लोक तुमचे नुकसान करण्याच्या योजना आखतील, सावध रहा. मिथुन राशी मिथुन राशीच्या लोकांसाठी नोकरीत बदल होण्याची शक्यता आहे. तुम्हाला एखाद्या महत्त्वाच्या पोस्टवर पाठवले जाऊ शकते. जमीन, इमारती आणि वाहनांशी संबंधित कामात तुम्हाला कठोर परिश्रम…

Read More

जळगाव :  प्रतिनिधी एमआयडीसी परिसरातील गोडाऊन फोडून ८ लाख ३५ हजार रुपये किंमतीचा माल चोरी करणाऱ्या टोळीला एमआयडीसी पोलिसांनी अवघ्या ४८ तासांत जेरबंद केले आहे. या कारवाईत चोरीचा सर्व मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एमआयडीसीतील एम सेक्टर २११/२ येथे अतुल विश्वनाथ मुळे यांच्या मालकीची ‘श्री प्रभु डिस्ट्रीब्युटर्स’ ही कंपनी आहे. ही कंपनी जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांत रामबंधु मसाले कंपनीची डीलरशिप आहे . २५ मार्च २०२५ रोजी रात्री अज्ञात चोरट्यांनी गोडाऊनचे शटर तोडून आत प्रवेश करत ७१ गोण्या मसाल्यांचा साठा चोरला. या मालाची किंमत ८ लाख ३५ हजार रुपये आहे. घटनेची माहिती २७ मार्च रोजी अतुल मुळे…

Read More

जळगाव : प्रतिनिधी शहरात वयोवृद्धांना रिक्षात बसवून लुटणाऱ्या टोळीला जळगाव पोलिसांनी केवळ काही तासांतच जेरबंद केले आहे. पोलिसांनी गुन्ह्यातील संपूर्ण २५,००० रुपये रक्कम आणि चोरीसाठी वापरलेली रिक्षा जप्त केली आहे. ही कारवाई नेत्रम प्रोजेक्टच्या अत्याधुनिक सीसीटीव्ही यंत्रणेच्या मदतीने करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, दि. २९ मार्च २०२५ रोजी शेख फिरोज शेख शादुल्ला (वय ५०, रा. नांदुरा, जि. बुलढाणा) हे अजिंठा चौफुली (एमआयडीसी, जळगाव) येथे नांदुरा येथे जाण्यासाठी रिक्षाच्या प्रतीक्षेत होते. त्यांच्या जवळ २५,००० रुपये रोख रकमेची प्लास्टिक पिशवी होती. याच दरम्यान, एक रिक्षा (MH19-CW-5250) त्यांच्या जवळ येऊन थांबली. रिक्षाचालकाने खामगावला जात असल्याचे सांगत फिर्यादींना प्रवासासाठी विचारले. फिर्यादींनी होकार दिल्यानंतर त्यांना मागच्या दोन प्रवाशांसोबत…

Read More

नागपूर : वृत्तसंस्था देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर त्यांचा वारसदार कोण असेल? मग तो महाराष्ट्रातील असेल का? आणखी कोण? अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच वयाची ७५ वर्षे पूर्ण करणार असल्याने, ते निवृत्त होऊ शकतात, असे विरोधी पक्षातील नेत्यांकडून वारंवार अधोरेखित केले जात आहे. दरम्यान, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी संघाला नेतृत्त्वात बदल हवा आहे, त्यामुळे पीएम मोदी निघून जात असल्याचे म्हटले होते, यावर राज्याचे महसूलमंत्री, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जोरदार टीका केली आहे. मंत्री बावनकुळे यांनी या संदर्भातील सोशल मीडिया एक्स पोस्ट केली आहे. त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की, “उबाठाचे नेते संजय…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था गेल्या काही दिवसापासून राज्यातील अजित पवार गटाचे नेते व माजी मंत्री धनंजय मुंडे अनेक अडचणीत असतांना आता पुन्हा एकदा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी गंभीर आरोप केल्याने आता अडचणीत येण्याची शक्यता आहे. धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांचे सत्र सुरू ठेवले असून आज दि.१ त्यांनी पत्रकार परिषदेत मुंडे यांच्यावर आणखी काही गंभीर आरोप केले आहेत. मुंडेचे सहकारी राजेंद्र घनवट यांनी शेतकऱ्यांच्या जमिनी लाटल्या आहेत. याबाबत पीडित महिला शेतकरी २००८ पासून पोलीस ठाण्यात हलपाटे मारत आहेत. परंतु, त्यांना अद्याप न्याय मिळालेला नाही. यापैकी काही महिला उपस्थित होत्या. त्यांना यावेळी अश्रू अनावर झाले. दमानिया पुढे म्हणाल्या की, राजेंद्र घनवट यांचे धनंजय…

Read More