Author: editor desk

बीड : वृत्तसंस्था अंगाची ओली हळद सुकण्यापूर्वी लग्नानंतर दुसऱ्याच दिवशी नवरी माहेरातून प्रियकरासोबत पळून गेल्‍याचा प्रकार समोर आला आहे. दि. ९ मे शुक्रवार रोजी केज तालुक्यात एक विवाह सोहळा संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला अनेक जणांची उपस्थिती होती. या विवाह सोहळ्यानंतर उपस्थितांनी नवदाम्पत्यांना सुखी संस्काराच्या शुभेच्छा दिल्या, पण यावेळी वधूच्या मनात वेगळेच काही असावे. ९ मे रोजी लग्न लागल्यानंतर १० मे रोजी नववधू- वराने जोडीने देवदर्शन केले. त्यानंतर दि. ११ मे रोजी तिला मुराळी पाठवून येती-जातीसाठी माहेरी नेण्यात आले. मात्र त्या नंतर तिने रात्री शौचाला जाण्याच्या बहाण्याने भाजाईचा मोबाईल घेतला आणि त्याद्वारे आपल्या शेजारच्या गावात राहणाऱ्या प्रियकराशी असलेल्या संपर्क साधला.…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था भारत आणि पाकिस्तानमध्ये मोठा तणाव वाढला असून सध्या दोन्ही देशांत शस्त्रसंधी झालेली असली तरीही अद्याप हा तणाव निवळलेला नाही. शत्रूराष्ट्र पाकिस्तानने काही कुरपाती केल्याच तर त्याला चोख प्रत्युत्तर देण्यास भारतीय सेना सज्ज आहे. असे असतानाच आता भारताने ऑपरेशन सिंदूर राबवल्यानंतर मोठी माहिती समोर येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री 8 वाजता संपूर्ण देशाला संबोधित करणार आहेत. मोदी आज देशाशी बातचित करणार असून यावेळी ते नेमकं काय बोलणार ? याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी दहशतवादी हल्ला झाल्यानंतर मोदी यांनी आपला परदेश दौरा अर्धवट सोडला होता. त्यानंतर मोदींनी देशात येऊन…

Read More

भुसावळ : प्रतिनिधी शहरातील गंगाराम प्लॉट भागातील प्रौढ इसमाने स्वत:वर गोळी झाडून जीवनयात्रा संपवल्याची घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गंगाराम प्लॉटमधील नमस्कार मंडळाच्या मागे रहिवासी असलेले डिगंबर बढे ( वय ५२ ) यांनी आज दि.१२ मे रोजी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास स्वत:वर गोळी झाडून घेतली. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा पोलिसांनी घटनास्थळी जाऊन तपासाची चक्रे फिरवली होती. . पोलीस निरिक्षक राहूल वाघ आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तपास सुरू केला होता. या घटनेमुळे परिसरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Read More

मुंबई : वृत्तसंस्था भारत – पाकिस्तानात तणावाचे वातावरण असतांना आता अमरावतीच्या भाजपच्या माजी खासदार नवनीत राणा यांना पाकिस्तानातून जीवे मारण्याच्या धमकीचा काॅल आला आहे. या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. ‘हिंदू शेरनी हनुमान चालीसा पढ़ने वाली थोडे दिन की मेहमान.. जल्दी उडाने है वाले है’, अशा पद्धतीच्या नवनीत राणा यांना धमक्या आल्या आहेत. याप्रकरणी नवनीत राणा यांनी तातडीने पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली आहे. दरम्यान, धमक्या नेमक्या कोठून येत आहेत, याचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे. भाजप नेत्या नवनीत राणा यांना पाकिस्तानातील वेगवेगळ्या फोनवरून जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. या धमक्यांची पोलिसांनी गंभीर दखल घेत, तपास सुरू केला…

Read More

पुणे: वृत्तसंस्था राज्यातील विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून बारावीचा निकाल जाहीर केल्यानंतर विद्यार्थी आणि पालकांचे डोळे दहावीच्या निकालाकडे लागलेले आहेत. दहावीचा निकाल याच आठवड्यात जाहीर होणार असून, 13 ते 15 मेदरम्यान निकाल जाहीर होण्याची शक्यता असल्याची माहिती शिक्षण विभागातील अधिकार्‍यांनी दिली आहे. राज्य मंडळाने यंदा पहिल्यांदाच सीबीएसईचा दहावी-बारावीचा निकाल जाहीर होण्याअगोदरच बारावीचा निकाल जाहीर करण्याची किमया साधली आहे. राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी बारावीच्या निकालाच्या पत्रकार परिषदेतच दहावीचा निकाल यंदा 15 मेपूर्वीच जाहीर करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे. सोमवारी बुद्ध पौर्णिमा असल्यामुळे सार्वजनिक सुटी जाहीर केली आहे. त्यामुळे…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्काराचे व्हिडीओ आणि छायाचित्रे सोशल मीडियावर समोर आली असून, त्यामध्ये अनेक पाकिस्तानी लष्कर अधिकारी व कर्मचारी उपस्थित असल्याचे दिसून आले. रविवारी (दि. ११ मे) भारताने पाकिस्‍तानमधील पंजाब प्रांतातल्या दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित असणार्‍या पाकिस्तानी लष्करी व पोलिस अधिकाऱ्यांची नावे जाहीर केली. पाकिस्तान वारंवार दावा करत आला आहे की तो कोणत्याही प्रकारच्या दहशतवादाला आश्रय देत नाही, परंतु भारतीय सशस्त्र दलांनी प्रसिद्ध केलेल्या प्रतिमांनुसार, पाक लष्कराचे अनेक अधिकारी दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित होते. ७ मे रोजी ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारताने अचूक लक्ष्‍यभेद करत १०० हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केला. सोशल मीडियावर भारताच्‍या धडक कारवाईत ठार झालेल्‍या दहशतवाद्यांच्‍या अंत्यसंस्काराचे व्हिडीओ…

Read More

जळगाव : प्रतिनिधी प्रेमसंबंधाच्या वादातून मारहाण केल्याच्या रागातून आकाश पंडीत भावसार (वय २७, रा. अशोक नगर) या तरुणाची हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी अटक असलेल्या दोन अल्पवयीन मुलांसह तिघ संशयितांकडून कोयता, चॉपरसह गावठी पिस्तुल हस्तगत करण्यात आले आहे. घटनेच्या दिवशी संशयितांपैकी एकाने आकाशवर गोळी झाडली, मात्र ती अडकून पडल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले असून पोलिसांनी गावठी पिस्तुल देखील हस्तगत केले आहे. सविस्तर वृत्त असे कि, वारंवार पत्नीच्या संपर्कात असलेल्या अजय मोरे याला मयत आकाश भावसाने याने दोन ते तीन वेळा मारहाण केल्याचा राग अजयच्या मनात होता. खूनाच्या दिवशी रात्रीच्या सुमारास संशयित अजय मोरे, चेतन सोनार व कुणाल उर्फ सोनू चौधरी…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था पहलगाम हल्ल्यानंतर भारताने एअर स्ट्राईक करत पाकिस्तानला हादरला दिला. त्यानंतर पाकिस्तानकडून सीमारेषेवर कारवाया सुरू झाली. यावेळी झालेल्या गोळीबारात जम्मू काश्मीर सीमारेषेवर तैनात बीएएसएफ जवान मोहम्मद इम्तियाज शहीद झाले आहेत. रविवार (11 मे) रोजी जम्मूतील फ्रंटियर मुख्यालयात त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येणार आहे. पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या गोळीबारात आतापर्यंत पाच जवानांना वीरमरण आले आहे. जम्मू सीमा सुरक्षा दलाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. ‘आम्ही 10 मे 2025 रोजी आर एस पुरा क्षेत्रातील, जिल्हा जम्मू येथे अंतराष्ट्रीय सीमारेषेवर क्रॉस बॉर्डर फायरिंगमध्ये बीएसएफचे बहादुर सब इंस्पेक्टर मोहम्मद इम्तियाज यांना वीरगती प्राप्त झाली. देशसेवेच्या रक्षणात मोहम्मद इम्तियाज यांनी…

Read More

जामनेर : प्रतिनिधी फर्दापूर तांडा (ता. सोयगाव) येथील चव्हाण परिवार वन्हाडींना घेऊन घरी परतत असताना शनिवारी, ११ मे रोजी संध्याकाळी पाच वाजता पहूर-जामनेर मार्गावर सोनाळा फाट्याजवळ भीषण अपघात घडला. या अपघातात ६५ वर्षीय दशरथ रतन चव्हाण जागीच ठार झाले, तर अकरा जण जखमी झाले. जखमींमध्ये सात वर्षीय कार्तिक राठोडचाही समावेश आहे. सविस्तर वृत्त असे कि, फर्दापूर तांडा येथील रमेश चव्हाण यांच्या मुलाच्या विवाहासाठी चव्हाण परिवार लहासर येथील रामपूर तांड्यावर गेले होते. विवाह आटोपल्यानंतर ते चारचाकीने (क्र. एमएच ०८ आर ३५२४) घराकडे परतत होते. सोनाळा फाट्याजवळ समोरून भरधाव येणाऱ्या कंटेनरने (क्र. जीजे १५ एक्स १४२५) त्यांच्या कारला धडक दिली. हे वाहन…

Read More

जळगाव : प्रतिनिधी बनावट कागदपत्रांच्या आधारे १४ लाख ४३ हजार रुपयांचे कर्ज घेतले तर दुसऱ्या एका प्रकरणात १७ लाख १९ हजार रुपयांच्या कर्जासाठी गहाण ठेवलेली जागा कर्जदाराने परस्पर विक्री केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकारातून वित्त पुरवठा करणाऱ्या संस्थेची ३१ लाख ६२ हजार रुपयांत फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी सहा जणांविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला. मिळालेल्या माहितीनुसार, फेडरल बँकेशी संलग्न फेडबँक फायनान्सियल सर्व्हिसेस या वित्त पुरवठा करणाऱ्या संस्थेच्या जळगाव कार्यालयात खडगाव, ता. जामनेर येथील योगेश भाऊराव गवांदे व भाग्यश्री भाऊराव गवांदे यांनी मालमत्ता गहाण ठेवून ८ जून २०२२ रोजी १४ लाख ४३ हजार रुपये कर्ज घेतले. ७ जून २०२३…

Read More