नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलांनी पुन्हा एकदा दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी ऑपरेशन सुरू केले आहे. जम्मू-काश्मीरमध्ये ‘लश्कर’च्या ३ दहशतवाद्यांचा खात्मा; सुरक्षा दलांना मोठं यश दरम्यान, मंगळवारी सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे. जम्मू-काश्मीरमधील शोपियानमध्ये सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांना घेरले आहे. सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये जोरदार चकमक सुरू आहे ज्यामध्ये लष्कर-ए-तोयबाचे ३ दहशतवादी मारले गेले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, जम्मू-काश्मीरमधील शोपियान येथील केलर वनक्षेत्रात घेराव आणि शोध मोहिमेदरम्यान सुरक्षा दलांना गोळीबाराचा आवाज ऐकू आला. यानंतर, परिसराची घेराबंदी कडक करण्यात आली आणि परिसरात अधिक सुरक्षा दल पाठवण्यात आले. परिसरात २ ते ३ दहशतवादी घेरले असल्याची बातमी आली. वृत्तानुसार, तो दहशतवाद्यांचा टॉप कमांडर…
Author: editor desk
अमृतसर : वृत्तसंस्था पंजाबमधील अमृतसरमध्ये विषारी दारू पिऊन १५ जणांचा मृत्यू झाला. तर ६ जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. ज्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी मजीठा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, पुढील तपास सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘हे’ संपूर्ण प्रकरण अमृतसरमधील मढई गाव आणि मजिठा येथील भागली गावाचे आहे. ही घटना सोमवारी (१२ मे) रात्री घडल्याचे सांगितले जात आहे. सध्या पोलीस पथक त्या दारूचा स्रोत शोधत आहेत. प्राथमिक तपासात असे समोर आले आहे की, रविवारी (११ मे) संध्याकाळी ही दारू एका ठिकाणाहून खरेदी करण्यात आली होती. त्यातील काही व्यक्तींचा मृत्यू सोमवारी सकाळीच झाला…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे तर यंदा उशीर न होता वेळेत मान्सूनची एन्ट्री होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आधीच तयारी करून ठेवणे गरजेचे असल्याचे मत जेष्ठ हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी व्यक्त केले आहे. सोबतच राज्यात अवकाळी पावसाबाबत शेतकऱ्यांना सतर्क करत महत्वाच्या सूचना देखील केल्या आहेत. राज्यात 12 मे ते 20 मे दरम्यान टप्प्याटप्प्याने मान्सूनपूर्व पावसाचे आगमन होणार आहे. हा पाऊस अगदी पावसाळ्यासारखा मुसळधार असेल. 12 मे रोजी अंदमान-निकोबार बेटांवर मान्सूनचे आगमन होईल. यावर्षी मान्सून साधारणतः 8 ते 10 दिवस लवकर दाखल होत आहे. 19 मे पर्यंत तो बेटांवर स्थिर राहील आणि 21 मे नंतर महाराष्ट्रात मान्सून सक्रिय होण्याची शक्यता आहे. 12 मे पासून अवकाळी…
पुणे : वृत्तसंस्था महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेला इयत्ता दहावीचा निकाल जाहीर झाला आहे. यंदा राज्याचा दहावीचा निकाल ९४.१० टक्के इतका लागला आहे. बारावीप्रमाणे दहावीच्या निकालातही मुलींनीच बाजी मारली आहे. तसेच दरवर्षीप्रमाणे यंदाही कोकणाचा निकाल सर्वाधिक लागला आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेत महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दहावीच्या निकालाची वैशिष्ट्ये सांगितली आहेत. यंदा दहावीसाठी १५ लाख ४६ हजार ५७९ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी १४ लाख ५५ हजार ४७७ विद्यार्थी पास झाले. यंदाच्या दहावीच्या विद्यार्थ्यांच्या…
अमरावती : वृत्तसंस्था भारत – पाकिस्तानमध्ये तणाव सुरु असतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांशी सवांद साधल्यानंतर राजकीय क्षेत्रातून प्रतिक्रिया येत असतांना आता प्रहारचे सर्वेसर्वा बच्चू कडू यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. नेहमी-नेहमी पाकिस्तानचे वार सुरू असतात. पाकिस्तानच नेहमीचं दुखणं बंद केलं पाहिजे. जसा इंदिरा गांधी यांनी बांगलादेश वेगळा काढला, तसाच पाकिस्तान भारतात घ्यावा. त्यासाठी जर सैनिक कमी पडत असतील तर प्रहारचा कार्यकर्ता आणि हा बच्चू कडू तयार असल्याचे प्रहारचे सर्वेसर्वा बच्चू कडू म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यांची जोरदार चर्चा रंगली आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर ऑपरेशन सिंदूर रावबत भारताने दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिले. भारताने केलेल्या या कारवाईविरोधात पाकिस्तानने ड्रोन, क्षेपणास्त्र डागून कुरापती…
जळगाव : प्रतिनिधी राज्यात आपलेच सरकार असल्याने कुठूनही कामे करता येतील. मात्र, काही जण नाशिकच्या पालकमंत्रिपदासाठी लाचारी पत्करत असल्याचा टोला माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी मंत्री गिरीश महाजन यांचे नाव घेता लगावला. अनेक महिन्यांपासून नाशिकला पालकमंत्रिपदाचा तिढा कायम आहे. नाशिकची धुरा कोणाकडे जाणार याबाबत अद्यापही निर्णय झालेला नाही. सध्या मला पालकमंत्री करा, अशी मागणी करत लाचारी पत्करण्याचे काम काही जणांकडून होत आहे. मात्र, कशाला हवे पालकमंत्रिपद जिथे दिले तिथे काम करावे. संपूर्ण राज्यात आपलीच सत्ता आहे, अशी पुष्टी खडसे यांनी यावेळी जोडली. तसेच काहींनी विशेष कारणासाठी पालकमंत्रिपदासाठी आग्रही भूमिका मांडल्याचा आरोपही केला. कुंभमेळ्याची अनेक कामे रखडलेली आहेत. मुळात पालकमंत्री असेल…
जळगाव : प्रतिनिधी आमच्या दुकानावर येणारे ग्राहक तुम्ही वळविल्याचे म्हणत नवीद अकिल खाटीक यांच्या डोक्यात एक किलोचे माप शेजारील दुकानदाराने मारले. ही घटना १० मे रोजी कासमवाडी परिसरात घडली. मिळालेल्या माहितीनुसार, नवीद खाटीक यांचे कासमवाडी परिसरात दुकान आहे. त्यांच्या शेजारील दुकानदार त्यांच्याकडे आला व तुम्ही आमचे ग्राहक तुमच्याकडे वळविले आहे. तुम्हाला जास्त झाली आहे, असे म्हणत एक किलो वजनाचे माप डोक्यात मारले. यात त्यांच्या डोक्याला दुखापत झाली. तसेच तेथे आणखी एक जण आला व त्याने नवीद व त्यांच्या वडिलांना शिवीगाळ केली. या घटनेबाबत खाटीक यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा…
भुसावळ : प्रतिनिधी गाडी क्रमांक ११११९ इगतपुरी-भुसावळ मेमू या गाडीमध्ये १० मे रोजी संध्याकाळी सात वाजेच्यापूर्वी ४० ते ४५ वर्षाचा अनोळखी प्रौढ बेशुद्ध अवस्थेत आढळून आला होता. त्यास उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय ट्रामा केअर सेंटर येथे दाखल करण्यात आले होते. तपासणी केली असता वैद्यकीय अधिकारी डॉ. उमेश मुकुंद यांनी त्यास मृत्यू घोषित केले. याप्रकरणी कलम १९४ बीएनएसएस प्रमाणे लोहमार्ग पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास हवालदार कोंडवे करीत आहे. मयत व्यक्तीच्या अंगात आकाशी निळा रंगाचा फुलबाह्यांचा शर्ट व काळ्या रंगाची हाफ पॅन्ट आहे. अनोळखीची ओळख पटवण्याचे आवाहन लोहमार्ग पोलिसांकडून करण्यात आले आहे.
नागपूर : वृत्तसंस्था फिरायला जात आहोत, असे सांगून नागपूर येथून कुही फाट्यालगत गिट्टी खदानच्या खोल खड्यात पाच जणांना जलसमाधी मिळाली. मृतकांमध्ये धुळ्याच्या एकाच कुटुंबातील आई व तिच्या दोन लेकरांचा समावेश आहे. धुळ्यातील ही मंडळी माहेरी गृहप्रवेशाच्या कार्यक्रमासाठी आली होती. सविस्तर वृत्त असे कि, रज्जु उर्फ रंजना सूर्यकांत राऊत (२२, नागपूर), रोशनी चंद्रकांत चौधरी (३२), मोहीत चंद्रकांत चौधरी (१०), लक्ष्मी चंद्रकांत चौधरी (८, तिघेही रा. लक्ष्मी नगर धुळे) व एहतेशाम मुक्तार अन्सारी (२०, नागपूर) यांचा मृतांत समावेश आहे. पाचही जण याठिकाणी पोहताना ही घटना घडली असावी, असा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटनेची माहिती चौधरी कुटुंबियांना सोमवारी दुपारी…
मेष राशी श्रीगणेश म्हणतात की, आज एखादे महत्त्वाचे काम वेळेवर पूर्ण झाल्यामुळे मनःशांती लाभेल. स्व:विकासाचा विचार करणे गरजेचे आहे. कार्यक्षेत्राशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते. कामाच्या धावपळीतही कुटुंबाला प्राधान्य दिल्याने घरगुती वातावरण मधुर राहील. वृषभ राशी श्रीगणेश सांगतात की, आजचा दिवस तुमच्यासाठी थोडा आव्हानात्मक आहे. मात्र तुम्ही प्रत्येक परिस्थितीवर मात करू शकता. महिलांसाठी वेळ अनुकूल आहे. प्रापर्टी वाटपावरून निर्माण झालेला वाद परस्पर सहमतीने किंवा तडजोडीने सुटेल. कार्यक्षेत्रात मेहनतीचे सकारात्मक फळ मिळू शकते. घरात धार्मिक कार्यक्रमाचे नियोजन होईल. मिथुन राशी आजचा दिवस तुमच्यासाठी यशदायक आहे. लाभाच्या घटनांमुळे मनात नवा उत्साह व ऊर्जा निर्माण होईल. गेले काही दिवस चालू असलेल्या चिंता…

