Author: editor desk

धरणगाव : प्रतिनिधी शहरातील लहान माळीवाडा परिसरात राहणाऱ्या ४१ वर्षीय व्यक्तीने राहत्या घरातील मागच्या खोलीत पंख्याला बेडसिट बांधून गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी समोर आली. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. राजेंद्र भगवान महाजन वय ४१ रा. लहान माळीवाडा, धरणगाव असे मयत प्रौढाचे नाव आहे. सविस्तर वृत्त असे कि, धरणगाव शहरातील लहान माळीवाडा परिसरात राजेंद्र महाजन हे प्रौढ व्यक्ती आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहेत. मंगळवारी १३ मे रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घरात कुणीही नसतांना त्यांनी राहत्या घराच्या मागील घरात पंख्याला गळफास घेवून आत्महत्या केली. आत्महत्या करण्याचे कारण समोर आलेले नाही. या घटनेची माहिती समोर आल्यानंतर नातेवाईकांनी…

Read More

जळगाव : प्रतिनिधी तालुक्यातील एका गावातून एका तरुणासोबत अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे. तरुणाचे आठ दिवसांवर लग्न आले असताना त्याने आपले आयुष्य संपवल्याची घटना घडली आहे. बोहल्यावर चढण्याआधीच नवरदेवाने टोकाचे पाऊल उचलले आहे. सोमवारी रात्री तरुणाने कुटुंबासोबत जेवण केले. त्यानंतर तो शेतात गेला, मात्र घरी परतलाच नाही. त्यानंतर शेतात झाडाला गळफास घेऊन त्याने आत्महत्या केल्याचे समोर आले. मिळालेल्या माहितीनुसार, लग्न घरात लग्नाची धामधूम सुरु होती. पाहुणे मंडळींना पत्रिका वाटप सुरु होते. आठवडाभरात लग्न आल्याने घरात तयारी आणि आनंदाचे वातावरण होते असे असताना उपवर अमोल वाल्मीक पाटील (वय 21, रा. वाकडी, ता. जळगाव) या तरुणाने शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना…

Read More

शिर्डी : वृत्तसंस्था देशविदेशातून शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनासाठी लाखो साईभक्त शिर्डीत येत असतात. अनेक भाविक मोठ्या श्रद्धेने श्री साईबाबांच्या चरणी विविध प्रकारचे दान अर्पण करतात. देणगीदार साईभक्तांच्या सेवा-सुविधांमध्ये वाढ करण्यासाठी सुधारित देणगी धोरणास नुकतीच तदर्थ समितीची मान्यता मिळाल्याची माहिती श्री साईबाबा संस्थानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर यांनी दिली. या निर्णयानुसार श्री साईबाबा संस्थानामार्फत साजरे होणारे प्रमुख चार उत्सव सोडून देणगीदार साईभक्तांना त्यांच्या देणगीच्या श्रेणीनुसार विविध प्रकारच्या सेवा-सुविधा- विशेषतः दर्शन-आरती सुविधा, बहुमान म्हणून शाल व फोटो, साईचरित्र, उदी-लाडू प्रसाद, भोजन पास इत्यादी दिले जाणार आहे. या धोरणामुळे साईभक्तांना अधिक चांगल्या प्रकारे सुविधा देण्याचा संस्थानाचा प्रयत्न आहे, असे गाडिलकर यांनी सांगितले.…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था नुकताच दहावीच्या निकाल जाहीर झाला आहे तर आता राज्यातील महायुती सरकारने अनेक महत्वाचे निर्णय घेतले आहे. त्यातील प्रत्येक शाळेसाठी देखील एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. बदलापूर येथील खासगी शाळेत दोन बालकांवर झालेल्या अमानुष अत्याचाराच्या घटनेनंतर राज्य शासनाने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी कडक उपाययोजना लागू केल्या आहेत. आता राज्यातील सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे, सुरक्षा रक्षकांची नियुक्ती, आणि तक्रार पेटी उपलब्ध करून देणे बंधनकारक करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी थेट शाळा व्यवस्थापनावर टाकण्यात आली आहे. शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने यासंबंधीचा शासन निर्णय (जीआर) मंगळवारी जारी केला. याअंतर्गत प्रत्येक शाळेत विद्यार्थी सुरक्षित राहावेत यासाठी ठोस उपाययोजना अंमलात आणण्याचे निर्देश…

Read More

पाचोरा : प्रतिनिधी बालपणीच वडील मयत झाले. अवघ्या दहा महिन्यांपूर्वी आईचे दीर्घ आजाराने निधन झाले. असे आघात सहन करणाऱ्या येथील तरुणाचाही ११ रोजी अपघाती मृत्यू झाला. काळाचे हे क्रूर आघात येथील चौधरी (माळी) कुटुंबावर झाले. सविस्तर वृत्त असे कि, दि.११ रोजी झालेल्या अपघातात मयत झालेल्या २५ वर्षीय तरुणाचे नाव अजय सुरेश चौधरी (माळी) असे आहे. आई आजारी होती म्हणून नोकरीला जाता आले नाही. तिची अजयने मनापासून सेवा केली. वडिलांच्या निधनानंतर अजय हा आईसोबत मामा श्रीकृष्ण भिवसने व दगडू भिवसने यांच्या छत्रछायेखाली वाढला. बारावीनंतर आयटीआय इलेक्ट्रिकल डिप्लोमा केलेला अजय चौधरी व गणेश गीते हे दोघे मित्र ११ मे रविवारी नाचनखेडा येथून…

Read More

जळगाव : प्रतिनिधी शिरसोली रोडवर दुचाकीवरून पडून गंभीर जखमी झालेल्या विनोद गोविंदा हटकर (३५, रा. शिरसोली, ता. जळगाव) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सविस्तर वृत्त असे कि, जळगावकडून शिरसोलीकडे विनोद हटकर हे दि. २ मे रोजी जात असताना इकरा युनानी महाविद्यालयाजवळ त्यांची दुचाकी घसरून अपघात झाला होता. यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोकों समाधान टहाकळे करीत आहेत.

Read More

चाळीसगाव : प्रतिनिधी सोशल मीडियावर ‘शांताबाई’ या नावाने बनावट अकाऊंट तयार करून चाळीसगावातील प्रतिष्ठित व्यक्तींच्या नावाने बदनामी करणाऱ्या ‘शांताबाई’ फेम तरुणाला अखेर नाशिक येथील सायबर क्राइम ब्रँचच्या पथकाने शहर पोलिसांच्या मदतीने सोमवारी रात्री ताब्यात घेतले आहे. या कारवाईने तालुक्यात एकच खळबळ उडाली असून ही व्यक्ती कोण ? त्याला पाहण्यासाठी शहर पोलिसांत गर्दी उसळली होती. या तरुणाचे नाव रणजितकुमार सुदेशकुमार दराडे (३२, रा. गवळीवाडा, नेताजी चौक, चाळीसगाव) असे आहे. सविस्तर वृत्त असे कि, गेल्या एक-दीड वर्षापासून फेसबुक या सोशल मीडियावर ‘शांताबाई’ या नावाने अकाउंटद्वारे दररोज एक-दोन व्यक्तींवर चिखलफेक करून बदनामी केली जात होती. त्यामुळे ‘शांताबाई’ आज कोणावर तोफ डागणार याकडे सबंध…

Read More

मेष राशी श्रीगणेश म्‍हणतात की, आज तुमचे लक्ष आर्थिक बाबींवर राहील. सध्या ग्रहांची स्थिती अनुकूल आहे. जवळच्या मित्रांचा आणि नातेवाईकांचे सहकार्य मिळेल. घरी काही चांगल्या कामाचे नियोजन होऊ शकते. कोणत्याही अनोळखी व्यक्तीच्या बोलण्याला बळी पडू नका. वैयक्तिक कामे तसेच कुटुंबाच्‍या व्यवस्थेकडे लक्ष द्‍या. व्यवसायाच्या ठिकाणी तुमची उपस्थिती आवश्यक आहे. वृषभ राशी श्रीगणेश सांगतात, आज तुमची अध्यात्म आणि धार्मिक कार्यात रुची वाढेल. व्यक्तिमत्त्वामध्ये सकारात्मक बदल जाणवेल.कला आणि क्षमता इतरांसमोर सादर करण्याची संधी मिळू शकते. मुलांच्या सकारात्मक कार्यामुळे मन प्रसन्न राहील. जवळच्या मित्रांशी आणि नातेवाईकांशी संबंध बिघडू नयेत, याची काळजी घ्या. मिथुन राशी कोणत्याही कामात हृदयाऐवजी मनाचा आवाज ऐका. तुम्हाला नवीन शक्यता…

Read More

अमळनेर : प्रतिनिधी तालुक्यातील अमळनेर-धुळे रस्त्यावर लोंढवे फाट्यापासून काही अंतरावर अज्ञात वाहनाने कट मारल्याने झालेल्या अपघातात वडिलांच्या व्यवसायात हातभार लावून ‛भाग्यश्री’ ठरलेल्या कन्येचा मृत्यू झाला. हा दुर्दैवी घटना १२ रोजी रात्री साडे आठ वाजता घडली. सविस्तर वृत्त असे कि, अमळनेर तालुक्यातील जानवे येथील भाग्यश्री दीपक पाटील ही तरुणी आपल्या वडिलांच्या दुग्ध व्यवसायात हातभार लावण्यासाठी मोटरसायकलला दुधाचे कॅन बांधून एकटी जानव्याहून कधी धुळे तर कधी अमळनेर येत असे. तिला  रात्रीचीही कधी भीती वाटली नाही. धाडसी कन्या भाग्यश्रीमुळे दीपक पाटील याने व्यवसायात वृद्धी केली होती.  दीड महिन्यापूर्वीच मोटरसायकल घसरून तिच्या वडिलांचा अपघात झाला होता. डॉक्टरांनी त्यांना मोटरसायकल चालवायला बंदी घातली होती. नेहमीप्रमाणे…

Read More

जळगाव : प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यात वाढत्या चोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर, एमआयडीसी पोलिसांनी संघटीत गुन्हेगारीत सक्रिय असलेल्या घरफोडीच्या दोन आरोपींना जेरबंद केले आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून चोरी केलेला १ लाख ८५ हजार रुपये किमतीचा तांब्याचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलिस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या गुन्हे शोध पथकाने ही कारवाई केली. मिळालेल्या माहितीनुसार, जगवानीनगर गेटसमोर असलेल्या एका दुकानाचे शटर उचकावून आणि चैनल गेट तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला होता. त्यांनी दुकानातून सुमारे ३५० किलो वजनाचे ६५ हजार रुपये किमतीचे जुने तांबे आणि १५० किलो…

Read More