मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील अनेक नागरिक आज देखील सरकारचे रेशन घेवून आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करीत असून यात आता बोगस रेशनकार्ड धारकांना मोठा दणका बसला आहे. राज्यातील १८ लाख रेशन कार्ड रद्द झाले. राज्यात सध्या रेशनकार्ड ई-केवायसी मोहिम राबवण्यात येत आहे. या मोहिमेमुळे सरकारच्या अन्नधान्यावर डल्ला मरणाऱ्यांना चपराक बसली आहे. भरगोस पगार, सरकारी नोकरदार, व्यापारी, व्यावसायिक, श्रीमंतांची नावे या मोहिमेमुळे रद्दबातल होत आहे. तर बांग्लादेशी नागरिकांचे पण धाबे दणाणले आहे. तसेचआधार कार्ड सहाय्याने ई-केवायसी मोहिम राबवण्यात येत आहे. त्यात अनेक बोगस रेशनकार्डधारक समोर आले आहेत. त्यांची नोंदणी रद्द करण्यात आली आहे. त्यांचे रेशनकार्ड रद्द करण्यात आले आहे. आता या मोहिमेत अजून मोठ्या…
Author: editor desk
बीड : वृत्तसंस्था राज्यातील अनेक ठिकाणी अपघाताच्या घटना घडत असतना आता दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात कार पलटी होऊन झालेल्या भीषण अपघातात 3 जण ठार झाले. तर 4 जण गंभीर जखमी झाले. ही घटना आज (दि.१४) दुपारी अंबाजोगाई – आडस रोडवरील उमराई पाटी नजीक घडली. मिळालेल्या माहितीनुसार, माजलगाव तालुक्यातील पाथरूड येथून (एम एच 05 सी व्ही 9186) या कारमधून अंबाजोगाईकडे एका विवाह समारंभास उपस्थित राहण्यासाठी एक कुटुंब जात होते. आडस अंबाजोगाई रोडवरील उमराई पाटील नजीक असलेल्या दत्त मंदिरासमोर एक दुचाकीस्वार अचानक आडवा आला. या दुचाकीस्वारास वाचवण्याच्या प्रयत्नात चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि कार जागीच पलटी झाली. यात शौकत अहमद शेख (वय ४६)…
चाळीसगाव : प्रतिनिधी ‘शांताबाई’ या नावाने बनावट अकाउंट तयार करून चाळीसगावातील प्रतिष्ठित व्यक्तींच्या नावाने बदनामी करणाऱ्या ‘शांताबाई’ फेम रणजीतकुमार दराडे तरुणाला अखेर नाशिक येथील पथकाने नुकतेच ताब्यात घेतले आहे. त्याला रसद पुरविणारे आता पोलिसांच्या रडारवर आहेत. गेल्या एक-दीड वर्षापासून फेसबुक या सोशल मीडियावर ‘शांताबाई’ या नावाने अकाउंटद्वारे दररोज एक-दोन व्यक्तींवर चिखलफेक करून बदनामी केली जात होती. दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष कैलास सूर्यवंशी यांनी नाशिक येथील सायबर क्राइम ब्रँच यांच्याकडे तक्रार केली होती. त्या अनुषंगाने तपासाअंती पोलिसांनी दराडे याला ताब्यात घेतले. त्याला माहिती, छायाचित्रे, व्हिडीओ पुरविणारे आणि त्यावर प्रतिक्रिया देणारे कोण? याबाबत पोलिसांकडून चौकशी होत आहे. या…
जळगाव : प्रतिनिधी घरी जेवण झाल्यानंतर बाहेर जाऊन विष प्राशन करीत योगेश लीलाधर वाघोदे (३२, रा. आयोध्यानगर) या तरुणाने आत्महत्या केली. विषप्राशन करून आल्यानंतर हा तरुण आईजवळ येऊन बसला व त्यानंतर त्याला उलट्या झाल्या अन् तो गतप्राण झाला. सविस्तर वृत्त असे कि, एका कंपनीत कामाला असलेला योगेश वाघोदे हा तरुण आई, पत्नी व मुलासह आयोध्यानगरमध्ये राहत होता. सहा महिन्यांपासून त्याची पत्नी मुलासह माहेरी गेलेली आहे. मंगळवारी या तरुणाने आईसोबत जेवण केले व नंतर तो बाहेर गेला. काही वेळाने तो घरी आला व दारात बसलेल्या आईजवळ बसला. त्याला उलट्या होऊ लागल्याने आईने इतरांच्या मदतीने त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल…
रावेर : प्रतिनिधी पशुधनाची हत्या केल्याप्रकरणी पती- पत्नीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नजमाबी मोहम्मद हुसेन भतीयारा (३७) व तिचा पती मोहम्मद हुसेन मोहंमद अहमद (५१) अशी गुन्हा दाखल झालेल्या पती-पत्नीची नावे आहेत. सविस्तर वृत्त असे कि, शहरातील कुरेशी मोहल्ल्यात एक दाम्पत्य अवैध मांस विक्री करत असल्याची माहिती रावेरचे पोलिस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने बुधवारी पहाटे धाड टाकली. त्यावेळी या दाम्पत्यास पकडण्यात आले. त्यांच्याकडून काही साहित्यही जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणातील तिसरा एकजण पसार झाला आहे. सरकारतर्फे पोकॉ. सचिन घुगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रावेर पोलिसांत वरील दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रावेरचे…
अमळनेर : प्रतिनिधी गुजरात राज्यातील पोस्कोचा गुन्हा दाखल असलेल्या एका आरोपीने अमळनेर बसस्थानकाजवळील लॉजमध्ये गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना १३ रोजी सायंकाळी उघडकीस आली. विशेष म्हणजे आत्महत्येपूर्वी त्याने आपल्या प्रेयसीशी व्हिडीओ कॉल करुन मी आता ‘ऑपरेशन मौत’ जवळ पोहोचल्याचे तिला सांगितले. सविस्तर वृत्त असे कि, सौरभ शर्मा (रा. अहमदाबाद) असे आत्महत्या केलेल्या आरोपीचे नाव आहे. गेल्या पाच ते सहा दिवसापासून त्याने अमळनेर येथील पाठक प्लाझामध्ये करणसिंग एम.पी. या नावाने लॉजमध्ये रुम बूक केली होती. घटनेच्या आदल्या रात्री सौरभने लॉजमधील कर्मचा-यांना मला सकाळी उशिरा उठवा, असा निरोप दिला होता. १३ रोजी दुपारी लॉजचे कर्मचारी त्याला उठवायला गेले तेव्हा त्याने आवाज दिला…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील दूध फेडरेशन रोडवर एका धार्मिक स्थळाच्या बाहेर मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास एका भरधाव चार चाकीमध्ये गोळीबार होऊन एका 25 वर्षीय तरुणाच्या पाठीत उजव्या बाजूस शरीरास घुसली असून तो जखमी झाला आहे. याप्रकरणी जळगाव शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, नाजीम फिरोज पटेल ( वय २५) हा तरुण शेप बनवण्याचा व्यवसाय करीत असून धरणगाव तालुक्यातील पाळधी येथे आई-वडील दोन भाऊ यांच्यासह वास्तव्यास आहे. दिनांक 14 मे रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास नाझीम पटेल हे आपले मामा बबलू पटेल व मित्र तो हित देशपांडे अल्ताफ शेख यांच्यासह चार चाकी क्रमांक MH.19.Q.7514 याने…
मेष राशी मेष राशीच्या व्यक्तींचा आजचा दिवस फारच आनंदी असेल. कुटुंबासोबत मधुर संबंध राहतील. तुमच्या पत्नीचा किंवा पतीचा पूर्ण पाठिंबा मिळेल. सामाजिक कार्यात रुची वाढेल. मित्रांसोबत चांगला वेळ जाईल. व्यवसायात भागीदारी फायदेशीर ठरू शकते. वृषभ राशी वृषभ राशीच्या व्यक्तींचा आत्मविश्वास प्रचंड वाढलेला असेल. आर्थिकदृष्ट्या फायदा होईल. पर्यटनाशी संबंधित लोकांना लाभ होईल. कुटुंबात सुख-शांती नांदेल. कामात मन रमेल आणि अधिकाऱ्यांकडून प्रशंसा मिळेल. मिथुन राशी मिथुन राशीच्या व्यक्तींनी आजचा दिवस संमिश्र जाईल. मित्रांच्या मदतीने कामात यश मिळेल. आरोग्याची काळजी घ्या. धैर्याने निर्णय घेतल्यास नवीन संधी मिळतील. व्यवसायात मोठे यश मिळेल. कर्क राशी कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फारच व्यस्त असणार असेल. आज…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था गेल्या काही दिवसापासून भारत – पाकिस्तानचे वातावरण तापले असतांना चुकून पाकिस्तानच्या सीमेत गेलेले सीमा सुरक्षा दलाचे (BSF) जवान कॉन्स्टेबल पी के साहू अखेर 20 दिवसांनी सुखरूप भारतात परतले आहेत. आज सकाळी 10:30 वाजता अटारी-वाघा सीमेवरून पाक रेंजर्सने त्यांना भारतीय अधिकाऱ्यांच्या ताब्यात दिले. बीएसएफच्या निवेदनानुसार, 23 एप्रिल 2025 रोजी सकाळी 11:50 वाजता, पंजाबमधील फिरोजपूर सेक्टरमध्ये ऑपरेशनल ड्युटीवर असताना कॉन्स्टेबल पी के साहू चुकून पाकिस्तानच्या हद्दीत गेले होते. त्यानंतर पाकिस्तानी रेंजर्सने त्यांना ताब्यात घेतले. या घटनेमुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील राजनैतिक संवाद पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला. अखेर दोन्ही देशांमध्ये संवादाच्या माध्यमातून कॉन्स्टेबल पी के साहू यांना सुरक्षित…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शस्त्रीसंधीनंतर सीमा भागामध्ये सध्या शांततेचे वातावरण आहे. मात्र यादरम्यान पाकिस्तानाला चीनचे समर्थन केले आहे. यानंतर आता चीन देखील आपल्या कुरपती सुरुच ठेवल्या आहेत. चीनकडून एक नकाशा प्रसिद्ध करण्यात आला असून चीनने अरुणाचल प्रदेशवर आपला दावा सांगितला.तसेच येथील काही जागांची नावं बदलली आहेत. चीनच्या या कृतीनंतर भारताकडून तातडीने प्रत्युत्तर देण्यात आले आहे. नावं बदलली तरी वास्तव बदलणार नाही असं म्हणत चीनकडून अरुणाचल प्रदेशमधील काही ठिकाणांची नावं बदलली जाताच, भारताने परराष्ट्र मंत्रालयाने खडसावले आहे. “अरुणाचल प्रदेशातील ठिकाणांची नावे बदलण्याचा चीनने केलेला प्रयत्न व्यर्थ आणि हास्यास्पद आहे. आम्ही आमच्या तत्वनिष्ठ भूमिकेनुसार असे प्रयत्न धुडकावून लावतो.…

