Author: editor desk

नवी दिल्ली : वृत्तसंस्था छत्तीसगडमधील नारायणपूर जिल्ह्यात आज सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले. या चकमकीदरम्यान, सुरक्षा दलांनी २७ नक्षलवाद्यांना ठार केले आहे.  ज्यामध्ये वसवराजूचा समावेश होता, ज्याच्यावर १ कोटी रुपयांचे बक्षीस होते. या चकमकीत एक जवान देखील शहीद झाला तर एक जखमी झाला असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अबुझमद परिसरात सकाळी सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली.”  नारायणपूर जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक प्रभात कुमार म्हणाले की, जिल्ह्यातील अबुझमद भागातील माड विभागात नक्षलवाद्यांच्या उपस्थितीच्या माहितीच्या आधारे, जिल्हा राखीव रक्षक (डीआरजी) नारायणपूर, डीआरजी दंतेवाडा, डीआरजी बिजापूर आणि डीआरजी कोंडागाव यांचे संयुक्त पथक…

Read More

पुणे : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारने शेतकऱ्यांचे हितासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. जमिनीची हिस्सेवाटप मोजणी आता केवळ 200 रुपयात होणार आहे, अशी माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. या निर्णयामुळे शेतीची तसेच जमिनीची मोजणी आणि हिस्सेवाटप आता कमी खर्चात होणार आहे. अवघ्या 200 जमिनीची हिस्सेवाटप मोजणी होणार आहे. महाराष्ट्र सरकारने मोजणी शुल्कात मोठी कपात केली आहे. 200 रुपये शुल्क भरून एकत्र कुटुंबाच्या जमिनीचे नोंदणीकृत वाटणीपत्र आणि नकाशे देण्याचा महत्त्वाचा निर्णय महसूल मंत्र्यांनी घेतला आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. शेतकऱ्यांवर आर्थिक भार पडू नये हाच या निर्णयामागचा उद्देश असल्याचे बावनकुळे यांनी म्हटले आहे. यापूर्वी हिस्सेमोजणी शुल्क जवळपास एक…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुती व महाविकास आघाडीत आरोप प्रत्यारोप सुरु असतांना आता सर्वोच्च न्यायालयाने आगामी चार महिन्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या आणि पक्ष संघटनात्मक बदल करण्यासाठी अॅड. आंबेडकर हे लातूरमध्ये दाखल झाले होते. त्यांनी लातूरच्या दयानंद सभागृहात पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या. यावेळी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार हे लवकरच भाजपमय होतील, असा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात वेगळ्याच हालचाली सुरु झाल्या आहेत. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षात शरद पवार गट सामील होईल असेच काहीसे चित्र आहे. त्यामुळे लवकरच शरद पवार देखील भाजपमय होतील, असं प्रकाश…

Read More

धरणगाव : प्रतिनिधी तालुक्यातील चमगाव येथील धनराज योगराज सावंत (वय ४९) यांनी चमगाव शिवारातील स्वतःच्या शेतात कांदा चाळीजवळ विषारी कीटकनाशक औषध सेवन केल्याने १९ मे रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास त्यांना जळगाव येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता विभागात दाखल केले होते. उपचार सुरू असताना रात्री त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, सून, जावई असा परिवार आहे. त्यांच्या शेतात पीक न आल्याने त्यांनी विष प्राशन केल्याचे समजते. याबाबत धरणगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Read More

जळगाव : प्रतिनिधी शहरातील नेहमीच गजबजलेल्या टॉवर चौकात पुन्हा एकदा चोरट्यांनी आपला हात साफ केला आहे. शनिवारी सायंकाळी ५.१५ वाजता बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेत एका ५२ वर्षीय महिलेच्या हातातील पर्स अज्ञात चोरट्याने लंपास केली. पर्समध्ये असलेल्या सोन्याच्या दागिन्यांचा १४ हजारांचा ऐवज चोरट्यांनी पळवला आहे. विशेष म्हणजे घटना घडलेल्या ठिकाणापासून पोलीस स्थानक हाकेच्या अंतरावर आहे. म्हणजे पोलीस स्थानकाच्या समोरचा चोरट्यांची दादागिरी वाढली की काय अशी चर्चा सुरु झाली आहे. सविस्तर वृत्त असे कि, जानकाबाई भगवान पाटील (वय ५२, रा. गुर्जर अळी, चोपडा) या रविवारी सायंकाळी चोपडा येथे जाण्यासाठी टॉवर चौकात बसची वाट पाहत उभ्या होत्या. चोपडा बस आल्यानंतर जानकाबाई…

Read More

जळगाव : प्रतिनिधी यावल येथील एका माध्यमिक शिक्षकाला ट्रेडींगमध्ये भरघोस नफ्याचे आमिष दाखवून तब्बल ७ लाख ६२ हजार रुपयांना गंडा घालण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी फसवणूक झालेल्या शिक्षकाने जळगाव सायबर पोलिस ठाण्यात एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. नंदकिशोर दत्तू भारुडे (वय ५२, रा. यावल) असे फसवणूक झालेल्या शिक्षकाचे नाव आहे. शिक्षकाला ३० मार्च रोजी एका व्हॉटसअॅप ग्रुपमधून ट्रेडींगमध्ये गुंतवणूक करण्यासाठी एक अॅप डाउनलोड करण्यास सांगितले गेले. सौजन्या गिल नावाच्या महिलेने भारुडे यांना ‘व्हिआयपी ६५’ या व्हॉटसअॅप ग्रुपवर सहभागी करून घेतले. वेगवेगळ्या ट्रेडींग ग्रुपमध्ये सामील करून, ‘मोठा नफा मिळेल’ असे आमिष दाखवण्यात आले.  चोरट्यांनी भारुडे यांना सुरुवातीला…

Read More

चाळीसगाव : प्रतिनिधी चाळीसगाव पोलिस खात्याचे ब्रीद असणाऱ्या सद्रक्षणाय खलनिग्रहणायचा अर्थ आहे सज्जनांचे रक्षण करणे आणि दुर्जनांचा नाश करणे. चाळीसगावला याउलट घडले. पोलिसांनीच खंडणी घेतल्यामुळे वर्दी डागाळली आहे. पोलिस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांनाही हे प्रकरण भोवले आहे. अवघ्या सात महिन्यांत त्यांची उचलबांगडी झाली आहे. त्यांना कंट्रोल रूमला पाठवण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चाळीसगाव शहरातील गुन्ह्याचा आलेख गेल्या काही वर्षात वाढला आहे. थेट गोळीबाराच्या घटना घडल्या. टोळीयुद्धाचा भडकादेखील शहरवासीयांनी अनुभवला. पोलिस दलातील सुंदोपसुंदीचे प्रकारही समोर आले आहेत. दरम्यान, खंडणी प्ररकणातील आरोपी पोलिस हवालदार अजय पाटील याला निलंबित करण्यात आले आहे. जळगावला पोलिस निरीक्षक नियंत्रण कक्षात त्यांची बदली करण्यात आल्याची माहिती अपर…

Read More

यावल : प्रतिनिधी तालुक्यातील महेलखेडी येथील महिलेने पतीसोबत जात असताना गाडी थांबविण्यास सांगितले व थेट विहिरीत उडी घेत आत्महत्या केली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सविस्तर वृत्त असे कि, मुस्कान अल्ताफ तडवी (२०) ही दुचाकीने पती अल्ताफ रहेमान तडवी (रा. महेलखेडी) यांच्यासोबत दुचाकीवर जात होती. दरम्यान, विरावली गावाच्याजवळ शेत गट क्रमांक ५७ येथे पतीला दुचाकी थांबविण्यास सांगितले, दुचाकीवरून उतरून तिने विहिरीकडे धाव घेतली. विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. पती अल्ताफ तडवी यांनी आरडाओरड केली. नागरिकांनी धाव घेत विवाहितेला विहिरीतून बाहेर काढले. यावल ग्रामीण रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. याप्रकरणी यावल पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात…

Read More

यावल : प्रतिनिधी तालुक्यातील कोरपावली येथून पुतण्या काकूला घेऊन यावल बसस्थानकावर येत असताना शहराच्या बाहेर तालुका कृषी कार्यालयाच्यासमोर स्कूलबसने धडक दिल्याने दोघांचा मृत्यू झाला. हा अपघात मंगळवारी सकाळी ६:४५ वाजता झाला. मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील कोरपावली येथील रहिवासी विशाल कुशल येवले हा युवक मंगळवारी पहाटे काकू निशा जितेंद्र येवले (वय २०) यांना दुचाकीने (एमपी ०७ एनपी ३०७२) यावल बसस्थानकावर सोडण्यासाठी येत असताना त्यांना बसची (एमएच १९ वाय ७१९८) धडक बसली. या अपघातामध्ये विशाल येवले व निशा येवले दोघे जागीच ठार झाले. रवी भालेराव, उमेश जावळे यांच्या मदतीने मृतदेह तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. या अपघातप्रकरणी कुशल पांडुरंग येवले यांच्या फिर्यादीवरून…

Read More

मेष राशी श्रीगणेश म्‍हणतात की, आज कुटुंब आणि नातेवाईकांसोबत चांगला वेळ घालवला जाईल. तुमच्या संपर्कातील आणि मित्रांसोबत भेटीगाठी फायदेशीर ठरतील. काही काळापासून तुम्ही तुमच्या व्यक्तिमत्त्वात अधिक सकारात्मक बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करत आहात, त्यामुळे तुम्हाला सामाजिक आणि कौटुंबिक प्रोत्साहन देखील मिळू शकते. कोणत्याही अनोळखी व्यक्तीसोबत कोणतेही महत्त्वाचे संभाषण किंवा काम करण्यापूर्वी, त्यावर चांगली चर्चा करा आणि त्याची चौकशी करा. लहानशा निष्काळजीपणामुळे तुमची फसवणूक होऊ शकते. व्यावसायिक कामांमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल करायचा नाही. वृषभ राशी श्रीगणेश म्‍हणतात की, तुम्ही तुमच्या प्रभावी आणि गोड बोलण्याने इतरांवर तुमचा प्रभाव टिकवून ठेवाल. लोक तुमच्या व्यक्तिमत्त्वाने प्रभावित होऊ शकतात. घरात एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीचे आगमन देखील…

Read More