Author: editor desk

मेष राशी श्रीगणेश म्‍हणतात की, सकारात्मक विचारसरणीच्या लोकांसोबत वेळ घालवल्याने तुम्हाला भावनिकदृष्ट्या मजबूत वाटेल. घाईघाईने घेतलेले निर्णय बदलावे लागू शकतात. तुम्ही तुमच्या वैयक्तिक कामांसाठी वेळ काढू शकणार नाही, ज्यामुळे मन थोडे निराश होऊ शकते. आज तुमचे बाहेरील संपर्क किंवा कोणताही प्रवास टाळण्याचा प्रयत्न करा. व्यवसायात इच्छित परिणाम मिळू शकतो. पती-पत्नीच्या नात्यात गोडवा येऊ शकतो. कधीकधी तणाव किंवा नैराश्याची स्थिती अनुभवता येते. वृषभ राशी श्रीगणेश म्‍हणतात की, भविष्यातील योजनांवर चर्चा करण्यासाठी आणि त्या प्रत्यक्षात आणण्यासाठी हा योग्य वेळ आहे. विशेषतः महिला त्यांच्या कामांबद्दल अधिक जागरूक असतील आणि त्यांना यश देखील मिळेल. कधीकधी तुमच्या छोट्या छोट्या गोष्टींवरून राग येण्यामुळे घरातील वातावरण बिघडू…

Read More

पुणे : वृत्तसंस्था गेल्या काही दिवसापासून राज्यातील नागरिक ज्या मान्सूनची वाट पाहत होते, तो आज रविवार, 25 मे रोजी महाराष्ट्रात दाखल झाला. हवामान खात्याने याबाबत अधिकृत घोषणा केली असून, यावर्षी मान्सून अपेक्षेपेक्षा तब्बल 12 दिवस आधी राज्यात पोहोचला आहे. मान्सून वेळेपूर्वीच दाखल झाल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून, आनंदाचे वातावरण आहे. दरवर्षी साधारणतः 7 जूनच्या सुमारास महाराष्ट्रात मान्सून दाखल होत असतो. शनिवारी केरळात पोहोचलेल्या मान्सूनला, महाराष्ट्रात आगमनासाठी एक ते दोन दिवस लागतील, असा अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र मात्र यंदा हवामानातील पोषक स्थितीमुळे अवघ्या काही तासांतच मान्सून रविवारी महाराष्ट्रात दाखल झाला. आज 25 मे 2025 रोजी नैऋत्य मान्सून पश्चिममध्य आणि…

Read More

चोपडा  : प्रतिनिधी शहरातील पं.स. सभापती निवास असणाऱ्या स्थळी एका अज्ञाताचा खून झाल्याची घटना उघडकीस आली. उपविभागीय पोलिस अधिकारी अण्णासाहेब घोलप आणि पोलिस निरीक्षक मधुकर साळवे यांनी काही तासांतच आरोपीस अटक केली आहे. सविस्तर वृत्त असे कि, चोपडा शहरात कचरा गोळा करून उदरनिर्वाह करणारे दोन पुरुष व एक स्त्री हे सोबत कचरा गोळा करतात. यापैकी मृत व्यक्ती आणि सोबत असणारी जानू राजू बारेला (३५) यांचे अनैतिक संबंध असल्याचा राग मनात ठेवत राजेश काशीनाथ बारेला याने मृताच्या डोक्यात दगड मारून खून केला. तसेच जानू बारेला हिलादेखील मारहाण करून जखमी केल्याची घटना २५ रोजी पहाटे ३ वाजेच्या सुमारास घडली होती. पंचायत समितीसमोर…

Read More

जळगाव, दि. २५ मे (जिमाका वृत्तसेवा) “शासन आपल्या दारी” या संकल्पनेवर आधारित ‘समाधान शिबिरा’चे उद्घाटन जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून संपन्न झाले. यावेळी त्यांनी प्रशासन व जनतेमधील आपुलकीचा सेतू दृढ करत नागरिकांशी थेट संवाद साधला. “या शिबिराचं नावच ‘समाधान’ आहे… आणि खरं समाधान म्हणजे इथं येणाऱ्या प्रत्येक नागरिकाच्या चेहऱ्यावर हसू उमटणं. नागरिकाच्या डोळ्यांत दिसणारं समाधानच आमच्या कार्याचं खरं मोजमाप आहे,” असे भावनिक उद्गार पालकमंत्र्यांनी काढले. “पूर्वी नागरिकांना कामासाठी तहसील कार्यालयात जावं लागायचं; पण आता शासनच त्यांच्या दारी पोहोचत आहे. ही केवळ औपचारिकता नसून प्रशासन व जनतेमधील माणुसकीची नाळ दृढ करणारा उपक्रम आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले.…

Read More

जळगाव : प्रतिनिधी क्रूरपणे वाहतूक केल्या जाणाऱ्या एकूण ३० उंटांची सावदा पोलिसांनी वेळेत सुटका करून त्यांचे प्राण वाचवले. या उंटांना पुढील उपचारासाठी आणि सुरक्षित निवाऱ्यासाठी जळगावनजीकच्या कुसुंबा येथील ‘अहिंसा तीर्थ, रतनलाल सी. बाफना गोशाळा येथे सोपविण्यात आले आहे. सावदा पोलिसांनी १६ मे २०२५ रोजी केलेल्या कारवाईत २१ उंटांची सुटका केली. वन्यजीव संरक्षण अधिनियम १९६० अंतर्गत ही कारवाई करण्यात आली. दोन मोठ्या गाड्यांमध्ये कोंबून नेण्यात येत असलेल्या या उंटांबाबत पोलिसांना माहिती मिळाली होती. १६ मे रोजी पोलिसांनी १७ नर आणि ४ मादी असे एकूण २१ उंटांची सुटका केली होती. यातील १०-१२ उंट गंभीर जखमी अवस्थेत होते. २४ मे रोजी पहाटे ३…

Read More

चोपडा : प्रतिनिधी तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीला अमळनेर येथील एक तरुण पळवून नेत असताना काही सजग तरुणांनी त्याला पकडून शहर पोलिसांच्या ताब्यात दिले. हा प्रकार शुक्रवारी दुपारी घडला. मिळालेल्या माहितीनुसार, अमळनेर येथील बँड पथकाचा मालक अस्लमअली युसूफअली सय्यद (२९) याची ओळख तालुक्यातील अल्पवयीन झाली. मुलीशी संशयित हा मुलीच्या संपर्कात होता. दोन महिन्यांपूर्वी त्याने या मुलीस यावल भागात बोलावून तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. संशयित हा विवाहित असून, त्यास तीन अपत्ये असल्याची माहिती पोलिस तपासात पढे आली आहे. मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून अस्लमअली सय्यद याच्याविरुद्ध पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यास अटक करण्यात आली आहे. त्याला २८ पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात…

Read More

भुसावळ : प्रतिनिधी भुसावळ धावत्या रेल्वेत चोरी करणाऱ्या सहा जणांना अटक करण्यात आली आहे. यातील एक जण रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. मध्य रेल्वे सुरक्षा बल आणि लोहमार्ग पोलिस यांनी शनिवारी संयुक्तपणे ही कारवाई केली. भुसावळ स्थानकाच्या दक्षिण भागातील मुसाफिरखान्यातून देवास आणि नाशिक येथील संशयितांना अटक करण्यात आली.  अटक करण्यात आलेल्या संशयितांमध्ये गिरिजा शंकर बाबूलाल शर्मा (७१, रा.नेपानगर), लक्ष्मीनारायण दयाराम बागरी (५९), रवी लक्ष्मीनारायण बागरी (२५, दोन्ही रा.उज्जैन), विनोद राधेश्याम बागरी (३५), महेंद्र देवकरण यादव (२२, दोन्ही रा.देवास) आणि राजू निंबा खैरनार (६०, रा. नाशिक) यांचा समावेश आहे. सविस्तर वृत्त असे कि, नेपानगर आणि उज्जैन येथील संशयितांनी हावडा सीएसएमटी मेल एक्स्प्रेसच्या एसी…

Read More

मेष राशी आज तुम्हाला एखाद्या गंभीर समस्येपासून आराम मिळू शकेल. राजकारणात गुंतलेल्या लोकांना एखाद्या उच्चपदस्थ व्यक्तीकडून मार्गदर्शन आणि संगत मिळेल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठ आणि कनिष्ठ अधिकाऱ्यांशी समन्वय ठेवा. नोकरीच्या शोधात तुम्हाला घराबाहेर जावे लागू शकते. वृषभ राशी आज उत्पन्न कमी असेल. मित्र आणि कुटुंबाच्या मदतीने तुम्ही कोणताही अपूर्ण व्यवसाय योजना पुन्हा सुरू करण्यात यशस्वी व्हाल. वडिलोपार्जित मालमत्तेत वाढ होण्याचे संकेत आहेत. मिथुन राशी आज तुमच्या प्रिय व्यक्तीच्या कटू बोलण्यामुळे तुम्हाला मनातून वेदना जाणवतील. कामाच्या ठिकाणी विरुद्ध लिंगी जोडीदाराकडून चांगली बातमी मिळाल्याने तुमचे मन आनंदी होऊ शकते. वैवाहिक जीवनात तिसऱ्या व्यक्तीमुळे भांडण होऊ शकते. घरातील गोष्टी बाहेर चर्चा करू नका. कर्क…

Read More

जळगाव, दि. २४ मे (जिमाका वृत्तसेवा) – राज्य शासनाच्या महसूल विभागामार्फत राबविण्यात आलेल्या ‘१०० दिवस कार्यक्रम’ अंतर्गत अमळनेर उपविभागाने उल्लेखनीय कामगिरीची नोंद करत संपूर्ण नाशिक विभागात सर्वोत्तम उपविभाग म्हणून आपली वेगळी छाप पाडली आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल अमळनेर उपविभागाचे उपविभागीय अधिकारी नितीनकुमार मुंडावरे यांचा सन्मान महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते करण्यात आला. विभागीय आयुक्त नाशिक डॉ. प्रवीण गेडाम यांची या वेळी विशेष उपस्थिती होती. ‘१०० दिवस कार्यक्रम’ अंतर्गत विविध महसूल विषयक उपक्रम, नागरिक केंद्रित सेवा, दस्ताऐवजांचे सुलभीकरण, ई-हक्क नोंदणी, महसूल अभिलेखांचे अद्ययावतकरण, जलद निर्णय प्रक्रिया, वादांचे त्वरित निराकरण, तक्रार निवारण यंत्रणा यासारख्या बाबींमध्ये अमळनेर उपविभागाने उल्लेखनीय प्रगती साधली. उत्कृष्ट…

Read More

जालना : वृत्तसंस्था राज्यातील अनेक ठिकाणी अपघाताच्या घटना उघडकीस येत असतांना आता जालन्यातील अंबड तालुक्यातील सुखापुरी फाट्यावर भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. ट्रॅव्हल आणि टेम्पोची समोरासमोर जोरदार धडक झाली आहे. या अपघातात मायलेकींचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. अंजना पुरुषोत्तम सापनर (वय ३०), अनुसया पुरुषोत्तम सापनर (वय १४ रा. धानोरा ता. शेणगाव जि. हिंगोली) असं अपघातात मृत्यू झालेल्या मायलेकींची नावे आहेत. या अपघातामध्ये दोघेजण गंभीर जखमी झाले असून जवळपास सहा जण किरकोळ जखमी झाले आहे आहे. ही घटना मध्यरात्री 12 वाजेच्या सुमारास सुखापुरी फाट्यावर अंबड – वडीगोद्री रोडवर घडली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, बीड वरून जालना कडे येणारी…

Read More