मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील तूर उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. तूर उत्पादक व लोकप्रतिनिधी यांची मागणी लक्षात घेता पीपीएस अंतर्गत नाफेड आणि एनसीसीएफ यांच्या माध्यमातून सुरू असलेल्या तूर खरेदीस आता केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने 28 मे 2025 पर्यंत मुदत वाढवून दिली आहे, अशी माहिती राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिली आहे. या निर्णयामुळे राज्यातील तूर उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. तूर उत्पादक शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेत, केंद्र सरकारने तूर खरेदी मुदत वाढवून दिल्याबद्दल त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांचे आभार मानले आहेत. राज्यात तूर खरेदीची मुदत 13 मे 2025 पर्यंत…
Author: editor desk
पुणे : वृत्तसंस्था गेल्या दोन दिवसापासून राज्यातील पुणे येथील अजित पवार गटाचे कार्यकर्ते राजेंद्र पवार यांची सून वैष्णवी हगवणे यांच्या आत्म्हत्या प्रकरणी मोठी कारवाई होण्याची मागणी सुरु असतांना वैष्णवी हगवणे यांच्या मृत्यूला जबाबदार धरला जाणारा सासरा राजेंद्र हगवणे आणि तिचा दीर सुशील हगवणे हे दोघेही गेल्या सात दिवसांपासून मोकाट फिरत होते. त्यांना आता अटक झाली असून ते मागील काही दिवसांपासून तळेगाव परिसरातच असल्याचे उघड झाले आहे. याबाबतचे सीसीटीव्ही फुटेज आता समोर आले असून हे दोघेही हॉटेलमध्ये जेवण करत असताना या सीसीटीव्ही मध्ये दिसून येत आहे. वैष्णवीच्या आत्महत्येनंतर तब्बल सात दिवस राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे हे फरार होते. मात्र, हे…
चोपडा : प्रतिनिधी धुळे जिल्ह्यातील वढजाई येथील केटर्स २२ रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास तालुक्यातील चहार्डी येथे मालवाहूक रिक्षाने जात होते. ही रिक्षा सावखेड्याजवळ उलटल्याने रिक्षातील ११ जण जखमी झाले आहेत. त्यांना चोपडा उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले असून सर्वांची प्रकृती स्थिर आहे. सविस्तर वृत्त असे कि, रिक्षा उलटून झालेल्या अपघातात धुळे जिल्ह्यातील वढजाई येथील कुंदनबाई दिनेश खैरे (वय ५५), अर्चना खंडू कुवर (वय ३८), हिरकन बन्सिलाल ठाकरे (वय ६०), सरला संदीप खैरे (वय ४०), सुशीलाबाई सुकदेव वाघ (वय ७०), मीराबाई गोकुळ वानखेडे (वय ४५), वनराज गुलाब माळी (वय २६), कल्पना कृष्णा आखाडे (वय ५६), दीपक संदीप खैरे (वय १५),…
जळगाव : प्रतिनिधी तू मातून गेला आहे तुला बघतोच म्हणत छत्री लावण्यासाठी काढलेल्या काठीने मधूकर चिंतामणी वाणी (वय ५५, रा. ईश्वर कॉलनी) यांना बेदम मारहाण केली. या मारहाणीत त्यांचा हात फॅक्चर झाला. ही घटना दि. २१ रोजी सकाळी पावणेअकरा वाजेच्या सुमारास भजेगल्लीत घडली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीसात संशयित हर्षल विजय चौरसिया (रा. नाथवाडा, सिंधी कॉलनी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील ईश्वर कॉलनीतील लाठी शाळेजवळ मधुकर चिंतामणी वाणी हे वात्तसतव्यास असून त्यांचे भजेगल्लीत कटलरी साहित्य विक्री करुन उदनिर्वाह करतात. दि. २१ रोजी सकाळी त्यांनी नेहमीप्रमाणे गाडी लावली. त्यावेळी त्यांच्या ओळखीचा हर्षल चौरसिया हा तेथे आला. त्याने काहीही कारण नसतांना मधुकर…
अमळनेर : प्रतिनिधी बकरी ईदचे प्रत्येकी ४० हजार रुपये मिळवून देतो, असे सांगत एका दाम्पत्याजवळून ४५ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने अनोळखी व्यक्तीने फसवुन पळवून नेल्याची घटना १९ रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास घडली. सविस्तर वृत्त असे कि, अशरफबी फकीर मोहम्मद शेख ही मूळची अमळनेर येथील महिला सध्या सुरत येथे राहते. पुतणीच्या लग्नासाठी ती पतीसोबत अमळनेरला आली होती. १९ रोजी ती स्टेट बँकेतून लाडकी बहीण योजनेचे पैसे काढण्यासाठी अर्बन बँकेसमोर उभी असताना एकजण आला व त्यांना म्हणाला की, तुम्हाला बकरी ईदचे प्रत्येकी ४० हजार रुपयांप्रमाणे ८० हजार रुपये काढून देतो. कोणाशी तरी फोनवर बोलण्याचे नाटक करून नंतर साडेबारा वाजता रिक्षामध्ये बसवून…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील समता नगरात एक धक्कादायक घटना समोर आली असून, येथे राहणाऱ्या ४९ वर्षीय व्यक्तीने राहत्या घरात मध्यरात्री गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी सकाळी ६ वाजता उघडकीस आली. मात्र, आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. यासंदर्भात रामानंदनगर पोलिस ठाण्यात सकाळी १० वाजता अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सविस्तर वृत्त असे कि, ईश्वर सुखदेव वाघ (वय ४९) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. नातेवाइकांनी दिलेल्या माहितीनुसार, ईश्वर वाघ हे पत्नी संगीता आणि मुलगा रणजित यांच्यासोबत समता नगरात राहत होते. हातमजुरी करून ते कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असत. बुधवारी रात्री ११ वाजता जेवण केल्यानंतर ते मागच्या खोलीत झोपायला गेले.…
बोदवड : प्रतिनिधी शहरातील भर चौकात रस्त्यावर असलेली हॉटेल अमर चोरट्यांनी लक्ष केले. खिडकी तोडून हॉटेलमधील ५० हजाराची रोकडसह सीसीटीव्ही कॅमेरे तोडून चोरटे पसार झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना गुरुवारी पहाटे उघडकीस आली. चोरट्यांनी हॉटेलच्या दुसऱ्या मजल्यावर असलेल्या खिडकी फोडून आत प्रवेश केला. त्यात हॉटेलमध्ये लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे तोडत चोरट्याने हॉटेलच्या गल्ल्यात असलेले ४७ हजार शंभर रुपये चोरून नेले. गुरुवारी सकाळी हॉटेल उघडल्यावर हा प्रकार उघडकीस आला. याबाबत पोलिसांना बोदवड माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पाहणी करून पंचनामा केला. याप्रकरणी बोदवड पोलिसात रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.
मेष राशी श्रीगणेश म्हणतात की, ग्रहांची स्थिती शुभ आहे. यावेळी तुमचे वर्तन आणि भूतकाळातील चुका दुरुस्त करा. तुम्ही यावरही काम करत आहात. अशा प्रकारच्या प्रयत्नांमुळे लोकांशी संबंधांमध्ये आश्चर्यकारक सुधारणा होईल. चुकीच्या मजा आणि बाह्य कामांमध्ये तुमचा वेळ वाया घालवू नका. यामुळे तुम्ही तुमची वैयक्तिक कामे योग्यरित्या करू शकणार नाही. घरातील वडीलधाऱ्यांकडे दुर्लक्ष करू नका. व्यवसायाच्या दृष्टिकोनातून ग्रहांच्या स्थितीत काही सकारात्मक बदल होतो. पती-पत्नीमध्ये योग्य सुसंवाद निर्माण होऊ शकतो. वृषभ राशी श्रीगणेश म्हणतात की, ग्रहांचे संक्रमण सकारात्मक असेल. अडकलेल्या कामांना गती मिळेल. प्रतिष्ठित लोकांशी भेटीगाठीमुळे फायदे आणि आदर मिळेल. त्यामुळे तुमची कार्यक्षमता देखील सुधारेल. स्वार्थी मित्रांपासून दूर रहा. त्यांचा चुकीचा सल्ला…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी बोगस बियाण्यांच्या मुद्यावरून महायुती सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. महाराष्ट्र हा बोगस बियाण्यांचा अड्डा बनला आहे. या प्रकरणाचे धागेदोरे थेट मंत्रालयापर्यंत पोहोचले आहेत, असे ते म्हणाले. पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरण आत्महत्येचे नव्हे तर हत्येचे असल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला. विजय वडेट्टीवार गुरुवारी सकाळी पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, महाराष्ट्र हा बोगस बियाण्यांचा अड्डा बनला आहे. यासंबंधी तुम्ही – आम्ही मिळून खाऊ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. मी मागील अनेक वर्षांपासून या प्रकरणाला वाचा फोडत आहे. विधानसभेतही आम्ही हा प्रश्न वारंवार लावून धरला आहे. शेतकऱ्यांना बियाण्यांचे शुद्ध वाण मिळत नाही. याचे धागेदोरे मंत्रालयापर्यंत…
मुंबई : वृत्तसंस्था बॉलिवूडच्या क्षेत्रात अनेक अभिनेते व अभिनेत्री चर्चेत येत असतांना आता बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टीने चित्रपटसृष्टीला कायमचा निरोप दिला आहे. हा धक्कादायक खुलासा तिचे वडील आणि अभिनेते सुनील शेट्टी यांनी केला आहे. एका मुलाखतीत सुनील शेट्टी यांनी सांगितले की, अथिया यापुढे चित्रपटांमध्ये काम करू इच्छित नाही आणि तिने तिच्या करिअरसाठी नवीन मार्ग निवडला आहे. वयाच्या 2015 मध्ये सलमान खानच्या प्रॉडक्शन हाऊस अंतर्गत प्रदर्शित झालेल्या ‘हिरो’ चित्रपटातून अथिया शेट्टीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. तिच्या करिअरची सुरुवात खूपच चर्चेत होती, पण त्यानंतर ती बॉलिवूडमधील मोजक्याच चित्रपटांमध्ये दिसली. ‘मुबारकां’ आणि ‘मोतीचूर चकनाचूर’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर ती अचानक चित्रपटसृष्टीतून गायब झाली.…

