Author: editor desk

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम हल्ल्यात सहभागी असलेला स्थानिक दहशतवादी आदिल हुसेन ठोकर याच्या घरावर सुरक्षा दलांनी बॉम्बहल्ला केला. आदिल ठोकर उर्फ ​​आदिल गुरी असे ओळखल्या जाणाऱ्या या दहशतवाद्यावर २२ एप्रिल रोजी पहलगामच्या बैसरन खोऱ्यात झालेल्या हल्ल्याचे नियोजन,अंमलबजावणी करतपाकिस्तानी दहशतवाद्यांना मदत केल्याचा आरोप आहे. त्याच वेळी, या हल्ल्यात सहभागी असलेला आणखी एक स्थानिक दहशतवादी आसिफ शेख याचे त्राल येथील घर जम्मू आणि काश्मीर प्रशासनाने बुलडोझरने नेस्तनाबूत करण्यात आले आहे. लष्कराकडून समोर आलेल्या  माहितीनुसार, २२ एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे स्टीलच्या गोळ्या, एके-४७ रायफल्स आणि बॉडी कॅमेरे घातलेल्या चार लष्कर-ए-तैयबा (एलईटी) दहशतवाद्यांच्या गटाने हिंदू पर्यटकांना लक्ष्य केले…

Read More

पारोळा : प्रतिनिधी तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४वरील बाभळे नाग फाट्याजवळ गुरुवारी दुपारच्या सुमारास बस व टँकर यांच्यात समोरासमोर अपघात झाल्याने नऊजण जखमी झाल्याची घटना घडली आहे. सविस्तर वृत्त असे कि, गुरुवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास पारोळा येथून लोणीमार्गे कासोदा बस (एमएच१४/बीटी१८८१) सुटली होती. बाभळे नागफाट्याजवळ या बसला वळण आहे. याच ठिकाणी हा अपघात झाला. चालकाने विरुद्ध बाजूला जाऊन वळण घेण्याचा प्रयत्न केला असता यावेळी समोरून भरधाव वेगाने येणारी टँकर (एमएच १२/एक्सएम६०५७) यांच्यात समोरासमोर धडक झाली. सुदैवाने दोघांनीही समोरासमोर आल्यानंतर जोरदार ब्रेक मारल्याने मोठी हानी टळली. सर्व जखमींवर पारोळा कुटीर रुग्णालयात उपचार करण्यात आले. याबाबत रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे…

Read More

चोपडा : प्रतिनिधी तालुक्यातील अडावद येथे  कापणी करून ठेवलेल्या मक्याच्या शेतात आग लागल्याने सुमारे एक हेक्टरवरील मका जळून खाक झाला. यामुळे शेतकऱ्याचे सुमारे ३ लाख रुपयांचे नुकसान झाल्याची घटना २२ रोजी दुपारच्या सुमारास घडली. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून या नुकसानीचा महसूल विभागाने पंचनामा केला आहे. सविस्तर वृत्त असे कि, येथील वटार रस्त्यावरील किशोर धोंडू पाटील यांनी १ हेक्टर २७ आर. क्षेत्रात मक्याची लागवड करण्यात आली टोती मता कात्रणीतर साल्याने २० रोजी मका कापून ठेवला होता. दरम्यान, २२ रोजी दुपारी अचानक शॉर्टसर्किटमुळे शेतात आग लागल्याने संपूर्ण मका जळून खाक झाला. या शेतातून वीजतारा गेल्या असून ह्या तारा लोंबकळलेल्या असल्यानेच…

Read More

जळगाव : प्रतिनिधी दोन आठवड्यांपूर्वी झालेल्या वादातून काही जणांनी एका युवकावर गोळीबार करून त्याला गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी रात्री १० वाजता शहरातील मीनाताई ठाकरे संकुल परिसरात झाली आहे. महेंद्र उर्फ दादू समाधान सपकाळे (वय २५, रा. प्रबुद्ध नगर) असे गंभीर जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महेंद्र सपकाळे हा गुरुवारी रात्री मित्र सचिन चौधरी याचा वाढदिवस असल्यामुळे मीनाताई ठाकरे संकुल परिसरात आला होता. वाढदिवस साजरा करत असतानाच त्या ठिकाणी अचानक चार ते पाच जण आले. त्यानंतर संबंधितांनी महेंद्र याच्यासह त्याचा मित्र सचिन चौधरी याला मारहाण केली. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे महेंद्र व त्याचे मित्र घाबरले. हा वाद सुरू…

Read More

जळगाव : प्रतिनिधी तालुक्यातील शिरसोलीपासून जवळ असलेल्या शज्जनशाह बाबा दर्गा भागातील नायगाव धरणाच्या पाण्यात गुरुवारी दुपारी ४:३० वाजता तीन मुली बुडाल्याची घटना घडली. नातेवाइकांच्या प्रसंगावधानामुळे यातील दोन मुलींना वाचविण्यात यश आले. मात्र खुशी अरमान पटेल (वय १४, रा.फातेमानगर, जळगाव) या मुलीचा धरणात बुडून मृत्यू झाला. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, फातेमानगरातील अरमान पटेल यांच्या मोठ्या मुलीचे म्हणजेच मयत खुशीच्या मोठ्या बहिणिचे लग्न १८ एप्रिल रोजी जळगावात पार पडले. या लग्नासाठी सर्व नातेवाईक घरी आले होते. लग्नाची धावपळ संपल्यामुळे पटेल कुटुंबीय शिरसोली भागातील शज्जनशाह बाबा यांच्या दर्याच्या ठिकाणी दर्शनासाठी गेले होते. या  परिसरात…

Read More

मेष राशी श्री गणेश म्हणतात की, आज तुमची कोणतीही इच्छा पूर्ण होईल. त्यामुळे मन आनंदी राहील. नवीन उपक्रमांच्या योजना राबविण्यासाठी कुटुंबाचा पाठिंबा देखील उपलब्ध असेल. आता स्वतःला सिद्ध करण्यासाठी अधिक प्रयत्न करणे आवश्यक आहे. जर तुम्ही वाहनाशी संबंधित कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर प्रथम त्याबद्दल विचार करा. यावेळी तुमच्या कामांची गोपनीयता राखणे महत्वाचे आहे. नवीन काम सुरू होईल. पती-पत्नीमध्ये चांगले संबंध राखले जातील. वृषभ राशी श्री गणेश म्हणतात की, आर्थिकदृष्ट्या हा काळ सर्वोत्तम आहे. एखाद्या आध्यात्मिक कार्यात असलेल्या व्यक्तीच्या सहवासात राहिल्याने तुम्हाला मानसिक शांती मिळेल. मुलांच्या करिअरशी संबंधित कोणतीही माहिती मिळाल्याने घरात उत्साहाचे वातावरण निर्माण होईल. तुमच्यावर जबाबदाऱ्या अधिक…

Read More

मुंबई : प्रतिनिधी मुंबईतील सात ठिकाणी सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) 50 कोटी रुपयांच्या कर्ज फसवणुकीप्रकरणी बुधवारी छापे टाकले. माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या अखत्यारित असलेल्या सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम ब्रॉडकास्ट इंजिनीअरिंग कन्सल्टंट्स इंडिया लिमिटेडमधील (बीईसीआयएल) संशयीत अधिकाऱ्यांनी मुंबईतील कंपनीला नियमबाह्य पद्धतीने कर्ज दिले होते. त्या कर्जाची रक्कम पुणे महानगरपालिकेच्या कचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी वापरण्यात येणार असल्याचा दावा करण्यात आला होता. पण प्रत्यक्षात ती रक्कम इतरत्र वळवण्यात आल्याचे ईडीच्या तपासात निष्पन्न झाले आहे. बीईसीआयएल तक्रारीवरून सीबीआयने याप्रकरणी २०२४ मध्ये गुन्हा दाखल केला होता. त्या गुन्ह्यांच्या आधारावर ईडी याप्रकरणी तपास करीत आहे. याप्रकरणात बीईसीआयएलचे तत्कालिन मुख्य व्यवस्थापकीय संचालक व महाव्यवस्थापकांनी नियमानुसार ठरवलेल्या कार्यपद्धतीचे उल्लंघन करून ‘द…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था देशातील पहलगाम हल्ल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये जाणाऱ्या पर्यटकांची संख्या रोडावली असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने काश्मीरची सहल आयोजित केली आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ही सहल आयोजित केली आहे. काश्मीर भारताचा अविभाज्य अंग आहे. आम्ही तिथे जाण्यास घाबरत नाही. पर्यटकांना भारतात कुठेही जाण्याची भिती वाटू नये असा संदेश आम्हाला या प्रकरणी द्यायचा आहे, असे ते म्हणालेत. पहलगाम अतिरेकी हल्ल्यात 26 पर्यटकांचा बळी गेला आहे. यात महाराष्ट्रातील 6 पर्यटकांचा समावेश आहे. या घटनेमुळे जम्मू काश्मीरच्या पर्यटन उद्योगाला मोठा फटका बसला आहे. या पार्श्वभूमीवर मनसेने काश्मीरची सहल आयोजित केली आहे. मनसेचे मुंबई शहराध्यक्ष संदीप देशपांडे या प्रकरणी बोलताना म्हणाले की,…

Read More

देशातील जम्मू आणि काश्मीर येथील पहलगाम येथे दहशतवादी हल्ल्याची घटना ताजी असतांना आता भाजपचे माजी खासदार आणि भारतीय क्रिकेट संघाचे सध्याचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांना ‘आयसिस काश्मीर’कडून जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. बुधवारी, त्याने दिल्ली पोलिसांशी संपर्क साधला आणि एफआयआरसाठी औपचारिक तक्रार दाखल केली आणि त्याच्या कुटुंबासाठी सुरक्षेची मागणी केली. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर गौतम गंभीरने त्याचा तीव्र शब्दात निषेध केला होता. माजी भारतीय क्रिकेटपटू आणि भाजप नेते गौतम गंभीर यांनी या दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या लोकांबद्दल शोक व्यक्त करत ‘भारत या भ्याड कृत्याला प्रत्युत्तर देईल’ असे म्हटले होते. गौतम गंभीरने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत,”ते मृतांच्या कुटुंबियांसाठी प्रार्थना करत…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था जम्मू काश्मीरच्या रम्य थंड हवेत काही आनंदाचे क्षण घालवण्यासाठी गेलेल्या तिन्ही मावस भावंडांच्या कुटुंबांवर अचानक अतिरेक्यांनी घाला घातला. पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात घरातील कर्ते पुरुष अतुल मोने (43), संजय लेले (50) आणि हेमंत जोशी (45) यांचा मृत्यू झाला. त्यांच्या जाण्याने डोंबिवलीत हळहळ व्यक्त होत असून संपूर्ण परिसर शोकमग्न झाला आहे. यानंतर अतुल मोने यांच्या कुटुंबियांनी सांगितले की, हिंदू कोण आहे विचारत गोळी घातली. दरम्यान मोने कुटुंबियांनी सांगितले की, दहशतवादी आले तेव्हा सर्व जण घाबरले होते. दहशतवाद्यांनी कॉमनली विचारले इथे कोण-कोण हिंदू आहेत, मुसलमान आणि हिंदूंनी वेगळे व्हा, पण घाबरलेलो असल्याने सर्व जण खाली झोपले होते. त्यांनी…

Read More