मुंबई : वृत्तसंस्था राज्यात सर्वत्र उल्लू अॅपवरील एजाज खानचा ‘हाउस अरेस्ट’ हा शो बंद करण्याच्या मागणीने जोर धरला आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर या देखील या शो बाबत आक्रमक झाल्या असून त्यांनी शो वर बंदी घालण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात त्यांनी राज्याचे पोलिस महासंचालक यांना पत्र लिहिले असून कारवाईच्या सूचना दिल्या आहेत. अभिनेता एजाज खानच्या ‘हाऊस अरेस्ट’ या शोवरून वाद निर्माण झाला आहे. या शोवर अश्लीलता पसरवल्याचा आरोप आहे. या शोची एक व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये, एका टास्कदरम्यान , महिला स्पर्धकांना त्यांचे कपडे काढण्यास भाग पाडले जात आहे. सोशल मीडियावर लोक या शोविरुद्ध संताप…
Author: editor desk
जळगाव : प्रतिनिधी चाळीसगाव तालुक्यातील वाघले येथील ४२ वर्षीय गणेश ताराचंद राठोड यांचे अज्ञात व्यक्तींनी ३० मे २०२५ रोजी अपहरण केले होते आणि त्यांच्या सुटकेसाठी ४५ लाख रुपयांची खंडणी मागितली होती. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी तातडीने तपास करत १२ तासात दोन आरोपींना अटक तर दोन फरार झाले आहे. अपहृत गणेश राठोड यांची सुखरूप सुटका केली आहे. सविस्तर वृत्त असे कि, अपहरणकर्ते गणेश राठोड यांना मारहाण करत त्याचे व्हिडिओ आणि व्हॉइस कॉल त्यांच्या मुलाला पाठवून खंडणीची मागणी करत होते. अपहरणाची जागा निश्चित नसल्याने पोलिसांसमोर तपासाचे मोठे आव्हान होते. मात्र, पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी…
जळगाव : प्रतिनिधी तालुक्यातील किनोद येथील 26 वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन आयुष्याची अखेर केल्याची घटना गुरुवारी (१ मे) समोर आली होती. दरम्यान ही आत्महत्या नसून सासू आणि ननंद यांनी तिचा गळा दाबून खून केल्याचा आरोप विवाहितेच्या माहेरच्या नातेवाईकांनी केला आहे. गायत्री ज्ञानेश्वर कोळी (वय 26 रा. किनोद ता. जळगाव) असे मयत विवाहितेचे नाव आहे. सविस्तर वृत्त असे कि, जळगाव तालुक्यातील किनोद गावात गायत्री कोळी या पती, सासू आणि दोन मुलं यांच्यासह वास्तव्याला होत्या. पती भाजीपाला विक्री करतो, तर संसाराला हातभार लावण्यासाठी गायत्री शिवणकाम काम करत होत्या. गुरुवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास विवाहितेने गळफास घेऊन आपलं आयुष्य संपवल्याचं सांगण्यात आलं होतं.…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील आकाशवाणी चौकात ट्रकने दिलेल्या धडकेत दुचाकीवर मागे तरुणीचे दोन्ही पायांचा चेंदामेंदा झाला असून दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना गुरुवारी 1 मे रोजी रात्री 8 वाजता घडली आहे. जखमींवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील महाबळ परिसरातील रहिवासी नयन मिलिंद तायडे (वय 22) आणि रोहित संजय माळी (वय 21, रा. राधाकृष्ण नगर, जळगाव) असे दोन जण जखमी झालेल्यांची नावे आहे. जळगाव शहरातील आकाशवाणी चौकाकडून तरुणी नयन तायडे आणि तरुण रोहित माळी हे दुचाकीने आकाशवाणी चौकाकडून उड्डाणपुलाकडे वळण घेत असताना मागून येणाऱ्या ट्रकने त्यांना जोरदार धडक दिली. या धडकेत तरुणी रोडवर पडल्याने तिच्या पायावर ट्रॅकचे…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील जम्मू काश्मीर येथील पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील प्रत्येक दहशतवाद्याचा शोध घेऊन उत्तर दिले जाईल, असे आश्वासन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गुरुवारी दिल्लीमध्ये दिले. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पहिल्यांदाच सार्वजनिक कार्यक्रमामध्ये संबोधित करताना दहशतवादाविरोधात सरकारचा ‘झीरो टॉलरन्स’ असल्याचे ते म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकार कोणत्याही दहशतवाद्याला सोडणार नाही, असे शहा म्हणाले. 1990 च्या दशकापासून काश्मीरमध्ये दहशतवाद चालवणार्यांविरुद्ध पंतप्रधान मोदींनी ‘झीरो टॉलरन्स’ धोरण स्वीकारले आहे. सरकार त्यांच्याविरुद्ध जोरदार लढा देत आहे. देशातून दहशतवादाचे उच्चाटन करण्याचा नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील ‘एनडीए’ सरकारचा संकल्प आहे आणि तो पूर्ण होईल, असे केंद्रीय गृहमंत्री म्हणाले. हा भ्याड हल्ला करून हा…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती पुन्हा एकदा खालावली आहे. जालना येथून बीड दौऱ्यावर जात असताना त्यांना रस्त्यातच भोवळ आली. त्यामुळे बीड येथील दौरा सोडून त्यांना छत्रपती संभाजीनगर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील हे सध्या मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी त्यांच्या मराठवाड्यात सातत्याने बैठका सुरू आहेत. याच दरम्यान जालना येथील बैठक झाल्यानंतर ते बीड कडे जात असताना मार्गामध्ये त्यांना भोवळ आली. त्यामुळे त्यांना छत्रपती संभाजीनगर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मनोज जरांगे पाटील यांना उष्माघात म्हणजेच सनस्ट्रोक आणि अतिसाराचा त्रास होत असल्याची…
जळगाव : प्रतिनिधी मुंबई बीकेसी येथील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये १ ते ४ मे या कालावधीत आयोजित करण्यात आलेली ‘वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेन्मेंट समिट’ (वेव्हज) ही परिषद मनोरंजन क्षेत्रातील गुंतवणुकीसाठी एक प्रभावी मंच ठरणार असून, मुंबईसारख्या महानगराला जागतिक स्तरावर या क्षेत्राचे नेतृत्व करण्याची संधी प्राप्त होईल, असा विश्वास राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केला आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने देश-विदेशातील चित्रपट, दूरचित्रवाणी, ओटीटी, अॅनिमेशन, गेमिंग आणि मिडिया या क्षेत्रांतील नामवंत प्रतिनिधी एकत्र येत असून, या परिषदेमुळे उद्योग, रोजगार व नव्या कल्पनांना चालना मिळेल, असेही त्यांनी नमूद केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या आंतरराष्ट्रीय…
मेष राशी आज तुम्हाला राजकारणात महत्त्वाच्या जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे. बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या लोकांना दूरच्या देशातून चांगली बातमी मिळेल. तुम्हाला सरकारी सत्तेचा लाभ मिळेल. विद्यार्थ्यांना अभ्यासाशी संबंधित काही समस्या येत राहतील. वृषभ राशी आज व्यवसाय क्षेत्रात जास्त काम असेल. ज्यामुळे भरपूर संपत्ती मिळेल. नोकरीत अधीनस्थांना फायदा होईल. जमीन, इमारत, वाहन इत्यादी खरेदी करण्याच्या नियोजनासाठी, बचत केलेले भांडवल खर्च करण्यासोबतच, तुम्हाला कर्ज देखील घ्यावे लागू शकते. मिथुन राशी आज प्रेमसंबंधांमध्ये जवळीकता येईल. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी सहलीला जाऊ शकता. वैवाहिक जीवनात पती-पत्नीमधील प्रेम आणि आकर्षण वाढेल. तुमच्या सासरच्या लोकांकडून तुम्हाला एखाद्या शुभ कार्यक्रमाचे आमंत्रण मिळू शकते. कर्क राशी…
मुंबई : वृत्तसंस्था केंद्र सरकारने जातीनिहाय जनगणनेचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे स्वागत देशभरात होत असताना मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मात्र अशा जनगणनेची कोणतीही गरज नसल्याची विरोधाभासी प्रतिक्रिया दिली आहे. जातीनिहाय जनगणना करण्याची काहीच गरज नाही. सरकारने बांठिया आयोगाचा अहवाल लागू केला तरी पुरेसे आहे. पण सरकारची इच्छा असेल, तर आमचा विरोध नाही, असे ते म्हणाले. या प्रकरणी त्यांनी आरक्षणाची कमाल मर्यादा 72 टक्के करण्याचीही मागणी केली आहे. केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने बुधवारी देशभरात जातीनिहाय जनगणना करण्याची घोषणा केली. केंद्राच्या या निर्णयाचे सर्वच राजकीय पक्षांनी स्वागत केले आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनीही याचे स्वागत केले. पण…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था आजपासून मे महिन्यांची सुरुवात चांगली झाली आहे. आज गुरुवार १ मे २०२५ पासून संपूर्ण भारतात एलपीजी सिलिंडरच्या किमती कमी करण्यात आल्या आहेत. इंडियन ऑईल कॉर्पोरेशन (आयओसी) च्या अपडेट्स दरांनुसार, १९ किलोचा व्यावसायिक एलपीजी सिलिंडर आता १४.५ रुपयांनी स्वस्त झाला आहे. पण, एप्रिलमधील शेवटच्या बदलापासून घरगुती एलपीजीच्या किमती जैसे थे आहेत. सध्या घरगुती वापराच्या १४.२ किलो वजनाच्या सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. पण १९ किलोच्या व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत कपात केली आहे. १ मे रोजी गॅसच्या किमतीतील बदलानुसार, आता राजधानी दिल्लीत १९ किलोच्या गॅस सिलिंडरसाठी १७४७.५० रुपये द्यावे लागतील. गेल्या एप्रिल महिन्यात याचा दर १७६२ रुपये…

