जळगाव : प्रतिनिधी जळगावमधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात विविध उपचारांसाठी जिल्हा वार्षिक नियोजनाच्या निधीतून अत्याधुनिक यंत्रसामग्री घेतली असून, आज अद्ययावत एमआरआय मशीनचे लोकार्पण झाल्यामुळे एवढ्या सुविधा असलेले हे राज्यातील पहिले केंद्र ठरले, असे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. या वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात मानवी अवयव प्रत्यारोपण वगळता सर्व शस्त्रक्रिया होतील, असे सांगून राज्यातील पहिले मेडिकल हब जळगावमध्ये साकारले जात असल्याचा गौरवपूर्ण उल्लेख जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी केला. केंद्र व राज्य शासनाच्या ईडब्ल्यूएस योजनेंतर्गत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात अत्याधुनिक थ्री टी एमआरआय मशीन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते, तर जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली कार्यान्वित करण्यात आले. यावेळी खासदार स्मिता…
Author: editor desk
जळगाव : प्रतिनिधी संभाव्य महानगरपालिका निवडणुका आणि येणारे सण लक्षात घेता जिल्ह्यातील सामाजिक आणि राजकीय वातावरण तापू शकते हे लक्षात घेवून , कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी यांचे आदेशान्वये अपर जिल्हादंडाधिकारी गजेंद्र पाटोळे यांनी मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७(१) व (३) अंतर्गत हा आदेश जारी केला आहे. दिनांक ०३ मे २०२५ रोजी पहाटे ००.०१ वाजल्यापासून ते दिनांक १६ मे २०२५ रोजी रात्री १२.०० वाजेपर्यंत संपूर्ण जळगाव जिल्हा हद्दीत जमावबंदी लागू राहील. या कालावधीत पाच किंवा अधिक लोकांनी जमणे, सभा, मिरवणूक घेणे, शस्त्र बाळगणे, दाहक किंवा स्फोटक पदार्थ बरोबर ठेवणे, चित्रांचे दहन,…
मुंबई : वृत्तसंस्था बॉलिवूड सुपरस्टार अजय देवगण व रितेश देशमुखच्या ‘रेड 2’ चित्रपटाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. 1 मे रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात अजय देवगण आयकर विभाग अधिकाऱ्याच्या भूमिकेत झळकला आहे. तर रितेश देशमुखने खलनायकाची भूमिका साकारली आहे. या चित्रपटाने दोन दिवसात कोटींचा व्यवसाय केला आहे. सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, ४८ कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर १९.२५ कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे. दुसऱ्या दिवशी ‘रेड-२’ चित्रपटाने ११.७५ कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. त्यामुळे चित्रपटाचं कलेक्शन ३१ कोटी इतकं झालं आहे. पहिल्या दिवसाच्या तुलनेत ‘रेड 2’चित्रपटाची दुसऱ्या दिवशीच्या कलेक्शनमध्ये घट झालेली पाहायला मिळत आहे. मात्र दोन…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील काही भागातील तापमानाचा पारा 40 अंश सेल्सिअसच्या पुढे गेला आहे. यातच आता उकाडयाने हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळणार आहे. महाराष्ट्रात पुढील तीन दिवसांमध्ये वादळी वाऱ्यांसह वीजांचा कडकडाट आणि मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. राज्यातील भंडारा, चंद्रपूर, गोंदिया आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे. तर विदर्भातही पावसाचा तडाखा राहील असा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे राज्यात अवकाळी पावसाची स्थिती निर्माण झाली आहे. विदर्भात काही ठिकाणी विजेच्या कडकडाटासह काही ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ऑरेंज अलर्ट जारी तर मध्य महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात 4 तारखेपासून ढगाळ वातावरणासह तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.…
अमळनेर : प्रतिनधी आई वडील ऊस तोडायला गेल्याने आसऱ्यासाठी ज्याच्याकडे ठेवले त्या चुलत मामानेच परित्यक्ता भाचीला तिच्या मुलीला मारण्याची धमकी देत अत्याचार केल्याची घटना तालुक्यातील एका गावात घडली. एका विवाहित महिलेचा पती दुसऱ्याच महिलेबरोबर पळून गेल्याने तिचा खावटीबाबत न्यायालयात खटला सुरू आहे. म्हणून ही महिला येथे आई वडिलांकडे राहात होती. महिलेचे आई वडील दसऱ्यानंतर ऊस तोडायला अहिल्यानगर येथे गेले होते. मुलीचा न्यायालयात खटला सुरू होता म्हणून ते आपल्या मुलीला तिच्या चुलत मामाकडे ठेवून गेले होते. चुलत मामाने आपल्या भाचीला आणि तिच्या मुलीला मारण्याची धमकी देत अत्याचार केला. पीडितेने दि. २९ एप्रिल रोजी अमळनेर पोलिसात फिर्याद दिली आहे.
जळगाव : प्रतिनिधी ठरवून दिलेल्या वेळेपेक्षा अधिक वेळ बिअर बार सुरू ठेवण्यासह त्या ठिकाणी सुरू असलेल्या पत्त्याच्या क्लबवर कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांना अरेरावी करीत धक्काबुक्की करण्यात आली. तसेच पोलिस ठाण्यात नेत असताना शासकीय वाहन अडवून तुम्ही नोकऱ्या कशा करतात ते पाहतोच, अशी पोलिसांना धमकी देण्यात आली. हा प्रकार १ मे रोजी रात्री एक वाजता आव्हाणे शिवारातील बारमध्ये घडला. या प्रकरणी दोघांविरुद्ध तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येऊन त्यांना अटक करण्यात आले आहे. सविस्तर वृत्त असे कि, आव्हाणे शिवारात नवीन महामार्गालगत गार्गी बिअर बार या नावाचे हॉटेल असून ते ठरवून दिलेल्या वेळेपेक्षा अधिक वेळ सुरू असल्याची माहिती तालुका पोलिसांना मिळाली. तसेच…
जळगाव : प्रतिनिधी पाच दिवसांपूर्वी रबरी शिक्के देण्यासाठी शहरात आलेल्या मोहम्मद शफी मोहम्मद मोमीन (७०, रा. मंचर, जि. पुणे) यांचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह शुक्रवारी (२ मे) नवीन बसस्थानकाशेजारील एका हॉटेलमध्ये आढळून आला. रबरी शिक्के दिल्यानंतर ते बेपत्ता होते. या प्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मोहम्मद शफी हे २८ एप्रिल रोजी न्यायालयात रबरी शिक्के देण्यासाठी आले होते. शिक्के दिल्यानंतर ते घरी परतले नाही. चार दिवस उलटले तरी त्यांचा शोध न लागल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यात त्यांचा शोध सुरू असताना शुक्रवारी सकाळी नवीन बसस्थानकाशेजारील एका हॉटेलमधील एका खोलीत मोहम्मद…
मेष राशी श्री गणेश म्हणतात की, गुंतवणुकीसाठी हा काळ खूप अनुकूल आहे. घरात बदल या विषयावरही महत्त्वाची चर्चा होईल. तुमच्या मार्गदर्शनाखाली मुलांना काही विशेष यश मिळू शकते. कुटुंबासोबत मनोरंजन आणि आरोग्याशी संबंधित कामांमध्येही वेळ घालवला जाईल. आळशीपणामुळे तुम्ही कोणत्याही कामाकडे दुर्लक्ष करू शकता, ज्यामुळे तुमच्या आर्थिक स्थितीवरही परिणाम होऊ शकतो. शहाणपणाने आणि सावधगिरीने काम करण्याची ही वेळ आहे. कामाच्या क्षेत्रात अडकलेले काम आता वेग घेईल. वृषभ राशी श्री गणेश म्हणतात की, तुम्ही तुमचा दैनंदिन दिनक्रम व्यवस्थित ठेवण्यासाठी काही नियोजन कराल आणि त्यात यशस्वी व्हाल. तुम्हाला मनाची शांती आणि तुमच्या आत ऊर्जा भरलेली वाटेल. इतरांच्या म्हणण्याकडे लक्ष देण्याऐवजी, तुमच्या कार्यक्षमतेवर आणि…
जळगाव : प्रतिनिधी ही मोहीम केवळ एका खड्ड्यापुरती मर्यादित नाही, तर ती आपल्या गावाच्या उज्ज्वल भविष्यासाठीचा संकल्प आहे, स्वच्छता म्हणजे फक्त शासकीय कार्यक्रम नाही, ती आपल्या संस्कृतीची ओळख असून सामूहिक जबाबदारीआहे. आजवर आपण घरटी शौचालय उभारून पहिला टप्पा पूर्ण केला आहे. पण आता वेळ आहे शिस्तबद्ध वापर, ओला-सुका कचरा विलगीकरण आणि त्याचे खतात रूपांतर यासाठी प्रत्यक्ष कृतीची. कंपोस्ट खड्डा हे घरातलं ‘सोनं’ आहे. यातून तयार होणारं खत हे शेतीला संजीवनी ठरेल. ग्रामस्थांनी स्वच्छतेसाठी शासनाला सहकार्य करण्याचे आवाहन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. “एक खड्डा… एक संकल्प – स्वच्छ गाव, समृद्ध गाव!” या प्रेरणादायी घोषवाक्याने महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या निमित्ताने…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था नॅशनल हेराल्ड मनी लाँड्रिंग प्रकरणात दिल्लीतील एका न्यायालयाने शुक्रवारी (दि.२) लोकसभेतील विरोधी पक्षनेते, काँग्रेस खासदार राहुल गांधी आणि काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांना नोटीस बजावली. काँग्रेसच्या निकटवर्तीयांसह इतर ६ जणांनादेखील नोटीस देण्यात आली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी ८ मे रोजी होणार असल्याचेदेखील न्यायालयाने म्हटले आहे. विशेष न्यायाधीश (पीसी कायदा) विशाल गोगणे यांनी सॅम पित्रोदा, सुमन दुबे, सुनील भंडारी, मेसर्स यंग इंडिया आणि मेसर्स डोटेक्स मर्चंडाइज प्रायव्हेट लिमिटेड यांनाही नोटीस बजावली आहे. न्यायाधीश गोगणे म्हणाले की, सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) त्यांच्या आरोपपत्रात ज्यांची नावे दिली आहेत, त्यांना नोटीस बजावताना सुनावणी घेण्याचा अधिकार आहे. नॅशनल हेराल्ड प्रकरण…

