बीड : वृत्तसंस्था गेल्या काही महिन्यापासून बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात बाहेर आल्यानंतर आता पुन्हा एकदा एक खळबळजनक घटना घडली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते व माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर करुणा शर्मा यांनी पुन्हा एकदा गंभीर आरोप केले आहेत. करुणा शर्मा यांनी ऑक्टोबर 2020 पासून पोटगीची 60 लाखांची थकबाकी धनंजय मुंडे यांनी द्यावी यासाठी वांद्रे कोर्टात तीन अर्ज दाखल केले आहेत. तसेच धनंजय मुंडे यांच्याकडून धमक्या आणि छळ सुरूच असल्याची लेखी तक्रार करुणा शर्मा यांनी कोर्टात दिली आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना, स्वतः धनंजय मुंडेंनी मला 18 तुकडे करण्याची धमकी दिली असल्याचे करुणा शर्मा यांनी सांगितले आहे. लव्ह जिहादपेक्षा जास्त माझ्यावर…
Author: editor desk
जळगाव : प्रतिनिधी स्त्रीच्या मनात अनेक प्रश्न असतात. त्याची उत्तरे मिळत नाहीत आणि स्त्रिया प्रश्न विचारायला संकोचतात तश्या घाबरतात. मुलींना मासिक पाळी का येते? वयाच्या ५०-५५ नंतर मासिक पाळी जाते, नेमकं काय होतं?. तिला भीती वाटत असते, आपली गरज संपली, म्हणून पाळी गेल्याची त्या आपल्या पतीला सांगत नाही, त्यातून त्यांचा कोंडमारा होतो. कुटुंबात विसंवाद सुरू होतो. हा संवाद शास्त्रीय द्दष्टीकोनातून साधण्याकरता दिनांक ६ मे २०२५ रोजी सकाळी १०.३० वाजता ग्रामपंचायत हॉल येथे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, मोहोपाडा रसायनी, ग्रुप ग्रामपंचायत वासांबे, आणि अक्षर मानव, मोहोपाडा रसायनी आयोजित करत आहे, तिच्या मनाचिये गुंती संवाद प्रत्येकाचा संवाद स्त्री मनाचा… हा संवाद फक्त…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था जम्मू आणि काश्मीरमधून एक धक्कादायक बातमी उघडकीस आली आहे. रामबन जिल्ह्यातील बॅटरी चष्मा येथे लष्कराचा ट्रक सुमारे २००-३०० मीटर दरीत कोसळल्याने तीन जवानांचा मृत्यू झाला. अमित कुमार, सुजीत कुमार आणि मान बहादूर अशी मृत जवानांची नावे आहेत. रविवारी जम्मूहून श्रीनगरला लष्काराचा ताफा जात असताना ही घटना घडली. रविवारी रामबन जिल्ह्यातील बॅटरी चष्मा भागात लष्कराचा ट्रक रस्त्यावरून घसरल्याने भीषण अपघात झाला. ट्रक खोल दरीत कोसळल्याने तीन जवानांना आपला जीव गमवावा लागला. लष्कर आणि स्थानिक प्रशासनाकडून बचाव कार्य करण्यात आले. जम्मू आणि काश्मीरमध्ये लष्कराच्या वाहनांशी संबंधित ही सहा महिन्यांतील तिसरी घटना आहे. यापूर्वी, ४ जानेवारी रोजी बांदीपोरा…
ठाणे : वृत्तसंस्था राज्यातील अनेक ठिकाणी धक्कादायक घटना घडत असतांना आता थरकाप उडविणारी घटना ठाणे येथील भिवंडीतून समोर आली आहे. शनिवारी एका महिलेसह तिच्या तीन मुलींचे मृतदेह गळफास घेऊन लटकलेल्या अवस्थेत आढळून आले आहेत. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली. पती नाईट शिफ्ट संपवून कामावरून सकाळी घरी परतला असता त्याला पत्नीसह मुलींचे मृतदेह पंख्याला लटकलेले दिसून आले. या दृश्याने त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली असून पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. मृत महिलेचे वय 32 वर्षे होते, तर तिच्या मुलींचे वय हे 4 वर्षे ते 12 वर्षे दरम्यान होते. पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, आम्ही चौकशी…
भडगाव : प्रतिनिधी तालुक्यातील वाक येथे गाडीस मागून जोरदार धडक देत चालकासह अन्य तिघांवर तलवार, कोयता, लाकडी दांडकाने वार करत जीवघेणा हल्ला करत गंभीर जखमी केले आहे. यात एका जणांच्या डाव्या हाताच्या मनगटाची नस तुटली असून, एकाच्या डोक्यात लाकडी दांडका हाणून गंभीर जखमी केले. हा थरार शुक्रवारी रात्री घडला. याबाबत पोलिस ठाण्याला ४ संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी धुळे येथे हलवण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, २ मे रोजी रात्री ११:३० वाजेच्या सुमारास राकेश पाटील हे वाक गावात उभे असताना योगेश कैलास पाटील, उमेश शालीक पाटील, सतीश शालीक पाटील, अक्षय बारकू पाटील, असे चारचाकी गाडी (एमएच४२/एयु४२४९)…
जळगाव : प्रतिनिधी घराचा व्यवहार होऊन बांधकाम व्यावसायिकास (बिल्डर) देण्यासाठी आणलेल्या दोन लाख ६५ हजार रुपयांसह १५ हजार रुपयांचे दागिने चोरट्यांनी घरातून लांबविल्याची घटना १ रोजी रात्री सत्यम पार्क भागात घडली. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शेती व्यवसाय असलेले राजू जगन्नाथ साळवे (५८, रा. सत्यम पार्क, सोपान नगर) यांच्या घराचा व्यवहार झाला. त्यासाठी बिल्डरला देण्यासाठी त्यांनी दोन लाख ६५ हजार रुपये घरात ठेवले होते. या घराला कुलूप लावून साळवे कुटुंबीय घरात झोपले होते. मध्यरात्री चोरट्यांनी घरात असलेले रोख दोन लाख ६५ हजार रुपयांसह १५ हजार रुपयांचे सोन्याचे कानातील टॉप, साकळ्या चोरून नेल्या.…
यावल : प्रतिनिधी तालुक्यातील चिंचोली येथे बऱ्हाणपूर-अंकलेश्वर महामार्गावर ३ मे रोजी मध्यरात्री २:३० वाजेच्या सुमारास भीषण अपघात घडला. गुजरातकडून भुसावळला येत असलेली एक चारचाकी चिंचोली ते धानोरादरम्यान रस्त्यालगत पडलेल्या मोठ्या निंबाच्या झाडावर आदळली. या अपघातात चार प्रवासी जखमी झाले असून, त्यातील एकाची प्रकृती गंभीर आहे. चारचाकीत प्रवास करणारे सर्व प्रवासी गुजरात राज्यातील आहेत. अपघाताची माहिती मिळताच पोलिसमित्र संजय साळुंखे, विजय पाटील, पिंटू सूर्यवंशी, देवीदास पाटील, सुनील पाटील, जनार्दन कोळी, आनंदा साळुंखे यांच्यासह घटनास्थळी धाव घेतली. जखमींना पुढील उपचारासाठी जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात हलविण्यात आले. महामार्गालगत असलेली २ झाडे कोसळत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. जिवंत झाड…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील कालिंका माता मंदिर परिसरात एका भरीत सेंटरनजीक तरुणासोबत वाद घालून नंतर त्याचा भोसकून खून करण्यात आल्याची घटना शनिवारी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास घडली. आकाश पंडित भावसार (३०, रा. आयोध्या नगर) असे खून करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. शहरात पुन्हा खुनाच्या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अयोध्यानगरमधील आकाश भावसार यांच्या घरी शनिवारी रात्री काही जण आले व त्यांनी आकाशविषयी विचारणा केली, परंतु त्या वेळी तो घरी सापडला नाही. त्यानंतर आकाशच्या पत्नीच्या मोबाईलवरूनच आकाश यास कॉल करून त्याची चौकशी करीत असतानाच कालिंका माता चौक परिसरात एका भरीत सेंटरवर आकाशशी काही जणांनी वाद घातला. वाद वाढत जाऊन तेथून…
मेष राशी आज पूर्ण होत आलेल्या कामात अडथळे येतील. पण काही प्रयत्नांनी परिस्थिती अनुकूल होऊ लागेल. ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. काही आधीपासून प्रलंबित राहिलेली कामं पूर्ण होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी गोंधळाची परिस्थिती निर्माण होऊ देऊ नका. वृषभ राशी आज, मालमत्तेशी संबंधित वाद लवकरात लवकर सोडवण्याचा प्रयत्न करा. आर्थिक बाबींमध्ये विचारपूर्वक निर्णय घ्या. घाईघाईत भांडवल गुंतवू नका. नाहीतर त्रास होऊ शकतो. मालमत्ता खरेदी-विक्रीशी संबंधित बाबींमध्ये तुम्हाला तुमच्या जवळच्या मित्रांकडून सहकार्य मिळेल. मिथुन राशी आज प्रेमसंबंधातील तुमच्या भावनांना सकारात्मक दिशा द्या. सकारात्मक विचारसरणीमुळे नात्यात अधिक गोडवा येईल. वैवाहिक जीवनात छोट्या-छोट्या गोष्टींवरून वाद होऊ शकतात. ते वाढू देऊ नका. कर्क राशी आज…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारमध्ये अंतर्गत राजकारण सुरु असल्याचे सातत्याने समोर येत असतांना आता अजित पवार आम्हाला निधी देत नाहीत, असा कांगावा करत शिवसेनेत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात मोठी बंडाळी झाली. त्यानंतर अनेक आमदारही हेच कारण देत त्यांच्यासोबत गेले. पण नंतर अजित पवारही महायुतीत आल्याने त्यांच्यावर दादांच्याच नेतृत्वात काम करण्याची विचित्र वेळ आली. त्यानंतर आता शिवसेनेच्या मंत्र्यांनी पुन्हा अजित पवार आमच्या खात्याचा निधी पळवतात असा धोशा लावला आहे. संजय शिरसाट यांनी अजित पवारांवर कोणतीही पूर्वकल्पना न देता लाडकी बहीण योजनेसाठी सामाजिक न्याय खात्याचा पहिल्यांदा 3 हजार कोटी, तर आता सव्वा चारशे कोटी रुपयांचा निधी पळवल्याचा आरोप केला आहे. यामुळे…

