जळगाव : प्रतिनिधी शहरातील गायत्री नगर परिसरातील ज्योती संदीप मेकलकर (वय ४५) हे नातेवाइकांकडे असलेल्या लग्न सोहळ्यासाठी गेलेल्या असतांना त्यांच्या बंद घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी रोख नऊ हजार रुपयांसह दागिने, चांदीचे पूजा साहित्य व लॅपटॉप चोरून नेला. ही घटना ३१ मे ते ६ जून दरम्यान गायत्री नगरात घडली. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, गायत्रीनगरातील ज्योती मेकलकर यांच्या नातेवाइकांकडे लग्न असल्याने त्या लग्नसोहळ्यासाठी गेलेल्या होत्या. त्यावेळी चोरट्यांनी घराच्या दरवाजाचे कुलूप तोडले. घरात प्रवेश करून लोखंडी कपाटातून रोख नऊ हजार रुपये, सहा हजार रुपये किमतीची सोन्याची बाळी, नथ, १० हजार रुपये…
Author: editor desk
जळगाव : प्रतिनिधी गांजा सेवन करणाऱ्या अमन मुस्ताक पटेल (२०, रा. शिवाजीनगर हुडको) याच्यावर एमआयडीसी पोलिसांनी कारवाई केली. आर. एल. चौफुलीजवळ दि. ६ जून रोजी गांजा सेवन करताना आढळला होता. याप्रकरणी पोकॉ. नितीन ठाकूर यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अमन पटेल याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस नाईक पंकज पाटील करीत आहेत. दरम्यान, गांजा सेवन करणाऱ्यांवर जिल्हाभरात पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात कारवाई केली जात आहे. गांजा सेवन करणाऱ्या व्यक्तींवर गुन्हा दाखल होत आहे. गेल्या महिनाभरापासून जळगाव शहरातदेखील गांजा सेवन करणाऱ्यांवर कारवाईचे सत्र सुरूच आहे.
भुसावळ : प्रतिनिधी शहरातील एका २१ वर्षीय तरुणीची तिघांनी छेडछाड करीत मारहाण आणि लूटमार केल्याची गंभीर घटना ७ जून रोजी संध्याकाळी घडली. या तरुणीच्या घरी शोलू (पूर्ण नाव माहीत नाही), आसिफ बेग ऊर्फ बाबा काल्या आणि सादिक इबाबत हे आले. तिघांनी शिवीगाळ करत तिचा विनयभंग केला. शोलू याने तिचे केस ओढले, तर बाबा काल्या याने मारहाण केली. सादिक इबाबत याने चाकू दाखवून ठार मारण्याची धमकी दिली. यावेळी तिच्या खिशातील चार ते पाच हजार रुपये काढून नेल्याचा आरोपही फिर्यादीत करण्यात आला आहे. ही घटना घडत असताना मरियम नाजिर, हिसा नौशिर आणि फातेमा हिसा यांनी पीडितेलाआरोपींच्या तावडीतून सोडविले. बाजारपेठ पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा…
मेष – श्रीगणेश सांगतात की, ग्रहांची स्थिती अत्यंत अनुकूल आहे. तुम्हाला सामाजिक कार्यांमध्ये रस वाटेल आणि त्याचवेळी तुमचे ध्येय गाठणे हेसुद्धा तुमचं प्राधान्य असेल, आणि त्यात तुम्हाला यश मिळेल. कोणताही वाद शांततेने सोडवण्याचा प्रयत्न करा. तणाव घेणे कार्यक्षमता कमी करू शकते. मुलांसोबत थोडा वेळ घालवणे अत्यावश्यक आहे. व्यवसायात कामे योग्य पद्धतीने पूर्ण होतील. भागीदारीसाठी अनुकूल काळ आहे. नोकरीत असलेल्या लोकांना बदलाबाबत काही चांगली बातमी मिळू शकते. वृषभ – महत्त्वाच्या लोकांसोबत भेट लाभदायक ठरेल. घर व व्यवसाय या दोन्ही ठिकाणी योग्य समन्वय राहील. मालमत्तेसंदर्भातील रखडलेला प्रश्न सुटेल. काही संभ्रम निर्माण होऊ शकतात, मात्र तणाव न घेता शांतपणे समस्या सोडवा. धोकादायक कृती टाळा. वाहन…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशभरात अल्पवयीन मुलीसह विवाहितेवर अत्याचाराच्या घटना घडत असतांना आता राजधानी दिल्लीतून एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. 9 वर्षीय चिमुकलीचा सूटकेसमध्ये मृतहेद आढळला आहे. ज्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. एवढंच नाही तर, चिमुकलीवर बलात्कार झाल्याची देखील शक्यता याठिकाणी वर्तवण्यात येत आहे. पुन्हा एकदा धक्कादायक घटना समोर आल्यानंतर मुली खरंच सुरक्षित आहेत का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. उत्तर पुर्व दिल्लीच्या दयालपूर भागात डी ब्लॉकमध्ये एका 9 वर्षाच्या मुलीचा मृतदेह एका सुटकेसमध्ये सापडल्यानं खळबळ उडाली आहे. सध्या याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, चिमुकली घरातून चुलतीला बर्फ देण्यासाठी निघाली होती. पण फार उशीर…
मुंबई : वृत्तसंस्था गेल्या काही दिवसापासून वातावरणात बदल होत असतांना आता मुंबई, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील घाट भागांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा हवामानशास्त्र विभागाने दिला आहे. तर मराठवाडा, विदर्भातील जिल्ह्यांमध्येही मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. 8 जून रोजी संपूर्ण राज्यामध्ये पाऊस सक्रिय राहणार आहे. बहुतांश जिल्ह्यांमध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. मुंबई, ठाणे सामान्यतः ढगाळ आकाश राहून मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर कोकण विभागातील रायगड आणि रत्नागिरीला 8 जूनसाठी हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि सोलापूरमध्ये…
जळगाव : प्रतिनिधी पाचोरा तालुक्यातील पिंपळगांव हरेश्वर येथून जवळ असलेल्या शेवाळे गावात एका वृद्ध महिलेवर निर्घृण हल्ला करून तिचा खून केल्याची घटना ५ जून २०२५ रोजी रात्री घडली. या गुन्ह्याचा छडा स्थानिक गुन्हे शाखा जळगाव व पिंपळगांव हरेश्वर पोलिसांच्या संयुक्त तपासातून केवळ ४८ तासांत लागला असून तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. सविस्तर वृत्त असे कि, गेल्या गुरुवारी रात्री ९ ते ११ वाजेच्या दरम्यान शेवाळे गावातील श्रीमती जनाबाई महारु पाटील (वय ८५ वर्षे) यांच्या राहत्या घरात अज्ञात इसमांनी मागच्या दरवाजातून प्रवेश केला. त्यानंतर त्यांच्या डोक्यावर टणक हत्याराने वार करून त्यांचा निर्घृण खून करण्यात आला. तसेच त्यांच्या कानातील सोन्याचे दागिने जबरदस्तीने…
धरणगाव : प्रतिनिधी तालुक्यातील पाळधी येथून जवळच असलेल्या वराड गावात तलवार घेऊन फिरणाऱ्या अन् दहशत माजवणाऱ्या २५ वर्षीय तरुणास पाळधी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सविस्तर वृत्त असे कि, येथून जवळच असलेल्या वराड गावात एक तरुण हातात तलवार घेऊन फिरत असून दहशत निर्माण करत असल्याची माहिती पाळधी पोलिसांनी मिळाली होती. त्यानंतर तत्काळ पाळधी पोलिसांनी तेथे धाव घेतली. या वेळी तेथे राहुल आधार येशराय (वय २५, रा. वराड) हा तरुण हातात तलवार घेऊन फिरत असताना आढळून आला. त्याला पोलिसांनी तलवारीसह ताब्यात घेऊन पाळधी पोलीस चौकीत आणले. त्या नंतर त्याच्यावर विविध कलमांनुसार कारवाई करून त्याला अटक केली आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.…
पाचोरा : प्रतिनिधी तालुक्यातील बाळद येथील २६ वर्षीय तरुणाने आपल्या शेतातच गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली. आत्महत्येचे कारण गुलदस्त्यातच आहे. सविस्तर वृत्त असे कि, बाळद येथील समाधान बाळू चव्हाण हा पुण्यातील एका नामांकित कंपनीत अभियंता म्हणून गेल्या पाच सहा वर्षांपासून नोकरीला होता. शनिवारी सकाळी तो पुण्याहून बाळदला आल्यावर त्यांने आपल्या स्वतःच्या शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच, गावातील ग्रामस्थांसह पोलिस पाटील नितीन पाटील यांनी नगरदेवळा दूरक्षेत्राला घटनेची माहिती दिली. समाधान चव्हाण याची घरची परिस्थिती अतिशय हलाखीची होती. वडिलांचा व्यवसाय शेती असून, मुलाच्या शिक्षणासाठी त्यांनी आपले शेत विकून त्याचे शिक्षण पूर्ण केले. शिक्षणानंतर त्याला पुण्यातील एका नामांकित कंपनीत पाच-सहा…
भुसावळ : प्रतिनिधी शहरातील अकबर टॉकीज परिसरात शुक्रवारी सायंकाळी ७:३० वाजता डॉ. फिरोज खान यांच्या दवाखान्यात त्यांचे सहकारी मोहम्मद अली आणि आवेश खान यांना मारहाण करण्यात आली. रुग्णालयात विनाकारण बसण्यावरून झालेल्या वादातून ८ जणांच्या टोळीने दोघांवर हल्ला केला. या प्रकरणी डॉ. फिरोज खान (रा. खडका रोड, भुसावळ) यांनी शहर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, संशयित आरोपी अजीम खान, रजीम खान, कैफ खान, सैफ खान, साहिल खान, सोहेल खान, मजेत खान व शफिक खान (सर्व रा. अकबर टॉकीज परिसर, भुसावळ) यांनी रागाच्या भरात मोहम्मद अली व आवेश खान या डॉक्टरच्या सहकाऱ्यांना बेदम मारहाण केली. लोखंडी रॉड व लाकडी दांडक्यांनी केलेल्या हल्ल्यामुळे दोघे…

