Author: editor desk

जळगाव : प्रतिनिधी तालुक्यातील तुरखेडा येथील 74 वर्षीय शेतकरी रमेश उत्तम धीवर यांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर वाढल्याने त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवारी (९ जून) तुरखेडा शिवारात घडली. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सविस्तर वृत्त असे कि, रमेश धीवर यांनी शेतीसाठी कर्ज घेतलेले होते. मात्र हवे तसे उत्पन्न येत नसल्याने त्यांच्यावर कर्ज वाढत गेले. कर्ज कसे फेडावे या विवंचनेत ते असायचे. त्यात त्यांनी सोमवारी शेतात गळफास घेतला. हा प्रकार त्यांच्या मुलाच्या लक्षात आला. त्यावेळी त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. असता डॉक्टरांनी मयत घोषित केले. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची…

Read More

जळगाव : प्रतिनिधी दक्षिण भारतात फिरण्यासाठी गेलेल्या कुटुंबीयांच्या वाहनावर भरधाव कंटेनर येऊन धडकल्याने ऋषभ सुरेशचंद तोडरवाल (३८) व त्यांची पत्नी वृषाली ऋषभ तोडरवाल (३६) दोन्ही रा. देवकर नगर, जळगाव हे ठार झाले. यात तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. दाम्पत्याचे दोन्ही मुले व सासरे दुकानावर गेलेले असल्याने ते सुखरुप आहेत. हा अपघात रविवारी (८ जून) तामिळनाडुतील वेलूर जवळ झाला. मंगळवारी रात्री मयताचे मृतदेह जळगावात पोहचले. जळगावातील रहिवासी व सावदा येथे सुवर्ण पेढीमध्ये व्यवस्थापक असलेले ऋषभ तोडरवाल हे पत्नी वृषाली, मुलगी चहेती (११), मुलगा तक्ष (७) सासरे, आते सासू यांच्यासह दोन चालक घेऊन वाहनाने चेन्नई व दक्षिण भारतातील इतर ठिकाणी फिरण्यासाठी…

Read More

मेष राशी मेष राशीच्या व्यक्तींनी स्वतःच्या आरोग्याकडे आणि मानसिक स्थितीकडे अधिक लक्ष देणे गरजेचे आहे. आज तुम्हाला कामात भरपूर उत्साह जाणवेल. तुम्ही तुमच्या जबाबदाऱ्या अत्यंत चांगल्या प्रकारे पार पाडाल. कुटुंबासोबत विशेषतः आई-वडिलांसोबत वेळ घालवाल. यामुळे नातेसंबंध अधिक मजबूत होतील. आर्थिक बाबतीत चढ-उतार दिसू शकतात. त्यामुळे खर्चावर नियंत्रण ठेवणे महत्त्वाचे आहे. कठीण परिस्थितीला सामोरे जाऊन त्यावर मात कराल. वृषभ राशी वृषभ राशीच्या व्यक्तींची आज तुमची आर्थिक परिस्थिती थोडी गडबडू शकते. त्यामुळे कोणत्याही मोठ्या निर्णयांमध्ये सावधगिरी बाळगा. सतत काम करण्याऐवजी छोटे ब्रेक घ्या. यामुळे तुमची कार्यक्षमता टिकून राहील. तुम्ही थकणार नाही. तुमच्या बॉसशी बोलताना किंवा महत्त्वाच्या चर्चा करताना शहाणपणाने आणि विचारपूर्वक बोला.…

Read More

चाळीसगाव : प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून आमदार मंगेश दादा चव्हाण यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेली ७ जून ते १० जून या कालावधीत आयोजित करण्यात आलेली ‘रायगड मोहीम 2025’ यंदाही उत्साहात आणि मोठ्या प्रमाणात पार पडली. या मोहिमेद्वारे चाळीसगाव विधानसभा मतदारसंघातील हजारो शिवभक्त, विद्यार्थी आणि तरुणाईने रायगडाचा इतिहास प्रत्यक्ष अनुभवला. गेल्या पाच वर्षांपासून सुरू असलेल्या या ऐतिहासिक मोहिमेचे यंदाचे आयोजन अधिक भव्य स्वरूपात झाले. छत्रपती शिवाजी महाराजांचे सिंहासनाधीश रूप व भव्य-दिव्य दुर्गराज रायगडचे स्वरूप मनात साठवत चाळीसगाव तालुक्यातील हजारो शिवभक्तांचा ताफा आज भल्या पहाटे चाळीसगाव येथे सुखरूप परतला व रायगड मोहिमेची यशस्वी सांगता झाली. रायगडावरील मुख्य शिवराज्याभिषेक…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था महायुती सरकारचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (दि. १० जून) झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोगास वैधानिक दर्जा देण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. आगामी विधिमंडळ अधिवेशनात याबाबत विधेयक आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील शासकीय भौतिकोपचार आणि व्यवसायोपचार पदवी विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनात वाढ करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील शासकीय भौतिकोपचार आणि व्यवसायोपचार पदवी विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनात 6,250रुपयांची वाढ,पदव्युत्तर पदवी विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनात 10,000 ची वाढ, तर बी.एस्‍सी. नर्सिंग अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनाही मिळणार 8,000 विद्यावेतन (वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये) सामाजिक न्याय विभाग : महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोगास वैधानिक दर्जा.…

Read More

पुणे : वृत्तसंस्था पतीच्या आयुष्याची दोरी बळकट होऊ दे, अशी प्रार्थना करण्याचा सण वडाला धागा बांधून वटपौर्णिमा यंदा महिलांना दोन दिवस साजरी करता येणार आहे. यंदा मंगळवारी (दि.१०) साडेअकरानंतर पाैर्णिमेला प्रारंभ होणार आहे. त्यामुळे या दिवशी सकाळी वटपुजन न करता दुपारनंतर महिला वटपूजन करणार आहेत. बुधवारी (दि.१०) सुर्याने पाहिलेली तिथी याही दिवशी दुपारी १.१५ वाजेपर्यंत पौर्णिमा असणार आहे. त्यामुळे यंदा दोन दिवस सुवासिनी महिलांना वटपूजनाची संधी मिळणार आहे. वटपौर्णिमेचा उपवास करुन सुवासिनी वडाला धागा गुंडाळून पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली जाते. भ्रदायोग असला तरी वटपौर्णिमा करता येते, अभ्यासकांनी स्पष्ट केले. दरम्यान, वटपौर्णिमेच्या पूर्वसंध्येला बाजारात महिलांची भाज्या, आंबे खरेदीसाठी मोठी गर्दी केली…

Read More

जळगाव : प्रतिनिधी गेल्या काही दिवसापासून शहरातील अनेक ठिकाणी तलवार व कोयत्यासारखी शस्त्रे घेऊन खुलेआम फिरून दहशत माजवण्याचे प्रकार समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली अशा व्यक्तींविरोधात विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. याच मोहिमेअंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेने इस्माइल गल्लीतून एका संशयितास अटक केली आहे. सविस्तर वृत्त असे कि, दिनांक ९ जून २०२५ रोजी पो.ना. श्रीकृष्ण ईश्वरू यांनी मिळवलेल्या गुप्त माहितीच्या आधारे, शेळके व महालक्ष्मी माता मंदिर, तपोवन येथे एक इस्माइल बोबडे नावाचा युवक तलवार व कोयता घेऊन फिरत असल्याची माहिती समोर आली. यावरून पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली सापळा रचण्यात आला.…

Read More

जळगाव : प्रतिनिधी मध्यप्रदेशातून गावठी कट्टूयाची तस्करी करणाऱ्यांना पथकाने थांबवले. मात्र ते पोलिसांच्या तावडीतून सुटून पळून जावू लागले. एलसीबीच्या पथकाने त्यांचा सिनेस्टाईल पाठलाग करीत संशयित गोविंदसिंग ठानसिंग बरनाला (वय ४५, रा. शिरवेल महादेव, ता. भगवानपुरा, मध्यप्रदेश) व निसानसिंग जीवनसिंग बरनाला (वय २३, रा. उमर्टी, ता. वरला, जि. बडवाणी. ह. मु. शिरवेल महादेव, ता. भगवानपुरा, मध्यप्रदेश) यांना अटक केली. त्यांच्याकडून दोन दुचाकींसह दोन गावठी कट्टे हस्तगत केले. सविस्तर वृत्त असे कि, मध्यप्रदेशातील सिरवेल येथून अवैधरित्या गावठी कट्टे विक्री करणारे दोन जण रावेर तालुक्यातील पाल मार्गे महाराष्ट्रात येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेतील सफौ रवी नरवाडे व पोहेकॉ गोपाळ गव्हाळे यांना मिळाली…

Read More

जळगाव : प्रतिनिधी कासमवाडी परिसरातील आठवडे बाजारात खरेदीसाठी गेलेल्या एका महिलेच्या गळ्यातून अज्ञात चोरट्याने १७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे फॅन्सी मंगळसूत्र लंपास केल्याची घटना ७ जून रोजी सायंकाळी ५:३० वाजता घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, जयश्री संजय धरम (वय ३०, रा. महाबळ) या ७ जून रोजी संध्याकाळी ५:३० ते ७:४५ वाजण्याच्या सुमारास शहरातील कासमवाडी भागात, आठवडे बाजार परिसरात एका हॉस्पिटलसमोरील रोडवर उभ्या होत्या. याचवेळी गर्दीचा फायदा घेऊन, कोणीतरी अज्ञात चोरट्याने त्यांच्या गळ्यातील सुमारे १७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे फॅन्सी मंगळसूत्र चोरून नेले. या प्रकारानंतर जयश्री धरम यांनी तात्काळ एमआयडीसी पोलिसांकडे धाव…

Read More

जळगाव : प्रतिनिधी वाढदिवसाच्या दिवशी नवीन गॉगल घेण्यासाठी आलेल्या एका तरुणाला गॉगल चोरल्याच्या संशयावरून गोलाणी मार्केटमध्ये बेदम मारहाण झाल्याची धक्कादायक घटना सोमवारी दुपारी ४:०० वाजता घडली. या प्रकारामुळे मार्केटमध्ये काही काळ तणावाचे वातावरण निर्माण होऊन दुकाने बंद करण्यात आली होती. सविस्तर वृत्त असे कि, चौघुले प्लॉटमधील एका तरुणाचा सोमवारी वाढदिवस होता. वाढदिवसानिमित्त दुपारी ४:०० वाजण्याच्या सुमारास तो गोलाणी मार्केटमधील एका दुकानात गॉगल घेण्यासाठी गेला होता. शाब्दिक वादाचे रुपांतर हाणामारीत झाल्यानंतर दुकानदाराने आपल्या इतर मित्रांना बोलावून घेत त्या तरुणाला बेदम मारहाण केली. ही हाणामारी सुरू झाल्यामुळे मार्केटमध्ये एकच गोंधळ उडाला. त्यामुळे मार्केटमध्ये पळापळ सुरू झाली. या घटनेमुळे मार्केटमध्ये मोठी गर्दी जमली…

Read More