Author: editor desk

जळगाव : प्रतिनिधी लग्नात मानपान न दिल्याच्या कारणावरून आणि पतीच्या व्यवसायासाठी माहेरून १० लाख रुपये आणण्याची मागणी करत जळगावचे माहेर असलेल्या विवाहितेचा मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात महिलेच्या पतीसह सासरच्या ९ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, शहरातील नेहरू नगर परिसरातील सपना सुदर्शन पाटील (वय ३९) यांचा विवाह जळगाव तालुक्यातील पाथरी येथील सुदर्शन रवींद्रसिंग पाटील यांच्याशी झाला आहे. सपना पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सासरच्या मंडळींनी लग्नात मानपान न दिल्यावरून शिवीगाळ केली. याशिवाय सपना पाटील यांना शासकीय नोकरीतून येणाऱ्या पूर्ण पगाराची मागणी करत आणि पतीच्या व्यवसायासाठी माहेरून १०…

Read More

नेवासा : वृत्तसंस्था बंगळुरू येथे आयपीएलचा जल्लोष ११ क्रिकेटप्रेमींच्या मृत्यूचे कारण ठरल्याची घटना ताजी असतानाच आता महाराष्ट्र प्रीमियर लीग (एमपीएल) चे बोदवडचे चाहते आणि उदयोन्मुख क्रिकेटपटूंवरही आपत्ती कोसळली आहे. पुणे येथे एमपीएलचा सामना पाहून परत येणाऱ्या या क्रिकेटप्रेमींचे वाहन नेवासा तालुक्यातील उस्थळ दुमाला शिवारात सोमवारी पहाटे सव्वापाचच्या सुमारास ट्रकवर मागच्या बाजूने आदळले. या अपघातात दोन जण ठार तर चालक व तीन प्रशिक्षकांसह १५ जण जखमी झाले आहे. यात प्रथमेश योगेश तेली (वय १४, रा. बोदवड) याचा जागेवरच तर ऋषभ बबनराव सोनवणे (१४, रा. चिखली, ता. बोदवड) याचा उपचारादरम्यान नगर येथील रुग्णालयात मृत्यू झाला. जखमींवर नेवासा फाटा येथे उपचार करण्यात येत…

Read More

मेष राशी आजचा दिवस मेष राशीसाठी भाग्यवान ठरेल. तुम्हाला तुमच्या नशिबाची पूर्ण साथ मिळेल. ज्यामुळे अनेक अडलेली कामे मार्गी लागतील. अनावश्यक खर्च टाळून तुम्ही तुमच्या आर्थिक स्थितीवर नियंत्रण ठेवू शकाल. कामावर अधिक लक्ष केंद्रित करा. तुमच्या जीवनसाथीकडून आर्थिक पाठबळ मिळण्याची शक्यता आहे. उत्पन्न वाढवण्यासाठी आणि चांगल्या प्रकल्पांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी ही एक उत्तम संधी आहे. संधीचा फायदा घ्या. आर्थिकदृष्ट्या स्वतःला अधिक मजबूत करा. वृषभ राशी वृषभ राशीच्या व्यक्तींचा आज आत्मविश्वास वाढलेला दिसेल. कामाच्या ठिकाणी तुमचे सहकारी आणि वरिष्ठ अधिकारी तुम्हाला पूर्णपणे पाठिंबा देतील. ज्यामुळे तुमचे उद्दिष्ट्ये साध्य करणे सोपे होईल. तुम्हाला बोनस किंवा वेतनवाढ मिळण्याची शक्यता आहे. ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती…

Read More

यावल : प्रतिनिधी तालुक्यातील कोरपावली येथील शेळ्या मेंढ्या चालून उदरनिर्वाह करणाऱ्या एका अठरा वर्षीय तरुणाला सांडपाण्याच्या खड्ड्यामध्ये पडल्याने त्याचा चिखलात गुदमरून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना यावल तालुक्यातील कोरपावली गावाबाहेर आठ जून रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास घडली यामुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे. यात जयेश संतोष महाजन (वय १८, रा. कोरपावली, ता. यावल) असे मयत तरुणाचे नाव आहे. सविस्तर वृत्त असे कि, कोरपावली गावाच्या बाहेर असणाऱ्या सांडपाण्याच्या खड्ड्यातील चिखलात आठ जून रोजी सायंकाळी सात वाजता जयेश महाजन हा नेहमीप्रमाणे शेळ्या मेंढ्या चारून येत असताना यातील एक शेळी खड्ड्यात पडल्याने त्याने तिला वाचवण्यासाठी तो देखील खड्ड्यात उतरण्याच्या प्रयत्नात त्याचा तोल जाऊन…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील मध्य रेल्वेच्या दिवा ते मुंब्रा स्थानकादरम्यान मोठी दुर्घटना घडली आहे. कसाऱ्याहून सीएसएमटीकडे जाणाऱ्या लोकलमधून पडून ६ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. एक लोकल कसाऱ्याच्या दिशेनं येत होती. तर, दुसरी लोकल सीएसएमटीच्या दिशेनं जात होती. दिवा आणि मुंब्रा स्थानकादरम्यान, या दोन्ही धावत्या लोकल एकमेकांच्या जवळून गेल्याने  फुटबोर्डवर उभे असलेल्या प्रवाशांचा तोल जाऊन काही प्रवासी खाली पडले. सेंट्रल रेल्वे दिलेल्या माहितीनुसार, ठाण्यातील मुंब्रा रेल्वे स्थानकावर सीएसएमटीकडे जाणारे काही प्रवासी लोकलमधून पडले. लोकलमध्ये जास्त गर्दी असल्यामुळे हा अपघात असल्याची माहिती आहे. रेल्वे आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, जखमींवर रूग्णालयात उपचार सुरू आहे. या घटनेवर शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे.…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था क्रिकेटप्रेमीसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. वेस्ट इंडिज आणि द. आफ्रिकेचे संघ या वर्षी भारत दौ-यावर येणार आहेत. दरम्यान, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) या दौ-यांच्या वेळापत्रकात काही बदल केले आहेत. टीम इंडिया आणि वेस्ट इंडिज यांच्यात ऑक्टोबरमध्ये दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. त्यानंतर, नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये द. आफ्रिकेविरुद्ध दोन कसोटी, तीन एकदिवसीय आणि पाच टी-20 सामन्यांच्या मालिका खेळवल्या जातील. वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना 10 ऑक्टोबरपासून कोलकात्यातील ऐतिहासिक ईडन गार्डन्सवर खेळवला जाणार होता, पण सुधारित वेळापत्रकानुसार, हा सामना आता नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळवला जाईल. त्यानंतर भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला कसोटी…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था मुंबईहून लखनऊकडे जाणाऱ्या पुष्पक एक्सप्रेसमधून तब्बल आठ ते बारा प्रवासी पडल्याची धक्कादायक घटना शनिवारी घडली. सोमवार (९ जून) सकाळी घडली आहे. सहा जणांचा मृत्यू झाला असून उर्वरित जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना दिवा ते कोपर रेल्वे स्थानकादरम्यान घडल्याचे प्राथमिक माहितीवरून समोर आले आहे. ANI ने दिलेल्या माहितीनुसार ही घटना सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास घडली. शाळा-महाविद्यालये आणि कार्यालयांना जाणाऱ्या प्रवाशांनी लोकलमध्ये प्रचंड गर्दी केली होती. या गर्दीत काही प्रवासी दरवाजावर उभे होते. गर्दी आणि धक्काबुक्कीमुळे संतुलन बिघडून तब्बल आठ ते बारा प्रवासी खाली पडले असल्याची प्राथमिक माहिती समोर आलेली आहे. प्राथमिक माहितीनुसार यातील सहा जणांचा…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था गेल्या जवळपास दोन आठवड्यापासून राज्यातील मान्सूनचा प्रवास पूर्णपणे रखडला आहे, आणि किमान 15 जूनपर्यंत तरी तो रखडलेलाच राहणार आहे. यामुळे 14 जूनपर्यंत पश्चिम किनारपट्टी वगळता राज्यातील विविध भागांमधील तापमानात वाढ होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. प्रामुख्याने विदर्भ, मराठवाडा, आणि खानदेशातील कमाल तापमान अधिक राहण्याचा अंदाज आहे. या दरम्यान पूर्व विदर्भात कमाल तापमानात अजून वाढ होऊन ते 45 अंशापर्यंत जाण्याचा अंदाज आहे, तर विदर्भातील बऱ्याच भागात कमाल तापमान 40 अंशापेक्षा अधिक राहणार असल्याचा अंदाज आहे. मराठवाडा आणि खानदेशातील अनेक भागात कमाल तापमान 40 अंशाच्या आसपास राहण्याचा अंदाज देखील आहे. 14 जूनपर्यंत राज्यात सार्वत्रिक आणि मान्सूनचा पाऊस अपेक्षित नाही.…

Read More

एरंडोल : प्रतिनिधी तालुक्यातील निपाणे येथील आनंदनगर तांडा येथील शेतकरी श्रीराम सखाराम राठोड (२६) याने रविवारी पहाटे ५ वाजता घरात दोरीच्या साहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली. सविस्तर वृत्त असे कि, श्रीराम राठोड यांना एक नऊ महिन्यांची मुलगी आहे. मागील वर्षी शेतात कपाशी पिकाची लागवड केली, परंतु निसर्गाने साथ दिली नाही. उत्पन्न जेमतेम आले, पण कपाशीला भाव नाही. बाहेरून लोकांचे उसनवारीचे पैसे कसे द्यावे, याने नेहमी विचार करत असे. वृद्ध आई आणि पत्नी श्रीराम राठोड यांना धीर देत होते, परंतु ते नेहमी चिंतेत राहत असे. श्रीराम सखाराम राठोड यांनी दि. ८ रोजी सकाळी घराला दोरीच्या साहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली. ही…

Read More

जळगाव : प्रतिनिधी महापालिकेच्या कचरा संकलनाच्या वाहनामध्ये प्राण्यांचे संशयास्पद अवशेष आढळून आल्याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अनोळखीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही बाब हिंदुत्ववादी संघटनांना समजताच पदाधिकारी व कार्यकर्ते आक्रमक झाले होते व यामुळे तालुका पोलिस ठाणे परिसरात काहीसे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. रात्री या प्रकरणी अनोळखींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, रविवारी सकाळी महापालिकेचे कचरा संकलित करणारे वाहन (एमएच १९, एम ९३८९) मास्टर कॉलनीत कचरा संकलित करीत असताना त्यात प्राण्यांचे आक्षेपार्ह अवशेष टाकण्यात आले. दुपारी तीनच्या सुमारास हे वाहन कचरा डेपो येथे कचरा खाली करीत असताना त्या ठिकाणी दुसरे वाहनदेखील (एमएच १९, एम ९३८५)…

Read More