Author: editor desk

जळगाव : प्रतिनिधी पोलिस ठाण्यात तक्रार का केली, या कारणावरून वाद होऊन एकमेकांना शिवीगाळ करीत सळईने मारहाण करण्यासह कोयत्याने वार करण्यात आले. ही घटना १० जून रोजी पिंप्राळा हुडको परिसरात घडली. परस्परविरोधी तक्रारीवरून एकूण आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील पिंप्राळा हुडको परिसरातील रहिवासी किरण अर्जुन सोये ( वय३१) यांनी रामानंदनगर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, पिंप्राळा हुडको परिसरातील चार जणांनी त्यांना मारहाण करत जखमी केले. दुसऱ्या गटातील बेबाबाई अभिमान भालेराव यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, आमच्या विरुद्ध पोलिसात तक्रार का केली म्हणत त्यांना चौघांनी मारहाण करून कोयत्याने वार केले. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली…

Read More

मेष राशी आजचा दिवस तुमच्यासाठी खूपच चांगला राहील. बऱ्याच काळापासून मनात असलेली एखादी इच्छा आज पूर्ण होऊ शकते, ज्यामुळे तुम्ही खूप आनंदी असाल. व्यापारी वर्गासाठी आजचा दिवस फायदेशीर ठरेल. तुम्ही व्यवसायाच्या कामासाठी प्रवासाला जाऊ शकता. वैवाहिक आयुष्यात प्रेम वाढेल. तुमचा जोडीदार तुम्हाला कोणतीतरी प्रॉपर्टी खरेदी करण्यास सांगू शकतो. वृषभ राशी आजचा दिवस वृषभ राशीच्या लोकांसाठी खर्चाचा असेल. तुम्हाला तुमच्या जोडीदारासोबत शॉपिंगला जायला लागू शकते. ज्यामुळे तुमच्या खिशावर परिणाम होईल. आरोग्याची काळजी घ्या. आर्थिक बाबतीत आजचा दिवस थोडा कमजोर असू शकतो. कोणत्याही गोष्टीबद्दल अति-आत्मविश्वास ठेवू नका. कामाच्या बाबतीत आजचा दिवस चांगला ठरेल. विवाहित लोकांच्या जीवनात आज थोडा तणाव वाढू शकतो. मिथुन…

Read More

पुणे : वृत्तसंस्था राज्यातील अनेक शहरात अपघाताच्या घटना घडत असतांना पुण्यात भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. भरधाव ट्रकने एका महिलेला चिरडले असून या महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना पुण्यातील मार्केट यार्ड येथील गंगाधाम चौकात घडली. बुधवारी सकाळी सव्वा अकराच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, दीपाली सोनी (वय 29) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. तसेच या अपघातात जगदीश पन्नालाल सोनी (वय 61) असे जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या अपघातानंतर मार्केट यार्ड पोलिसांनी ट्रक चालक शौकत आली पापालाल कुलकुंडी (वय 51) यास ताब्यात घेतले असून वैद्यकीय तपासणी केली जात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मार्केट…

Read More

चाळीसगाव : प्रतिनिधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बनावट सहीचे जॉइनिंग लेटर देऊन मंत्रालयात नोकरी लावण्याचे आमिष दाखवत चाळीसगावमधील एका तरुणीची फसवणूक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी चाळीसगाव तालुक्यातील तिघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तपास सुरू केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चाळीसगाव तालुक्यातील सायगाव येथील तरुणीला मुंबई येथील मंत्रालयात क्लार्क पदावर नोकरी लावण्याचे आमिष दाखवण्यात आले. तिच्याकडे देण्यात आलेले जॉइनिंग लेटर हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या लेटरपॅडवर आणि बनावट सहीसह तयार करण्यात आले होते. त्यामुळे ते खरे असल्याचा भास झाला. मात्र, मुख्यमंत्री कार्यालयाच्या नियमानुसार अशा लेटरवर संबंधित विभागप्रमुख अथवा सचिवांची सही असते, हे लक्षात आल्यावर…

Read More

पुणे : वृत्तसंस्था महायुतीचे सरकार स्थापन झाल्यापासून अनेक महत्वाचे निर्णय घेत असतांना आता महाराष्ट्राच्या परिवहन खात्यातील (एसटी) सर्व बसेस इलेक्ट्रीक करणार असून पुढील 10 वर्षात जुन्या एसटी बसेस टप्प्प्याने बंद केल्या जातील आणि त्या जागी नवीन बसेस येतील, अशी घोषणा राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी पुण्यात केली.  तसेच राज्यातील सर्व एसटी बस आणि डेपो अद्ययावत करण्याचे काम दोन महिन्यात सुरू होणार असून सुरक्षा आणि स्वच्छता याचा विचार करून काम केले जाईल, असे आश्वासन सरनाईकांनी दिले. प्रताप सरनाईक हे बुधवारी कार्यक्रमानिमित्त पुण्यात होते. माध्यमांशी संवाद साधताना सरनाईक यांनी एसटीच्या विकासाचा प्लानच मांडला. एसटी खात्यात 5 हजार बस घेणार असू तर…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था गेल्या काही महिन्यापासून राज्यातील भाजपचे मंत्री व ठाकरे गटाच्या नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु असतांना आता धाराशिव येथे आयोजित केलेल्या भाजपच्या कार्यकर्ता मेळाव्यात नितेश राणे उपस्थित राहिले होते. यावेळी नितेश राणे यांनी सगळ्यांचा बाप म्हणून भारतीय जनता पार्टीचाच मुख्यमंत्री बसलाय, हे लक्षात ठेवा, अशी धमकीच घटक पक्षातील नेत्यांना दिली होती. नितेश राणे यांच्यामुळे सत्ताधारी गटात अंतर्गत संघर्ष निर्माण झाला आहे. त्यांच्या या वक्तव्याबद्दल शिंदे गटाने मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर तीव्र नाराजी व्यक्त केली होती. एवढंच नाही तर, ‘आमचा बाप बाळासाहेब ठाकरे आहेत, तुमचा कोण?’, असा सवाल शिवसेनेच्या मंत्र्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत केला होता. त्यानंतर ठाण्यात ठाकरे…

Read More

अमळनेर : प्रतिनिधी तालुक्यातील वावडे येथे विहिरीचे पाणी भरण्यावरून वाद होऊन सहा जणांनी मारहाण केल्याने हात मोडल्याची घटना ७ रोजी घडली. सविस्तर वृत्त असे कि, वावडे येथील नरेंद्र भीमराव वानखेडे (३०) हा ७ जून रोजी शेतात कपाशीला पाणी देत असताना बाजूच्या शेतात काम करणारे त्याचे काका शिवाजी विठ्ठल पाटील यांनी मोटरचा फ्यूज काढून घेतला. नरेंद्र याने याबाबत विचारले असता त्याचा राग आल्याने दोघात बाचाबाची झाली. त्यामुळे बाजूच्या शेतात काम करणाऱ्या फिर्यादीच्या काकू सुलाबाई शिवाजी पाटील, दुसरे काका गुलाब विठ्ठल पाटील, चुलत भाऊ ज्ञानेश्वर गुलाब पाटील, त्याची पत्नी आशाबाई ज्ञानेश्वर पाटील, पुतण्या प्रतीक ज्ञानेश्वर पाटील यांनी शिवीगाळ केली. तसेच लाथाबुक्क्यांनी, काठीने…

Read More

चाळीसगाव : प्रतिनिधी तालुक्यातील तमगव्हाण येथून जवळच असलेल्या माळशेवगे येथील प्रकाश विक्रम पाटील यांच्या शेतातील शेडमध्ये बांधलेल्या बकऱ्यांवर अज्ञात हिंस प्राण्याने हल्ला केला. यात १७बकऱ्या व १ मोठा बोकड अशा १८ जनावरांचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, प्रकाश पाटील यांनी त्यांच्या शेतात शेड उभारले होते. यात ४० शेळ्या ठेवल्या होत्या. ९ जूनला रात्री चारा टाकून ते घरी आले. मात्र, रात्री हिंस्र प्राण्यांनी या शेडमधील शेळ्यांवर हल्ला करून ४० पैकी १७ शेळ्या व एक बोकड अशा १८ जनावरांना ठार मारले. सकाळी प्रकाश पाटील हे शेडमध्ये गेले असता त्यांना एकूण १८ जनावरे मृतावस्थेत दिसली. त्यांनी वनविभाग तसेच पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना संपर्क केला. यावेळी वनविभागाचे…

Read More

जळगाव : प्रतिनिधी शहरातील रजा कॉलनी परिसरातील रहिवासी रहीम पटेल हे कामावर तर आई नातेवाईकांकडे गेलेली असताना घरी एकटीच असलेल्या हुमेरा रहीम पटेल (१६, रा. रजा कॉलनी) या मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी (१० जून) दुपारी रजा कॉलनीत घडली. बाहेर खेळत असलेला तिचा भाऊ घरात गेला त्या वेळी ही घटना लक्षात आली. सविस्तर वृत्त असे कि, मजुरी काम करणारे रहीम पटेल हे नेहमीप्रमाणे मंगळवारी कामावर गेलेले होते व त्यांच्या पत्नी नातेवाईकांकडे गेल्या होत्या. वीज नसल्याने उकाड्यामुळे मुलगा घराबाहेर खेळत होता. त्यावेळी घरात एकटीच असलेल्या हुमेरा हिने गळफास घेतला. मुलीला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी…

Read More

जळगाव : प्रतिनिधी वीज मीटर बदलण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच घेताना भूषण शालिग्राम चौधरी (३७) या कंत्राटी वायरमनला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी (१० जून) पकडले. सविस्तर वृत्त असे कि, ४६ वर्षीय तक्रारदाराच्या राहत्या घराचे वीज मीटर पूर्वीच्या मालकाच्या नावावर होते. ते बदलण्यासाठी प्रभात कॉलनी कक्षातील वायरमन भूषण चौधरी हा तीन दिवसांपूर्वी तक्रारदाराच्या घरी गेला होता. त्यावेळी तुम्ही मीटरमध्ये छेडछाड केली असल्याने तुम्हाला दंड होईल व वीजचोरीचा गुन्हा दाखल होईल, असे सांगितले, तसेच हा गुन्हा दाखल न करण्यासाठी आणि वीज मीटर टेस्टिंगचा सकारात्मक रिपोर्ट देण्यासाठी १५ हजार रुपयांची मागणी केली. याविषयी तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.

Read More