मुंबई : वृत्तसंस्था गेल्या काही महिन्यापासून सोन्याच्या दरात कमी अधिक होत असतांना आता पुन्हा एकदा सोने १ लाख पार झाले आहे. मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर (MCX) शुक्रवारी सोन्याच्या वायदे दरात २ टक्के म्हणजेच २ हजारांची वाढ झाली. यामुळे सोन्याचा प्रति १० ग्रॅम दर १ लाख ४०० रुपयांवर पोहोचला. तर चांदीचा दर ८०० रुपयांनी वाढून प्रति किलो १ लाख ६ हजारांवर गेला. एमसीएक्सवरील सोने दराचा हा सर्वकालीन उच्चांक मानला जात आहे. इस्रायलने शुक्रवारी पहाटे इराणमधील अनेक ठिकाणांवर हल्ला केला. यात इराणच्या अण्विक तळांचा समावेश आहे. यात इराणचे मोठे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. इस्रायलने या कारवाईला ‘रायझिंग लायन’ असे नाव दिले…
Author: editor desk
जळगाव : प्रतिनिधी कंपनीतून ड्युटी आटोपल्यानंतर पत्नीसोबत जेवण केले. त्यानंतर झोपलेल्या अजय बुधराम पाटील (वय २२, रा. अंबेरी, ता. नेपानगर, मध्यप्रदेश) या तरुणाने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना एमआयडीसी परिसरात रात्री ११ वाजेच्या सुमारास घडली. तरुणाच्या आत्महत्येचे कारण अस्पष्ट असून याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मध्यप्रदेशातील अंबेरी गावात राहणारा अजय पाटील हा रोजगारासाठी जळगावात आला होता. एमआयडीसीतील एका कंपनीत नोकरी करुन तो कुटुंबाचा उदनिर्वाह करीत होता. रात्री कंपनीतून घरी आल्यानंतर पत्नीसोबत जेवण करून, अजय काही वेळासाठी झोपला. या दरम्यान, अजयच्या पत्नीने घरातील आवर-सावर करुन, अजय झोपलेल्या खोलीत गेली. खोलीचा दरवाजा…
अहमदाबाद : वृत्तसंस्था अहमदाबाद येथून लंडन येथे जाणाऱ्या एअर इंडिया विमानाच्या भीषण अपघातात 265 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असताना, या दुर्घटनेतून एकमेव बचावलेले प्रवासी विश्वास कुमार रमेश यांची कहाणी सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे. ब्रिटनमध्ये वास्तव्यास असलेले भारतीय वंशाचे 40 वर्षीय विश्वास कुमार यांनी अहमदाबाद सिव्हिल हॉस्पिटलमधून डीडी न्यूजशी संवाद साधला आणि त्या क्षणाचे थरारक वर्णन केले. “एक क्षण वाटलं की मीही मेलोय, पण जेव्हा डोळे उघडले, तेव्हा लक्षात आलं की मी जिवंत आहे. अजूनही विश्वास बसत नाही की मी कसा बचावलो,” असं विश्वास यांनी सांगितलं. अपघाताच्या वेळी ते इकॉनॉमी वर्गामधील डावीकडील खिडकीजवळ, म्हणजेच रांग 11 ए मध्ये बसले…
अमरावती : वृत्तसंस्था राज्यातील अमरावती जिल्ह्यात गेल्या चार दिवसापासून प्रहार संघटनेचे बच्चू कडू यांनी शेतकर्यांना संपूर्ण कर्जमाफी, त्यांच्या मुलांना शिष्यवृत्ती, दिव्यांग, विधवा महिलांना 6 हजार रुपये मानधन, वंचित घटकांचे प्रश्न या मागण्यांसाठी मोझरी येथे बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. त्यांच्या उपोषणाचा आज चौथा दिवस आहे. त्यांच्या या उपोषणाने राज्य सरकारचे लक्ष वेधले गेले आहे. बच्चू कडू यांना महसूल मंत्री बावनकुळे यांनी फोन केल्याची माहिती समोर अली आहे. परंतु बावनकुळे यांच्याशी झालेल्या संभाषणानंतर कडूंनी नाराजी व्यक्त केली आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांनी वापरलेल्या भाषेवर बच्चू कडू यांनी आक्षेप घेतला आहे. ते म्हणाले, सरकारने सरकारचे काम करावे, आम्ही आमचे काम करू. शेतकऱ्यांसाठी…
नागपूर ; वृत्तसंस्था मागील महिन्यात भारताच्या वतीने राबवण्यात आलेले ‘ऑपरेशन सिंदूर’ म्हणजे ‘कम्प्युटर गेम’ असल्याचे वादग्रस्त वक्तव्य काँग्रेसचे नेते आमदार नाना पटोले यांनी केले आहे. त्यांच्या या विधानावर आता भारतीय जनता पक्षाने देखील टीका केली आहे. नाना पटोले यांचे मन आणि मेंदू भ्रष्ट झाला असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. नाना पटोले यांच्या वक्तव्यानंतर भारतीय जनता पक्ष चांगलाच आक्रमक झाला आहे. ‘काँग्रेस का हात पाकिस्तान के साथ’ हे पुन्हा एकदा सिद्ध झाले असल्याचे बावनकुळे यांनी म्हटले आहे. या संदर्भात त्यांनी एका पोस्टच्या माध्यमातून नाना पटोले यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. या देशद्रोही मानसिकतेला देश…
चाळीसगाव : प्रतिनिधी सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागांतर्गत चाळीसगाव येथे अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलां-मुलींकरिता शासकीय निवासी शाळा कार्यरत आहे. या शासकीय निवासी शाळांमधील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या निवासाची सोय निवासी शाळेच्या आवारातच व्हावी. तसेच, त्यांना निवासी शाळेतील प्रवेशित विद्यार्थ्यांसोबत कायमस्वरूपी राहता यावे, त्यांच्यावर योग्य ते संस्कार करता यावे, यासाठी संबधित शासकीय निवासी शाळेच्या आवारात उपलब्ध असलेल्या मोकळ्या जागेमध्ये कर्मचारी निवासस्थान बांधणे तसेच, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने त्यांच्या कला, क्रिडा गुणांना वाव देण्याकरिता आवश्यक सोयी-सुविधा निर्माण करणे आवश्यक होते. आमदार मंगेश दादा चव्हाण यांनी देखील या संदर्भात वेळोवेळी शाळेला भेट देऊन सोयी-सुविधा उपलब्ध होण्यासाठी मागणी लाणून धरली केली…
अहमदाबाद : वृत्तसंस्था 242 प्रवाशांना घेऊन अहमदाबादवरुन लंडनला निघालेले विमान अहमदाबादमधील रुपानी नगर येथे कोसळल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली. टेक ऑफनंतर काही मिनिटांमध्येच विमान कोसळले असून घटनास्थळी बचावकार्य सुरू आहे. अपघाताचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. अहमदाबादमधील मेघानी नगर येथे गुरुवारी दुपारी जोरदार आवाज आला आणि परिसरात धूराचे लोट दिसू लागले. काही क्षणांतच हा विमान अपघात असल्याचे स्पष्ट झाले. एअर इंडियाचे हे विमान असून सरदार वल्लभभाई विमानतळावरून दुपारी एक वाजून 17 मिनिटांनी विमानाने टेक ऑफ केले होते. यानंतर काही मिनिटांमध्येच हे विमान मेघानीनगरमधील निवासी भागात कोसळले. एअर इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, AI 171 हे विमान अहमदाबादहून लंडनमधील गॅटविक विमानतळाच्या…
जळगाव : प्रतिनिधी जळगाव शहरात विजांच्या कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने दि. ११ रोजी रात्री आठच्या हजेरी लावली. या वादळी पावसामुळे शहरातील झाडे कोसळून रस्ते अडले होते. नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला. मेहरूण येथे संतोष चिंधु तायडे यांची गाय वीज पडून ठार झाली. जळगाव-धुळे राष्ट्रीय महामार्गावरील पॉलीटेक्निक कॉलेजपासून बांभोरी कॉलेजपर्यंत अनेक झाडे रस्त्यावर कोसळल्यामुळे महामार्ग वाहतुकीसाठी बंद झाला आहे. आपत्ती व्यवस्थापन पथकाने तातडीने झाडे हटवण्याचे काम स रू केले होते. वादळामुळे शहरातील अनेक घरांच्या आणि दुकानांच्या पत्रे उडून गेले असून, मोठ्या प्रमाणावर मालमत्ता हानी झाल्याचे प्राथमिक अंदाज आहेत. यासंदर्भातील अधिकृत पंचनाम्यासाठी प्रशासनाने आज सकाळपासून चौकशी सुरू करण्याचे आदेश…
फैजपूर : प्रतिनिधी हॉटेलमधील बिलावरून झालेल्या भांडणात जातिवाचक शिवीगाळ का केली, याचा फोनवरून जाब विचारल्याचा राग आल्याने हॉटेल व्यवस्थापक आणि त्याच्या दोन मित्रांना चार जणांनी बेदम मारहाण करत, गावठी कट्टा फिर्यादीवर रोखून त्याला जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची ही घटना दि १० रोजी रात्री ११:४५ मिनिटांनी सुभाष चौकात घडली. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेप्रकरणी शेख आरिफ शेख कलीम, शाहरुख शेख, आसिफ शेख, आकीब शेख या चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हॉटेलचे व्यवस्थापक सुमित उर्फ छोटू मार्तंड साळुंके रा. फैजपूर याला जातीवाचक शिवीगाळ करण्यात आली होती सुमित साळुंके याने फोनवरून जाब विचारला होता, याचा…
जळगाव : प्रतिनिधी उपचार करण्यासाठी घेऊन जाते असे सांगून एक अज्ञात महिला ही ज्योतीबाई भगवान बाविस्कर (४७, रा. संत गाडगेबाबा बेघर निवारा केंद्र, जळगाव) या महिलेचे दागिने व मोबाइल घेऊन पसार झाली. हा प्रकार ७ जून रोजी घडला. या प्रकरणी १० जून रोजी जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात अज्ञात महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवीन बसस्टँडसमोरील मंदिराजवळ अज्ञात महिला ज्योतीबाई यांना भेटली होती. मिळालेल्या माहितीनुसार, अज्ञात महिलेने ज्योतीबाई यांना साकेगाव शिवारातील खासगी रुग्णालयात नेले. तेथे त्यांच्याजवळील दागिने, मोबाइल घेऊन पसार झाली. ज्योतीबाई भुसावळ येथे पोलिस ठाण्यात गेल्या असता तिला नशिराबाद पोलिस ठाण्यात जाण्याविषयी सल्ला देऊन त्यांना रिक्षात बसवून देण्यात आले.…

