मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ निवासस्थानी भेट दिली. ही भेट कौटुंबिक निमित्ताने असली तरी, आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तिचे राजकीय महत्त्व मोठे मानले जात आहे. लाखो मराठी माणसांच्या मनात दडलेली राज आणि उद्धव यांच्या एकत्र येण्याची इच्छा आता प्रत्यक्षात येण्याची शक्यता वाढली आहे. ही दोन महिन्यांत ठाकरे बंधूंची पाचवी भेट आहे, ज्यामुळे राजकीय वर्तुळात युतीच्या तर्कवितर्कांना वेग आला आहे. उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे खासदार संजय राऊत यांच्या नातूचे नामकरण आज मुंबईतील बीकेसी येथील एका सभागृहात साजरे करण्यात आले. या सोहळ्याला उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचेही…
Author: editor desk
जामनेर : प्रतिनिधी सोयगाव येथील दुर्गा विसर्जन मिरवणूक पाहून शेंदुर्णीकडे येणाऱ्या आणि शेंदुर्णी येथून सोयगाव येथे जाणाऱ्या दोन दुचाकींची समोरासमोर धडक होवून झालेल्या अपघातात दोन युवकांचा मृत्यू झाला, तर एक जण जखमी झाल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. यामुळे शेंदुर्णी शहरात शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सोयगाव येथील दुर्गा विसर्जन मिरवणूक पाहून शेंदुर्णीकडे येणाऱ्या आणि शेंदुर्णी येथून सोयगाव येथे जाणाऱ्या दोन दुचाकींची शुक्रवारी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास समोरासमोर धडक झाली. या दुर्घटनेत शेंदुर्णी येथील ओम कॉम्प्युटरचे संचालक मनोज जोशी यांचा एकुलता एक मुलगा नचिकेत मनोज जोशी व विशाल अशोक सूर्यवंशी या दोन युवकांचे निधन झाले आहे. दरम्यान, नचिकेत जोशी हा १८ वर्षांचा…
जळगाव : प्रतिनिधी हृदयविकाराचा त्रास होत असलेल्या भूषण बाळकृष्ण महाजन (वय ३५, रा. रामानंद नगर) तीन वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये नेले. परंतु तेथील डॉक्टरांनी उपचारासाठी खाली न उतरता असिस्टंड डॉक्टरांना तपासणी करण्याचा सल्ला दिला. त्यामुळे तरुणाला योग्य उपचार न मिळाल्याने तरुणाचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. तसेच तिघ डॉक्टरांच्या निष्काळपणामुळे तरुणाचा मृत्यू झाला असून तिघ डॉक्टरांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी मयताच्या नातेवाईकांनी केली आहे. त्यांनी तसा अर्ज त्यांनी रामानंद नगर पोलिसांना दिला असून त्याची चौकशी केली जाणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांनी दिली. सविस्तर वृत्त असे कि, जिल्हा परिषदेतील आरोग्य विभागात नोकरीस असलेला आरोग्य सेवक…
पाचोरा : प्रतिनिधी अल्पवयीन मुलीस फूस लावून कारमधून पळवून नेत तिच्यावर कारमध्येच अत्याचार केला व तिला चौकात सोडून दिले. याप्रकरणी मुलीच्या वडिलांनी विचारणा केली असता आरोपीने खुनाची धमकी दिल्यावरून पाचोरा पोलिसांत त्या नराधमाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पाचोरा तालुक्यातील एका गावातील १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी अकरावीसाठी येथील महाविद्यालयात शिक्षण घेण्यासाठी ये-जा करीत होती. यातच गावातील एका युवकाशी सूत जुळले. त्या युवकाने दि. २९ रोजी सकाळी ११ वाजता पाचोरा शहरातील महाराणा चौकातून त्या मुलीस स्वतःच्या कारमध्ये बसवून जरंडी (ता. सोयगाव) भागात नेले व त्या ठिकाणी कारमध्येच मुलीवर अत्याचार केला. मुलगी घरी येण्यास उशीर होत असल्याने आई-वडिलांनी चौकशी सुरू केली.…
जळगाव : प्रतिनिधी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक ही कार्यकर्त्यांची निवडणूक असते, त्यामुळे हवं तर तुम्ही 100 जागा लढा, आम्ही आमच्या ताकदीप्रमाणे 50 जागा लढतो पण युती करा असं आवाहन शिवसेना शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी भाजपला केलं. युती जर केली नाही तर कार्यकर्ते मरुन जातील असं ते म्हणाले. तसेच विरोधकांनी केलेली टीका ही आपल्यासाठी मार्गदर्शनक असते, गेली वर्षभर झालं आम्ही गद्दार असल्याची टीका सहन करतोय असंही ते म्हणाले. जळगावमधील एका कार्यक्रमात बोलताना गुलाबराव पाटील यांनी हे वक्तव्य केलं. आमदारकी-खासदारकीच्या निवडणुकीत युती केली जाते, मग स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत युती का करत नाही? असा प्रश्न यावेळी गुलाबराव पाटील यांनी…
आजचे राशिभविष्य दि. ५ ऑक्टोबर २०२५ मेष राशी आज, तुम्ही तुमची कामे पूर्ण करण्यावर लक्ष केंद्रित कराल आणि तुमचे बहुतेक प्रयत्न यशस्वी होतील. नवीन वाहन खरेदी करण्याबद्दल तुम्ही उत्साहित असाल. तुम्हाला वडीलधाऱ्यांच्या सेवांचा लाभ होईल आणि त्यांचे आशीर्वाद तुमच्या जीवनातील कोणत्याही समस्या सोडवण्यास मदत करतील. वृषभ राशी आज तुम्हाला व्यवसायात चांगला नफा मिळेल, ज्यामुळे तुमची स्वप्ने लवकरच पूर्ण होतील. तुमचे वैवाहिक जीवन आनंदी राहील आणि तुमची मुलेही मनापासून अभ्यास करतील. आज तुम्ही अध्यात्मात काही वेळ घालवाल, ज्यामुळे तुमच्या मनाला शांती मिळेल. तुम्हाला दीर्घकाळापासून असलेल्या समस्येतून आज आराम मिळेल. या राशीच्या महिला आज नवीन प्रकल्प सुरू करू शकतात. मिथुन राशी आज,…
अमरावती : वृत्तसंस्था राज्यातील अमरावतीच्या परतवाड्यात मुंबई, नागपूर आणि अमरावती गुन्हे शाखेच्या पथकाने मोठी कारवाई केली. या कारवाईत ब्राह्मण सभा कॉलनी येथून 5 अज्ञात व्यक्तींना तर दुसऱ्या कारवाईत कश्यप पेट्रोल पंप परिसरातून 6 जणांना पकडण्यात आले. परंतु, तपसाअंती पकडण्यात आलेल्या सर्वांना सोडून देण्यात आले आहे. अशी माहिती अमरावती ग्रामीण पोलिसांनी पत्रकाद्वारे दिली आहे. त्यामुळे पोलिसांची ही कारवाई फसली असल्याची चर्चा सुरू आहे. मुंबई, नागपूर आणि अमरावती गुन्हे शाखेच्या पोलिसांनी परतवाडा शहरात संयुक्त कारवाई करत 13 जणांना ताब्यात घेतले. या कारवाईदरम्यान, ताब्यात घेतलेल्यांमध्ये आंतरराष्ट्रीय बिश्नोई गँगशी संबंधित एक आरोपी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. संशयितांना ताब्यात घेण्याच्या उद्देशाने आणि त्यांच्याकडे शस्त्रे…
नियुक्ती पत्र वितरण सोहळा उत्साहात संपन्न जळगाव, दिनांक ४ ऑक्टोंबर (जिमाका वृत्तसेवा): शासकीय नोकरीत रुजू होताना आपल्या मनात केवळ ‘नोकरी’ ही भावना न ठेवता ‘जनतेची सेवा’ हीच भावना ठेवा. शासकीय नोकर म्हणून नव्हे तर जनतेचे सेवक म्हणून काम करा,” असे भावनिक प्रतिपादन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात आयोजित अनुकंपा भरती 2025 अंतर्गत गट क व गट ड संवर्गातील उमेदवार, महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत लिपिक टंकलेखक भरती 2023 गट क या संवर्गातील उमेदवारांच्या नियुक्ती आदेशांचे वाटप कार्यक्रमात, उमेदवारांना मार्गदर्शन करतांना पालकमंत्री गुलाबराव पाटील बोलत होते. यावेळी, खासदार स्मिता वाघ,आमदार सुरेश भोळे,…
मुंबई : वृत्तसंस्था पिंजरा’ या अजरामर मराठी चित्रपटातून घराघरांत पोहोचलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री आणि प्रसिद्ध नृत्यांगना संध्या शांताराम यांचे निधन झाले आहे. वयाच्या 87 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीवर शोककळा पसरली आहे. 1972 साली प्रदर्शित झालेला व्ही. शांताराम दिग्दर्शित ‘पिंजरा’ हा मराठी चित्रपटसृष्टीतील अमर कलाकृती मानली जाते. एका आदर्श शिक्षक आणि तमाशा कलावंत यांच्यातील प्रेम कथेवर आधारित या चित्रपटात संध्या यांनी साकारलेली तमाशातील नर्तिकेची भूमिका प्रचंड गाजली. या भूमिकेमुळे त्या संपूर्ण महाराष्ट्राच्या लाडक्या अभिनेत्री बनल्या. आजही ‘पिंजरा’ आणि संध्या यांची भूमिका प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. ज्येष्ठ चित्रपट निर्माते-दिग्दर्शक व्ही. शांताराम यांनी त्यांच्या…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील शिंदेंच्या शिवसेनेतील नेते रामदास कदम यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या मृत्यू बाबत शंका उपस्थित केल्यानंतर आता उद्धव ठाकरे आक्रमक झाले असून त्यांनी देखील रामदास कदम यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. मी गद्दार, नमकहराम व हरामखोरांना उत्तर देत नाही, अशा कडवट शब्दांत उद्धव ठाकरे यांनी सत्ताधारी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांची टीकेला प्रत्युत्तर देणे टाळले आहे. मी गद्दार व नमकहारांना उत्तर देत नाही. मला ते देण्याची गरज वाटत नाही. ठाकरे म्हणजे काय? हे संपूर्ण महाराष्ट्र व देश ओळखतो. त्यामुळे मी त्या गद्दाराला व हरामखोराला उत्तर देणार नाही, असे ते म्हणालेत. उद्धव ठाकरे आज पुणे दौऱ्यावर आहेत. त्यांनी तेथील…

