Author: editor desk

आजचे राशिभविष्य दि.८ ऑक्टोबर २०२५ मेष राशी आज, या राशीखाली जन्मलेल्या विद्यार्थ्यांना करिअरमध्ये एक नवीन बदल अनुभवायला मिळेल जो त्यांच्या भविष्यासाठी फायदेशीर ठरेल. तुमचे आरोग्य चांगले राहील. तुम्ही तुमच्या प्रियजनांसोबत खूप छान वेळ घालवाल. कौटुंबिक सौहार्द राखण्यात तुम्ही महत्त्वाची भूमिका बजावाल. काही लोक तुमच्या व्यवसायात खूप उपयुक्त ठरतील. तुम्हाला दुसऱ्या कंपनीत काम करण्याची संधी मिळू शकते. वृषभ राशी आज दिनचर्या व्यवस्थित ठेवा, फ्रेश वाटेल. तुम्हाला निरोगी आणि उत्साही वाटेल. तुम्ही बहुतेक कामे स्वतःहून करू शकाल. व्यवसायातील अडचणी आणि आर्थिक परिस्थितीमुळे कुटुंबातील सदस्यांना खर्चात कपात करावी लागू शकते. मिथुन राशी आज, तुम्हाला चांगला फायदा होईल. तुमच्या पालकांशी तुमचे संबंध सुधारतील. तुमचा…

Read More

जळगाव : प्रतिनिधी आज जळगाव तालुक्यातील वसंतवाडी येथे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत पद्मालय महीला प्रभाग संघातील म्हसावद बोरणार प्रभागातील श्री स्वामी समर्थ ग्रामसंघ वसंतवाडी यांच्या माध्यमातून चार लाख रुपये समुदाय गुंतवणूक निधी व्यवसायासाठी बचत गटांना वाटप करण्यात आला होता त्या बचतगटाच्या महिलांनी वसंतवाडी व जळके बस स्थानक याठिकाणी शॉपिंगगाळे भाडेतत्त्वावर घेऊन आपल्या व्यवसायाला आज जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मिनल करणवाल यांच्या हस्ते फित कापुन सुरुवात केली. यात आदर्श समुहातुन सौ.सोनाली नरेंद्र पाटील यांना चहा फरसाण उपहारगृहासाठी , शिवकृपा समुहातील सौ.सोनाली लक्ष्मण पाटील यांना पाणी पुरी स्टाॅलसाठी , आदर्श समुहातील सौ.अनिता धनराज पाटील साडी विक्री सेंटरसाठी, उडान…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील मुंबई उच्‍च न्‍यायालयाने आज हैदराबाद गॅझेटियरच्या अंमलबजावणीला मान्यता देणाऱ्या शासन निर्णयाला (जीआर) अंतरिम स्‍थगिती देण्यास नकार दिला आहे. या निर्णयामुळे राज्य सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे .राज्य सरकारने २ सप्‍टेंबर रोजी हैदराबाद गॅझेटियरच्या अंमलबजावणीला मान्यता देण्याचा शासन निर्णय दिला होता. या शासन निर्णयाविरोधात विविध संघटनांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करून या आदेशाला आव्हान दिले होते. हा २ सप्टेंबरचा शासन निर्णय असंवैधानिक असून तो रद्द करण्याची मागणी याचिकाकर्त्यांनी केली होती. कुणबी सेना, महाराष्ट्र माळी समाज महासंघ, अहिर सुवर्णकार समाज संस्था, महाराष्ट्र नाभिक महामंडळ आणि सदानंद मंडलिक यांच्याकडून याचिकांच्या माध्यमातून शासन निर्णयास उच्च न्यायालयात आव्हान देण्‍यात आले होते.…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असताना सर्वच विरोधकांनी मोठी मदत शेतकऱ्यांना मिळावी यासाठी नेहमीच आंदोलन सुरु होती. राज्य सरकारच्या मदतीकडे आस लावून बसलेल्या पूरग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देत राज्य सरकारच्या वतीने अखेर पॅकेज जाहीर करण्यात आले आहे. 31 हजार 628 कोटी रुपयांचे मोठा पॅकेज आपण शेतकऱ्यांच्या मदतीसाठी देत असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत दिली. हा जास्तीत जास्त पैसा दिवाळीच्या आधी, शेतकऱ्यांना देता येईल, असा राज्य सरकारचा प्रयत्न असल्याचेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत ही घोषणा केली. राज्यातील…

Read More

जळगाव : प्रतिनिधी गेल्या अनेक दिवसांपासून हाताला काम मिळत नव्हते. त्यामुळे ज्या दुकानातून काम करीत होताच त्याच दुकानातून १४ लाखांचे १२४ ग्रॅम सोने चोरले. चोरी केल्यानंतर हैदराबादला पळून जाण्यापुर्वीच संशयित बिस्वजीत बनेस्वर सासमल (रा. पश्चिम बंगाल) या कारागिरला तांत्रिक विश्लेषणावरुन शनिपेठ पोलिसांनी जेरबंद केले. त्याच्याकडून चोरलेले १२४ ग्रॅम सोन्याची लगड हस्तगत केल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी पत्रकार परिषदेत दिली. सविस्तर वृत्त असे कि, शहरातील बालाजी पेठेत निखिल कैलास गौड (वय ३०, रा. पश्चिम बंगाल) यांचे लक्ष्मीनारायण ज्वेलर्स नावाने सोन्याचे दागिने घडविण्याचे दुकान आहे. त्या दुकानात बिस्वजीत सासमल हा पश्चिम बंगाल येथील कारागिर गेल्या अनेक दिवसांपासून काम करीत…

Read More

जळगाव : प्रतिनिधी मुलाला एका गुन्ह्यात अटक झाल्याच्या दोन दिवसांनंतर वडील आत्माराम प्रल्हाद सपकाळे (४५, रा.भोकर, ता. जळगाव) यांनी राहत्या घरात गळफास घेतला. ही घटना ५ ऑक्टोबर रोजी रात्री उघडकीस आली. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील भादली गावात झालेल्या एका घटनेप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात दोन अल्पवयीन मुलांसह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल असून, यात भोकर येथील हर्षल आत्माराम सपकाळे (१८) याचाही समावेश आहे. त्याला ३ ऑक्टोबर रोजी अटक करण्यात आले होते. यानंतर, त्याचे वडील आत्माराम सपकाळे यांनी ५ ऑक्टोबर रोजी घराच्या दुसऱ्या मजल्यावर जाऊन गळफास घेतला. त्यांना जीएमसीत दाखल केले असता डॉक्टरांनी…

Read More

जळगाव : प्रतिनिधी विदेशी नागरिकांची आर्थिक फसवणूक करणारे बोगस कॉल सेंटर ज्या पोलिस ठाण्याच्या हद्दीत सुरू होते, त्या तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संजय गायकवाड यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे. हद्दीत बोगस कॉल सेंटर सुरू असण्यासह कारवाईनंतरही संशयितांना व्हीआयपी ट्रीटमेंट दिल्यामुळे ही कारवाई केल्याची माहिती सूत्रांनी दिली. सविस्तर वृत्त असे कि, नामांकित कंपन्यांचे प्रतिनिधी असल्याचे सांगून विविध देशातील नागरिकांना आमिष दाखवत आर्थिक फसवणूक करणाऱ्या मुमराबाद रस्त्यावरील बोगस कॉल सेंटरवर जळगाव पोलिसांनी कारवाई केली होती. हे कॉल सेंटर तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीत सुरू होते, तरीदेखील प्रभारींना याविषयी माहिती नव्हती. याशिवाय पोलिसांनी कारवाई केल्यानंतर अटक केलेले माजी महापौर ललित कोल्हे…

Read More

मुक्ताईनगर  : प्रतिनिधी पिंप्राळा येथील हरवलेल्या तरुणाचा मृतदेह शेतातील विहिरीत आढळला. हातपाय तारेने बांधलेल्या अवस्थेत सापडल्यामुळे घातपात असल्याची शंका निर्माण झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कुन्हा गावाजवळील पिंप्राळा येथील भागवत पुरुषोत्तम पडोळकर (वय २७वर्षे) हा तरुण बुधवार दि. १ ऑक्टोबर रोजी संध्याकाळपासून कोणालाच दिसला नव्हता. त्याचा नातेवाइकांनी शोध घेतला असता तो सापडला नाही. शुक्रवारी रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास, त्याचे वडील गावाजवळील विहिरीत पाहण्यासाठी गेले असता भागवत याचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळला. घटनास्थळी फॉरेन्सिक टीमचे पथक आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. मृताचे हातपाय तारेने बांधलेले असल्यामुळे या घटनेत घातपाताचा संशय व्यक्त केला जात आहे. मात्र, भागवत पडोळकर…

Read More

धरणगाव : प्रतिनिधी तालुक्यातील कवठळ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक श्री.सुरेश सोनवणे हे आठवड्यातून अनेक वेळेस दारु पिऊन शाळेत येतच नाहीत पर्यायी शाळेतील विद्यार्थ्यांना घरीच राहावे लागते. आज दि.६ आक्टोबर रोजी तर “शिक्षक दारु पिऊन मस्त आणि विद्यार्थ्यांचे शिक्षण नाही स्वस्त” या संदर्भात विद्यार्थ्यांच्या अतोनात नुकसान होत आहे.ही एक वेळची समस्या नसून याअगोदर ही वृतपात्रात या शाळेतील प्रकार उघडकीस आला आहे. परंतु यावर ठोस निर्णय होत नाही किंबहुना कवठळ येथील शालेय विद्यार्थ्यांचे अतोनात नुकसान होत आहे तरि कवठळ येथील पालकांनी जर यावर ठोस उपाययोजना झाल्या नाहीत तर सर्व पालकवर्ग मुलांना दुसऱ्या शाळेत नाईलाजास्तव प्रवेश करावा लागेल.दिवाळीपूवीच मुलांना सुट्टी लागली…

Read More

आजचे राशिभविष्य दि.७ ऑक्टोबर २०२५ मेष राशी तुमचा आत्मविश्वास वाढलेला असल्यामुळे तुम्ही तुमची कामे अधिक चांगल्या प्रकारे करू शकाल. व्यवसायात तुम्हाला नफा मिळेल, परंतु भागीदारीत तुम्ही सावधगिरी बाळगली पाहिजे. तुमचे वैवाहिक जीवन आनंदी राहील आणि कोणत्याही प्रयत्नात तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून पाठिंबा मिळेल. वृषभ राशी आज तुम्हाला व्यवसायात लक्षणीय आर्थिक लाभ होतील आणि तुमचे व्यावसायिक संबंधही सुधारतील. खाजगी नोकरी करणाऱ्यांना बढतीच्या संधी मिळतील. कोणाशीही सुरू असलेले मतभेद संपतील आणि परस्पर सौहार्द वाढेल. मिथुन राशी आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला असणार आहे. तुम्ही असे काही कराल की तुमचे शेजारीही तुमची प्रशंसा करतील. जर तुम्ही नवीन वाहन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आजचा…

Read More