मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारमधील पर्यटन मंत्री आणि शिंदे गटाचे नेते शंभुराज देसाई यांनी शिवसेनेच्या चिन्हावरून आणि मुख्यमंत्रीपदावरून सातत्याने भूमिका मांडणाऱ्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर आज सडकून टीका केली. घटना आणि कायद्याने दिलेले अधिकार मान्य न करता “मी म्हणतोय तेच खरं,” असा पवित्रा घेणे योग्य नाही, तसेच माझ्या मनात मुख्यमंत्रीपदाचा कोणताची विचार नव्हता, या उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यावर शंभुराज देसाई यांनी टीका केली. उद्धव ठाकरे हे फक्त आपल्यासोबतच्या सहकाऱ्यांना थोपवून धरण्यासाठीच अशी विधाने करत असल्याचे ते म्हणाले. शंभुराज देसाई यांनी आज साताऱ्यात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, उद्धव ठाकरे हे अडीच वर्ष राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले आहे. राज्य हे…
Author: editor desk
छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था राज्यातील मराठवाड्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदतीची गरज असून निर्णय घेण्यात सरकार विलंब करत आहे. मराठवाड्यात सहा शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. या आत्महत्या नसून खून आहेत. हे सरकारचे पाप असल्याची टीका सोमवारी (दि.६) शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी केली. भोकरदन येथे शेतकरी आक्रोश मोर्चासाठी रवाना होण्यापूर्वी छत्रपती संभाजीनगरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी शिंदे म्हणाले की, शिवसेना ठाकरे गटाकडून शेतकऱ्यांवरील प्रश्नावर छत्रपती संभाजीनगरमध्ये मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. त्यामुळे आमच्या पक्षाकडून येथे मोर्चाचे आयोजन करण्यात आलेले नाही. दरम्यान अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदतीची गरज आहे. ऑगस्टपासून महाराष्ट्रात पाऊस सुरू आहे. अजूनही काही ठिकाणी पंचनामे सुरू…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशाच्या सर्वोच्च न्यायालयात आज खळबळजनक घटना घडली आहे. भारताचे सरन्यायाधीश बी.आर. गवई यांच्यासमोर एका वकिलाने कोर्टरूममध्ये गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला आहे. एवढेच नाही तर वकिलाने सरन्यायाधीशांवर बूट फेकण्याचा प्रयत्नही केला असल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेनंतर पोलिसांनी आरोपी वकिलाला ताबडतोब ताब्यात घेतले. पोलीस त्यांना बाहेर काढत असताना, वकिलाने सांगितले की, “भारत सनातन धर्माचा अपमान सहन करणार नाही.” दरम्यान, संपूर्ण घटनेत न्यायमूर्ती गवई शांत राहिले आणि न्यायालयीन कामकाज नेहमीप्रमाणे सुरू राहिले. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता, पोलिसांनी तातडीने कारवाई केली आणि न्यायालयाच्या आवारात सुरक्षा वाढवली. या घटनेवर एका वकिलाने प्रतिक्रिया देखील दिली आहे. वकिलाने, “आजची घटना खूप दुःखद आहे.…
जामनेर येथील जिनियस मास्टर्स फाउंडेशनतर्फे झाला सन्मान धरणगाव : प्रतिनिधी तालुक्यात चमगाव येथील रहिवासी दीपक वसंतराव सोनवणे अमळनेर तालुक्यातील गडखांब केंद्रातील जि.प.शाळा देवगाव देवळी येथे गेल्या तीन वर्षापासून कार्यरत असून दीपक सोनवणे यांना जामनेर येथील जिनियस मास्टर्स फाउंडेशनतर्फे दरवर्षी तालुक्यासह जिल्हाभरात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांना दिला जाणारा “ जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक” पुरस्कार २०२५ स्वामी विवेकानंद हॉल,जामनेर येथे समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला. दीपक सोनवणे यांनी यापूर्वी नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव येथील जि.प शाळेत देखील त्यांनी सेवा केली आहे. याची दखल घेवून दीपक सोनवणे यांना यांची सन २०२५ च्या “जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक” पुरस्कारासाठी निवड केली असल्याचे जिनियस मास्टर्स फाउंडेशनचे अध्यक्ष रमेश कांतीलाल पाटील…
जळगाव : प्रतिनिधी भुसावळ तालुक्यातील कंडारी परिसरात रविवारी दि. ५ ऑक्टोबर रात्री सुमारास १० ते ११ वाजेच्या दरम्यान किरकोळ वादातून तरुणाचा धारदार शस्त्राने खून करण्यात आला. ही घटना समोर येताच जिल्हाभरात खळबळ उडाली असून, पोलिसांनी अवघ्या काही तासांत दोन संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जितेंद्र कोळी (वय ४०) हा जळगाव शहरातील तीन परिचित व्यक्तींसोबत भुसावळ तालुक्यातील कंडारी गावात एका वैयक्तिक कामानिमित्त गेला होता. रात्री उशिरा चौघेही एका हॉटेलवर बसून मद्यपान करत असताना त्यांच्यात काही किरकोळ कारणावरून वाद सुरू झाला. वाद काही क्षणांतच चकमकीत परिवर्तित झाला आणि तिघा आरोपींनी मिळून जितेंद्रवर धारदार शस्त्राने वार केले. जखमी अवस्थेत त्याला…
जळगाव : प्रतिनिधी नवीन बसस्थानकात बसमध्ये चढत असताना एका महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना शनिवार, ४ ऑक्टोबर रोजी दुपारी १:३० वाजता घडली आहे. चोरीस गेलेल्या मंगळसूत्राची किंमत २२ हजार रुपये असून, या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुनीता नारायण चौधरी (वय ४०, रा. नशिराबाद, ता.जि. जळगाव) ही मजूर महिला, शनिवारी दुपारी १.३० वाजेच्या दरम्यान जळगाव ते शिंदखेडा बस (एम. एच.१४. बीटी. १८५४) मध्ये चढत होत्या. बसमध्ये प्रवाशांची गर्दी असल्याचा फायदा घेत, अज्ञात चोरट्याने त्यांच्या गळ्यातील चार ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र चोरून नेले. चोरी झाल्याचे लक्षात येताच सुनीता चौधरी यांनी…
भुसावळ : प्रतिनिधी रेल्वे इन्स्टिट्यूट परिसरात दारू पिणाऱ्या व्यक्तींना हटकल्याचा राग आल्याने रेल्वे कर्मचाऱ्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून चाकूने हल्ला केल्याची घटना शहरातील १५ बंगला परिसरात घडली. याप्रकरणी चौघांविरोधात बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चेतन प्रतापसिंग खरारे (वय ४०, रा. सरस्वतीनगर) गेली १७ वर्षे रेल्वे इन्स्टिट्यूटमध्ये खलाशी पदावर कार्यरत असून, रात्रीच्या वेळी परिसराची देखरेख करतात. २ रोजी रात्री ११:०० वाजता गस्त घालत असताना त्यांनी काही व्यक्तींना दारू पिताना पाहिले. त्यांनी त्यांना इशारा दिला असता संबंधितांनी चिडून बबलू ठाकुर, अजय सहारे, सुजित सहारे व मनोज सहारे (सर्व रा. शिवाजीनगर) यांना बोलावले. यानंतर या चौघांनी खरारे यांच्यावर हल्ला…
जळगाव : प्रतिनिधी जळगाव शहरातील गेंदालाल मिल परिसरात राहणाऱ्या तरुणाचा भुसावळ कंडारी येथे किरकोळ वादातून धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला. ही धक्कादायक घटना रविवार, ५ रोजी रात्री १० ते ११ वाजेच्या सुमारास घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जितेंद्र राजेंद्र साळुंखे -कोळी (४०, रा. गेंदालाल मिल, जळगाव) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. तो जळगावात पत्नी, तीन मुलांसह राहत होता. हातमजुरी करून परिवाराचा उदरनिर्वाह करीत होता. जळगावच्या माजी महापौरांचा मुलगा व इतर दोघांसोबत जितेंद्र हा भुसावळ तालुक्यातील कंडारी येथे एका कामानिमित्त गेला होता. तिथे एका हॉटेलवर मद्यपान केल्यानंतर चौघांमध्ये वाद सुरू झाले. वादातून हाणामारी झाली. यानंतर जितेंद्र याला इतर तिघांनी…
आजचे राशिभविष्य दि. ६ ऑक्टोबर २०२५ मेष राशी मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस तुमच्यासाठी सामान्य राहील. तुमच्या मनात प्रेम आणि सहकार्याची भावना राहील. जुन्या मित्राला भेटल्याने आनंद होईल. सरकारी कामात निष्काळजीपणा टाळा. तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवा. कारण मौजमजेच्या वस्तूंवर जास्त खर्च होऊ शकतो. ज्यामुळे भविष्यात समस्या येऊ शकते. तुमच्या उत्पन्नाचा विचार करूनच खर्च करा. वृषभ राशी वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस आरोग्याच्या दृष्टीने जागरूक राहण्याचा आहे. जर तुम्हाला कोणती जुनी समस्या असेल, तर त्यातून तुमची सुटका होईल. आज तुम्हाला तुमची महत्त्वाची माहिती मिळू शकते. तुमच्या आजूबाजूच्या लोकांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करा. भावाकडून चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. तुमची एखादी मनोकामना पूर्ण…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ निवासस्थानी भेट दिली. ही भेट कौटुंबिक निमित्ताने असली तरी, आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तिचे राजकीय महत्त्व मोठे मानले जात आहे. लाखो मराठी माणसांच्या मनात दडलेली राज आणि उद्धव यांच्या एकत्र येण्याची इच्छा आता प्रत्यक्षात येण्याची शक्यता वाढली आहे. ही दोन महिन्यांत ठाकरे बंधूंची पाचवी भेट आहे, ज्यामुळे राजकीय वर्तुळात युतीच्या तर्कवितर्कांना वेग आला आहे. उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे खासदार संजय राऊत यांच्या नातूचे नामकरण आज मुंबईतील बीकेसी येथील एका सभागृहात साजरे करण्यात आले. या सोहळ्याला उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचेही…

