Author: editor desk

मेष राशी आज तुमच्या प्रार्थनेला लवकरच फळ मिळेल. तुम्ही तुमच्या कृतींवर लक्ष केंद्रित कराल आणि सकारात्मक राहाल. कोणतीही समस्या तुमच्या स्वतःच्या कृतींद्वारे सोडवली जाईल. आज इतरांवर जास्त अवलंबून राहणे टाळल्याने तुमची कामगिरी सुधारेल. मानसिक शांती लाभेल. वृषभ राशी आज, तुमची मुले करत असलेल्या एखाद्या गोष्टीमुळे तुम्हाला दुःख होऊ शकते. जर तुम्ही शांतपणे समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला तर सर्व काही ठीक होईल. तुमचा विश्वास आणि आत्मविश्वास अबाधित राहील. आज तुम्ही जे काही हाती घ्याल ते नक्कीच साध्य होईल. महत्वाच्या गोष्टी गुपित ठेवा, कोणासमोरही बोलू नका, नाहीतर विरोधक खेळ बिघडवू शकतील. मिथुन राशी जर तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करण्याचा किंवा विस्तार करण्याचा…

Read More

बीड : वृत्तसंस्था राज्यातील बीड जिल्ह्या गेल्या काही दिवसापासून गुन्हेगारीच्या माध्यमातून चर्चेत येत असताना आता पुन्हा एकदा शेतीच्या वादातून एका महिलेचे पाय तोडण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची खळबळजनक घटना बीड जिल्ह्यातील अंजनवती गावात घडली आहे. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या महिलेवर बीड जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तिथे तिची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. दरम्यान, अन्य एका घटनेत वकील राहुल आघाव यांनी बीड जिल्हा कारागृहात काही कैद्यांवर धर्मांतरासाठी दबाव टाकण्यात येत असल्याचा आरोप केला आहे. या घटनेमुळेही जिल्ह्यात एकच खळबळ माजली आहे. येथील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण खूपच गाजले. त्यानंतर महादेव मुंडे हत्या प्रकरणही उजेडात आली. या दोन्ही घटनांची…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था राज्यातील शिवसेना आणि धनुष्यबाण पक्ष चिन्ह कोणाचे? यावर आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी पार पडली. यात सर्वोच्च न्यायालयाकडून पुन्हा एकदा पुढील तारीख देण्यात आली आहे. आता १२ नोव्हेंबर रोजी शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्हावर सुनावणी होणार आहे. सध्या शिवसेना नाव आणि चिन्ह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे. याप्रकरणी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयात याबाबत आव्हान दिले होते. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा कालावधी जवळ येत असल्याने उद्धव ठाकरे यांनी जुलै महिन्यात अंतरिम अर्जाद्वारे पक्ष आणि चिन्ह वापरण्यावर तात्पुरते निर्बंध घालण्याची मागणी केली होती. वकील असीम सरोदेंची पोस्ट ठाकरेंच्या शिवसेनेची बाजू मांडणारे वकील असीम सरोदे यांनी सुनावणी पार…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन केले. एक टर्मिनल आणि एक धावपट्टी असलेल्या पहिल्या टप्प्याची क्षमता दरवर्षी दोन कोटी प्रवाशांना हाताळण्याची आहे. ते मुंबई मेट्रो लाईन 3 च्या फेज 2बी चे उद्घाटन देखील त्यांनी केले. ही मुंबईची पहिली पूर्णपणे भूमिगत मेट्रो लाईन आहे. नवी मुंबई विमानतळावरील टर्मिनल कमळाच्या आकाराच्या डिझाइनमध्ये विकसित करण्यात आले आहे. डिसेंबरमध्ये येथून नियमित उड्डाणे सुरू होतील. हे मुंबईचे दुसरे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. शेतकरी नेते डी.बी. पाटील यांचे नाव या विमानतळाला देण्यात आले आहे. या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस पक्ष आणि महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला.…

Read More

छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था राज्यातील मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांना आज ( दि. ८ ऑक्टोबर) छत्रपती संभाजीनगर येथील गॅलेक्सी रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. उपचारांनंतर ते आता अंकुश नगर येथील त्यांच्या घरी परतणार आहेत. डिस्चार्ज मिळाल्यानंतर लगेचच जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासंदर्भात पुन्हा एकदा जोरदार भूमिका मांडली. यावेळी त्यांनी शेतीबरोबरच मराठ्यांनी नोकरी आणि शिक्षणाकडंही लक्ष दिलं पाहिजे असं सांगितलं. तसंच ओबीसी नेत्यांवर टीका करताना त्यांनी ज्या ज्या नेत्यानं मराठा आरक्षणला विरोध केला त्यांना २०२९ च्या निवडणुकीत आठवणीनं पाडा असं देखील सांगितलं. मराठा समाजाला उच्चशिक्षण आणि मोठ्या नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत, या मागणीचा त्यांनी पुनरुच्चार केला. “शेतीवर मोठमोठी संकटं येतात…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था जयपूर-अजमेर महामार्गावर मंगळवारी रात्री १० वाजता एका रासायनिक टँकरची एलपीजी गॅस सिलिंडरने भरलेल्या ट्रकशी टक्कर झाली. यामुळे टँकरच्या केबिनमध्ये आग लागली. आग सिलिंडरपर्यंत पोहोचताच त्यांचा स्फोट झाला. एकामागून एक २०० सिलिंडरचा स्फोट झाला. काही ५०० मीटर अंतरावर शेतात पडले. १० किलोमीटर अंतरापर्यंत स्फोटांचे आवाज ऐकू आले. सुमारे दोन तास सिलिंडरचा स्फोट होत राहिला. या अपघातात एक व्यक्ती जिवंत जळाली. १२ अग्निशमन दलाच्या गाड्यांनी तीन तासांनंतर आग आटोक्यात आणली. ट्रकमध्ये अंदाजे ३३० सिलेंडर होते. एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, “आरटीओ गाडी पाहून टँकर चालकाने गाडी ढाब्याकडे वळवली. यादरम्यान, ती गॅस सिलेंडरने भरलेल्या ट्रकला धडकली.” जयपूरमधील डुडू येथील मोखमपुराजवळ…

Read More

जळगाव : प्रतिनिधी शहरातील शासकीय कंत्राटदाराला हस्तांतर करारनामा करून देण्याच्या मागणीसाठी 80 हजारांची लाच एरंडोल तालुक्यातील रिंगणगावच्या सरपंचाने मागितली होती. जळगाव एसीबीकडे तक्रार नोंदवल्यानंतर मंगळवारी सायंकाळी जळगावच्या काव्य रत्नांजली चौकात सापळा रचण्यात आला व खाजगी पंटराच्या माध्यमातून लाच स्वीकारताच तिघांना बेड्या ठोकण्यात आल्या. या अटकेतील आरोपींमध्ये रिंगणगाव सरपंच भानुदास पुंडलिक मते (खोंडेवाडा, ता.एरंडोल), सदस्यपती समाधान काशीनाथ महाजन (38, युनियन बँकेजवळ, एरंडोल) व संतोष नथ्थू पाटील (49, कल्याणेहोळ, ता.धरणगाव) यांचा समावेश आहे. या कारवाईने रिंगणगाव ग्रामपंचायतीतील लाचखोरांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे शासकीय कंत्राटदार आहेत. त्यांनी जलजीवन मिशन अंतर्गत नळ पाणीपुरवठा योजनेत एक कोटी 50 लाख 23 हजार…

Read More

जळगाव : प्रतिनिधी औद्योगिक वसाहत परिसरातील दोन कंपन्यांमधून चोरट्याने दोन लाख रुपयांची रोकड लांबविली. ही घटना ५ ऑक्टोबर रोजी उघडकीस आली. या प्रकरणी ६ ऑक्टोबर रोजी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ५ ऑक्टोबर रोजी पहाटे सव्वा चार वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्याने शटरचे कुलूप तोडले व शटर उचकवून आत प्रवेश केला. पूनम पेंट कंपनीतून ३० हजार रुपये तर ई सेक्टरमधील छबी इलेक्ट्रीकल कंपनीमधून एक लाख ७० हजार रुपये चोरून नेले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर विजय गोविंद वाघुळदे (५४, रा. मुंदडा नगर) यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील…

Read More

जळगाव : प्रतिनिधी तालुक्यातील कुसुंबा गावात चंद्रशेखर पाटील यांच्या घरावर दगडफेक करून गोळीबार केल्याच्या गंभीर घटनेतील पाच संशयित आरोपींना अटक केल्यानंतर एमआयडीसी पोलिसांनी त्यांची धिंड काढल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सोमवारी ६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७वाजता ही कारवाई करण्यात आली, ज्यामध्ये अटक केलेल्या आरोपींना सुप्रीम कॉलनी परिसरातून फिरवण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथील गणपती नगरात राहणारे चंद्रशेखर त्रंबक पाटील (वय-५५) यांच्या घरावर शनिवारी ४ ऑक्टोबर रोजी रात्री ७ ते ८ जणांनी हल्ला केला होता पाटील यांच्या मुलाच्या जुन्या वादातून हा प्रकार घडल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. दुचाकीवरून आलेल्या या टोळक्याने प्रथम पाटील यांच्या घरावर दगडफेक केली आणि…

Read More

जळगाव : प्रतिनिधी धुळ्याकडे जाताना दुचाकीला अपघात झाल्याने संतोष चिंतामण चंदासरे (६०) हे जागीच ठार झाल्याची घटना मंगरूळ शिवारात सोमवारी (दि. ६) रात्रीच्या सुमारास घडली. मिळालेल्या माहितीनुसार, चाळीसगाव तालुक्यातील भामरे गावचे संतोष चंदासरे हे कामानिमित्त अमळनेर शहरात आले होते. ते आपल्या मोटारसायकलने (क्र. एमएच १९ बीएच ४२३०) परत जात असताना मंगरूळच्या वृंदावन हॉटेलच्या पुढे १०० मीटर अंतरावर मोटारसायकल पडून जबर जखमी झाले. त्यांच्या डोक्यातून रक्त वाहू लागले. ते सुमारे अर्धा तास पडलेले होते. हॉटेलमालक किरण पाटील, चेतन पाटील, युवराज सोनवणे, गणू पाटील यांनी त्यांना उचलून ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. ग्रामीण रुग्णालयात उपचार घेताना त्यांचा मृत्यू झाला. घटनेचे कळताच हेडकॉन्स्टेबल कैलास…

Read More