आजचे राशिभविष्य दि. १० ऑक्टोबर २०२५ मेष राशी आज तुम्ही ऑफिसमध्ये फोनचा वापर कमीत कमी कराल आणि पूर्णपणे तुमच्या कामावर लक्ष केंद्रित कराल. आर्थिक बाबींमध्ये लोकांवर जास्त विश्वास ठेवणे टाळावे. कोणालाही पैसे उधार देण्यापूर्वी विचारपूर्वक विचार करणे शहाणपणाचे ठरेल. वृषभ राशी तुमच्या योजनांनुसार सर्वकाही चालत राहिल्याने, तुमचे मन तुमच्या कामावर केंद्रित राहील. सामाजिक कार्यात तुमची आवड वाढू शकते. तुमच्या जोडीदाराकडून तुम्हाला पूर्ण पाठिंबा मिळेल. व्यवसाय भागीदारीमुळे तुम्हाला फायदा होऊ शकतो. तुम्ही गोष्टी चांगल्या प्रकारे समजून घेण्याचा प्रयत्न कराल. कुटुंबातील सदस्यांशी संबध सुधारतील. मिथुन राशी तुमच्या व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी तुम्हाला नवीन संधी मिळतील. आज तुम्ही एखाद्याला उधार दिलेले पैसे अचानक परत…
Author: editor desk
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील खरी शिवसेना कुणाची? आणि आमदार अपात्रतेबाबतचा मुद्दा गेल्या तीन वर्षांपासून प्रलंबित आहे. या महत्त्वपूर्ण खटल्यावर सुप्रीम कोर्टात 8 ऑक्टोबर रोजी सुनावणी पार पडली. कालच निर्णय अपेक्षित असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोरदार होती. मात्र, ऐनवेळी सशस्त्र सुरक्षा दलांशी संबंधित एका महत्त्वाच्या प्रकरण सुनावणीला आल्याने न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलली. त्यामुळे शिवसेना पक्षनाव आणि धनुष्यबाण चिन्हाच्या वादासोबतच आमदार अपात्रतेच्या प्रलंबित प्रकरणावर आता सर्वोच्च न्यायालयात 12 नोव्हेंबर रोजी सुनावणी होणार आहे. शिवसेनेतील फुटीनंतर एकनाथ शिंदे नेतृत्वाखालील गटाला अधिकृत पक्ष म्हणून मान्यता देणे आणि धनुष्य-बाण चिन्ह त्या गटाला देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला. याच निर्णयाला आव्हान देणाऱ्या शिवसेना उबाठा…
जळगाव : प्रतिनिधी जळगाव जिल्हाधिकारी पदावर नियुक्ती देण्यात आलेल्या रोहन घुगे (भाप्रसे) यांनी गुरुवार दि.09 ऑगस्ट 2025 रोजी आपला पदभार स्वीकारला. यापूर्वी ते जिल्हा परिषद ठाणेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यांच्या नेतृत्वाखाली ठाणे जिल्हा परिषदेला डिजिटल प्रशासन, शिक्षण, आरोग्य व ग्रामीण विकास या क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळाले असून ‘कार्यालयीन मूल्यमापन – १०० दिवसांचा कृती कार्यक्रम’ अंतर्गत राज्यात प्रथम क्रमांक प्राप्त झाला आहे. दरम्यान, माजी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची बदली नाशिक येथे झाली असून त्यांच्या जागी रोहन घुगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पदभार स्वीकारताना अपर जिल्हाधिकारी श्रीमंत हारकर व निवासी उपजिल्हाधिकारी वैशाली चव्हाण उपस्थित होते.
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळ याचा भाऊ सचिन घायवळ याला पोलिसांचा अहवाल डावलून शस्त्र परवाना मंजूर करण्यात आला. याप्रकरणी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची ताबडतोब मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, अशी मागणी ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी केली आहे. नुकतेच पत्रकार परिषदेत अनिल परब यांनी योगेश कदमांनी कशाप्रकारे नियम डावलून सचिन घायवळ याला शस्त्र परवाना मंजूर केला, याबाबतची माहिती उघडून सांगितली आहे. अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेत म्हणाले की, “गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी गुंडाचा भाऊ असलेल्या व्यक्तीला अधिकृत शस्त्र परवाना दिला. पोलिसांनी हा परवाना नाकारला. पोलिसांनी त्यांचे काम चोख केले होते. परंतु योगेश कदमांनी पुणे पोलीस आयुक्तांचे…
जळगाव : प्रतिनिधी गेल्या काही महिन्यापासून जळगाव जिल्ह्यात छोटे मोठे गुन्हे घडत असल्याने जळगाव जिल्हा पोलीस दलाने गुरुवारी, ९ ऑक्टोबर रोजी पहाटेच्या सुमारास शहरात ‘वॉश आऊट’ या शोध मोहिमेअंतर्गत मोठे कोंबिंग ऑपरेशन राबवले. पहाटे ३ ते सकाळी ६ वाजेपर्यंत चाललेल्या या धडक कारवाईत ८४ हून अधिक विविध गंभीर गुन्ह्यांमधील गुन्हेगारांना पोलिसांनी अटक केली आहे. जळगाव शहर, जिल्हापेठ, एमआयडीसी, जळगाव तालुका आणि रामानंद नगर पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील संवेदनशील भागांना लक्ष्य करून ही मोहीम राबवण्यात आली. अचानक करण्यात आलेल्या या कारवाईमुळे गुन्हेगारांमध्ये एकच खळबळ उडाली. या कारवाईत अटकेत असलेल्यांमध्ये हद्दपार केलेले, इतर गुन्ह्यांमधील फरार असलेले, रेकॉर्डवरील अट्टल गुन्हेगार, चोरटे आणि दारू विक्रेते…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था विषारी पिल्यानं मध्य प्रदेशातील २१ लहान मुलांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आता मध्य प्रदेश पोलिसांनी मोठी कारवाई केली असून चेन्नईमधुन स्रेसन फार्मासिटिकल्सचे मालक जी रंगनाथन यांना अटक करण्यात आली आहे. ७३ वर्षाचे रंगनाथन हे मद्रास मेडिकल कॉलेजमधून पासआऊट झालेले आहेत. त्यांनी चार दशापासून ते औषध निर्मितीमध्ये कार्यरत आहेत. त्यांनी सुरूवातीला प्रोनीट हे पोषण देणारं सिरप तयार केलं होतं. तिथून त्यांची ओळख निर्माण झाली होती. १९८० च्या दशकात रंगनाथन यांनी स्वतः या प्रोनीटचं प्रमोशन बालरोगतज्ञांकडे जाऊन केलं होत. या सिरपचा फायदा गर्भवती महिलांना होतो असा दावा देखील त्यांनी केला होता. या उत्पादनानं चांगलीच प्रसिद्धी मिळवली होती. मात्र…
जळगाव : प्रतिनिधी कॉफी शॉपच्या नावाखाली सुरू असलेल्या कॅफेमध्ये तरुण-तरुणींचे अश्लील चाळे सुरू असलेल्या दुकानावर रामानंद नगर पोलिसांनी छापा टाकला. ही कारवाई बुधवारी (दि. ८ ऑक्टोबर) दुपारी केली. याप्रकरणी रामानंद नगर पोलिसांत कॅफे चालविणारा मयूर धोंड्डू राठोड (२५, रा. कोल्हे हिल्स) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोल्ड जीमच्या पुढे काही अंतरावर चॅट अड्डा नावाने एका गाळ्यात प्लायवूडचे कंपार्टमेंट तयार केले आहे. या ठिकाणी तरुण-तरुणींचे अश्लील चाळे सुरू असतात व त्यासाठी जागा उपलब्ध करून दिल्याची माहिती रामानंद नगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांना मिळाली. पोलिसांनी कॉफी शॉपमधील काही जागेची व डस्टबिनची पाहणी केली असता, त्यात निरोध सापडले. तसेच…
जळगाव : प्रतिनिधी धावत्या रेल्वेचा धक्का लागून सुरेश धर्मा पाटील (७३, रा. अजिंठा हाऊसिंग सोसायटी) यांचा मृत्यू झाला. ही घटना जळगाव ते शिरसोली दरम्यान घडली. सुरुवातील अनोळखी म्हणून तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. नंतर ओळख पटली. मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव ते शिरसोली रेल्वे खांबा क्रमांक ४१५ जवळ एका वृद्धाचा मंगळवारी (७ ऑक्टोबर) धावत्या रेल्वेचा धक्का लागल्याने मृत्यू झाला होता. सुरुवातीला अनोळखी म्हणून नोंद करण्यात आली होती. मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेण्यात आला होता. त्यावेळी ओळख पटली. या प्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक श्यामकुमार मोरे करीत आहेत.
जळगाव : प्रतिनिधी स्वतःचा जीव देण्यासह तुझ्या भावाला मारेल, अशी धमकी देत अल्पवयीन मुलीला फोनवर बोलण्यास भाग पाडण्यासह तिच्यासोबत बळजबरीने फोटो काढून विनयभंग केला. ही घटना जून महिन्यापासून सुरू होती. याप्रकरणी प्रदीप उर्फ बंटी विनोद राठोड (रा. रामदेववाडी, ता. जळगाव याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलिसात पोक्सोंतर्गत विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका गावातील १७ वर्षीय मुलीशी प्रदीप राठोड याने मैत्री केली. नंतर जीव देण्यासह तिच्या भावाला मारण्याची धमकी देत फोनवर बोलण्यास भाग पाडले. त्यानंतर पीडितेला एका महाविद्यालयाबाहेर भेटून तिच्यासोबत बळजबरीने फोटो काढून विनयभंग केला. पीडितेने हा प्रकार कुटुंबीयांना सांगितल्यानंतर दि. ७ ऑक्टोबर रोजी एमआयडीसी पोलिस…
जळगाव : प्रतिनिधी जळगावातील बोगस कॉल सेंटरमधून ज्या विदेशी नागरिकांची फसवणूक झाली व त्यांनी त्या-त्या देशात तक्रार दिली असेल, त्याची माहिती संकलित केली जात आहे. दरम्यान, या प्रकरणात माजी महापौर ललित कोल्हे (रा. कोल्हे नगर) व राकेश चंदू अगारिया (रा. वाघ नगर) या दोघांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. त्यांची नाशिक कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. नामांकीत कंपन्यांचे प्रतिनिधी असल्याचे सांगण्यासह वेगवेगळे आमिष दाखवून इंग्लंड, अमेरिका, कॅनडा, युरोप यासह अन्य देशांमधील नागरिकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या जळगावातील बनावट कॉल सेंटरवर जळगाव पोलिसांनी २८ सप्टेंबर रोजी छापा टाकला होता. यामध्ये पोलिसांनी विविध मुद्द्यांवर माहिती संकलित केली असून, एकूण फसवणुकीचा आकडा व फसवणूक झालेल्यांची…

