आजचे राशीभविष्य दि. ११ ऑक्टोबर २०२५ मेष राशी आज तुम्ही जमीन किंवा घर खरेदी करण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी तुम्हाला अपेक्षित फायदे मिळतील. स्थलांतराची शक्यता आहे. तुमचे वैवाहिक जीवन आनंदी राहील. सगळं तुमच्या मनासारखं होईल. वृषभ राशी तुमच्या कुटुंबातील वातावरण शांततापूर्ण असेल. तथापि, विविध कारणांमुळे काही समस्या उद्भवू शकतात. तुमची सार्वजनिक प्रतिमा तुमच्यासाठी अनुकूल असेल. जर तुम्ही व्यवसाय चालवत असाल तर तुम्हाला तो वाढवण्यासाठी थोडे अधिक परिश्रम करावे लागतील. मिथुन राशी तुम्ही तुमच्या व्यवसायात एक नवीन उपक्रम सुरू करू शकता, जिथे तुम्ही वेळोवेळी बदल कराल. या काळात, तुम्ही तुमच्या घरासाठी एक आलिशान वस्तू खरेदी करू शकता. तुमची आर्थिक परिस्थिती चांगली…
Author: editor desk
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील अहिल्यानगरमध्ये गुरूवारी (दि.९ ऑक्टोबर) एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांची सभा झाली होती. या सभेवेळी एमआयएमचे नेते वारीस पठाण यांनी वादग्रस्त भाषण केलं होतं. त्यांनी भातपचे नेते नितेश राणे यांच्यावर टीका करताना काही आक्षेपार्ह आव्हाने दिली होती. त्यावर आता मंत्री नितेश राणे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. नितेश राणे यांनी वारीस पठाण यांच्या आव्हानावर प्रतिआव्हान देत तुम्ही फक्त जागा, वेळ किंवा मस्जिद कळवा असं म्हटलं. नितेश राणे आज माध्यमांशी बोलताना म्हणाले, कालची सभा ही अहमदनगरमध्ये नाही तर अहिल्यानगरमध्ये झाली आहे. भुंकाणारी कुत्री चावत नाहीत. राणे पुढे म्हणाले, ‘ते अहिल्यानगरमध्ये येत वळवळ करत होते त्यांना अहिल्यानगर नाव मानायंच नाही…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था येत्या काही दिवसावर दिवाळी सण येवून ठेपला असताना देशांतर्गत वायदा बाजारात आज सोन्याच्या किमती वाढल्या, परंतु ही वाढ अल्पकालीन होती. सकाळी १० वाजता, मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर ५ डिसेंबर रोजी एक्सपायर होणारा सोन्याचा वायदा दर ₹१२०,४८८ प्रति १० ग्रॅमवर व्यवहार करत होता, जो मागील दिवसाच्या बंद किमतीपेक्षा ₹५ ने कमी होता. भारतीय देशांतर्गत वायदा बाजारात सोन्याच्या किमती ₹५०८ च्या वाढीसह उघडल्या. गुरुवारी ₹१२०,४९३ वर बंद झाल्यानंतर आज, MCX वर सोन्याच्या किमती ₹१२१,००१ प्रति १० ग्रॅमवर उघडल्या. सुरुवातीच्या व्यवहारात MCX सोने ₹१२१,३५० च्या उच्चांकावर पोहोचले होते. मात्र, विक्रीच्या दबावामुळे ते घसरले. IBJA वर, ९ ऑक्टोबर रोजी…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील काही भागात मुसळधार पाऊस झाल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. राज्य सरकारकडून शेतकऱ्यांसाठी मदतीची घोषणा देखील केली जात आहे. मात्र ओला दुष्काळ जाहीर करावा आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी, या मागण्या जोर धरत आहेत. सहकार मंत्री आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार बाबासाहेब पाटील यांनी केलेल्या विधानामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. चोपडा येथे दीपज बँकेच्या शाखा उद्घाटन कार्यक्रमात बोलताना बाबासाहेब पाटील यांनी ‘लोकांना कर्जमाफीचा नाद लागलाय. आम्हाला निवडून यायचं म्हणून निवडणुकीत काहीतरी आश्वासन देतो,’ असे विधान केले आहे. सध्या मराठवाड्यातील शेतकरी अडचणीत सापडला आहे. राज्यभरातून शेतकऱ्यासाठी मदत पोहचली जात…
पुणे : वृत्तसंस्था गेल्या काही दिवसापासून पुणे जिल्ह्यात वाढत असलेल्या गुन्हेगारी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. कोथरूडमधील अलीकडील गोळीबारानंतर घायवळ गँगचा म्होरक्या नीलेश घायवळ आणि त्याच्या टोळीच्या कारवायांमुळे पुणेच नव्हे तर राज्यभरातील राजकारणात खळबळ उडाली आहे. या प्रकरणावरून महायुतीतच एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी नीलेशचा भाऊ सचिन घायवळ याला शस्त्र परवाना दिल्याचा आरोप होत असतानाच, राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज यावर सविस्तर भूमिका मांडली आहे. पुण्यात आज झालेल्या राष्ट्रवादी परिवार मिलन कार्यक्रमानंतर अजित पवार माध्यमांशी बोलत होते. पत्रकारांनी नीलेश घायवळ आणि सचिन घायवळ यांच्या संदर्भात विचारले असता त्यांनी स्पष्ट सांगितले की,…
जळगाव : प्रतिनिधी दोन एकरावर तूरीच्या पिकात गांजाची लागवड करणाऱ्यांचा रावेर पोलिसांनी पर्दाफाश केला. ही कारवाई रावेर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने रावरे तालुक्यातील मोरव्हेल शिवारात केली. याठिकाणाहून सुमार १७ लाख रुपये किंमतीचे १७१ किलो वजनाची गांजाची (कॅनबिस वनस्पती) लागवड उद्ध्वस्त केली आहे. या प्रकरणी एका संशयितावर आरोपीवर एन.डी.पी.एस. अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, रावेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल हे दि. ८ रोजी गावात पायी गस्तीसाठी निघाले असताना त्यांना दोन तरुण संशयितरित्या बसलेले आढळून आले. दोघांना पोलीस ठाण्यात घेऊन जात विचारपूस केली असता एकाच्या मोबाईलमध्ये गांजाची शेती असलेले फोटो दिसले. त्यांनी याबाबत…
जळगाव : प्रतिनिधी भुसावळ तालुक्यातील वरणगाव शहरात बेकायदेशीररित्या शस्त्र बाळगणाऱ्या एका रेकॉर्डवरील आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रंगेहाथ अटक केली आहे. कारवाई दरम्यान पोलिसांनी दोन गावठी पिस्तुल व एक जिवंत काडतूस असा सुमारे ५०,५०० रुपये किंमतीचा शस्त्रसाठा जप्त केला आहे. ही कारवाई ८ ऑक्टोबर रोजी रात्री ११.३० वाजता वरणगाव येथील तिरंगा चौकात करण्यात आली. अटकेतील आरोपीचे नाव संजय गोपाळ चंडेले (वय ५०, रा. दर्यापुर शिवार, ऑर्डनन्स फॅक्टरी, वरणगाव) असे आहे. तो पूर्वीही आर्म अॅक्ट अंतर्गत गुन्ह्यांमध्ये अडकलेला असून, वरणगाव पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध २०२२ मध्ये दोन गुन्हे नोंद आहेत. या संदर्भात जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी (भा.पो.से.) यांनी आगामी…
जळगाव : प्रतिनिधी गैरसमजातून कृष्णा पांडुरंग सोनवणे (वय २८, रा. शिवाजी नगर नवीन घरकुल) याला संशयित कल्पेश देविदास शिंपी (रा. शिवाजीनगर) याने लोखंडी पट्टीने वार करीत गंभीर जखमी केले. ही घटना दि. ८ रोजी दुपारच्या सुमारास शिवाजी नगरात घडली. याप्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, शहरातील शिवाजी नगर घरकुल परिसरात कृष्णा पांडुरंग सोनवणे हा तरुण वास्तव्यास आहे. दि. ८ रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास संशयित कल्पेश शिंपी याने गैरसमजातून कृष्णा सोनवणे याच्यासोबत वाद घातला. त्यांच्यातील वाद वाढतच गेला. यावेळी कल्पेश शिंपी याने कृष्णा सोनवणे याला शिवीगाळ करीत लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. त्यानंतर त्याजवळील लोखंडी…
जळगाव : प्रतिनिधी ऑनलाइन ट्रेडिंगमध्ये आकर्षक नफ्याचे आमिष दाखवून एका ६१ वर्षीय व्यक्तीची तब्बल ५ लाख १४ हजार १०० रुपयांची फसवणूक केल्याची घटना बुधवार, ८ ऑक्टोबर रोजी उघडकीस आली आहे. ‘वेल्थ इंडेक्स-के१३’ नावाच्या ग्रुपच्या माध्यमातून ही फसवणूक केली आहे. सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भागवत किसन पाटील (वय ६१, रा. गणेश पार्क, जळगाव) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. दि. १४ ऑगस्टपासून फिर्यादी भागवत पाटील यांना ट्रेडिंगमध्ये पैसे गुंतवण्यासंदर्भात संपर्क साधण्यात आला. आमिषाला बळी पडून फिर्यादी भागवत पाटील यांनी वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये टप्प्याटप्याने एकूण ५ लाख १४ हजार रुपये ऑनलाईन जमा केले. रक्कम स्वीकारल्यानंतर आरोपींनी फिर्यादीला कोणत्याही प्रकारची रक्कम…
मुक्ताईनगर : वृत्तसंस्था केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या मालकीच्या रक्षा ऑटो फुएल्स या मुक्ताईनगरातील पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्यात आला. यात दोन कर्मचाऱ्यांना बंदुकीचा धाक दाखवत मारहाण करीत तोडफोड करण्यात आली. जवळपास एक लाख रुपयांची रोकड लंपास करण्यात आली. ही थरारक घटना राष्ट्रीय महामार्गावर गुरुवारी रात्री १०:४५ वाजेच्या सुमारास घडली. मिळालेल्या माहितीनुसार, प्रकाश माळी व दीपक खोसे अशी मारहाण झालेल्या कर्मचाऱ्यांची नावे आहेत. या पेट्रोल पंपावर दोन दुचाकीवर आलेल्या पाच जणांनी अचानक या कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. कर्मचाऱ्यांच्या डोक्याला बंदूक लावत गल्ल्यातील आणि कर्मचाऱ्यांकडे असलेली जवळपास एक लाख रुपयांची रोकड लंपास केली. तसेच ऑफिसमधील संगणक, प्रिंटर, सीसीटीव्ही आणि विविध…

