Author: editor desk

पाचोरा : प्रतिनिधी येथील भाजपच्या नेत्या वैशाली सूर्यवंशी यांना अज्ञात व्यक्तीने भ्रमणध्वनीद्वारे धमकी देत चक्क ३० लाख रुपयांची खंडणी मागीतल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यानंतर वैशाली सूर्यवंशी यांनी पोलिस ठाण्यात धाव घेत अज्ञात व्यक्तीविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सन २०२४ मध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत वैशाली सूर्यवंशी यांनी उमेदवारी केली होती. त्या वेळी वैशाली सूर्यवंशी यांना अज्ञात क्रमांकावरुन फोन आला होता. त्यावेळी अज्ञात व्यक्तीने वैशाली सूर्यवंशी यांना कुटनितीने तुम्हाला जिंकुन देतो, असे सांगितले होते. मात्र, वैशाली सूर्यवंशी यांनी त्याकडे दुर्लक्ष केले होते. दरम्यान, सप्टेंबर २०२५मध्ये पुन्हा त्या अज्ञात व्यक्तीने वेगवेगळ्या मोबाइलवरुन वैशाली सूर्यवंशी यांना फोन करुन धमकावण्याची…

Read More

आजचे राशिभविष्य दि. १२ ऑक्टोबर २०२५ मेष राशी वाटेत आलेले अनावश्यक अडथळे आपोआपच संपतील. आज तुम्हाला तुमच्या आईकडून काही चांगली बातमी मिळू शकते. आज तुम्ही आनंदी असाल. तुम्हाला अचानक एखाद्या धार्मिक कार्यात योगदान देण्याची संधी मिळेल. वृषभ राशी आर्थिक बाबतीत तुम्हाला थोडे सावध राहण्याची गरज आहे. आज तुम्ही एखाद्या परदेशी कंपनीसोबत भागीदारी करू शकता, ज्यामुळे तुम्हाला भविष्यात फायदा होईल. आज तुम्ही तुमच्या शेजाऱ्यांसोबत काही सामाजिक कार्यातही मदत कराल. मिथुन राशी आज तुम्हाला तुमच्या वडिलांकडून प्रेरणा घेऊन पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे. तुमची आर्थिक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी तुमच्या सर्जनशीलतेचा वापर केल्याने लक्षणीय फायदे होतील. कोणताही नवीन व्यवसाय सुरू करण्यापूर्वी, अनुभवी लोकांचा सल्ला…

Read More

धुळे : वृत्तसंस्था देशभरातील शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजना, राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान, कडधान्य अभियानाचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिल्ली येथे करण्यात आला. राज्यातील नऊ जिल्ह्यांची या योजनेसाठी निवड झाली असून ऑनलाइन पद्धतीने दोंडाईचा येथिल कृषी उत्पन्न बाजार समिती येथील सभागृहात कृषी विभागातील अधिकारी शेतकरी यांनी या कार्यक्रमात सहभाग नोंदवला. दोंडाईचा येथील कार्यक्रमास पालकमंत्री जयकुमार रावल यांची उपस्थिती होती. त्यांनी या योजनेचा उद्देश उपस्थितांसमोर स्पष्ट केला. प्रधानमंत्री धन्य धान्य कृषी योजना, राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान, कडधान्य अभियान शुभारंभ नवी दिल्ली येथे संपन्न झाला. हा कार्यक्रम महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक जिल्हा, तालुका मुख्यालय, ग्रामपंचायत,…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती म्हणूनच लढायच्या आहेत, जे लोक छळकपट करतात त्यांना रोखलं पाहिजे. तसेच युती होऊ नये असे त्यांना वाटत असेल तर त्यांच्यापासून सावध राहिले पाहिजे, असे विधान शिवसेनेचे नेते सामाज कल्याण विभागाचे मंत्री संजय शिरसाट यांनी केले आहे. यामुळे चर्चांना उधाण आले असून महायुतीमध्ये अंतर्गत धूसफूस असल्याची जोरदार चर्चा राज्याच्या राजकारणात सुरू झाली आहे. त्यांच्या विधानाचा रोख नेमका कोणाकडे होता याबाबत त्यांनी स्पष्ट संकेत दिलेले नाहीत. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे जोरदार मोर्चेबांधणी केली जात आहे. आत्तापासूनच इच्छुकांचे संधी मिळण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. महायुतीमधील भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने स्थानिक…

Read More

छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था राज्यात गेल्या काही दिवसांपूर्वी पावसाच्या पाण्याचा हाहाकार माजला होता. या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. राज्य सरकारने शेतकऱ्यांना मदत जाहीर केले आहे. मात्र, संपूर्ण कर्जमाफी आणि ओला दुष्काळ याबाबत कोणताही ठोस निर्णय घेतला नाही. यावरून आता राजकारण आणखी तीव्र होताना दिसत आहे. याचे कारण म्हणजे उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आक्रमक भूमिका घेतली असून छत्रपती संभाजीनगरमध्ये आयोजित हंबरडा मोर्चातून त्यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या मदतीच्या पॅकेजवर उद्धव ठाकरे यांनी आक्षेप घेत जोरदार प्रहार केला. पॅकेज पाहिल्यावर सगळ्यांना असं वाटलं की इतिहासातलं सर्वात मोठं पॅकेज…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था राज्यातील अनेक ज्येष्ठ मंत्र्यांना महायुतीची सत्ता आल्यानंतर नव्या मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही. यामुळे अनेक नेत्यांनी उघडपणे नाराजी बोलून दाखवली नाही. परंतु राज्याच्या राजकारणात अनेक बड्या नेत्यांना मंत्रिमंडळातून डावल्यामुळे ते नाराज असल्याची चर्चा अधून मधून होतच असते. भाजपचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले नाही. त्यामुळे ते नाराज असल्याची चर्चा होत होती. त्यानंतर त्यांनी माध्यमांसमोर येत नाराज नसल्याची स्पष्ट भूमिका मांडली. परंतु, नुकतेच सुधीर मुनगंटीवार यांनी थेट दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भेट घेतली. त्यानंतर त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. या प्रतिक्रेमुळे मुनगंटीवार यांना मोठी संधी मिळणार असल्याची जोरदार चर्चा सुरू…

Read More

वडीगोद्री : वृत्तसंस्था गेल्या काही दिवसापासून राज्यात मराठा व ओबीसी आरक्षणावरून मोठे वादंग सुरु असून नागपूर येथे ओबीसी मोर्चा काढण्यात आला होता. जो नेता छगन भुजबळ यांच्या आहारी जातो तो संपतो, अशी टीका मनोज जरांगे पाटील यांनी नागपूर येथील ओबीसी मोर्चानंतर काँग्रेस नेते वडेट्टीवार यांच्यावर गुरुवारी (दि.९) केली. माध्यमांशी बोलताना जरांगे पाटील म्हणाले की, जोपर्यंत काँग्रेसचा सुपडा साफ होत नाही, तोपर्यंत ते गप्प बसणार नाहीत. छगन भुजबळ यांच्या षडयंत्रात विजय वडेट्टीवारसुद्धा गुंतले आहेत. चांगला माणूस होता, चांगला विरोधी पक्षनेता होता, चांगले काम करत होता, परंतु आता काँग्रेसचा सुपडासाफ करायला निघाला आहे. जरांगे पाटील पुढे म्हणाले की, मराठा समाजाला ४८ टक्के…

Read More

जळगाव : प्रतिनिधी चोपडा-सनपुले रस्त्यावर दि. १० रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात मोटारसायकलस्वार रोहिदास जुलाल पाटील (वय ४६, रा. सनपुले) यांचा जागीच मृत्यू झाला तर, मागे बसलेले हंसराज मोहन पाटील (वय २५, रा. सनपुले) हे जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, दोघेही सकाळी पिण्याच्या पाण्याचे कुप्पे घेऊन मोटारसायकल क्रमांक एमएच २०, डीओ ७५६४ वरून कुरवेलकडे जात होते. त्या दरम्यान चोपड्याकडून भरधाव वेगाने येणाऱ्या टक क्रमांक आरजे ११ जीए या धडकेत मोटारसायकल चालक रोहिदास पाटील हे ट्रकच्या मागच्या चाकाखाली आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला, तर हंसराज पाटील हे दूर फेकले गेल्याने जखमी झाले. अपघातानंतर ट्रकचालक वाहनासह घटनास्थळावरून फरार झाला. या…

Read More

जळगाव : प्रतिनिधी १५ वर्षीय अल्पवयीन मुलीला धमकी देत मित्राच्या खोलीवर नेऊन तिच्यावर तरुणाने अत्याचार केला. हा प्रकार एप्रिल ते ऑक्टोबर २०२५ दरम्यान घडला. याप्रकरणी तालुका पोलिस मुन्ना ठाण्यात फरहान उर्फ उसनुद्दीन सैयद (रा. आव्हाणे, ता. जळगाव) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील एका गावामधील १५ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही जळगावात टायपिंग क्लासला येते. क्लासजवळ येऊन फरहान सैयद याने माझ्या सोबत फिरायला चालते का, असे विचारले. मुलीने त्यास नकार दिला. मात्र तरुण सतत तगादा लावत होता. जून महिन्यात पुन्हा हा तरुण क्लासजवळ आला व तिला धमकी देऊन दुचाकीवर मित्राच्या घरी घेऊन गेला. त्यानंतर तरुणाने तीन ते…

Read More

जळगाव : प्रतिनिधी तालुक्यातील  वावडदा येथे महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री व पालकमंत्री यांचे पुत्र मा.जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांच्या हस्ते श्री साई ॲग्रो सव्हिर्सेस या दालनाचा फित कापुन शुभारंभ करण्यात आला . यावेळी प्रतापराव पाटील यांनी परिसरातील शेतकऱ्यांसाठी कृषी क्षेत्रात जलदगतीने सेवा देण्यासाठी एकाच छताखाली I S I कंपनीने ठिबक सिंचन, तुषार सिंचन,पी.व्ही.सी.पाईप, रासायनिक खते,बि-बियाणे, किटकनाशक औषधे तसेच नामांकित टिशु कल्चर केळीचे रोपे,खरबुज, टरबुज रोपांची बुकिंग अशा विविध सुविधा उपलब्ध होणार असल्याचे सांगितले . तसेच फॉर्चुन ठिबक कंपनीचे प्रतिनिधी स्वप्नील भुरे, रासायनिक खत कंपनीचे किरण पाटील यांनी मार्गदर्शन केले. या उद्घाटन प्रसंगी जळगाव जिल्हा दुध संघाचे संचालक…

Read More