जळगाव : प्रतिनिधी मोबाईलमधील व्हॉटस्अॅपची सेटिंग ‘अॅटो डाऊनलोड’वर असताना एपीके फाईल डाऊनलोड आणि झाली जळगावातील व्यावसायिकाच्या खात्यातून तब्बल चार लाख ६४ हजार ४३९ रुपये गायब झाले. हा प्रकार ९ ऑक्टोबर रोजी घडला. नीलेश सराफ यांच्या बँक खात्यातून पाच ते सहा ट्रान्झेक्शन झाले व १० ते १५ मिनिटात ही रक्कम गायब झाली. मोबाईल गरम झाल्याचे लक्षात आल्यानंतर सराफ यांनी मोबाईल पाहिला असता त्यांना पैसे काढल्याचे मेसेज आलेले दिसले. तसेच ४० ते ५० ओटीपीदेखील आलेले होते. सराफ यांची वॉशिंग मशीन खराब झाल्याने त्यांनी कस्टमर केअरला कॉल केला होता. त्यानंतर कर्मचारी येऊन मशीनची दुरुस्ती करून गेले होते. त्यासाठी आलेले ओटीपी संबंधितांना दिले व…
Author: editor desk
चाळीसगाव : प्रतिनिधी शहर पोलिसांच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे एका तरुणाला ताब्यात घेऊन त्याच्याकडून बनावटी गावठी पिस्तूल आणि दोन राउंड जप्त केले, तसेच त्यास अटक केली. ही कारवाई १२ तारखेला मध्यरात्री करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, दि. १२ तारखेला रात्री २:२० वाजता पोलिस निरीक्षक अमितकुमार मनेळ यांना गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी तत्काळ एक पथक नेमले. घाटरोड ते हुडको त्रिमूर्ती बेकरीकडे जाणाऱ्या रस्त्यावरून एक व्यक्ती जाताना दिसल्यावर पोलिसांनी त्याला घेराव लावून ताब्यात घेतले. त्याचे नाव मयूर राजू मोरे (३०, प्रभात गल्ली, चाळीसगाव) असे असल्याचे समजले. त्याची अंगझडती घेतली असता, त्याच्या कमरेच्या उजव्या बाजूस शर्टाखाली ३२ हजार रुपये किमतीची बनावटी गावठी पिस्टल,…
भुसावळ : प्रतिनिधी शहरातील रेल्वे फिल्टर हाऊस मागील कवाडे नगर परिसरात कर्ज हप्त्याच्या वादातून एका तरुणास चाकूने भोसकून गंभीर जखमी केल्याची घटना रविवारी १२ रोजी सकाळी दहा ते सव्वा दहा वाजेच्या सुमारास घडली. कवाडे नगर येथील जगन्नाथ तायडे यांच्या घरी त्यांची मुलगी रत्नमाला शरद बाविस्कर व नातू प्रतीक शरद बाविस्कर हे बसलेले असताना, रेखा उर्फ छकुबाई दीपक म्यांद्रे हिने बँकेतील कर्ज हप्त्याबाबत वाद घालत कर्जाचे हप्ते भरा, असे सांगितल्याचा राग धरून आणखी चौघांना सोबत घेऊन प्रतीक व रत्नमाला बाविस्कर यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात प्रतीक बाविस्कर याला चाकूने भोसकून गंभीर जखमी करण्यात आले तर रत्नमाला बाविस्कर व त्यांच्या आईलाही मारहाण…
चोपडा : प्रतिनिधी जिल्ह्यातील अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात अवैध वाळू वाहतूक सुरु असून महसूल पथक नेहमीच हि वाहतूक रोखण्यासाठी मोठी कसरत करत असतात, मात्र त्यांच्याकडून देखील हि वाळू वाहतूक रोखणे शक्य होत नसल्याने आता चोपडा तालुक्यातील एक थरारक घटना समोर आली आहे. अवैध वाळूची वाहतूक रोखणाऱ्या महसूल पथकातील कर्मचाऱ्यांवर रविवारी पहाटे वाळूतस्करांनी हल्ला केला. यात मंगरूळचे ग्राम महसूल अधिकारी अनंत माळी यांना ट्रॅक्टरवरून खाली फेकून मागील चाक त्यांच्या अंगावर घालून मारण्याचा प्रयत्न झाला. सोबतच्या कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखत त्यांना बाहेर ओढले. त्यामुळे त्यांचा जीव वाचला. याप्रकरणी दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही थरारक घटना बुधगाव-जळोद (ता. चोपडा) रस्त्यावर घडली.…
मेष राशी तुमच्या व्यवसायाच्या योजना सर्वांसोबत शेअर करू नका, गुप्त राखा, तरच नक्कीच यश मिळेल. जर तुम्ही आज तुमच्या योजनांनुसार काम केले तर तुमची सर्व नियोजित कामे पूर्ण होतील. कोणत्याही उपक्रमात गुंतवणूक करण्यापूर्वी, सखोल संशोधन करा. यामुळे नुकसान होणार नाही. वृषभ राशी खूप आधी सुरू केलेलं काम आज पूर्ण होईल आणि तुम्हाला सकारात्मक परिणाम दिसतील. संयम राखा आणि काळासोबत वाटचाल करा. तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवणे फायदेशीर ठरेल. आज तुम्हाला प्रगतीचे नवीन मार्ग सापडतील. या राशीच्या लोकांना आज काही महत्त्वाच्या कामात त्यांच्या जोडीदाराची मदत मिळेल. ते घर स्वच्छ करण्यात व्यस्त असतील. मिथुन राशी आज तुम्हाला काही कामातून मोठा फायदा होईल आणि…
मुंबई : वृत्तसंस्था राज्याच्या राजकारणातील ठाकरे बंधू गेल्या काही दिवसापासून एकत्र आल्याने मोठी चर्चा सुरु झाली आहे. आता पुन्हा एकदा मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज (दि.१२) दुपारी मातोश्रीवर दाखल झाले आहेत. ठाकरे कुटुंबीयांमध्ये स्नेहभोजनाचे आयोजन केल्याचे सांगितले जात असले तरी आजच्या भेटीत ठाकरे बंधूमध्ये राजकीय चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मागील चार महिन्यांतील ही पाचवी भेट आहे. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान, छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा घेऊन राज ठाकरे मातोश्रीवर दाखल झाले आहेत. तसेच भेट म्हणून तुळशीचे रोपही त्यांनी सोबत घेतले आहे. तर बऱ्याच वर्षांनी राज ठाकरे यांची आई मातोश्रीवर आल्या आहेत. महानगरपालिका निवडणुका काही तोंडावर आलेल्या…
चाळीसगाव : प्रतिनिधी तालुक्यातील अग्रगण्य अश्या पिंपळवाढ म्हाळसा सहकारी दूध उत्पादक सोसायटीच्या वतीने आज दूध उत्पादकांना माझ्याहस्ते बोनस वाटप शुभारंभ करण्यात आला. दूध उत्पादक शेतकऱ्यांना जिल्हा दूध संघाच्या वतीने 50 पैसे व सोसायटीच्या नफ्यातून 50 पैसे असे एकूण 1 रुपये प्रतिलिटर बोनस देण्यात येत आहे. आपल्या नफ्याचा वाटा शेतकऱ्यांना देण्याचा पिंपळवाड म्हाळसा सोसायटीचा हा निर्णय निश्चितच कौतुकास्पद असून खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांच्या कष्टाचा सन्मान त्यांनी केला आहे. व्यवस्थापन पारदर्शक असेल, सदस्य एकदिलाने काम करत असतील आणि शेतकऱ्यांचा हिताचा विचार केंद्रस्थानी ठेवला जाईल तर प्रत्येक सोसायटी अशाच पद्धतीने आत्मनिर्भर बनेल हा आम्हाला विश्वास आहे. जिल्हा दूध संघाचा चेअरमन या नात्याने जिल्ह्यातील प्रत्येक…
जळगाव : प्रतिनिधी नात्याला काळिमा फासणारी घटना जळगाव शहरातील एका परिसरातून समोर आली आहे. घरात कोणीही नसल्याचा फायदा घेत वाईट नजर ठेवून असलेल्या दीराने वहिनीवर अत्याचार केला. ही बाब विवाहितेने सासूसह पतीला सांगितली असता, त्यांनी ही बाब कोणाला सांगू नको अशी धमकी दिली. त्यानंतर देखील दि. १० रोजी संशयिताने वहिनीला जमिनीवर पाडून तिचा विनयभंग केल्याची ही संतापजनक घटना शहरात घडली आहे. याप्रकरणी विवाहितेने दिलेल्या फिर्यादीवरुन पती, दीरासह सासूविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, शहरातील एका परिसरात विवाहिता कुटुंबियांसह वास्तव्यास असून त्यांच्या पतीला दारुचे व्यसन असल्याने ते कामधंदा करीत नाही. विवाहितेचा दीर हा गेल्या दोन वर्षांपासून…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील पश्चिम बंगालमधून एक संतापजनक बातमी समोर आली आहे. पश्चिम बंगालमधील दुर्गापूर येथे एका वैद्यकीय विद्यार्थिनीवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणात पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. दोघे अजूनही फरार आहेत. ही घटना १० ऑक्टोबर रोजी रात्री ८ ते ९ च्या दरम्यान घडली. पीडिता तिच्या मित्रासोबत जेवण्यासाठी बाहेर गेली असताना तिच्यावर तीन तरुणांनी सामूहिक बलात्कार केला. कोलकातापासून १७० किमी अंतरावर असलेल्या दुर्गापूर येथील एका खाजगी वैद्यकीय महाविद्यालयासमोर ही घटना घडली. ओडिशातील एमबीबीएसच्या दुसऱ्या वर्षाची विद्यार्थिनी असलेली पीडिता सध्या एका खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी तिच्या मित्रासोबत जेवायला बाहेर गेली होती. कॅम्पसच्या गेटवर…
भुसावळ : प्रतिनिधी तालुक्यातील वरणगाव येथील रामपेठेतील रहिवासी तथा नगर परिषदेत पाणीपुरवठा विभागातील कर्मचारी सुनील भिका भुसांडे (वय ४५) यांचे बुलडाणा येथे एका दुर्दैवी अपघातात निधन झाले. त्यांच्या निधनाने संपूर्ण वरणगावात हळहळ व्यक्त होत आहे. सविस्तर वृत्त असे कि, सुनील भुसांडे हे काही दिवसांपूर्वी सामाजिक कार्यक्रमासाठी बुलढाणा येथे जात असताना रस्त्यात अपघात झाला होता. या अपघातात सुनील भुसांडे यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली होती. त्यामुळे त्यांच्यावर गत ४ दिवसपासून बुलढाणा येथील रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र, १० ऑक्टोबरलला मृत्यूशी झुंज देतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. मयत सुनील भुसांडे यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, २ मुली असा परिवार आहे. सुनील भुसांडे हे नगर…

