Author: editor desk

मुंबई : वृत्तसंस्था येत्या काही दिवसात दिवाळीला सुरुवात होणार असताना सोन्यापाठोपाठ चांदीचे दर विक्रमी पातळीवर गेले असून, जीएसटीसह चांदीचा दर प्रतिकिलो 1 लाख 85 हजार रुपयांवर गेला आहे. सोन्याचा दर जीएसटीसह प्रति दहा ग्रॅम एक लाख 28 हजार रुपये झाला आहे. चांदीच्या दरात गेल्या आठ दिवसांमध्ये 25 हजार रुपयांची मोठी दरवाढ झालेली दिसते. देशपातळीवर एमसीएक्स या वायदेबाजारातही 9 ऑक्टोबरला चांदीचा प्रतिकिलो दर 1 लाख 58 हजार रुपये होता. त्यात सोमवारी (13 ऑक्टोबर) 1 लाख 71 हजार 85 रुपयांपर्यंत वाढ झाली. सणासुदीमुळे वाढलेली मागणी आणि त्या तुलनेत कमी पुरवठा यामुळे प्रामुख्याने चांदी भाव खाऊ लागली आहे. इलेक्ट्रिक वाहन, सौरऊर्जा, सेमीकंडक्टरसाठी चांदीची…

Read More

अमळनेर : प्रतिनिधी तालुक्यातील अंतुर्ली येथे शेतात पायी जाणाऱ्या महिलेला दुचाकीने धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना १२ रोजी घडली. यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. तालुक्यातील अंतुर्ली येथील संजय आसाराम पाटील व त्यांच्या पत्नी वंदना संजय पाटील हे खापरखेडा ते अंतुर्ली रस्त्याने शेतात जात होत्या. या वेळी भरत निंबा पाटील (रा. अंतुर्ली) यांची समोरून येणारी दुचाकी (एमएच – ५४, ए- ०१८८) भरधाव वेगाने वंदना पाटील यांना धडकली. या दुर्दैवी अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली. त्यांना तत्काळ अमळनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी भरत पाटील याच्याविरुद्ध मारवड पोलिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात…

Read More

जळगाव : प्रतिनिधी दिवाळीसाठी पैसे आणि वस्तू द्या असे म्हणत घरात जबरदस्तीने शिरलेल्या वॉचमनने आरोही इंद्रकुमार ललवाणी (३८, रा. बालाजी हाईटस्, मोहाडी रोड) या महिलेवर चाकूने वार केले. हल्ला करणारा गोकूळ हंसराज राठोड (रा. सांगवी, ता. चाळीसगाव) हा पूर्वी या इमारतीमध्ये वॉचमन म्हणून काम करीत होता. ही घटना सोमवारी (दि. १३ ऑक्टोबर) घडली. यावेळी मोठी गर्दी होऊन नागरिकांनी हल्ला करणाऱ्याची धुलाईदेखील केली. संशयित गोकूळ राठोड हा १३ ऑक्टोबर रोजी इमारतीमध्ये आला व आरोही ललवाणी यांच्या घरी जाऊन पिण्यासाठी त्याने पाणी मागितले. पाणी पिल्यानंतर त्याने महिलेकडे दिवाळीसाठी पैसे व वस्तू द्या, अशी मागणी केली. त्यावेळी तो घरात शिरला. त्याला बाहेर काढत…

Read More

जळगाव : प्रतिनिधी जळगाव तालुक्यातील वसंतवाडी येथे २३०० लोकसंख्या असलेल्या गावांमध्ये पाणी पुरवठा कर्मचारी उमेश पाटील व शिपाई रामेश्वर चव्हाण असे दोन कर्मचारी कर्तव्यावर आहेत . वसंतवाडी प्लाट भाग वार्ड १मध्ये मोरोती मंदीरासमोरील चौकात बऱ्याच दिवसांपासून गावात पाणी पुरवठा करणाऱ्या पाईप लाईन वरील वाल लिक होते त्यामुळे पाण्याची नासाडी होऊन पुढे कमी दाबाने पाणीपुरवठा होत होता या विषयी त्यामुळे नागरिकांनी ग्रामपंचायतीत सरपंच व ग्रामसेवक यांना लिकेज संदर्भात माहिती दिली याची दखल घेत सरपंच विनोद पाटील यांनी ग्रामसेवक बबन वाघ यांना सदर लिकेज वाल बदलून नवीन वाल बसविण्याची सुचना केली.ग्रामसेवक यांनी त्यासाठी लागणारे साहित्य पाणी पुरवठा कर्मचाऱ्यांला घेऊन दिल्यानंतर साधारण दिड…

Read More

आजचे राशिभविष्य दि.१४ ऑक्टोबर २०२५  मेष राशी मेष राशीवाल्यांनी आज जोडीदारासोबत रोमँटिक वेळ घालवण्याचा विचार करा, किंवा जर तुम्ही अविवाहित असाल तर काही मित्रांसोबत किंवा कुटुंबासोबत बाहेर जाण्याचा विचार करा, कारण आज सामाजिक कार्यक्रम खूप मजेदार असणार आहेत. चिंता सोडा, थोडा वेळ मजेच घालवा, रिलॅक्स वाटेल. आजचा दिवस तुमच्यासाठी एक रोमांचक आणि सकारात्मक अनुभव घेऊन येईल, जो तुमच्या सामाजिक जीवनाला नवीन उंचीवर घेऊन जाईल. वृषभ राशी तुमच्या सभोवतालचे वातावरण सकारात्मकतेने भरलेले असेल आणि याचा तुमच्या नातेसंबंधांवरही परिणाम होईल. इतरांना प्रेरणा देण्याची तुमची क्षमता आज तुमचे नाते आणखी गोड करेल. तुम्ही नेहमीच ज्या मुख्य नात्यांवर अवलंबून राहिला आहात ते मजबूत करण्याची…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात वाढलेल्या भेटीगाठींमुळे राज्याच्या राजकारणात मनसे-ठाकरे गट युतीच्या चर्चांना अधिक वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर आता राज्याचे उद्योगमंत्री आणि शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांनी राज ठाकरे यांना थेट सल्लाच दिला आहे. युतीचा निर्णय घेण्यापूर्वी राज ठाकरे यांनी काँग्रेसच्या स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दलच्या भूमिकेचा नक्कीच विचार करावा, असे उदय सामंत म्हणालेत. ‘काँग्रेस’ला सोबत घेण्याची इच्छा राज ठाकरे यांची इच्छा आहे. महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसला सोबत घेणे गरजेचे असल्याची राज यांची भूमिका असल्याचे विधान ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केले. त्यांच्या…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था केरळच्या तिरुवनंतपुरम येथील एका 26 वर्षीय अभियंत्र्याने 9 ऑक्टोबर रोजी आत्महत्या करून आपली जीवनयात्रा संपवली. तत्पूर्वी, एका सुसाईड नोटमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शिबिरात झालेल्या लैंगिक शोषणामुळे आपण हे टोकाचे पाऊल उचलत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचे सुपुत्र प्रियांक खरगे यांनी कर्नाटक सरकारकडे एका पत्राद्वारे संघावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी वरील शब्दांत ही मागणी धुडकावून लावली आहे. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले कि , राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही एक सांस्कृतिक शक्ती व देशभक्त संघटना आहे. त्यामुळे या संघटनेवर बंदी घालण्याची मागणी करणाऱ्यांकडे आम्ही ढुंकूणही पाहत नाही, अशा शब्दांत…

Read More

जळगाव : प्रतिनिधी भुसावळ तहसील कार्यालयातील तलाठी, कोतवाल आणि एका खाजगी पंटराला वाळू वाहतुकीस परवानगी देण्यासाठी आणि कारवाई न करण्याच्या मोबदल्यात ७३ हजारांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ अटक केली आहे. ही कारवाई आज सोमवार, १३ ऑक्टोबर रोजी दुपारी करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, वरणगाव परिसरातील वाळू व्यवसायाशी संबंधित व्यक्तीकडून ७३ हजार रुपयांची लाच मागण्यात आली होती. या प्रकरणाची तक्रार संबंधिताने जळगाव एसीबीकडे केली. त्यानुसार पोलिस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली सापळा रचण्यात आला. या सापळ्यात वराडसीम येथील तलाठी नितीन पंडितराव केले, कोतवाल आणि एका खाजगी पंटराला लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. ल्ह्यात सध्या वाळू वाहतुकीवर बंदी असतानाही, वरिष्ठांच्या…

Read More

जळगाव : प्रतिनिधी गेल्या आठवड्यात शहरातील स्मशानभूमीतून अस्थी आणि दागिने चोरी जाण्याच्या घटना ताजी असताना आता पुन्हा एकदा अशीच घटना समोर आली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण पसरले आहे. एकाच आठवड्यात ही दुसरी घटना उघडकीस आल्याने स्मशानभूमींच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सविस्तर वृत्त असे कि, मेहरून स्मशानभूमीत छबाबाई पाटील यांच्या अंत्यसंस्कारांनंतर त्यांच्या अंगावरील दोन तोळे सोन्याचे दागिने चोरट्यांनी लंपास केल्याचे उघडकीस आले होते. नातेवाईक अस्थी घेण्यासाठी आले असता, स्मशानभूमी सुरक्षित नसल्याचे चित्र समोर आले. या घटनेला आठवडा उलटत नाही तोच, चोरट्यांनी पुन्हा त्याच पद्धतीने दुसरी चोरी केली आहे. जळगाव शहरातील खडके चाळीत राहणाऱ्या जिजाबाई पाटील यांच्या…

Read More

पुणे : वृत्तसंस्था गेल्या काही महिन्यापासून राज्यातील अनेक शहरात फळभाज्या महागल्या असून आता मध्य प्रदेशातून येणाऱ्या लालचुटुक अन गोड गाजराचा हंगाम अंतिम टप्प्यात आल्याने गुलटेकडी मार्केट यार्डातील तरकारी विभागात गाजराची आवक घटली आहे. सद्यस्थितीत स्थानिक भागातूनही गाजराची आवक होत आहे. मात्र त्या तुलनेत मागणी जास्त असल्याने गाजराच्या भावात गत आठवड्याच्या तुलनेत दहा टक्क्याने वाढ झाल्याचे सांगण्यात आले. गेल्या काही दिवसांपूर्वी राज्यात झालेल्या पावसामुळे फळभाज्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे पुणे बाजार समितीच्या गुलटेकडी मार्केटयार्डात रविवारी फळभाज्यांची आवक कमी झाली होती. आवक कमी झाल्याने हिरवी मिरची, सिमला मिरची, आले आणि फ्लॉवरच्या भावात 10 ते 20 टक्क्यांनी वाढ झाली होती. इतर सर्व…

Read More