मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीत अंतर्गत वाद पेटला आहे. शिवसेना (शिंदे गट) आणि भाजपामध्ये युतीच्या मुद्द्यावरून जोरदार शाब्दिक चकमक उडाली आहे. शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख अरविंद मोरे यांनी कल्याण येथील एका कार्यक्रमात भाजपाला थेट आव्हान देत म्हटले, “काम न करता निवडणूक जिंकण्याची स्वप्ने पाहणाऱ्यांना आम्ही आडवे करू. युती झाली तर ठीक, नाहीतर स्वबळावर लढू.” त्यांनी शिवसैनिकांना प्रत्येक प्रभागात धनुष्यबाण निवडून आणण्याची तयारी ठेवण्याचे आवाहन केले. याला प्रत्युत्तर देताना भाजपाचे जिल्हाध्यक्ष नंदू परब यांनी मोरे यांच्यावर पलटवार केला. ते म्हणाले, “मोरे यांनी आडवे पाडण्याची भाषा करू नये. मागील निवडणुकीत आमच्या सचिन खेमाणी यांनी त्यांना पराभूत केले होते.…
Author: editor desk
अहिल्यानगर : वृत्तसंस्था वैद्यकीय तपासणीसाठी पुण्याकडे जात असताना अज्ञात वाहन धडकेत कार उलटून झालेल्या अपघातात सासरे आणि सुनेचा मृत्यू झाला तर दोन लहान मुली गंभीर जखमी झाल्या आहेत. मृत दोघेही शेवगाव तालुक्यातील ठाकूर पिंपळगावचे रहिवासी असल्याची माहिती पोलिसांनी दिली. मंगळवारी पहाटे निवडुंगे शिवारात हा अपघात झाला. आसाराम लक्ष्मण निकाळजे (वय 70) आणि किरण बाळासाहेब निकाळजे (वय 38, दोघेही रा. ठाकूर पिंपळगाव, शेवगाव) अशी मृतांची नावे आहेत. स्वानंदा बाळासाहेब निकाळजे (वय 12) आणि स्नेहल बाळासाहेब निकाळजे (वय 6) अशी जखमी मुलींची नावे आहेत. त्यांच्यावर नगरच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. काही दिवसांपूर्वी झालेल्या अपघातात बाळासाहेब आसाराम निकाळजे हे जखमी झाले होते.…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील राजस्थानातील जैसलमेर येथे बस आगीत बळी पडलेल्या २० जणांची ओळख पटविण्यासाठी डीएनए सॅम्पलिंग सुरू झाले आहे. त्यांच्या प्रियजनांचा शोध घेणाऱ्या कुटुंबातील दोन सदस्यांचे नमुने घेतले जात आहेत. जोधपूरमधील महात्मा गांधी रुग्णालय आणि जैसलमेरमधील जवाहर रुग्णालयात डीएनए सॅम्पलिंगची व्यवस्था करण्यात आली आहे. यापूर्वी, मंगळवारी रात्री उशिरा, जैसलमेरहून १९ मृतदेह जोधपूरला आणण्यात आले. त्यापैकी फक्त हाडे असलेले एक पोते होते. एका व्यक्तीचा मृतदेह आधीच जोधपूरमध्ये होता. खरंतर, मंगळवारी दुपारी ३:३० वाजता, जैसलमेर-जोधपूर महामार्गावर एका एसी स्लीपर बसला आग लागली. या अपघातात वीस प्रवासी जिवंत जळाले. ही दुर्घटना इतकी भयंकर होती की मृतदेह बसच्या मध्ये अडकले होते. काही…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील खोटे नगरजवळ मंगळवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात भरधाव ट्रॅव्हल्सने दुचाकीला धडक दिल्याने दोन सख्खे भाऊ गंभीर जखमी झाले. जखमींपैकी एकाची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे. निमखेडी येथील रहिवासी गणपत भिकन कुंभार (वय ३५) आणि त्यांचा लहान भाऊ अर्जुन कुंभार हे दोघे रात्री दुचाकीने निमखेडीकडून खोटेनगरच्या दिशेने जात होते. याचवेळी, हॉटेल राधिकाजवळ पाळधीकडून जळगावकडे येणाऱ्या एका भरधाव ट्रॅव्हल्सने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. यात दुचाकीचा पूर्णपणे चक्काचूर झाला. यात दोन्ही भावंडे रस्त्यावर पडून गंभीर जखमी झाली. अपघात होताच परिसरातील नागरिकांनी तातडीने धाव घेतली आणि दोन्ही जखमींना उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात…
भुसावळ : प्रतिनिधी खडका गावात दिव्यांग व्यक्तीस शिवीगाळ करून मारहाण केल्याच्या प्रकरणी तीन जणांविरुद्ध भुसावळ तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना दि. १२ ऑक्टोबर रोजी खडका येथे संशयित आरोपींच्या घरासमोरील रस्त्यावर घडली. मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रवीण बाळू धांडे (वय ५०, रा. खडका) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, संशयित आरोपी राजेंद्र शालीग्राम कोळी, सुरज राजेंद्र कोळी आणि सरला राजेंद्र कोळी (सर्व रा. खडका) यांनी धांडे यांना शिवीगाळ केली. त्यानंतर सुरज कोळी याने हातातील फायटरने फिर्यादीच्या डोळ्याखाली मारहाण केली, तर अन्य दोघांनी हाताने मारहाण केल्याचा आरोप केला आहे. या घटनेत फिर्यादी जखमी झाले असून, पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेले हत्यार जप्त केले…
आजचे राशिभविष्य दि.१५ ऑक्टोबर २०२५ मेष राशी तुम्हाला आज थोरामोठ्यांचे आशीर्वाद मिळतील. आज तुमचा मूड चांगला असेल. व्यवसाय सामान्य राहील. तुमच्या वैवाहिक नात्याला पुन्हा उभारी देण्यासाठी आजचा दिवस उत्तम असेल. मेष राशी तुम्हाला आज थोरामोठ्यांचे आशीर्वाद मिळतील. आज तुमचा मूड चांगला असेल. व्यवसाय सामान्य राहील. तुमच्या वैवाहिक नात्याला पुन्हा उभारी देण्यासाठी आजचा दिवस उत्तम असेल. मिथुन राशी चांगल्या लोकांशी भेट झाल्याने तुमचा दिवस आणखी चांगला होऊ शकतो. तुमच्या आयुष्यात प्रगतीचे नवीन मार्ग उघडतील. कामाच्या ठिकाणी तुमची प्रशंसा होऊ शकते. काही महत्त्वाची कामे पूर्ण करण्यासाठी तुम्हाला तुमच्या दिनचर्येत बदल करावे लागू शकतात. कर्क राशी आज, तुमच्या जोडीदाराशी संवाद साधताना सौम्यपणे बोला,…
नातेवाईकांचे हक्क नसलेले पैसे उदगम पोर्टलवर शोधता येणार: ऑनलाइन अर्जाची सुविधा उपलब्ध! जळगाव, दि. 14 ऑक्टोबर (जिमाका वृत्तसेवा) : देशभरातील बँका आणि नियामक संस्थांकडे ₹१.८४ लाख कोटी रुपयांची कुणीही दावा न केलेली आर्थिक मालमत्ता आहे. यात जळगाव जिल्ह्यात बँकांमध्ये अंदाजे ३,३०,८७८ दावा न केलेली खाती आहेत, ज्यामध्ये अंदाजे ₹९१.४९ कोटी रुपये दावा न केलेली आहेत. सरकारद्वारे “तुमची भांडवल, तुमचे हक्क” नावाची मोहीम सुरू केली आहे. आरबीआयने “उद्गम” नावाचे एक पोर्टल तयार केले आहे. जर दावेदार किंवा वारसांनी आवश्यक कागदपत्रे सादर केली तर या पैशावर कायदेशीर दावा करता येणार आहे. दावा न केलेल्या निधीचा दावा करण्यासाठी, ओळखपत्र (आधार, पॅन, पासपोर्ट), बँक…
मुंबई : वृत्तसंस्था गेल्या विधानसभा निवडणुकीनंतर देशासह राज्यातील काही विरोधकांनी मतचोरीचा आरोप केल्याने मोठी खळबळ उडाली होती. आता राज्यातील प्रमुख विरोधी पक्षनेत्यांनी आज (मंगळवार) राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांची भेट घेतली. या भेटीवेळी विरोधकांनी निवडणूक प्रक्रियेतील विविध गंभीर त्रुटींवर आवाज उठवला. यावेळी राज ठाकरे यांनी विशेषतः मतदार याद्यांमधील ‘घोळ’ आणि ‘मतदार नोंदणी’ थांबवल्याच्या मुद्द्यावर तीव्र आक्षेप घेत अनेक प्रश्न उपस्थित केले. या सर्वपक्षीय शिष्टमंडळात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (शिवसेना-उबाठा), मनसेप्रमुख राज ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड, शिवसेना (उबाठा) नेते अनिल देसाई, अनिल परब आणि…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील सर्वोच्च न्यायालयाने लष्कराविरुद्ध अपमानास्पद टिप्पणी केल्याच्या प्रकरणात काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याविरुद्ध सुरू असलेल्या सुनावणीवरील स्थगिती २० नोव्हेंबरपर्यंत वाढवली आहे. हा खटला २०२२ मध्ये काँग्रेस पक्षाच्या भारत जोडो यात्रेशी संबंधित आहे. ज्यामध्ये राहुल गांधींवर लष्कराविषयी अपमानास्पद टिप्पणी केल्याचा आरोप होता. या प्रकरणातील सुनावणी लखनौ न्यायालयात सुरू होती, ज्याला सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिली होती. आता ती २० नोव्हेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. न्यायमूर्ती एम.एम. सुंदरेश आणि विपुल एम. पंचोली यांच्या खंडपीठाने, “याचिकाकर्त्याच्या वकिलांनी उत्तर शपथपत्र दाखल करण्यासाठी स्थगिती देण्याची विनंती करणारे पत्र सादर केले आहे, त्यामुळे हे प्रकरण २० नोव्हेंबर २०२५ साठी सूचीबद्ध आहे. ४ ऑगस्ट…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील मनसेचे माजी नेते आणि खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी अखेर भाजपमध्ये प्रवेश केला आहे. तीन वेळा पुढे ढकलला गेलेला हा पक्षप्रवेश आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पार पडला. कोकणात भाजपची पकड मजबूत करण्याच्या रणनीतीचा भाग म्हणून खेडेकरांचा हा प्रवेश महत्त्वाचा मानला जात आहे. मनसेतील राज ठाकरे यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाणारे खेडेकर यांची अलीकडेच भाजप आणि शिंदे गटाशी जवळीक वाढली होती. यामुळे मनसेने त्यांची पक्षातून हकालपट्टी केली. त्यानंतर खेडेकरांनी भाजप प्रवेशाचा निर्णय घेतला, पण तो रखडत गेल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. “भाजप खेडेकरांना झुलवत आहे का?” असा प्रश्न उपस्थित झाला…

