एरंडोल : प्रतिनिधी पोलिस स्टेशनमधील कर्मचारी बापू लोटन पाटील हा ३ हजाराची लाच स्विकारताना धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पथकाच्या जाळ्यात अडकला. त्यास लाच घेताना रंगेहाथ पकडल्यानंतर धुळ्याला नेण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी घडलेल्या अपघातात जप्त केलेली दुचाकी परत देण्याकरिता नुकत्याच काही दिवसांपूर्वी जळगावहून एरंडोल येथे बदली होऊन आलेला पोलिस हवालदार बापू लोटन पाटील याने म्हसवे (ता. पारोळा) येथील तक्रारदाराकडून पैशांची मागणी केली. विशेष म्हणजे तक्रारदार हा स्वतः अपघातात जबर जखमी झालेला असतानाही त्याच्याकडून पैशांची अवास्तव मागणी करण्यात आली. तडजोडीअंती ३ हजार रुपयात प्रकरण मिटविण्याचे ठरले. त्यानंतर ठरल्याप्रमाणे तक्रारदार याने बापू पाटील याला एरंडोल हायवे चौफुली येथे रक्कम घेण्यासाठी…
Author: editor desk
आजचे राशिभविष्य दि. १७ ऑक्टोबर २०२५ मेष आज तुम्हाला एखाद्या राजकीय संबंधाचा फायदा होण्याची आशा आहे. तुम्ही तुमच्या बुद्धिमत्तेने आणि प्रतिभेने काही निर्णय घ्याल, जे तुम्हालाही आश्चर्यचकित करतील. घरातही तुमचे उत्कृष्ट सहकार्य राहील. कोणत्याही अनोळखी व्यक्तीला आपल्याबद्दल माहिती देऊ नका, अन्यथा कोणीतरी तुमचा विश्वासघात करू शकतो. विद्यार्थ्यांनी अभ्यासावर अधिक लक्ष केंद्रित करावे. आळस तुमच्यावर हावी होऊ देऊ नका. कोणत्याही व्यवसायात गुंतवणूक करण्यापूर्वी विचार करा. वृषभ आज तुम्हाला अडकलेले पैसे मिळू शकतात, त्यामुळे प्रयत्न करत राहा. दिवसाच्या पहिल्या भागात आपले महत्त्वाचे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. या काळात ग्रहमान उत्कृष्ट राहील. दुपारनंतर कोणतीही अप्रिय बातमी किंवा सूचना मिळाल्याने घरात निराशा निर्माण…
पुणे : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकार मधील उपमुख्यमंत्री अजित पवारांनी एक मोठी घोषणा केली आहे. मागच्या महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने 31 हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले आहे. या पॅकेजनुसार शेतकऱ्यांना संपूर्ण मदत दिली जाईल. मदत कशा प्रकारे दिली गेली आहे, याची सविस्तर माहिती ही शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाल्यानंतर स्पष्ट होईल. दिवाळीपूर्वी ही मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यासंदर्भात वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता यांना स्पष्ट सूचना देण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. विरोधी पक्ष याबाबत शेतकऱ्यांची दिशाभूल करत असल्याची टीकाही त्यांनी या वेळी केली. विभागीय…
अमळनेर : प्रतिनिधी चार हजार रुपयांची लाच स्वीकारताना अमळनेर तालुक्यातील ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उपविभागीय अभियंत्यास एसीबीने रंगेहाथ पकडले. दिलीप पाटील असे लाचखोर अभियंत्याचे नाव असून या कारवाईने लाचखोरांमध्ये खळबळ उडाली आहे. सविस्तर वृत्त असे कि, अमळनेर तालुक्यातील ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उपविभागीय अभियंता दिलीप पाटील यांना नंदुरबार आणि जळगाव विभागाच्या लाचलुचपत विभागाने ४ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडल्याची घटना १५ रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली. दिलीप पाटील यांच्याकडे धरणगाव ग्रामीण पाणी पुरवठ्याचा ही पदभार होता. तेथील एका प्रकरणात मंजुरीसाठी दिलीप पाटील यांनी दुपारी २ वाजता ४ हजार रुपयांची लाच मागितली होती. फिर्यादीने जळगाव आणि नंदुरबार लाचलुचपत विभागाला कळवल्यानंतर सापळा…
जळगाव : प्रतिनिधी शिरसोली येथील नेवरे परिसरातील धरणामध्ये मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेल्या एका तरुणाचा पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून मृत्यू झाला आहे. ही घटना बुधवार, ऑक्टोबर रोजी सकाळी १५. १० वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शरद राजाराम सुने (बारी, वय ३१, रा.शिरसोली प्र.न.) असे मयत तरुणाचे नाव आहे. त्याच्या पश्चात आई-वडील आहेत. तो कुटुंबातील एकुलता एक मुलगा होता. बुधवारी सकाळी तो भिका वसंत शिंपी (वय ४५) आणि अशोक सखाराम भिल (वय ५०) यांच्यासोबत नेवरे शिवारातील धरणात पोहण्यासाठी गेला होता. धरणात पोहत असताना शरदला पाण्याचा अंदाज आला नाही आणि तो बुड्डू लागला. सोबत असलेल्या मित्रांनी घाबरून गावाकडे धाव घेतली आणि…
चोपडा : प्रतिनिधी शहादा येथील न्यायालयाच्या तत्कालीन न्यायाधीशांच्या निवासस्थानासह चोपड्यातील निवृत्त कर्मचाऱ्याच्या घरी चोरी करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी जेरबंद केले आहे. सविस्तर वृत्त असे कि, शहरातील सेवानिवृत्त इसम विजय नारायण बाविस्कर (६९, यावल रोड, चोपडा) यांच्या घरात मागील महिन्यात घरफोडी झाली होती. अज्ञात चोरट्याने सोन्याचे दागिने आणि मोबाईल असा ऐवज लंपास केला होता. याप्रकरणी गुन्हा दाखल होता. पोलिसांनी तपासादरम्यान आरोपी प्रकाश विजय पावरा (२८, तोरणमाळ, जि. नंदुरबार) याने हा गुन्हा केल्याचे निष्पन्न केले. त्याला दि. १२ ऑक्टोबर रोजी शिरपूर शहरातून ताब्यात घेण्यात आले. प्रकाश हा घरफोडी व चोरी करणारा सराईत आरोपी असून त्याच्यावर शहादा आणि दोंडाईचा पोलिस स्टेशनमध्ये १० ते १२…
जळगाव : प्रतिनिधी स्थानिक गुन्हे शाखेने मुक्ताईनगर आणि वरणगाव परिसरातील पेट्रोल पंपांवर झालेल्या सशस्त्र दरोड्याचा गंभीर गुन्हा अवघ्या चार दिवसातच उघडकीस आणला आहे. पोलिसांनी आंतरजिल्हा दरोडेखोर टोळीतील सहा संशयित आरोपींना अटक करून त्यांच्याकडून एकूण १ लाख ३३ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. बुधवारी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ९ ऑक्टोबर रोजी रात्री १० ते ११ च्या दरम्यान बोदवड चौफुली मुक्ताईनगर येथील ‘रक्षा टोफ्युअल’, कर्की फाटा येथील ‘मनुभाई आशीर्वाद पेट्रोलपंप’ आणि वरणगाव शिवारातील ‘सय्यद पेट्रोलपंप’ या तीन ठिकाणी पाच ते सहा अनोळखी व्यक्तींनी दरोडा टाकला होता. आरोपींनी बंदुकीचा…
आजचे राशिभविष्य दि. १६ ऑक्टोबर २०२५ मेष राशी विद्यार्थ्यांना आज अभ्यासात एक नवीन बदल अनुभवायला मिळेल, जो त्यांच्या भविष्यासाठी फायदेशीर ठरेल. तुमचे आरोग्य चांगले राहील. तुम्ही तुमच्या प्रियजनांसोबत खूप छान वेळ घालवाल.कौटुंबिक सौहार्द राखण्यात तुम्ही महत्त्वाची भूमिका बजावाल. काही लोक तुमच्या व्यवसायात खूप मदतगार ठरतील आणि तुम्हाला दुसऱ्या कंपनीत काम करण्याची संधी मिळेल. वृषभ राशी नियमित दिनचर्या आणि आहारामुळे निरोगी आणि उत्साही रहाल. तुमच्याकडे स्वतःची कामे करण्याची क्षमता असेल. व्यवसायातील चढउतार आणि आर्थिक परिस्थितीमुळे तुम्हाला कौटुंबिक खर्चात कपात करावी लागू शकते. मिथुन राशी तुमच्या पालकांसोबतचे तुमचे संबंध सुधारतील. तुमचा जोडीदार तुमच्या बोलण्याने प्रभावित होईल आणि तुमच्या कामात मदत करेल. आज…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महाविकास आघाडीसह मनसे आणि इतर विरोधी पक्षांची एकत्रित शिष्टमंडळ राज्य निवडणूक आयुक्त आणि राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्यासोबत बैठक झाली. या बैठकीत निवडणूक प्रक्रियेतील त्रुटी, मतदार यादीतील गोंधळ आणि प्रशासनाच्या पक्षपाती कारभाराबाबत मुद्दे उपस्थित करण्यात आले. विरोधी पक्षाच्या नेत्यांनी आज पुन्हा एकदा निवडणूक आयुक्तांची भेट घेऊन मतदार यादी आणि बोगस नावावरुन आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने विविध मुद्द्यांवर संवाद साधला.बैठक झाल्यानंतर विरोधी पक्षातील नेत्यांनी एकत्र वाय.बी.चव्हाण येथे पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. पत्रकार परिषदेत जयंत पाटील, राज ठाकरे, बाळासाहेब थोरात आणि उद्धव ठाकरे यांनी मतदार याद्यातील घोळ आणि निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करत…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आणि आमदार बच्चू कडू यांनी राज्य सरकारच्या एका निर्णयावरून भाजपवर जोरदार टीका केली आहे. मुंबईतील नरिमन पॉइंट येथे प्रहार जनशक्ती पक्षाला दोन वर्षांपूर्वी देण्यात आलेले पक्ष कार्यालय राज्य सरकारने रद्द केले आहे. जागा रद्द करताना कोणतीही पर्यायी जागा न दिल्याने बच्चू कडू संतप्त झाले आहेत. या निर्णयावरून त्यांनी जोरदार टीका करत भाजपला ‘विष’ संबोधले आहे. तसेच भाजपची तुलना ही सापाशी केली आहे. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री असताना मंत्रालयाजवळ असलेल्या ‘जनता दल सेक्युलर’ (JDS) पक्षाच्या कार्यालयाची जागा कमी करून ती प्रहार जनशक्ती कार्यालयाला उपलब्ध करून दिली होती. फडणवीस सरकारने हा निर्णय बदलला असून,…

